अस म्हणतात..की, प्रत्येक व्यक्तिचं नाव हे त्याच्या स्वभावावर परिणाम करत असतात. अतिशय काळजीपूर्वक विचाराअंती प्रत्येकाच नाव हे ठेवण्यात येत असते. माझ्या वडिलांनी माझे नाव, 'प्रज्ञा' का बर ठेवले असावे याचं एकच उत्तर लहानपणी माहित होते. प्रज्ञा म्हणजे बुध्दी. तिचा शोध घेत अनेक नविन गोष्टी शिकण्याचा ध्यास जणू काही मनात संचारलेला होता. वेळीच व्यक्त होवून आपल्या ध्येयापर्यंत पोहचता येवू शकते हे समजण्यास उशीर मात्र झाला अस म्हणता येईल..
माझ्या बालपणाकडे जर एक कटाक्ष टाकला तरी मी फारशी बोलकी नव्हते.पण सर्वांशी मिळून - मिसळून रहायला आवडायचे. आजही ती आवड जोपासत आहे. जर कोणी मला रागावत असेल किंवा बोलत असेल तर मी त्यांच बोलणं ऐकून घ्यायचे ते पण चेह-यावर एक हसू ठेवतं.
कोणालाही उलट फिरुन न बोलण्यामुळे घरात तसेच आमच्या घरा शेजारी राहणा-या कुटूंबियांची मी लाडकी होते. माझ्या बरोबरीचे मित्र - मैत्रीणी घराजवळच असल्याने आम्ही सर्वजण शाळेतून घरी आलो की अभ्यास करुन घ्यायचो. संध्याकाळी मनसोक्त खेळत बसायचो. सात वाजले की आई हाक मारायची. या आता घरात. किती वेळ खेळलं तरी समाधान नाही होत बोलायची. आई हाक मारुन दमली की सात वाजता टिव्ही वर बातम्या लागायच्या. त्या ऐकायला आल्या नाही की तिथे राहणारे आजोबा आमच्यावर ओरडायचे. मग आम्ही तर अजून जोरात आरडाओरड करत खेळ खेळायचो.
शनिवारची आतुरतेने वाट पाहत असयचो. त्यावेळी टिव्ही वरील मालिका पाहण्याचा छंद कधी लागला कळालाच नाही. ज्यूनिअर जी, शक्तिमान, शकालाका बुम बुम , रविवार उजाडला की सकाळी ९ वाजता श्रीकृष्ण हि मालिका पाहायची. मग काय दिवसभर नुसता खेळ. एक आठवण नक्कीच सांगायला आवडेल मला. सर्वांनी मिळून सहल काढायची ठरवली होती. प्रत्येकाने घरातून आपल्या आवडीचा खाऊ घेऊन या सहली करता यायचे होते. कोणी भेळ, शेंगदाणा-गुळ, क्रिमच बिस्कीट, चिवडा आणायचे. आणि प्रत्येकाच्या गच्चीला गडांची नाव दिली होती. एका गच्चीवर पोहचलो की एकमेकांत बोलायचो, खूप लांब आहे ना चालायला, दमलो आता, मग त्यातले काही बोलयचे, आलेच आहे आता. खरतर बोलताना खूप हसू देखील यायचं. पोहचल्यावर बोलायचो. आलो आता रायगडावर आता शिवनेरीला जावूया. म्हणजे दुस-या मैत्रिणीच्या घराच्या गच्चीवर.
यानंतर आम्ही डबडा आईसपेस, लोखंड - पाणी, लिगोरची, विश- अमृत, टिपी टिपी टाॅप टाॅप, लपाछपी, डोंगर-पाणी, लंगडी खेळायचो. बालपणाचा काळ सुखाने न्याहून निघावा असाच होता. शाळेत देखील गमती - जमती केल्या. एकदा मराठीच्या वर्ग शिक्षिका वर्गात आल्या बाहेरचं निसर्ग सौंदर्य पाहून त्या सहज गुणगुणल्या
आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहिकडे
आणि शिकवायला सुरवात केली. मी आणि माझी मैत्रिण गप्पा मारत बसलो. ते शिक्षिकांनी पाहिले. माझ्या मैत्रिणीला उभं राहिला लावले. आणि शिकवलेलं आत्ता ते तिच्याकडून त्यांना सांगता येत का बरोबर ते पाहायचे होते. माझी मैत्रिण उभीच होती. तिला काय बोलावं कळत नव्हते. शेवटी मी शिक्षकांनी गुणगुणल्या जाणा-या ओळी हेच शिकवले ते तिला सांगितले. आणि मैत्रिण देखील त्या ओळी गुणगुणू लागली. शिक्षकांना बोलली तुम्ही हेच सांगितलं. शिक्षिका आणि वर्गातल्या सगळ्याजणी पोटधरुन हसू लागल्या. मग आम्हांला पण हसू आलं. त्यांनी मैत्रिणीला खाली बसायला सांगितलं. आणि म्हणाल्या आनंदाच आहे सगळीकडे. तो दिवस हसण्यातच व्यतीत झाला. आजही तो क्षण आठवून मी हसत असते.
आठवली असताना पहाटे सहा वाजता क्लासला बाहेर पडल्यावर तिथूनच शाळेची स्कूल बस घ्यायला यायची. आई क्लास दहा वाजता सुटला की नाश्ता, जेवणाचा डबा, कोरडा खाऊचा वेगळा डबा घेवून यायची. गंमत म्हणजे आई मला दहावी पर्यंत शाळेत सोडायला यायची. मुलं कितीही मोठं झाली तरी ती लहानचं वाटतात आईला हो ना? मला देखील आईला बाय करत स्कूल बसमधे चढून शाळेत जायला मज्जा यायची. स्कूल बस मधे आम्ही खूप धम्माल करायचो. दमशेराज, फिश पाॅईंट, असे खेळ खेळायचो. शाळेमधे रंगपंचमी साजरी करता येत नव्हती तर आम्ही शाळेत येताना रंग घेवून आलो की शाळा सुटल्यावर स्कूल बसमधे आम्ही रंगपंचमी साजरी करत होतो. खरतर रंगपंचमी या सणाला मी लहानपणी घाबरत होते. चेह-याला वेगवेगळे लावण्यात येणारे रंग पाहून तो रंग कायमस्वरुपी तसाच राहिला तर अशी भीती मनात तग धरुन बसली होती. नंतर मात्र रंगपंचमी खेळण्यास मी नेहमीच जोमाने खेळायल सज्ज.मी शाळेच्या स्कूल बसची सेक्रेटरी देखील होते.
पुण्यातल्या सगळ्या प्रसिद्ध शाळांमधे शिक्षण घेण्याचा सुवर्णयोग मला लाभला होता. १ ते १० वी अहिल्यादेवी शाळा, ११ वी १२ वी रेणुका स्वरुप, बी. काॅम हुजरपागा काॅलेज. पी. जी. डि. बी. एम डिप्लोमा आणि मास्टर इन बिजनेस स्टडीज नारळीकर इन्स्टिट्यूट, एम. काॅम एक्सटर्नल पुणे युनिव्हरसिटी. जी. डी. सी. ए. गव्हरमेंट डिप्लोमा. एवढं आपण शिक्षण घेवू अस स्वप्नात देखील वाटले नव्हते. अभ्यासात तशी मी सुरवाती पासून जेमतेम होती. दहावीच्या निकाला दिवशी मी नापास होते की काय याची चिंता संपूर्ण कुटूंबियांना लागली होती. त्यातून माझे निभावून गेलं. ते थेट दोन मास्टर डिग्री हातात आल्यावरच.
२०११ हे वर्ष माझ्याकरता अविस्मरणीय वर्ष म्हणावं लागेलं या वर्षात मी नोकरी करताना एम. काॅम आणि डिप्लोमा देखील यशस्वीरीत्या सांभाळू शकले होते. टॅली ई. आर. पी.९ हे साॅफ्टवेअर मी दिड वर्ष क्लास मधे शिकवले होते.त्यानंतर दोन वर्ष आय. टी. कंपनी हिंजवडी येथे नोकरी केली होती.
लग्नाकरता घरच्यांची स्थळ शोधण्याकरता पळापळ सुरु झाली होती. अनेक स्थळ पाहण्यात आली होती. कधी स्थळ आम्हांला पसंद नसायची तर कधी त्यांना पसंद पडत नव्हती. असे करता करता "काखेत कळसा आणि गावाला वळसा."या उक्तीप्रमाणे नवरदेव मामाच्या गावचे आमच्या नात्यातले निघाले. खरी कसरत माझी लग्नानंतरची होती. मला स्वंयपाक बेसिक गोष्टी सोडल्या तर काहीच जमत नव्हते. डाळ-भात, पोहे, उपमा, मॅगी, आगळा-वेगळा नकाशाच्या चपात्या. लाल तिखट, मीठ, मिरची किती वापराव याच फारसा अंदाज नव्हता पण ती कशी वापरायचे ते अंदाजपंजे काम माझ सुरु होते.
मला जरा फारस येत नसले तरी घरात कोणी ना कोणी मला शिकवेल. आणि मी शिकेन देखील हा विचार सुरू असतानाच लग्नाला तीन महिने झाल्यानंतर मिस्टरांची बदली यवतमाळ जिल्ह्यात झाली होती. आम्हा दोघांनाच पर्यायाने तिथे रवाना व्हावे लागले होते. जे येईल तसे काम चलावू पणा सुरु होता. लग्नानंतर पहिल्यांदाच एवढ्या लांब मी राहायला जाणार होते. माझी काळजी सर्वांनाच होती. काळ सर्व गोष्टी शिकवत असतो आणि सहा महिन्यांनी परत बदली सासरच्या जवळच्या जिल्हात झाली.
आता मला मनासारखी नोकरी करता येणार या आनंदाने स्वत:ला पुन्हा एकदा आपल्याला नोकरी आणि घर सांभाळता येईल का? अश्या प्रश्नावर उत्तर म्हणून नोकरी शोधायला सुरवात केली. नोकरी मिळाली पण पगार मात्र कमी होता. लग्नाआधी आई हातात डबा तयार ठेवायची. लग्नानंतर आपल्याला ही जबाबदारी पार पाडता येईल का ह्याची पडताळणी विचारात घेता नोकरीवर रुजू झाले होते.
नोकरी करताना तिथे चालणारे राजकारण, कामाचा तणाव, घरी आल्यावर होणारी धावपळ पाहता "चाराण्याची कोंबडी आणि रुपायचा मसाला." अशी गत झाली होती. अखेरीस नोकरी सोडली. आणि कोरोनाने शिरकाव केला. तेव्हा घरी राहिल्यावर मला लेखन करता येते हा सुप्तगुण जाणवू लागला.
लग्नानंतर माझ्या मधे कमालीचा बदल घडला. म्हणजे कधी पटकन न बोलणारी मी पटापट आणि मुद्देसुद बोलायला लागली. लग्नाआधी बोलताना दहा वेळा विचार करणारी मी आता मात्र घडाघडा बोलयला लागली होती. घर आणि गाव एवढाच प्रवास करणे हे मला ज्ञात होते. पण मिस्टरांबरोबर मी एकूण २४ जिल्हांमधे फिरुन आले आहे.
त्यांच्यामुळे प्रवास करण्याची आवड माझ्यामधे निर्माण झाली. सातवी मधे असताना दिवाळीच्या सुट्टीत शाळेमधून दहा ते बारा दिवसांकरता केरळ, कन्याकुमारी सहलीला पहिल्यांदाच एकटीला आई-वडिलांनी जीव मुठीत ठेवून पाठवले होते. मैत्रिणींसोबत तेव्हा विविध ठिकाणांना भेट देत फोटो काढले होते. ते फोटो आज पाहताना देखील त्या वर्षांमधे जावून मन स्थिर होते. चौथीत असताना आई- वडिलांसोबत जम्मूला वैष्णवी देवी पाहून आली होती.
मी हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत नव-याची अनमोल साथ भाग्यानेच लाभली गेली. घरी राहून मी माझी लिखाणाची आवड जोपासावी असे त्यांना देखील वाटू लागले. माझे लेखन वाचणे, प्रोत्साहन देणे या गोष्टींमुळे आजही मला लिहताना नवा हुरुप आपोआपच येतो. ईरा या व्यासपीठावर दुस-या चॅम्पियनला ट्राॅफीत भाग घेवून पदार्पण केले होते. त्यावेळी ट्राॅफी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न लहानपणी शाळेत असल्यापासून सुरु असते. या संधी करता मला मात्र खूपच वाट पाहावी लागली होती. कारण ते माझे स्वप्न मात्र 'सर्वोत्कृष्ट लढवय्या' हि ट्राॅफी हातात पाहताच पूर्ण झाले.
माझी आई, मैत्रिणी, नातेवाईक तितक्याच उत्सहाने माझे लेख वाचून मला भरभरुन प्रतिसाद देतात. माझे वाचक वर्ग देखील मला लिहण्यास उद्यूक्त करत असतात. चॅम्पियनशिप मधे वेगवेगळे राऊंड घेत असल्याने माझ्यातला आत्मविश्वास वाढू लागला. मी जेव्हा ऊसतोड्यांची मुलखात घेतली व्हिडिओ फेरी मधे तेव्हा मला आपण एक रिपोर्टर असल्याची संधी क्षणभरासाठी चालून आली असेच वाटले होते.
ज्ञानाचा साठा अमर्याद आहे. सतत नवनविन गोष्टी शिकण्या विषयी मला आई कडे बघून प्रोत्साहन लाभते. तीच्या हाताला चटकदार, खमंग चव आहे. ती जीभेवर सतत रेंगाळत असते. फॅशन डिझाईनिंग, ज्वेलरी मेकींग मधे तिला आवड आहे. हे पाहून मलाही आता उत्तम पदार्थ बनवता येतात आणि हाताला देखील आईच्या हातची चव आहे अशी दाद देखील मिळते आहे. बाबा देखील टाटा मोटर्स कंपनीमधे कामाला होते. आता रिटार्यड जरी असले तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत स्वत:ला गुंतवत ठेवतात. बाबांविषयी एक आवर्जून सांगायला आवडेल. आपण हाती घेतलेली मोहिम पार करत असताना अपयश आले तर खचून न जाता आपण कुठे चुकत आहोत. त्याचा सतत पाठपुरावा करायचा असतो. थोडक्यात जिद्द असेल तर यशापर्यंत कधी ना कधी पोहचता येते. बाबांच्या चेह-यावर सतत गोड हसू असते. सुख:दुखात ते नेहमी तटस्थ भूमिका बजावत असतात. सुखाने हुरळून जायचे नाही. आणि दुखाने खचून जायचे नाही अशी त्यांची शिकवण. कंपनीमधे त्यांना मॅन आॅफ द मंथ, रेग्यूलर अटेंडस अशी अनेक सन्मान चिन्ह, सर्टिफिकेट मिळाली आहेत. मला देखील दोघांकडे पाहून गाण्याची आवड जोपावीशी वाटते.कॅनव्हास पेटिंग, मंडाला आर्ट नुकतेच मी शिकत आहे. प्रत्येक क्षण, सोहळा, वाढदिवस, सण उत्साहात साजरा करत सजावट, रांगोळी, लायटिंग, पुरणपोळी किंवा गोड पदार्थ बनवून साजरा करायला आवडते. नवनविन पदार्थ हौशेने स्वत: बनवून बघायला आवडते.
माझी आजी वडिलांची आई ८० वय पार करुन देखील आजच्या पिढीला लाजवेल इतकी स्वत:ला फिट ठेवते. चालणे, चविष्ट पदार्थ बनवण्याची आजीला आवड आहे. माझी आजी म्हणजेच आईची आई ती देखील शेंगुळी मस्त बनवयाची. ती चव परत चाखायला तर नाही मिळू शकत पण भास मात्र होत असतो. ती सोबत नसली तरी तीची उणीव मात्र भासत असते.
लेखन करण्याची हि दैवी देणगी मला माझ्या दोन्ही आजोबांकडून लाभली आहे असे आई-वडिल माझे लेखन वाचल्यावर सांगतात. माझे वडिलांचे वडिलांनी लेखन करायचे. आईचे वडिल खूप पुस्तक वाचायचे. आज दोन्ही आजोबा जगात असते तर नक्कीच माझे लेखन त्यांना आवडेल असते अशी आशा करते. त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मला शिकता आल्या असत्या. पण कोणत्या ना कोणत्या रुपात ते माझे लेखन वाचून मला आशिर्वाद नक्कीच देत असतील.
माझे आत्मचरीत्र माझ्या आई-वडिलांप्रमाणेच मला साथ देणा-या नवरा, माझे चुलते-चुलती, आत्या-मामा, मामा-मामी, मावशी-काका, भाऊ-बहिणी, बहिणी- दाजी,नंदा-भाऊ, दिर,सासू-सासरे, मैत्रिणी यांच्यामुळे परीपूर्ण आहे असेच मी म्हणेल. प्रत्येकाकडून शिकण्यासारखे आहे आणि हळूहळू ते आत्मसात करण्याचा प्रयत्न नक्की सुरु ठेवणार आहे मी.
मला वाटत आयुष्य खूप सुंदर आहे. ते योग्य प्रकारे जगण्याचे तंत्र अवगत करता यायला हवे इतकचं.

©®प्रज्ञा बो-हाडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा