घटस्फोट एक पुनर्विचार ३

नात्यातली गोड आंबट चव
सौ. वैशाली मंठाळकर
घटस्फोट एक पुनर्विचार ३

"जज काय म्हणाले ?", सायलीचे वडील वकिलांकडे बघत म्हणाले.

दोन्ही वकील एकमेकांकडे बघून दोन्ही अर्जदारांजवळ जाऊन बोलू लागले.

"दोन्ही अर्जदारांना मध्यस्थी केंद्रात दोन दिवसांनी बोललेले आहे. जज स्वतः त्यांच्याशी बोलतील. ", वकील बोलून निघून गेले

"का..? मध्यस्थी केंद्रात का..? काय झालं..?", सायलीचे आई आणि वडील गोंधळून म्हणाले.

सायली तिच्या आईचा हात घट्ट पकडुन घेते. कधी असं कोर्टकचेरी माहीतच नव्हते, म्हणून आता आतून पूर्णपणे घाबरून गेली होती.

"आमच्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. तिला पोटगीसुद्धा मिळायला हवी.", मिसेस माने एक कटाक्ष मानवकडे टाकत म्हणाल्या.

"हे बघा मिसेस माने, आम्ही तुम्हाला घटस्फोट देण्याचा पूर्णपणे निकाल लावुन देऊ, पण तुम्ही थोडेसे पेशंस ठेवा. जज साहेबच्या डोक्यात काय चालू आहे ते आम्हाला तर कळणार नाही. आता दोन दिवसांनी मध्यस्थी केंद्रात त्यांच्या बोलल्याने पुढची तारीख ठरेल. काळजी करू नका. मुलीकडे कायदा आहे आणि केस आपणच जिंकू. तुमच्या मुलीला व्यवस्थित पोटगी मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करू.", वकील साहेब शांतपणे त्यांना समजावू लागले.

त्यांचं सगळं बोलणं मानवला ऐकू येत होतं. आतून तोही तुटत होता. तिच्यासाठी त्याने काय काय केलं होतं... ती जे मागेल तो हट्ट त्याने पूर्ण केली होता. कधीच तिला कुठल्या गोष्टीत कमी पडू दिले नव्हती. पोटगी हा शब्द ऐकून त्याच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. तोही मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता. त्यामुळे कधी कुठल्या गोष्टीची कमी नव्हतीच. घरातल त्याचं चांगलं होतं. सायलीला सुद्धा चांगला पगार होता, म्हणून कधीच तिला तरी आतापर्यंत कुठल्या गोष्टीची कमी पडली आहे, हे त्याला आठवत नव्हते.

वकील आपले अर्जदारांशी बोलून तिथून निघून गेले. रवी मानवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दिलासा देत इशारा करतो.

मानव वळला तर समोर सायली आली. दोघांची नजरा नजर झाली. त्याच्या डोळ्यात अजूनही एक आशेची किरण होती आणि सायलीच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला त्रासात ती बघू शकत नव्हती, पण या रस्त्यावर त्यानेच आणून तिला उभं केलं होतं.


"चल सायलीs....", तिच्या आईचा आवाज आला तशी ती दचकून तिच्या आई कडे बघू लागली.

सायलीची आई रागाने मानवकडे बघत होती. त्याने एक कटाक्ष टाकला अन् तिला क्रॉस करून तडतड तिथून गेला.


क्रमशः

🎭 Series Post

View all