Login

दिशा भाग 44

Sir Asks For Apology To Shalini


दिशा:- भाग 44

"अजिबात माफ करू नको आई या माणसाला! यांनी फक्त विश्वास घात नाही केला तर तुझे पूर्ण आयुष्य बरबाद केलं आहे. कुठल्याही क्षमा करणाच्या लायकीचा नाही आहे हा माणूस. आयुष्यभर याला क्षमा न करणे हीच मोठी शिक्षा आहे याच्यासाठी" असे म्हणून शरयू शालिनी आईचा हात पकडून तडक तिथून निघून गेली.

ती गेली तसे आदित्य आणि सर तिच्या जाण्याकडे नुसते पाहत बसले.
सरांचा बांध अजून फुटला तर आदित्यला काय करावे हे न कळल्यामुळे तसाच उभा राहिला.

बाहेर पार्टी मात्र चालू होती, आत काहीतरी चालू आहे हे लोकांना माहिती होते पण काय हे नक्की कळल्यामुळे सगळे आपापल्या गोष्टी मध्ये गुंग होते.

आदित्यने तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि म्हणाला, " सर तुमचे आता बाहेर सगळ्यामध्ये मिसळणे खूप गरजेचे आहे. तुम्ही आता स्वतःला आवरा आणि बाहेर चला. ही पार्टी तुम्ही दिलेली आहे. तुम्ही बाहेर जा. सगळ्यांशी नॉर्मल वागणे गरजेचे आहे. हे आता नाही झाले तर बरेच प्रश्न उत्तरे उठतील त्यामुळे तुम्ही चला आता" आदित्य त्यांना धीर ही देत होता आणि समजावत पण होता.

खरं तर त्यांना काही सुचत नव्हते. पण स्वतःच्या नावाचा डोलारा जो उभारला होता तो सांभाळणे गरजेचे सुद्धा होते.

आईला हाताला धरून निघालेली शरयू बाहेर आली आणि तिने सीमा आई आणि आत्याकडे सूचक बघितले. तसे अंदाज घेत त्याही दोघी यांच्या मागे निघाल्या. प्रीतीला काहीच कळत नव्हते काय करू? ती आदित्य ची वाट बघत तिथेच गोंधळत उभी राहिली.

शरयू ने टॅक्सीला हात दाखवत थांबवले आणि सरळ आत जाऊन बसली, तसे पाठोपाठ या दोघींनीही शालिनी आईला आत बसवले आणि स्वतःही आत बसल्या.
तिथून निघाल्यावर टॅक्सी सरळ त्यांच्या सोसायटीच्या दिशेला निघाली.

आदित्य सोबत सर बाहेर आले. त्यांना बघून कोणालाही कळत होते की त्यांची तब्येत बिघडली आहे. एकंदरीत एक "सर" म्हणून त्यांच्या इमेज प्रमाणे त्यांचा आदर हा सगळ्यांना होताच.

"सॉरी एव्हरीवन! माझी तब्येत अचानक बिघडल्याने मला तुमच्यासोबत नाही थांबता आले. आताही मला श्वास घेता येत नाही आहे त्यामुळे मी डॉक्टरकडे निघतो. तुम्ही छान एन्जॉय करा. आदित्य बघ सगळे नीट, तुझ्यावर जवाबदारी देतो आहे" असे म्हणून ते खरंच बाहेर पडले.

ते गेल्यावर सगळ्या स्टाफ मध्ये थोडी चर्चा झाली पण आदित्यने सगळ्यांना सांभाळले आणि सांगितले, " सरांना आता डॉक्टर कडे जाणे गरजेचे आहे.. त्यांनी आपल्या सगळ्यांना पार्टीमध्ये काही कमी राहणार नाही याची काळजी करून सगळं अरेंज करून दिला आहे सो आपण धडाकेबाज पार्टी करूया आणि त्याच्या या बोलण्यामुळे सगळे निश्चिंत होऊन पार्टीमध्ये मग्न झाले.

खरंतर आदित्यला शरयू सोबतच जायचे होते पण आता तो पूर्ण अडकला. त्याने पडलेल्या नजरेने प्रीती कडे बघितले तसे तिने त्याला हलकेच "नीट होईल" असे खुणावले.

नाईलाजाने त्यालाही त्या पार्टीचा भाग बनावे लागले. पार्टी जोरात सुरू होती. त्यातल्या त्यात संधी शोधून त्याने अदिती आणि प्रीतीलां सगळे सांगितले. दोघींनाही खरेतर हा मोठा धक्काच होता तो पण त्यांनी इतरांना काही जाणवू दिले नाही. एव्हाना आदित्य ने काय घडले हे आईला पण सांगितले होते, त्यांना नवल वाटले पण त्या काहीच बोलल्या नाहीत.
शरयू ने घरात प्रवेश केला आणि ती एकदम सोफ्यावर अंग टाकून स्पुंदन रडू लागली.

सीमा ने शालिनीला धरून काळजीने रूम मध्ये नेले. शालिनी आईजवळ बसत प्रेमाने त्यांचा हात हातात घेतला.

"मला माफ करा सीमा ताई. माझ्यामुळे खूप तमाशा झालंय आज." त्यांचे डोळे ओलावले होते.

"नाही! उलट जे झाले ते खूप चांगले झाले आहे. आज तुमचा ही ज्वालामुखी बाहेर पडलाय जो गरजेचा होता. शरयू हा धक्का नक्कीच पाचवेल. तिला खूप आदर होता तिच्या सरांबद्दल पण तोच माणूस तिचा जन्मदाता निघाला ज्याने तिच्या आईचे आयुष्य उध्वस्त केले.
त्यांचा मुखवटा आज तुटला आहे . जे त्यांनी केले ते माफीच्या पलीकडे आहे, कोणतीही स्त्री त्यांना माफ करूच शकत नाही. पण मला तुमच्यासाठी एका अर्थाने चांगले वाटते आहे की तुम्ही आज काय आयुष्य जगलात ते त्याच्यापुढे बोलण्याची हिम्मत केलीत."

सीमा आई बोलत होती तर तेवढ्यात आत्या कॉफी घेऊन आली त्या दोघांसाठी.

"सीमा ताई , माझी शरयू तुम्ही सांभाळली आहे. ती तुमचीच मुलगी आहे, जी या उच्चभ्रू समजत वाढली म्हणून तिला स्थान आहे. जर त्या वेळी तुम्ही आला नसतात तर मी विचारही करू शकत नाही तिच्या आयुष्याबद्दल....." त्यांना एकदम हुंदका आला.

"ती काय आणि तुम्ही काय, माझ्या घराचं अविभाज्य भाग आहात. समाज हा माणुसकीने बनायला हवा पण दुर्दैव की तसे घडत नाही. तुम्ही काही काळजी करू नका,आम्ही सगळे सोबत आहोत तुमच्या"

आज पहिल्यांदा शालिनी आईला कोणी प्रेमांचे शब्द बोलले होते ज्यात भक्कम आधार होता. नकळत ती सीमा आईच्या मिठीत सामावली.

"शरयू चल उठ! कॉफी घे बघू, तू अशी कमकुवत नाहीस जी खचेल कशाने" आत्या तिला उठवत म्हणाली.

"माझी शरू खूप स्ट्राँग आहे मला माहित आहे. तू जर रडली तर शालिनी ताईला कोण सांभाळेल. तुझा तो बाप...."

"तो माझा बाप नाही..." शरयू कडाडली तसे त्या दोघीही घाबरून बाहेर धावत आल्या.

तेवढ्यात दाराची बेल वाजली.
आत्याने पुढे होऊन दरवाजा उघडला तसे त्यांचे डोळे विस्फारले.

कारण समोर ती व्यक्ती उभी होती जिला बघून शरयू काय वागेल हे सांगता येत नव्हते.

समोर सर उभे होते.
शरयू च्या घरी येतील असा विचार कोणी केला नव्हता.
"या..." आत्या असे म्हणाले आणि दरवाजातून बाजूला झाली.

ते आत आले तसे शरयूची नजर त्यांच्याकडे गेली.
त्यांना पाहून तिच्या नजरेत अंगार फुलला.
ताडकन उभे राहत ती म्हणाली, "तुम्ही इथे का आला आहात?"

*मी तुझ्या आईला भेटायला आलोय मला तिला भेटू दे."

"तुम्ही तिला नाही भेटू शकत"

"का?"

"तुम्ही विचारताय? हे तुम्ही विचारताय ? एवढं सगळे करून परत हे विचारताय तुम्ही?"

"शरयू मला तुझ्या आईला भेटणे गरजेचे आहे, तू काही काळ मध्ये येऊ नकोस. आमचे भेटणे हे महत्त्वाचे आहे."

"त्यांना बोलू दे शरयू .."आतून शालिनी आई येत म्हणाली.

"पण आई..."

तसे तिला थांबवत शालिनी आई म्हणाली, "मी बघते काय करायचे ते.."

शरयु चां नाईलाज झाला. ती आत मध्ये निघून गेली बाकी सगळे सुद्धा आपापल्या खोलीत गेले बाहेरच्या हॉलमध्ये फक्त सर आणि शालिनी दोघेच जण राहिले.

थोडा वेळ शांततेत गेलां, कोणीच काही बोलले नाही. आणि मग काही काळाने सरांनी बोलायला सुरुवात केली..

"माझं चुकलं आहे शालिनी.. आयुष्यात सगळं कमावलं पण तुला गमावलं आयुष्यात जे जे काही हवं ते मिळवण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचं कोणी आपलं राहिलं नाही. माझ्या मनात हा विचार पण नाही आला की तू त्याच ठिकाणी इतके वर्ष राहशील. तुझे आयुष्य तिथेच जाईल. मला नव्हते वाटले की मी तुला तिथे सोडल्यावर ती तुला तिथून बाहेरच पडता येणार नाही आणि तू संपूर्ण तुझे आयुष्य त्या वस्तीत घालवशील.

आपल्या मुलीबद्दल पण मला काही माहिती नव्हतं.. स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मी तुझा बळी दिला पण मी कधीच सुखी समाधानी नव्हतो. आतून काहीतरी अपूर्णत्व वाटायचे. असे जाणवत राहायचे काहीतरी मी चुकीचे केले आहे. मनातून कुठल्याच क्षणाला मी शांत होतो असे नाही फक्त आणि फक्त काहीतरी करत राहीलो.

मी तुला सगळ्याच समाधान कारक उत्तर देत आहे किंवा स्पष्टीकरण देतोय असे बिलकुल नाही पण माझ्या आयुष्यात तुझी माफी मिळणे ही एकमेव गरज राहिली आहे मला फक्त माफी नकोय मला तू पण हवी आहेस जशी आहे तशी.

मला मला तू पूर्णपणे मान्य आहेस आणि मी तुला संपूर्ण स्वीकारायला तयार आहे.

माझ्याकडे सगळं आहे फक्त तू नाहीयेस!
तू म्हणशील एवढ्या वर्षांनी माझी काय किंमत तर असे समज या सगळ्याच्या वरती तू आहेस.

मला माफ कर आणि मला स्वीकार शालिनी."

त्यांच्या या बोलण्यावरती शालिनी शांत होती तिच्याकडून काही प्रतिसाद येईना म्हणून त्यांनी विचारले,
" काही बोल ना शालिनी..."

"जर शरयू ने तुम्हाला माफ केले तर मी पण तुम्हाला माफ करेन" एवढे बोलून ती आत मध्ये गेली.


क्रमशः
अमित मेढेकर

🎭 Series Post

View all