मागील भागात आपण पाहिले की या खेळामागील खरा सूत्रधार पुढे येतो.तो या खेळात इतर स्पर्धक का मारले गेले याचे स्पष्टीकरण तर देतो,पण त्याचा या खेळामागील उद्देश अजूनही समजत नाही.
आता पाहूया पुढे..
आता पाहूया पुढे..
अमित म्हणाला,
" पण कोणी कसेही वागेल! तुम्ही कोण अशी भयानक शिक्षा देणारे?"
" बरोबर म्हणतोस तू! मी कोण यांना ठार करणारा? मी अशाच एका सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या मुलाचा बाप आहे.माझ्या मुलाने खूप कष्ट घेऊन डिग्री मिळवली.सरकारी नोकरी मिळवण्याचे त्याचे स्वप्न होते.त्याने खूप अभ्यास केला पण शेवटच्या मुलाखतीच्या फेरीत वशिलेबाजी होऊन दुसराच मुलगा निवडला गेला.माझा मुलगा इतका हुशार असूनही त्याला त्याचा हा स्वप्नवत असणारा जॉब मिळाला नाही अन् एक दिवस त्याने स्वतःलाच संपवले.मग मी तेव्हाच ठरवले,ज्या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या मुलांकडे माझ्या मुलासारखी जिद्द,चिकाटी,अचूकता, समयसूचकता, व्यवहारकौशल्य नाही त्यांना जगण्याचा काही अधिकार नाही.म्हणून मी हा डू ऑर डाय खेळ रचला."
" मग आता माझे ७ कोटी कुठे आहेत?"
" ७ कोटी! हा हा हा..ते केवळ एक मृगजळ होतं.अरे या मृगजळामागे धावूनच तर तू आज जिद्द,चिकाटी,अचूकता, समयसूचकता, व्यवहारकौशल्य या कलांमध्ये पारंगत ठरला आहेस.तू आता इथून बाहेर पडू शकतोस.आता मी तुला शास्वती देतो की तुला नोकरी मिळणार आणि ५ वर्षांनंतर तुझ्याकडे ७ कोटी आपोआप असतील."
अमित तेथून बाहेर पडला.अचानक पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला.पोलिस आले आणि साऱ्यांना अटक करण्यात आली.
अमित लांबूनच सारे काही बघत होता.
२-३ दिवसांतच अमितला नोकरी मिळाली अन् ५ वर्षांनंतर त्याच्याकडे ७ कोटी बँक बॅलेन्स झाले.अमित त्या मास्टरमाईंडचा शोध घेत पुन्हा तुरुंगात आला.
तो व्यक्ती अमितची वाटच बघत होता.
तो व्यक्ती अमितची वाटच बघत होता.
" मला माहित आहे,तू मला हेच सांगायला आला आहेस की तुझ्याकडे मी म्हंटल्याप्रमाणे बरोबर ५ वर्षांनी ७ कोटी जमा झाले आहेत.बघ बरं हा खेळ तू खेळलास,पैसा कमावण्याचे गुण शिकलास आणि पैसे कमावले सुद्धा! मग ठरला की नाही तू या डू ऑर डाय गेमचा विजेता?"
तेवढ्यात तो जेलरला म्हणाला,
" माझ्या सर्व इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत.मला त्वरित फाशी द्या."
त्या माणसाला फाशी देण्यात आली.अमित उघड्या डोळ्यांनी हे सारे पाहत होता.खरच त्याच्या आयुष्यात आलेला हा डू ऑर डाय गेम त्याला रहस्यमयरित्या आज खूप काही शिकवून गेला होता.
समाप्त..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
