जलदकथा लेखन स्पर्धा नोव्हेंबर-२०२५
शीर्षक-दिसतं तसं नसतं..
"दुरून डोंगर साजरे "
शीर्षक-दिसतं तसं नसतं..
"दुरून डोंगर साजरे "
सकाळची वेळ.
कॉलेजच्या परिसरात सूर्यकिरण गालांवर स्पर्श करत होते, आणि हलकं वारा येत होतं.
त्या वाऱ्यातून हसण्याचे सूर ऐकू येत होते —
“अरे थांब ना! परत माझ्या नोटबुकमध्ये लिहू नकोस!”
हसत-खेळत कॅम्पसमध्ये चालत येणारी मुलगी म्हणजे अंकिता पाटील.
दिसायला एकदम सुंदर — पण तिच्या सौंदर्याचं रहस्य फक्त तिच्या चेहऱ्यात नव्हतं;
ते होतं तिच्या डोळ्यांत.
मोठे, भावपूर्ण, जादूई. जणू त्या नजरेत पाहिलं की काळ थांबून जातो.
दिसायला एकदम सुंदर — पण तिच्या सौंदर्याचं रहस्य फक्त तिच्या चेहऱ्यात नव्हतं;
ते होतं तिच्या डोळ्यांत.
मोठे, भावपूर्ण, जादूई. जणू त्या नजरेत पाहिलं की काळ थांबून जातो.
कॉलेजच्या गेटमधून आत येणारा प्रत्येक नवखा विद्यार्थी तिच्याकडे एकदा का होईना पाहतच राहायचा.
ती लोकप्रिय होती, पण अभिमान नव्हता.
ती नेहमी हसरी, सगळ्यांशी मिसळणारी.
ती लोकप्रिय होती, पण अभिमान नव्हता.
ती नेहमी हसरी, सगळ्यांशी मिसळणारी.
दररोज तिच्या भोवती चार-पाच मुलं जमायची —
कोणी तिच्या प्रोजेक्टचं कौतुक करायचं, कोणी तिच्या केसांचं, तर कोणी तिच्या स्मिताचं.
पण ती हसून म्हणायची—" कौतुक ज्ञानाचे करा चेहऱ्याचं नाही.”
कोणी तिच्या प्रोजेक्टचं कौतुक करायचं, कोणी तिच्या केसांचं, तर कोणी तिच्या स्मिताचं.
पण ती हसून म्हणायची—" कौतुक ज्ञानाचे करा चेहऱ्याचं नाही.”
तिचा हा आत्मविश्वासच तिला वेगळ बनवत होता.
कॉलेजमध्ये तिची जिवलग मैत्रीण होती — कीर्ती कदम.
गोल चेहरा, गालावर खळी, आणि नेहमी ओठांवर हास्य.
अंकिता आणि कीर्ती म्हणजे दोन जिवाभावाच्या बहिणी.
लहानपणापासून एकत्र शाळा, मग कॉलेज, आणि आता करिअरची स्वप्नंही जवळपास सारखीच.
गोल चेहरा, गालावर खळी, आणि नेहमी ओठांवर हास्य.
अंकिता आणि कीर्ती म्हणजे दोन जिवाभावाच्या बहिणी.
लहानपणापासून एकत्र शाळा, मग कॉलेज, आणि आता करिअरची स्वप्नंही जवळपास सारखीच.
त्या दोघी दररोज कॉलेजच्या कॅन्टीनमधल्या कोपऱ्यात बसून कॉफी प्यायच्या आणि भविष्याचे रंग भरायच्या.
एका दुपारी कीर्ती म्हणाली—
“अगं, तुझ्यासाठी कुठला राजकुमार शोधून आणणार बरं? तुझ्या सौंदर्याला योग्य तो मिळेल का गं?”
अंकिता खळखळून हसली.
“राजकुमार नको गं. मला तर फक्त असा कोणी पाहिजे जो माझं बोलणं ऐकेल.
मी बोलकी आहे, गप्प बसणं जमत नाही मला.”
मी बोलकी आहे, गप्प बसणं जमत नाही मला.”
कीर्तीने मिश्किलपणे विचारलं—
"मग तुझा होणारा नवरा नक्की त्रस्त होणार. दिवसभर गप्पा ऐकून कंटाळेल.”
“असं नाही गं, प्रेमात कंटाळ कुठे असतो?” अंकिता डोळे मिचकावत म्हणाली.
पण काळ सरकतोच.
कॉलेजचे शेवटचे दिवस आले.
कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, आणि अंकिताला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब मिळाला.
कीर्ती दुसऱ्या शहरात गेली, पण दोघींचं बोलणं कायम सुरू होतं — फोनवर, मेसेजवर, आणि आठवणींमध्ये.
कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, आणि अंकिताला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब मिळाला.
कीर्ती दुसऱ्या शहरात गेली, पण दोघींचं बोलणं कायम सुरू होतं — फोनवर, मेसेजवर, आणि आठवणींमध्ये.
आता अंकिता नोकरीला जायची — नीटनेटका ऑफिस ड्रेस, बांधलेले केस, आणि चेहऱ्यावर तीच चमक.
कामात ती एकदम परफेक्ट होती . सगळे तिचं कौतुक करायचे — "स्मार्ट, प्रोफेशनल, डेडिकेटेड."
कामात ती एकदम परफेक्ट होती . सगळे तिचं कौतुक करायचे — "स्मार्ट, प्रोफेशनल, डेडिकेटेड."
पण संध्याकाळी घरी येऊन जेव्हा ती एकटी बसायची, तेव्हा शांततेत काहीतरी कमी वाटायचं.
फोन उचलून कीर्तीला म्हणायची —
फोन उचलून कीर्तीला म्हणायची —
"लोक आहेत, गप्पा आहेत, पण तरी एकटं वाटतंय.”
कीर्ती म्हणायची—
“अगं, सगळं परफेक्ट असले तरी माणसाला माणूस हवा असतो.
तुझं मन प्रेम शोधतंय कदाचित.”
तुझं मन प्रेम शोधतंय कदाचित.”
काही महिन्यांनी एका सकाळी आईने हळू आवाजात सांगितलं—
“अंकिता, एका चांगल्या मुलाचं स्थळ आलंय. आपल्याच समाजातलं आहे.
मुलाचं नाव ऋषी देशमुख. कॉर्पोरेटमध्ये काम करतो. खूप शांत, सुसंस्कृत, स्थिर मुलगा आहे.”
मुलाचं नाव ऋषी देशमुख. कॉर्पोरेटमध्ये काम करतो. खूप शांत, सुसंस्कृत, स्थिर मुलगा आहे.”
अंकिता थोडी गप्प राहिली.
तिला लग्न म्हणजे अजून भीतीच वाटायची.
पण आईच्या डोळ्यांत उत्सुकता होती, आणि घरात एक वेगळी हालचाल होती.
तिला लग्न म्हणजे अजून भीतीच वाटायची.
पण आईच्या डोळ्यांत उत्सुकता होती, आणि घरात एक वेगळी हालचाल होती.
काही दिवसांनी ऋषी आणि त्याचे आईवडील त्यांच्याकडे आले.
ऋषी उंच, गोरा, चेहऱ्यावर स्थिर शांतता.
तो हसला, पण आवाज फारसा नाही.
त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं — स्थैर्य, गंभीरता, आणि आत्मविश्वास.
आई म्हणाली —
“अंकिता, जा जरा ऋषीला घर दाखव,टेरेस दाखव.थोडं बोलून या तुम्ही दोघं.”
दोघं टेरेसवर गेले.
अंकिता हसत म्हणाली—
“तुम्ही फार शांत दिसता.जास्त बोलत नाही का? "
ऋषीने हसून उत्तर दिलं—
“कदाचित. मी जास्त बोलत नाही, पण ऐकतो.”
अंकिता चकित झाली.
“अरे वा, म्हणजे माझ्यासाठी योग्यच आहेस. मला तर बोलत राहायचं असतं.”
दोघं थोडं वेळ शांततेत उभे राहिले.
तो काही विचारत नव्हता, ती काही बोलत नव्हती.
पण त्या शांततेतही काहीतरी ‘जुळतंय’ असं दोघांनाही जाणवलं.
तो काही विचारत नव्हता, ती काही बोलत नव्हती.
पण त्या शांततेतही काहीतरी ‘जुळतंय’ असं दोघांनाही जाणवलं.
दोन आठवड्यांत लग्न ठरलं.
कीर्तीला बातमी कळली तेव्हा ती आनंदात ओरडली —
“अगं! अखेर माझ्या बेस्ट फ्रेंडचा राजकुमार आला!”
कीर्तीला बातमी कळली तेव्हा ती आनंदात ओरडली —
“अगं! अखेर माझ्या बेस्ट फ्रेंडचा राजकुमार आला!”
अंकिता म्हणाली—
“राजकुमार नाही गं, पण स्थिर मनाचा राजा आहे.”
कीर्तीने तिचं डोकं गोंजारत म्हटलं,
“अगं, असं म्हणतात ना — शांत माणसाच्या मनात महासागर असतो.
तू त्याला ओळखशील हळूहळू.”
तू त्याला ओळखशील हळूहळू.”
लग्नाची तयारी सुरू झाली.
सोन्याच्या दागिन्यांची झळाळी, रंगीत साड्या, आणि घरभर आनंद.
लग्नाच्या दिवशी अंकिता गुलाबी लेहंगा नेसून आली तेव्हा सगळ्यांचे डोळे थक्क झाले.
ती अप्सरेसारखी दिसत होती.
मंडपात सगळे तिचं कौतुक करत होते —
“काय दिसते बघ!”
“काय दिसते बघ!”
पण ऋषी मात्र शांत.
तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला — न बोलता, न हसता.
तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला — न बोलता, न हसता.
अंकिता मनोमन वाटलं — “एक शब्द तरी बोल ना… एक ‘सुंदर दिसतेस’ तरी म्हण.”
पण तसं काही झालं नाही.
पण तसं काही झालं नाही.
लग्नानंतरची पहिली रात्रही तशीच शांत.
तो तिच्याकडे हसून पाहतो, पण काही बोलत नाही.
तो तिच्याकडे हसून पाहतो, पण काही बोलत नाही.
इतकंच.
तिच्या मनात कुठेतरी रिकामी जागा निर्माण झाली होती.
तिला त्याच्या शांततेचं अर्थ समजत नव्हता.
ती विचारायची — “तो खरंच माझ्यावर प्रेम करतो का?”
तिला त्याच्या शांततेचं अर्थ समजत नव्हता.
ती विचारायची — “तो खरंच माझ्यावर प्रेम करतो का?”
पण प्रत्येक वेळी तो काही न बोलता तिच्या डोळ्यांत बघायचा,
आणि ती स्वतःलाच समजावायची —
आणि ती स्वतःलाच समजावायची —
“कदाचित हीच त्याची प्रेमाची भाषा असेल…
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा