Login

डॉक्टर ( भयकथा)

Doctor
डॅा.दिलीप आणि डॅा. मीना. तसं सुखवस्तु कुटुंब होतं, मेडिकल कॅालेजातच दोघांची ओळख झालेली होती.नंतर प्रेमविवाह ,दोन बेडरुमचा फ्लॅट,चार चाकी वगैरे करुनअसलेले हसतमुख जोडपं होतं.पुण्याच्या बाहेर पिंपरीत दोघे मिळुन स्वतःचं एक छोटंसं मॅटर्निटीइस्पितळ चालवत होते.सध्या सगळा फोकस फक्त पैसे कमावण्याकडे होता.
दिलीप हसतमुख तरी गंभीर,उंच, घारे डोळे, कमावलेलं शरिर ,शक्यतो पांढराच शर्ट, रेबॅनचा गॅागल,थोडक्यात वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीचा तोल घालवण्याइतपत देखणा होता वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचा शौकीन असलेल्या दिलीपला परवाच एक पेशंटनं एक कुत्रं भेट दिलं होतं.
याउलट मीना रंगानं सावळी असली तरी नाकी डोळी निटस, चुणचुणीत,आकर्षक,कविता करणारी,प्रचंड बोलकी आणि लाघवी होती.

एकाच वेळी दोघांना भेटलेल्या मनुष्याला आवडेल दिलीप पण लक्षात मीनाच राहील असा सारा मामला होता.

संध्याकाळी मीना लवकर येऊन स्वयंपाक करत असे,दवाखान्यापासुन घर २किलोमीटर वरच होतं त्यामुळे दोघेही दुपारचं जेवण घरीच करीत असत.दुपारी कमला मावशी म्हणजे स्वयंपाकीणबाई सकाळी हे दोघे गेले की येऊन स्वयंपाक करुन ठेवत व निघून जात.काळाकुट्ट रंग, काही उन्हाळे पावसाळे जास्त पाहीले झेलल्याने अकाली पांढरे झालेले केस आणि स्थूल तरी चपळ शरिर असलेल्या कायम कोणत्यातरी विचारात असल्यारख्या भासणार्या,आजिबात न बोलणार्या भयाचॆ भाव वावरत असल्याने त्यांचाशीदेखील फारसं कोणी जात नसे बोलायला.
काही दिवसापासून आधीच शांत असलेला दिलीप काहीसा गंभीर भासु लागला.नंतर मग चिडचिड वाढली, क्षुल्लक कारणावरून आरडाओरडा करु लागला होता.मीनाने अनेक प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही केल्या कारण सांगत नव्हता.एक दिवस दुपारी जेवत असताना अचानक ठसका लागून त्याला रक्ताची उलटी झाली.मीना हादरली,तिने त्याला दाखल केलं सगळ्या टेस्ट झाल्या पण काहीच निदान झालं.नाही सगळं नॅार्मल होतं,पण त्यामुळे चिंता जास्त होती..काही दिवस दिलीप घरी राहीला मीना दुपारी येत होती त्याला धीर देत होती,गोष्टी पुर्वपदावर यायला सुरवात झाली होती..
कमलाबाईचं वागणं मात्र दिवसेंदिवस जास्त गुढ होत होतं..ती आताशा कधीकधी एकटीच गालातल्या गालात हसू लागली होती.मीनानं एक दोनदा तिला पकडलं देखील होतं तर तिने थातुर मातुर कारण सांगून टाकलं होतं.

एका रात्री काही दिलीप रात्री अचानक दचके द्यायला लागला, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यासारखा डोळे फिरवत छातीवर खाली करु लागला हात पाय कुणीतरी धरुन ठेवले आहेत आणि सुटत नाहीयेत असं त्याच्याकडे पाहुन वाटायला लागलं..सर्वांगाला घाम फुटलेला आणि लालभडक डोळ्यांनी दात ओठ खात तो मीना कडे पहात होता पण त्याला काही केल्या जागचं उठता आलं नाही.मीना मात्र मनातून ठार झाली होती.सकाळी पुन्हा दिलीपला अॅडमिट केलं गेलं पण पुन्हा रिपोर्ट नॅार्मल आले.मीना आता त्याच्याशेजारी बसायला देखील घाबरत होती.

तिने रात्री सोबतीला म्हणून काही दिवस कमलाबाईला यायला सांगितलं.कमलाबाई लगेच तयार झाली.दिलीपने आता दवाखान्यात जायचं बंदच केलं होतं.कसल्यातरी शापाने किंवा रोगाने खंगल्यासारखा तो वेगाने खंगु लागला होता.भेसुर नजरेने दिवसभर खिडकीबाहेर पहात जगायचा.

मीना वर कामाचा भार वाढला होता ती दुपारी येऊन लगेच जात होती व रात्री उशिरा येत होती.कमलाबाईला आता मुक्कामीच ठेऊन घेतलं होतं.ति स्वयंपाकासोबतच दिलीपला अौषध देणे, त्याचं सारं करणे हे ही करु लागली.

एका रात्री मीनाला जास्त उशीर झाला ११वाजुन गेले होते. बेल वाजली कमलाबाईने दार उघडलं मीनाच्या पायाखालची वाळू घसरली,कमलाबाईचे हात रक्तानं माखले होते,झटापट झाल्यासारखे कपाळावरुन केस विस्कटलेले होते.कपाळाच्या घामात केस चिकटून त्यांची विचित्र नक्षी तयार झाली होती.अंगावर नखांचे ओरखडे उठलेले होते.मान खाली करुन ती मीनाकडे पहात हसत होती,मीनानं घाबरत विचारलं दिलीप कुठाय..
कमला किंचित तिरकी मान करुन.भयानक हसत म्हणाली
" डाकटर जेवतायत"
मीना जवळजवळ तिला ढकलुनच आत गेली किचनमधलं दृश्य पाहुन ती किंचाळली,
तशीच बाहेर पळाली.

दिलीप डायनिंग टेबलावर बसून एका ताटात कमलाने केलेले कुत्र्याचे तुकडे हातात घेऊन त्याचे लचके तोडत होता.बेभान मंतरल्यासारखा तो अखंड ते मांस चावत होता,त्याचा कराकरा असा अभद्र आवाज येत होता,त्याचं तोंड हात सदरा लालभडक झाला होता..डोळे लालभडक आणि रक्ताळलेले दिसत होते.

त्या प्रकाराने मीना धास्तावली.आईकडे पुण्याला निघून गेली.

दुःख,आश्चर्य,भय, राग सगळ्या भावना तिच्या डोळ्यांतून एकाच वेळी वहात असल्यामुळे डोळ्यांना आजिबात आराम नव्हता.
बर्याच वेळाने तिला शांत झोप लागली.

एक सावली हातात एक बाळ घेउन मीना समोर आली.मीनाला म्हणाली बघा बरं कसं दिसतयं माझं बाळ ? मीनाला ते गोंडस बाळ पाहुन बरं वाटलं मीना म्हणाली "खुप गोड आहे नजर लागेल बाई कुणाची तरी"

ति बाई ताडकन म्हणाली

" कुणाची तरी नाही डाकटर ची नजर लागली बाई माह्या लेकीला, पोटातच मारला ४ महिन्याचा जीव आणि उकिरड्यावर फेकलं कुत्र्याला लचके तोडायला..माह्या नवर्याकडनं पैका घेऊन आन मी बी रगात जास्त जाऊन मेले.दोन कामं एकदम.झाली मनुन डबल पैका
आन् एक कुत्र दिलं डाकटरला.बाई सांग का सोडु मी डाकटरला."?

वीज चमकावी तशी मीना जागी झाली,घामाने डबडबलेला चेहरा,लालभडक डोळे घेऊन आईला प्रकार सांगितला,व पोलिसांना घेऊनच घरी पोचली.

कमलाबाई दारातच बसली होती शांत समाधानी चेहर्याने सगळ्याकडे पहात होती.

दरवाजा उघडा होता.पोलिस थबकले मीना पुन्हा घाबरली रडु व ओरडु लागली.

"दिलीप ए दिलीप...

तेवढ्यात आतुन दिलीप आला,जिवंत आला,हसत आला,पण

चार पायांवर आला गळ्यात कुत्र्याचा पट्टा होता, तोंडात कालच्या मेलेल्या कुत्र्याचं हाडुक होतं.

आणि बोलला