“काय हा मिरवणुकीचा गोंगाट?चांगला झोपलो होतो मी!” केशव त्रागा करत उठला.
“अहो साहेब, जागे व्हा..सकाळचे बारा वाजलेत..”
“हो का? अरे बापरे!”
“ अरे बापरे काय म्हणतोस? दिवसभर तर लोळतच असतोस..काय काम येतं रे तुला? मोबाईल बघायचा नाही तर मग झोपा काढायच्या, इतकच काय ते काम करतोस.. कधी यावं रुममध्ये तर सदैव लाईट बंदच..जरा म्हणून प्रकाश नाही..सदैव अंधार!”
“आई, मला प्रकाश आवडत नाही..”
“हो! कसा आवडेल? तुझ्या भविष्यात तर मला काळाकुट्ट अंधारच दिसतो आहे.”आई रागातच बोलली.
केशव पुन्हा आपल्या रूममध्ये गेला. त्याने दार जोरात आढळत बंद केले. असे रोजच व्हायचे.
“सरला काय हे?हीच वेळ सापडली होती का तुला त्याला रागवायला? रोज असं का करतेस तू?”
“आई, तुम्ही त्याची बाजू घेता म्हणूनच तो शेफारला आहे. जरा म्हणून जबाबदारीची जाणीव नाही त्याला. बरोबरीची मुले कुठे चालली आहेत आणि हा?सण असो किंवा काहीही असो याच्या वागण्यात काहीच बदल घडत नाही की याला शिक्षणात यश मिळत नाही, पदवीचे शेवटचे वर्ष देखील पूर्ण केले नाही याने..”
“वाह सरला,अगं आई ना तू त्याची? तुला सारं माहीत असूनही असं वागतेस?स्नेहल त्याला सोडून गेली त्यामुळेच त्याची अशी अवस्था झाली ना! आधी होता का तो असा?”
“नव्हता व आई काय नाही केलं मी माझ्या केशव साठी रमेश सोडून गेला आणि त्याचे पितृछत्र हरवली तरीही तुम्ही माझ्या पाठीशी होत्या म्हणून मी खंबीरपणे नोकरी केली. वाटलं होतं ते केशवला खूप शिकून मोठा अधिकारी करीन,पण देवाने एक सुख माझ्यापासून हिरावलं असूनही हे दुःख का म्हणून माझ्या पदरात टाकलं?”
“सरला कळतं गं मला सारं.. एक आई म्हणून तुझी मनस्थिती समजू शकते मी.. पण अशावेळी त्याची नाजूक मनस्थिती आपण नाही सांभाळून घेतली तर कोण समजून घेणार?”
“आई तुमचं म्हणणं कळतंय हो मला.. पण मी देखील त्याला किती वेळा समजून सांगितलं.. झाला का काही उपयोग?”
“शांत हो सरला.. काहीतरी करूया आपण.. नक्कीच चांगले दिवस येतील आपल्याला.. आपला केशव येईल या अंधकारातून वर..”
तेवढ्यात केशवच्या आजीला बाहेर गणपतीच्या नावाचा जयघोष ऐकायला आला,
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..”
“गणपती बसवूया आपण आज?”आजी बोलली.
“काय?”सरला अचंबित होत म्हणाली.
“हो आज सर्वत्र गणपती विराजमान होत आहेत. रमेश गेला आणि रागाच्या भरात मी गणपती बाप्पांना दोष दिला. त्यांचे दरवर्षीचे आगमन मी नाकारले,पण आता पुन्हा माझ्या केशवसाठी आपल्या घरी यायचे मी त्यांना आमंत्रण देणार आहे..”
आपला सासूबाईंचे हे बोल ऐकून सरला शांत झाली. तिला धीर आला. तिचे सैरभैर झालेले आईचे मन स्थिरावले.
“पण आई,केशव मान्य करेल का हे सर्व?”
“ती जबाबदारी माझी..”
“ठीक आहे आई..”
थोड्या वेळाने,
“केशवा, ए केशवा..”
केशवचा काहीच प्रतिसाद येत नाही असे पाहून आजीने पुन्हा केशवला आवाज दिला.
“केशवा, ए केशवा..”
मोबाईलमध्ये व्यग्र असलेला केशव चिडला आणि म्हणाला,
“काय गं आजी?”
“दार उघड बरं..”
“नाही ,मी नाही उघडणार..”
“अरे बाळा, मला जरा चक्कर येतेय..”
केशव ताडकन उठला.त्याने घाईघाईने दार उघडले..
“आजी तू ठीक आहेस ना? आणि आई कुठे आहे? तू अशी का उभी इथे?थांब डॉक्टरांना फोन करतो..”
“अरे हो हो.. शांत हो!मी ठीक आहे.जराशी भोवळ आली होती मग तोंडात साखर टाकली आणि घटाघटा पाणी पिलं. सरला मघाशीच गेली ऑफिसला. नैवेद्य करून ठेवलाय तिने.”
“कशाचा नैवेद्य?आज काय आहे?”
“अरे आज गणपती बाप्पा येणार आहेत आपल्याकडे..”
“काय? पण आपण तर गणपती बसवणं बंद केलंय ना?”
“हो केलं होतं, ती माझी चूकच झाली.. पण यावर्षीपासून पुन्हा सुरू करायचं आहे.. तुला आठवतं?लहानपणी तुला बाप्पा खूप आवडायचा. आरती करताना तर तू अगदी तल्लीन होऊन जायचा आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी तर खूप रडायचा..”
“सोड ना आजी,तेव्हा मी लहान होतो..असेहीआता या गोष्टींनी काय फरक पडणार आहे?”
“(हळू आवाजात) लेकरा, आपल्या परिस्थितीत बदल तर गणरायाच घडवतील..”
“काही म्हणालीस तू?”
“नाही, काही नाही.. तू माझ्यासोबत चल बाहेर..”
“कुठे? तुला माहित आहे ना मला बाहेर यायला आवडत नाही ते..”
“हे बघ केशव माझे दोन भरवसे आहेत.उद्या मी असेन किंवा नसेल म्हणून यावर्षी मला गणपती बसवायचा आहे.त्यासाठी गणपती आणायला माझ्यासोबत बाहेर चल..”
“आजी, तू असं बोलून मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहेस.”
“तु येणार का माझ्यासोबत की मी एकटी जाऊ?”
“थांब,मी येतो तुझ्यासोबत..”
“एक काम कर..तू जा आणि घेऊन ये मूर्ती.तोवर मी मूर्तीच्या स्वागताची तयारी करून ठेवते.”
केशवने सुंदर सुबक व बोलकी गणेश मूर्ती घरी आणली आजीने केशव व मूर्तीचे यथासांग स्वागत केले.
संध्याकाळी सरला आल्यावर, आजी व केशवने गणेशाची स्थापना केली. आजीने देवापुढे हात जोडले आणि ती मनोमन म्हणाली,' हे गणराया,केशवला या नैराश्यातून बाहेर काढ. मला आता दुसरे काहीही नकोय.'
रात्री केशव झोपला. दुसऱ्या दिवशी सरला व आजी उठायच्या आतच केशव उठून बसलेला होता. स्नान करून तो गणेशापुढे गणेश स्तोत्र म्हणत बसला.
दोघींनाही त्याच्याकडे पाहून आश्चर्य वाटले.
“केशव, आज लवकर उठलास!”आजी म्हणाली.
“अगं पडून पडून कंटाळा आला होता. म्हटलं उठावं आणि गणपतीचे दर्शन घ्यावं म्हणून उठलो आणि पटापट आवरलं.”
“वाह!”सरला म्हणाली.
“सरला, आज छान खीरपुरी व उकडीचे मोदक करूया.”
“हो आई.आज मला सुट्टीच आहे. केशवला पण आवडतात मोदक. नक्कीच करूया.”
असेच दिवस गेले. गणपतीच्या कृपेने केशवमध्ये छान बदल होत गेले. तो अगदी पूर्वीसारखा झाला होता.उत्साही,आनंदी, समाधानी व हुशार..त्याच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगाचा त्याला विसर पडला होता.गणपती विसर्जनाला एक दिवस अजूनही बाकी होता.
त्या दिवशी संध्याकाळी आई व आजीला पुढ्यात बसून तो म्हणाला,
“आई, आजी मी आजपर्यंत तुम्हा दोघींना खूप दुःख दिले आहे पण इथून पुढे माझ्या जीवनातील भूतकाळ विसरून,उज्वल भविष्यकाळ जगण्यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे. हे बघा, मी आजच लास्ट इयर एक्झामचा फॉर्म भरून आलो आहे.मी एक्झाम देणार व चांगली नोकरी करणार..”
आजी व सरलाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.आजी गणपतीच्या मूर्तीला भक्तिभावाने पाहत मनोमन म्हणाली,
' देवा श्री गणेशा तू मला दृष्टांत दिलास व माझ्या सेवेला फळ दिलेस. माझ्या केशवला बदलवलंस. अगदी पूर्वीसारखं केलंस. सरला व केशवला असंच आनंदी ,समाधानी ठेव.सदैव आमच्यासोबत रहा, असाच पाठीराखा बनून..तेवढ्यात केशव म्हणाला,
“ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..”

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे