शीर्षक - दिवाळी भाग 3
स्वराची आई आणि मोठा दादा आले. आजी आणि स्वराच्या खोलीत.
स्वराची आई - फराळ देणे आणि घेणे म्हणालात तुम्ही. किती महागाई झाली आहे. कोणी आधीच मोजके करतात. वाटत नाही. अगदीच जवळचे किंवा बिझनेस कारणाने देवाण घेवाण होते आजकाल. बाकी कोणी कुणाला देण शक्य नाही.
त्यात महागाई मुळे स्त्रीया नोकरी करत संसारासाठी हातभार लावतात. नोकरी करता करता फराळाचे पदार्थ तयार करणे नाही झाले तर घरगुती व्यवसाय करणाऱ्या कडून मोजके विकत आणून सण साजरा केला जातो.
आजी - खरे आहे. काळच बदलला. स्वरूप बदलत गेले. कालाय तस्मै नमः
स्वराची आई - आजकाल शॉपिंग करणे स्वतःसाठी ऑनलाईन.... घरपोच.... दिवाळी म्हणजे. कपडे, सोनं, मोबाईल, लॅपटॉप, सगळे मिळते.
आजी - पण शॉपिंग करा. जवळ च्या व्यापारी, रोडवर बसणारे गरीब विक्रेता यांच्या कडून खरेदी करा. सगळ्यांना विनंती करून सांगावे वाटते. देशात पैसा खर्च करून देशातील गरिबांची दिवाळी होऊ द्या. तो पैसा देशा बाहेर जाणार नाही. हि पण एक देशभक्ती आहे. आपल्या देशात बनलेल्या वस्तु विकत घ्या.
स्वराची आई - हे मात्र खरे आहे आई.
स्वराचा दादा - कधी जायचे खरेदीला. कपडे, फटाके आणायला.
सगळे हसतात.
आई - बाबा आले की जाऊ.
आजी - स्वरा या दिवाळीत प्रत्येक स्त्रीच्या मनात एक हळवा कोपरा आहे तो म्हणजे भाऊबीज.. भावाला औक्षण करून ओवाळणी मिळतेच बहिणीला. या दिवशी भाऊ येण यातच बहिण भरून पावते. भाऊ लहान असो मोठा असो भाऊ बहिणीची भाऊबीज होण महत्त्वाचे आहे. आपापसातले सगळे हेवे, दावे, रूसवे, फुगवे विसरून प्रत्येक भाऊ आणि बहिणीची भाऊबीज साजरा झाली यासारखा दुसरा आनंद नाही.
पाडव्याच्या दिवशी सकाळी आई बाबांना तेल, उटणे लावते औक्षण करून झाले की बाबा खास भेटवस्तू आईला देतात यातील गोडी वेगळीच आहे.
आजी - दिवाळी म्हणजे याचा पहिला दिवस वसूबारस आहे. गाईची आणि वासराची पूजा केली जाते. खाऊ घातले जाते. आपण गाईला देव मानतो. भूतदया प्राण्यांवर प्रेम करा. हे हिंदू धर्म, संस्कृती शिकवते.
आई - आपण धनत्रयोदशी ला धनाची, धान्याची पुजा करतो. लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीची पुजा करतात.
आजी - अभ्यंगस्नान पहाटेच करतो. आपल्याकडे लवकर उठणे. चांगले समजले जाते. पहाटे ब्रम्ह मुहूर्त असतो तो शुभ समजला जातो. "लवकर निजे.. लवकर उठे.. तया आरोग्यय, ज्ञान, संपत्ती भेटे."
आजी - दिवाळी मध्ये पणत्या सजावट, आकाश कंदिल घरी तयार करणे, रांगोळी काढणे, फराळ बनवणे म्हणजे पाककला. या कला आहे.
आई - दिवाळी साठी स्वच्छता केली जाते. साफसफाई, स्वच्छतेचे महत्त्व आहे.
आजी - दिवाळीत कमी आवाजाचे, कमी धूराचे फटाके फोडून निसर्गाची काळजी घेऊ शकतो.
स्वरा - दिवाळी मध्ये मामा आजोबा आणि मामा फटाके, फराळ आणतात. मला फारच छान वाटते सगळे आले की,
आजी - हेच सांगते आनंदाचा उत्सव दिवाळी असते. पुढच्या पिढीला हे समजले पाहिजे.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®18.10.2022
©®18.10.2022
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा