चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - श्रावणी
टीम - श्रावणी
"श्रेया..माझा रुमाल कुठेय गं? काय यार हल्ली एक वस्तू वेळेवर मिळत नसते. वैताग आलाय नुसता. त्याला आधी राहुदे. माझ्या वस्तू कुठे आहेत ते आधी शोधून दे. दिवसभर कामं काय असतात गं तुला, की एक वस्तू जागेवर नीट ठेऊ शकत नाहीस तू?"श्रेयस वैतागत म्हणाला.
" हा घे तुझा रुमाल. समोरचं होता; फक्त मला बोलण्याचा नादात तुला तो दिसला नाही. खरतरं मला दिवसभर काहीच कामं नसतात. तू गेलास की मी अश्शी एक टिचकी वाजवते आणि मग सगळी कामं आपोआप होतात."श्रेया सुद्धा जरा तिरसटपणे म्हणाली.
"हे बघ श्रेया. तू सध्या मॅटरनिटी लिव्हमुळे भरपगारी सुट्टीवर आहेस, माझं तसं नाहीये. मी बाप झालो म्हणून माझा बॉस मला काय सुट्टी देणार नाहीये. शिवाय कामाचं प्रेशर आहे माझ्यावर त्यामुळे प्लीज..सकाळी सकाळी हे असले टोमणे देऊन दिवस खराब करू नको माझा. माझी कॉफी आणि टिफीन रेडी ठेव." श्रेयस पण वैतागून बाहेर जात म्हणाला.
बाहेर जाणाऱ्या श्रेयसला बघून श्रेयाच्या डोळ्यात टचकन पाणी जमा झाले. एवढा जीव ओतून प्रेम करणारा नवरा आत्ता मला एक मुलं झाल्यावर असं बोलायला लागला याचं तिला फार वाईट वाटलं. आपल्या रडणाऱ्या लेकाला हातात घेऊन श्रेया बाहेर आली.
"हम्म.. कॉफी."
टेबलवर कॉफी ठेऊन जात असताना श्रेयसने आवाज
"बरं ऐक, संध्याकाळी माझं जेवण बनवू नको. बॉस सोबत एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. त्यामुळे जेवण बाहेरच होईल माझं." कॉफी घेत असताना श्रेयस म्हणाला.
श्रेया मात्र काहीही न बोलता आतमध्ये निघून गेली. काहीवेळाने दरवाजा बंद झाल्याचा आवाज येताच श्रेया बाहेर आली. घरात इकडे तिकडे पडलेल्या वस्तू,खेळणी,टेबलवर असलेला कॉफीचा मग, चार्जिंगच चालू असलेलं बटण,अस्ताव्यस्त झालेल्या सोफ्यावरच्या उशा, आणि बरंच काही. तिच्या डोक्यात सारखे श्रेयसचे शब्द थैमान घालत होते. 'दिवसभर कामं काय असतात गं तुला, की एक वस्तू जागेवर नीट ठेऊ शकत नाहीस तू?'
त्या विचारातच ती एक नजर किचनकडे फिरवून सरळ बेडरूम मध्ये निघून जाते. स्वतःसाठी मस्तपैकी घरचा स्वाद मधून दोन टाईम घरगुती जेवण ऑर्डर करून खाऊन पिऊन श्रेया आराम करत असते. रात्री सुमारे दहा साडे दहा दरम्यान बेल वाजते. श्रेया दार उघडते आणि पुन्हा तिच्या खोलीत निघून जाते.
घरात पाय ठेवताच सगळ्यात आधी श्रेयस हॉल मधली लाईट लावतो आणि एकदम गोंधळतो. त्याचा कॉफी पिऊन सुकलेला मग सुद्धा तिथेच डायनिंग टेबलवर पडलेला असतो. संपूर्ण घरात नजर तो बेडरूम मध्ये येतो.
त्या विचारातच ती एक नजर किचनकडे फिरवून सरळ बेडरूम मध्ये निघून जाते. स्वतःसाठी मस्तपैकी घरचा स्वाद मधून दोन टाईम घरगुती जेवण ऑर्डर करून खाऊन पिऊन श्रेया आराम करत असते. रात्री सुमारे दहा साडे दहा दरम्यान बेल वाजते. श्रेया दार उघडते आणि पुन्हा तिच्या खोलीत निघून जाते.
घरात पाय ठेवताच सगळ्यात आधी श्रेयस हॉल मधली लाईट लावतो आणि एकदम गोंधळतो. त्याचा कॉफी पिऊन सुकलेला मग सुद्धा तिथेच डायनिंग टेबलवर पडलेला असतो. संपूर्ण घरात नजर तो बेडरूम मध्ये येतो.
"श्रेया.. अगं काय हे? घराची काय अवस्था झाली आहे!" श्रेयस बेडरूमच्या पसाऱ्याकडे बघत म्हणाला
"अरे सॉरी रे श्रेयस..आज ना माझ्या टिचकीने कामचं नाही केलं." श्रेया म्हणाली.
"म्हणजे?"
"तू सकाळी काय बोललास ते आठव!"श्रेया म्हणाली.
"तू एवढं काय सिरियस होतेस!" श्रेयस म्हणाला.
"सिरियस काय होतेस म्हणजे! तू जे बोललास ते खरंच सिरियस न होण्यासारखे आहे? कमरेत इतकं मोठ जाड इंजेक्शन घेतलं. पोटाचे सात थर पार करून तुला बाप होण्याचं सुख दिलं. संपूर्ण आयुष्यभराचं दुखणं एका मुलाच्या जन्मावेळी घेतलं. बाळ दिवसा झोपलं असते तेंव्हा जेवणापासून घरातल्या सगळ्या कामांपर्यंत मी एकटी मॅनेज करते. रात्रभर तो जेव्हा रडतो तेव्हा माझ्या कमरेचा त्रास बाजूला ठेऊन संपूर्ण रात्र त्याच्यासोबत एकटीच जागून काढते. तुला उठवत नाही कारण तुला कामावर जायचं असतं म्हणून आणि तू म्हणतोस! 'दिवसभर कामं काय असतात गं तुला, की एक वस्तू जागेवर नीट ठेऊ शकत नाहीस तू?' रोज तुला घर नीटनेटके दिसतं कारण मुलाला सांभाळून घरासाठी तेवढे एफर्ट्स घेते मी. आज मुद्दाम घरातली काहीच कामं केली नाही मी कारण तुला पण कळू दे घर आपोआप साफ नाही राहत. एखादी वस्तू जागेवर नाही मिळाली तर जरा शोधावी. पण तू सरळ सरळ मला अश्या शब्दामध्ये बोलतोस म्हणजे काय अर्थ घ्यावा मी?" आलेला हुंदका आवरत श्रेया म्हणाली.
इतकं सगळं ऐकून श्रेयस खजील झाला. त्याला त्याची चूक लक्षात आली.
"आय एम सॉरी श्रेया..मी चुकलो. गेला दीड महिना वर्क लोड आणि बॉसच्या टार्गेटची टांगती तलवार यामुळे मी खूप डिस्टर्ब होतो आणि त्यात कळत नकळत मी तुला दुखावलं. खरंच मला माफ कर. मी तुला प्रॉमिस करतो की इथून पुढे असं कधीच होणार नाही. कुठल्याच गोष्टीत तुला एकटं सोडणार नाही. आय एम एक्स्ट्रिमली सॉरी श्रेया." श्रेयाला मिठीत घेत श्रेयस म्हणाला.
"हम्म..आता हे मिठ्या मारून काही होणार नाही दिवसभर हा पसारा असाच बघून बघून माझं डोकं दुखायला लागलं आहे. चल मला मदत कर सगळं आवरायला. तुला जे समजवायच होतं ते समजावून झालं."श्रेयसला मिठीतून बाजूला सारत श्रेया म्हणाली आणि सगळं पुन्हा एकदा सुरळीत झालं.
समाप्त
©® श्रावणी लोखंडे
समाप्त
©® श्रावणी लोखंडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा