उत्साहाचा असे
दिवाळीचा सण
मांगल्याचे दिप लावू
जगू आनंदाचे क्षण
दारी लावले फुलांचे तोरण
रांगोळीने सजले अंगण
दिव्यांच्या प्रकाशाने
उजळून आले जीवन
रांगोळीने सजले अंगण
दिव्यांच्या प्रकाशाने
उजळून आले जीवन
गोड तिखट फराळाची
मस्त आहे मेजवानी
पहाटे लावा सुगम
दिवाळीची गाणी
मस्त आहे मेजवानी
पहाटे लावा सुगम
दिवाळीची गाणी
पाच दिवसांचा सण
आनंदाने नाचे मन
भाऊबीजेला करी
बहिण भावाचे औक्षण
आनंदाने नाचे मन
भाऊबीजेला करी
बहिण भावाचे औक्षण
आतिशबाजी, फटाके
उजळून निघे आसमंत
दिवाळीचा टिकावा
आनंद काळ अनंत
उजळून निघे आसमंत
दिवाळीचा टिकावा
आनंद काळ अनंत
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा