घटस्फोट एक पुनर्विचार ५

नात्यातली गोड आंबट चव
सौ. वैशाली मंठाळकर
घटस्फोट एक पुनर्विचार ५

"माय लॉर्डs....", सायलीकडचे वकील हळूच म्हणाले.

"हम...", जज साहेब हातातला पेन बंद करून वकिलांकडे बघू लागले.

वकिलांनी त्यांच्या जवळची फाईल साहेबांच्या जवळ ठेवली, तसे त्यांनी दोन्ही फाइल्स घेतल्या आणि बाजूला ठेवत सायली मानवकडे आळीपाळीने बघू लागले. सायली तिच्या ओढणीचं टोक हातात घट्ट पकडून त्यांच्याकडे बघत होती.

"किती वेळ झाला आपण इथे बसलो आहोत..?", जज साहेबांनी त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा काढून त्या दोघांना बघत विचारलं.

"वीस पंचवीस मिनिट झाले असतील..", मानव शांतपणे उत्तर देत म्हणाला, कारण सायलीच्या तोंडून तर आता शब्द निघणार नाही, हे त्याला कळून चुकलं होतं.

"मिसेस जाधव किती वेळ झाला आपण इथे बसलो आहोत..?", जज साहेब आवाजात विनम्रपणा आणत शांतपणे म्हणाले.

"वीस पंचवीस मिनिट झाले असतील .", तिने एक नजर मानवकडे बघितले आणि त्याचाच उत्तर तिने रिपीट केलं होतं.

"बावीस मिनिट झाले, आपण इथे बसलेलो आहोत .", जज साहेब गालात हसत म्हणाले.

सद्य परिस्थिती वकिलांच्या डोक्याच्या बाहेरची होती. आतून जरी ते गोंधळलेले असले, तरी त्यांना शांत बसण्यापलीकडे काहीच करता येणार नव्हते.

सायली एक नजर मानवकडे बघत आवंढा गिळते. फॅन जरी चालू असला तरी घामाच्या धारा वाहतच होत्या.

"लग्नाला किती वर्षे झाली..?", जज साहेब

"तीन वर्षे चार महिने.", मानव आणि सायली दोघांनी एक साथ उत्तर दिले. ते कॅल्क्युलेशन आपल्याला चुकवायचं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

"छान! दोघांच्याही लक्षात आहे.", जज साहेब त्यांच्या हातातल्या पेनाची कॅप काढत समोरच्या पेपरवर लिहून लागले.

"तुम्ही दोघे लग्नाच्या आधीपासून एकमेकांना ओळखता. लग्न करताना काही अडचणी आल्या होत्या का..?"

"माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त सायलीच्या आई-वडिलांना कास्टमुळे प्रॉब्लेम होता.", मानवने एक नजर तिला बघून उत्तर दिलं.

"सर, माझ्या आई-वडिलांना प्रॉब्लेम होता पण नंतर तेही तयार झाले. उलट त्यांच्या घरात पहिलच लव मॅरेज असल्यामुळे लग्नानंतर कित्येक वेळा त्यांच्या आई मला बोलून दाखवत होत्या.", सायलीसुद्धा तिचा मुद्दा बोलून मोकळी झाली.

"म्हणजे मिसेस जाधव यांच्या घरच्यांकडून विरोध होता, नंतर तुम्ही दोघांनी त्यांना तुमची बाजू मांडून तयार केले आणि लग्न व्यवस्थितरित्या पार पडले.", जज साहेब बोलून त्यांच्या पेपर वर नोट करू लागले.

दोघांनीही होकारमध्ये मान हलवली.

"लग्नानंतर फिरायला वगैरे गेला होता की नाही..? म्हणजे तीन वर्षात फिरला की नाही एकमेकांसोबत.", जज साहेब गालात हसत म्हणाले, तसं सायली गोंधळून गेली. तिला त्यावर काय उत्तर द्यावं काही कळेना.

"हो, म्हणजे खूप ठिकाणी आम्ही दोघे फिरलो आहे. एक्झॅक्टली किती कधी फिरलो ते सांगता येणार नाही.", मानव दिर्घ श्वास घेत अडखळत म्हणाला.

हळूहळू दोघांच्या नजरेसमोरून दोघांनी एकमेकांसोबत घालवलेली क्षण येऊ लागले आणि मन त्याचबरोबर भरून येऊ लागले.

"म्हणजे फायनान्शली तुमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एन्जॉयही तितकाच केला."

"हो, जास्त नाही.. पण कधी कुठल्या गोष्टीची कमी झाली नाही इतकं तर मी स्वतः कमवतो आणि ती स्वतः सेल्फ इंडिपेंडेंट आहे.", तो तिची ही बाजू घेऊन म्हणाला.

"मिसेस जाधव लग्नाच्या आधीपासून भांडण होत होती का लग्नानंतर भांडण चालू झाली. ", जज साहेब सायलीकडे बघत म्हणाले.

दोघी एकमेकांकडे बघू लागले. लग्नाआधीसुद्धा कित्येक वेळा दोघांमध्ये भांडण झाले होते. रुसवा फुगवी झाला होता. कधी कधी महिना महिना बोलतसुद्धा नव्हते.

"हो होत होती भांडण..!", ती नजर खाली घेत म्हणाली.

"मग तुम्हा दोघांनी लग्न करायचा डिसिजन घेतलाच कस काय..?"

"सर त्यावेळी एवढी भांडण होत नव्हती. आताची भांडण जरा वेगळ्या लेवलमध्ये गेली की..", ती बोलून शांत झाली. कायदा तिला ही माहित होता की, आपण जर चुकून आपल्या तोंडून म्हणालो, की त्याने माझ्यावर हात उचलला तर त्याला शिक्षा ही होऊ शकते.

"पुढचं बोला, तुमच्या दोघांपैकी बाहेर कोणाचं अफेअर चालू आहे का..? असं काही कारण आहे की तुमच्या सोबत कुठल्या गोष्टीची जबरदस्ती होत असते का..?"

"नाही सर... असं काही नाही...", दोघे ही जज बोलायच्या आधी बोलून मोकळे झाले.


"इथे फक्त तुमच्या दोघांचा इगो अडवा येतो. एवढी पानभर तुम्ही एकमेकांची कंप्लेंट लिहिलेले आहे, त्याला काहीच अर्थ नाहीये. थोडासा तुम्ही तुमच्या नात्याचा विचार करा. सहा महिने सगळ्यांशी थोडं लांब राहून एकत्र घालवा. तुमच्यात काय प्रॉब्लेम्स असतील ते समोरासमोर बसून सॉल्व्ह करा. लाईफ छोटीशी आहे. आयुष्य कोर्ट कचेरीमध्ये घालू नका. महिना झालं तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जगत आहात.. जर तुम्ही घरात असला असता तर कितीही भांडण झाली तरी कधी ना कधी एकमेकांबद्दल ओढ जाणवेलच.. दोघांमधला इगो कमी करा आणि स्वतःच्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. एकाने प्रयत्न करून चालत नाही. दुसऱ्याने सुद्धा त्याला हातभार लावावा. तुम्ही बोलताना एकमेकांच्या साथीने बोलत आहात, पण तुम्हाला अजूनही कळत नाहीये.. तुम्ही दोघे स्वतः इंडिपेंडेंट आहात, पण एकमेकांचा सहारा तुम्हाला आयुष्यभर लागणारच ना... थोडसं नात्यात झुकले, तर कमीपणा का आणून देता..? नवरा बायकोमध्ये भांडण आजूबाजूच्या वातावरणामुळेसुद्धा होतात. त्याला तुम्ही थोडसं इग्नोर करायला शिका. खूप जण काही गोष्टी इग्नोर करत नाहीत, त्यामुळे ते आपल्या नात्यातला गोडवा विसरून जाऊन फक्तं दोष देत असतात. रागाच्या भरात तुम्ही दोघे कोर्टापर्यंत आला, पण इथेही तुम्हाला एकमेकांची काळजी वाटत आहे.. ह्यावरूनच कळत आहे की तुमच्या दोघांमध्ये फक्त राग आहे. तो कमी झाला की तुमचं नातं भरून जाईल.
राग आणि इगो ही एवढी मोठी गोष्ट आहे की त्यामुळे खूप नाती तुटून जातात आणि ती नाती तुटली की आयुष्यभर फक्त त्रास होतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही एकमेकांना थोडा वेळ द्या. मागचं काही आठवण्यापेक्षा पुढे काय करता येईल त्याच्यावर भर द्या. जुन्या आठवणी ताज्या करून अजून राग आणि इगोने भरून घेण्यापेक्षा फ्युचरचा विचार करा. ", जज साहेब दोघांना समजावून सांगत होते. सायलीच्या डोळ्यात पाणी होतं, तर मानवच  मन भरून आलं होतं.

सायली दोन्ही हात डोळ्यावर ठेवून रडू लागली.

दोन्ही वकील आणि जज तिच्याकडे बघू लागले मानव हताश होऊन तिच्याकडे बघू लागला.त्याचा ही कंठ जड झाला होता.


विचार करा आणि पुढची तारीख सहा महिन्यानंतर देण्यात येईल."जज साहेब चेअर वरून उठून एक नजर दोघांना बघून निघून गेले.

दोघे वकीलसुद्धा एकमेकांकडे बघून निघून गेले. आता तिथे फक्त सायली आणि मानव बसले होते.

मानव श्वास घेत तिच्या समोर गुडघ्यावर येऊन बसला.

तो तिचे दोन्ही हात धरून तिच्याकडे बघू लागला. तीही भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती.

"सर्वात मोठी चूक केली होती मी तुझ्यावर हात उचलून.. खरच त्याच्यासाठी मी कितीही माफी मागली तरी शेवटपर्यंत तुझा गुन्हेगार राहीन, पण मला आपलं नातं आयुष्यभर टिकवायच आहे. मलाही आपला संसार फुलवायचे आहे. आपण दोघांनी कित्येक स्वप्न पाहिले आहेत, ती पूर्ण करायची आहेत.. पण अचानक आपल्या लाईफमध्ये असा मोड येईल हा आपण दोघांनीही विचार केला नव्हता. आपण दोघेही आपल्या इगोच्या भावनेत इतके गुंतून गेलो की आपलं प्रेमसुद्धा आपण विसरून गेलो...", तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला, तशी ती तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घालून हुंदके देऊन रडू लागली.

दोघांनीही आपला राग आणि इगो बाजूला ठेवला आणि आपला संसार पुढे चालवू लागले. खट्टी मीठी तक्रार, एकमेकांना समजून घेणे, आपल्या चुका कुठे होत आहेत, त्यावर दोघेही झुकत आपला संसार फुलवू लागले.

★★★
समाप्त


🎭 Series Post

View all