मागील भागात आपण पाहिले की या डू ऑर डाय खेळाच्या दुसऱ्या फेरीतून पाच स्पर्धक पुढे आले. त्यात अमित देखील होता. अमितने इतर स्पर्धकांशी चर्चा केली व त्याला काही गोष्टी लक्षात आल्या.
आता पाहूया पुढे..
आता पाहूया पुढे..
दुसऱ्या दिवशी सारे स्पर्धक मन घट्ट करत उभे राहिले.पुन्हा एक सूचना झाली.
" सर्वांना असे निवेदन करण्यात येते की त्यांनी या खेळातील तिसऱ्या पायरीसाठी तयार राहावे.
तिसरी फेरी आहे, बाय अँड सेल.तुम्हाला सर्वांना एकच रक्कम देण्यात येईल.तुम्ही त्यातून कुठल्याही वस्तू घेवून नंतर त्याच वस्तू विकायच्या आहेत.जो यात प्रामाणिकपणे खेळून रक्कम नफा म्हणून घेऊन येईल तो जिंकणार."
तिसरी फेरी आहे, बाय अँड सेल.तुम्हाला सर्वांना एकच रक्कम देण्यात येईल.तुम्ही त्यातून कुठल्याही वस्तू घेवून नंतर त्याच वस्तू विकायच्या आहेत.जो यात प्रामाणिकपणे खेळून रक्कम नफा म्हणून घेऊन येईल तो जिंकणार."
अमितसह सारे स्पर्धक सारख्याच रकमेसह बाहेर पडले पण तिथे त्या सर्वांना नजरकैदेतच ठेवलेले होते.प्रत्येकाच्या सूक्ष्म हालचालींकडे मास्कधारी व्यक्तींचे लक्ष होते.स्पर्धक वस्तू घेवून विकायला निघाले,तोच एक गरीब म्हातारी अमितकडे खाण्यासाठी पैसे मागू लागली.त्याला म्हातारीची खूप दया आली.पण या फेरीनुसार प्रत्येकाला घेतलेली वस्तू विकून नफा जमा करायचा होता. अमितकडे असेही खूप कमी पैसे जमले होते.
त्याने विचार केला असेही मरायचे तर आहेच,मग या म्हातारीला थोडे पैसे देऊन हिचा आत्मा तरी शांत करू.
अमितने म्हातारीला पैसे दिले.
अमितने म्हातारीला पैसे दिले.
" अखंड आशीर्वाद पोरा तुला!"
तिने अगदी आनंदाने अमितला भरभरून आशीर्वाद दिला.
सर्व स्पर्धकांचा वेळ संपला.तेवढ्यात तीच म्हातारी तिथे आली अन् तिने अमितला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून चक्क ५०० रुपये दिले.
अमित त्या म्हातारीला काही विचारणार तोच एक मास्कधारी व्यक्ती बोलला,
" ए म्हातारे ,चल निघ इथून.नाहीतर जीव घेईन."
म्हातारी घाबरली अन् तिथून त्वरित निघून गेली.
अमित मात्र आता खुश झाला.त्याचे नफ्याचे पैसे आता वाढले.प्रत्येकाची रक्कम मोजण्यात आली.
त्यात अमित आणि रोहन यांची रक्कम एकच आली.बाकीच्यांची रक्कम कमी असल्याने त्यांना तिथे ठार मारले गेले.पुन्हा तोच आवाज आला.
अमित मात्र आता खुश झाला.त्याचे नफ्याचे पैसे आता वाढले.प्रत्येकाची रक्कम मोजण्यात आली.
त्यात अमित आणि रोहन यांची रक्कम एकच आली.बाकीच्यांची रक्कम कमी असल्याने त्यांना तिथे ठार मारले गेले.पुन्हा तोच आवाज आला.
" वाह,अमित आणि रोहन.आता तुम्ही दोघेच शेवटचा खेळ खेळणार.यात तुम्हाला आपले मत मांडायचे आहे.मी तुमच्यापैकी एकालाच जीवदान देऊ शकतो.हा निर्णय तुम्ही परस्पर सहमतीने घ्यायचा आहे."
रोहन हा गरीब घरचा मुलगा होता.त्याला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची होती. सर्व घराची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती.तो आपल्या कुटुंबाच्या फोटोकडे बघत रात्री खूप रडला होता,हे अमितने पाहिले होते.अमितसुद्धा आई-बाबांचा खूप लाडका होता.पण त्याच्यावर इतक्या आर्थिक जबाबदाऱ्या नव्हत्या.अमितने खूप विचार केला.त्याने रोहनला जीवदान देण्याचे ठरवले.
" मी रोहनचा जीव वाचवू इच्छितो."
रोहन आनंदित झाला.
आता पुढे काय होईल? अमित शेवटी ठार मारला जाईल की अजूनही खेळात काही ट्विस्ट घडेल?या डू ऑर डाय खेळाचे रहस्य नेमके काय आहे? जाणून घेऊया पुढील भागात..
भाग ४ समाप्त
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा