जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
दिव्याखाली अंधार भाग 3
दिवस सरत होते पण वेदिकाच्या घरातील वातावरणात फरक पडत नव्हता.मात्र वेदिकाचा तिच्या शाळेत एक आदर्श शिक्षिका म्हणून तिचा सत्कार करण्यात आला होता. तिच्याबरोबर काम करणाऱ्या शिक्षकांनी आणि तिच्या विद्यार्थ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले होते. या सगळ्यामुळे वेदिका भारावून गेली होती.आता तिची जबाबदारी ही वाढली होती. तिच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून ती त्यांच्यावर जास्त मेहनत घेत होती पण या सगळ्यात तिच्या मुलांकडे मात्र तिचे दुर्लक्ष होत होते.
बारावीचे बोर्ड एक्झाम जवळ आली होती.त्याआधी प्रीलियम सुरू झाल्या होत्या.
"प्रियंका उद्या मॅथेमॅटिक्स पेपर आहे ना. अभ्यास झाला ना सगळा."
वेदिका ने कडक आवाजात विचारले.
वेदिका ने कडक आवाजात विचारले.
"हो आई..."
प्रियांकाने दबकतच उत्तर दिले.
प्रियांकाने दबकतच उत्तर दिले.
"मला मॅथेमॅटिक्स मध्ये आऊट ऑफ मार्क्स पाहिजेत."
एवढे बोलून वेदिका शाळेत निघून गेली.
एवढे बोलून वेदिका शाळेत निघून गेली.
प्रियंकाचे टेन्शन आता वाढले होते. म्हणावं तसा तिचा अभ्यास झाला नव्हता. आई, आऊट ऑफ मार्क्सचा विचार करते आणि आपण तर फक्त पासिंग पुरते मार्क्स पाडण्याचा विचार करतोय याचे आता तिला दडपण आले. मार्क्स पडले नाही तर आईची खूप बोलणे खावे लागतील. पुन्हा एकदा आई-बाबांमध्ये भांडण सुरू होतील. या विचाराने तिला थोड्या वेळ दरदरून घाम फुटला. कसेबसे तिने स्वतःला सावरले आणि ती कॉलेजमध्ये पोहोचली.
तिथे पोहोचल्यानंतर आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हा विचार करून तिच्याकडून नको ती चूक घडली.
पेपर सोडवताना कॉपी करताना तिला तिच्या परीक्षकांनी पकडले. तेथील शिक्षकही वेदिकाला ओळखत असल्यामुळे तातडीने वेदिकाला बोलावण्यात आले.
पेपर सोडवताना कॉपी करताना तिला तिच्या परीक्षकांनी पकडले. तेथील शिक्षकही वेदिकाला ओळखत असल्यामुळे तातडीने वेदिकाला बोलावण्यात आले.
वेदिका आणि प्रियंका दोघीही प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसल्या होत्या. प्रिन्सिपल समोर वेदिकाची मान खाली गेली होती. वेदिका ने माफी मागून पुन्हा असे काही घडणार नाही. प्रियंकाला एक संधी द्यावी म्हणून प्रिन्सिपल ला रिक्वेस्ट केली.
प्रिन्सिपल मॅडम प्रियंकाला म्हणाल्या,
"तुझी आई एक आदर्श शिक्षक आहे. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. आज केवळ तुझ्याआई मुळे तुझी चूक माफ करत आहोत पुन्हा असं होता कामा नये."
"तुझी आई एक आदर्श शिक्षक आहे. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. आज केवळ तुझ्याआई मुळे तुझी चूक माफ करत आहोत पुन्हा असं होता कामा नये."
प्रियंकाने फक्त मान हलवली.
प्रिन्सिपल मॅडमचे आभार मानून वेदिका आणि प्रियंका दोघीही ऑफिसच्या बाहेर पडल्या.
प्रिन्सिपल मॅडमचे आभार मानून वेदिका आणि प्रियंका दोघीही ऑफिसच्या बाहेर पडल्या.
पेपर संपल्यामुळे तिथे मुलांची आणि पालकांची गर्दी जमली होती. झालेला प्रकार सगळीकडे समजला होता.
तिथे असलेल्या पालकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता.दोघीही तिथून जात असताना दोन मुलींच्या आयांमध्ये चाललेली कुजबुज त्यांच्या कानावर पडली,
तिथे असलेल्या पालकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता.दोघीही तिथून जात असताना दोन मुलींच्या आयांमध्ये चाललेली कुजबुज त्यांच्या कानावर पडली,
पहिली : "अगं तुला माहिती आहे ना प्रियंका आपल्या मुलींच्या क्लासमधली तिला म्हणे कॉपी करताना पकडलं."
दुसरी : "हो.. आत्ताच सांगितले ईशाने मला. अगं पण ईशा म्हणत होती तिची आई शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचा आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार करण्यात आला."
पहिली :" बघ ना आई आदर्श शिक्षिका आणि मुलीचे हे प्रताप. ते म्हणतात ना दिव्याखाली अंधार ते अगदी खरं आहे."
पहिली : "जाऊदे आपल्याला काय करायचे म्हणा."
"दिव्याखाली अंधार" हे दोन शब्द वेदिकाच्या कानात घुमत होते. या दोन शब्दांनी कोणीतरी आपल्या जोरात कानाखाली मारली आहे असे तिला वाटून गेले.
नकळत तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ते खाली ओघळणार नाही याची काळजी तिने घेतली मात्र प्रियंकाच्या नजरेतून ते सुटले नाही.
क्रमशः
वेदिका आता काय निर्णय घेईल?वाचूया पुढील भागात..
नकळत तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ते खाली ओघळणार नाही याची काळजी तिने घेतली मात्र प्रियंकाच्या नजरेतून ते सुटले नाही.
क्रमशः
वेदिका आता काय निर्णय घेईल?वाचूया पुढील भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा