दिशा भाग 39

Sharayu And Everyone Get To Know The Actual Truth


दिशा:- भाग 39

शरयू सुद्धा स्वतःला थांबवू शकली नाही. तिचा ही बांध फुटला. तो व्यक्ती ज्याचा ती मनापासून आदर करत होती तोच व्यक्ती हा निघावा की ज्याचा न बघताही ती अत्यंत द्वेष करत होती.

एक सर म्हणून जितका आदर तितकाच एक बाप म्हणून तिच्या मनात संताप होता.
बराच वेळ मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या.

शरयू पण नाही आली नाही, तिचा कॉल ही आला नाही ल, त्यामुळे प्रीती त्यांना बघायला बाहेर आली. समोरचं दृश्य बघून ती घाबरली.
"शरयू काय झालंय?\"" तसे शरयू तिला मिठी मारून रडायला लागली.
"बोल ना शरयू!
पण शरयू नुसतीच रडत होती. तिच्या रडण्याचा भर काही ओसरेना.
"काकू तुम्ही तरी बोला" ती विनवणी करत होती पण जणू या दोघी निशब्द पणे रडत होत्या.

त्यांचे रडणे पाहून तिला एकच गोष्ट जाणवली की या दोघींवरती पहाड कोसळला आहे.

घाबरून तिने आदित्यला कॉल केला "आदित्य लगेच बाहेर ये! शरयू, बघ कसं करतेय.."

तिचे बोलणे चालू असतानाच तो काळजीने धावतच बाहेर आला.

"प्रीती काय झालंय नक्की?"
"अरे मला पण माहित नाही. मी आहे तेव्हापासून बघतेय, दोघी रडत आहेत फक्त"

"शरयू काय होतंय तुला?" त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

पण कोणीच काही बोलेना.

"आई तुम्ही तरी बोला ना! काय झाले कळल्याशिवाय मी सोल्युशन कसे काढणार?"

तरी त्या दोघींचे रडणे काही थांबत नव्हते.

"अहो जीव जाईल काळजीने माझा.प्लीज बोला कोणीतरी" तो विनवत होता.

ज्या पद्धतीने तो बाहेर आला होता त्यावरून सीमा आई आणि आत्याच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. त्याही दोघी बाहेर असल्या.

आईला पाहून शरयू ने घट्ट मिठी आईला मारल. तिचे रडणे सुरूच होते.

"शरयू,शालिनी ताई, अहो बोला काय झालंय?"

"आई काहीच उरले नाही बोलायला." शरयू रडत रडत म्हणाली.

"तरी सांगा आम्हाला कसे कळणार?"

आता आदित्यचा पेशन्स संपला. तो वैतागून ओरडलाच.
" थांबवा हे आता!आताच्या आता थांबवा! काय संपलय? काय झालंय नक्की?"

क्षणभर शरयू ने शालिनी आईकडे पाहिली..ती डोळ्याला पदर लावून होती.

"शरयू, फॉर गॉडस सेक, प्लीज टेल मी" तो तिला हलवत म्हणाला.

"आदित्य, तो दिसला आईला" ती स्फुंदुन रडत म्हणाली

"कोण दिसला?"

"तोच!"

"अग कोण तो?"

"माझा जन्मदाता बाप!"

तसे सगळे एकदम चमकले.काही क्षण एक भयाण शांतता पसरली.

सीमा आईने ने शालिनी आईला कुशीत घेतले.

"शरयू आर यू सीरियस? म्हणजे इथे? या ठिकाणी? कोण? कुठे?"

"इथेच, याच ठिकाणी, आपल्या डोळ्यासमोर"

"कोण आहे तो सांग मी त्याला पकडून आणतो"

"तू काय, आपण कोणीच त्याला पकडू शकणार नाही आदित्य"

"का?"

"कारण हा तोच तो माणूस आहे, ज्याची तोंडभर स्तुती आपण करतो. आपला बिग बॉस! आपले मोठे सर"

हे ऐकल्यानंतर त्याचंही डोकं गरगरयला लागलं.
प्रीती,आई, आत्या यांची परिस्थिती काही वेगळी नव्हती.

प्रीती ने शरयूचा हात घट्ट पकडुन ठेवला होता.

तेवढ्यात त्याला शोधत शोधत आदिती आली.

"आदित्य, अरे तुला मोठे सर बोलावत आहेत. माईक वर त्यांनी तुझे नाव घेतले आत्ता."

क्षणात निग्रह करुन त्यायने मनाशी काही ठरवले.

"शालिनी आई ला घेऊन आत चल शरयू" पहिल्यांदा हुकमी स्वर काढत तो बोलला.

यावर शालिनी आई नाही म्हणाली.
शरयू च्या डोळ्यात सुद्धा प्रश्नचिन्ह होते.

"चल शरय, वेळ नाही घालवायचा आहे"
तसे शरयू ने तिचा हात पकडून तिला ओढले.
ती नाही नाही म्हणत असताना सुद्धा ते सगळे निघाले.
सगळ्यात पुढे आदित्य तर सगळ्यात मागे शरयू आणि शालिनी आई होते..

ताज चा तो भव्य हॉल माणसांनी पूर्ण भरून गेला होता. ह्यांनी आत जाऊन बघितले तर मोठे सर सगळ्यांच्या कुटुंबीयांना भेटत होते.

आदित्य त्यांच्यापाशी गेला आणि मागून त्यांच्या खांद्याला हात लावला.
त्यांनी मागे वळून पाहिले आणि म्हणाले, "अरे कुठे होतास आदित्य? कधीचा बोलवतो आहे मी. शरयू कुठे आहे? हॅलो प्रीती"

"इथेच होतो मी! तुम्हाला कोणालातरी भेटवयचे आहे"

"हो हो भेटव ना, आज मला सगळ्यांना भेटायचं आहे

आदित्य ने खूण करताच, मागे असलेल्या शरयू ने हाताला धरून शालिनी आईला पुढे केले.

शालिनीला बघून ते एकदम स्तब्ध झाले. आश्चर्य आणि भीती या दोन्हींचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असताना दुसऱ्या क्षणाला ते बाजूच्या खुर्चीचा आधार घेऊन ते खालती बसले.

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all