प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२२
मागील भागात,
"खरे सांगायचे नसेल तर राहू दे.माझ्या आईच्या स्वभावाने तू आली नाहीस.हे आम्हाला माहीत आहे." तो म्हणाला आणि तिचे काही न ऐकता निघून गेला.
तिलाही वाईट वाटत होते पण त्यांचा कार्यक्रम छान पार पाडला हे ऐकून बरे वाटले.
ती झोपत असताना तिला ते पत्र वाचायचे हे लक्षात आले.तिने पाकिटातून ते बाहेर काढले.ब्रेल लिपीत ते होते.त्यावर तिची बोटे फिरवली आणि मध्येच तिला त्याची सुरवातीची वाक्ये वाचून मोठा धक्काच बसला.
आता पुढे,
आधी तर ते पत्र कोणी पाठवले असेल हे चिन्मयीला जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
पत्राची सुरुवात प्रिय चिन्मयी म्हणून झाली आणि तिथेच तिचा काळजाचा ठोका चुकला.कारण प्रिय म्हणणारे कोणी आजपर्यंत तिच्या आयुष्यात नव्हते.त्यात ब्रेल लिपीमध्ये लिहिणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.
पुढे त्या पत्रावर बोटं फिरवून तिने वाचण्यास सुरूवात केली.
प्रिय चिन्मयी,
पत्र लिहिण्यास कारण की,मी तुम्हाला आपल्या नात्यासाठी एक पाऊल पुढे जाण्यासाठी विचारले होते.तुम्ही आधीच नकार दिला.
तो स्वीकारणे मला थोडे जड होते.तुम्ही लगेच होकार द्याल असे अपेक्षित नव्हते पण तुम्ही बोललेला सहानुभूती शब्द मात्र मला खटकला.तुम्हाला माहीत नसेल पण माझ्यासाठी तुमचे अंधत्व कधीच महत्त्वाची गोष्ट नव्हती. तुम्ही आमच्या सर्व सामान्य लोकांपेक्षा डोळस आहात.हे मी मनापासून बोलत आहे.ज्याप्रकारे तुम्ही मुलांचे समुपदेशन करता आणि आपले काम चोखपणे करता हे खरंच माझ्यासाठी चकित करणारे आहे.तुम्हाला माझी गरज ही मी तुम्हाला भेटण्या आधीही नव्हती आणि पुढेही नसेन पण मला मात्र तुमची गरज एक जीवनसंगिनी म्हणून आहे.पुन्हा विचार तुम्ही करावा असे मला वाटते.एक संधी देऊन पाहा.

तुमच्या उत्तराची वाट पाहणारा,
हर्ष.
हर्ष.
पत्र संपले होते पण तिच्या डोळ्यांतून अश्रू मात्र अविरत वाहत होते.त्याने घेतलेली मेहनत तिला दिसत होती.त्याने सुरुवातीला तिला मदत करावी म्हणून प्रयत्न केला होता पण तिने एकदा रागात बोलल्यावर त्याने तिला तीही आपल्यासारखीच सामान्य आहे हे वागण्यातून दाखवून दिले होते.
"उद्या मला शाळेनंतर भेटा." तिने स्वतःहून त्याला मेसेज केला.
तो मेसेज म्हणजे तिला आपले पत्र पोहोचले असणार ह्याची शाश्वती देत होता.
चिन्मयी काय बोलेल आणि पुढे आपण काय निर्णय घ्यायचा याबद्दल तो विचार करत होता.
खिडकीजवळ येऊन तो पौर्णिमेचा चंद्र पाहत होता.रात्रीची शांतता त्याला आल्हाददायक वाटत होती.उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असल्याने मनातील विचारांची मालिका काही संपत नव्हती.
माझ्या मनातील शब्दमोती
तुझ्यासाठी पत्रातून सांडले
अव्यक्त अबोल न राहून
प्रेमाचे विचार समोर मांडले
तुझ्यासाठी पत्रातून सांडले
अव्यक्त अबोल न राहून
प्रेमाचे विचार समोर मांडले
त्याने ब्लॉगवर लिहून पोस्ट केले. लाईक्स आणि प्रतिक्रिया पटापट येऊ लागल्या.त्या वाचून त्याला जणू प्रेरणा मिळत होती.सर्वांचे आभार मानत त्याने ब्लॉगमधून लॉगआऊट केले.
सकाळी लवकर उठून तो तयार झाला.आधी हॉस्पिटल बाहेर तिची वाट पाहिली आणि तिला पाहूनच त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.तो तिच्याजवळ जाऊन बोलला नाही.ती गेली तिचे काम आवरून कॅब करत विद्यालयात गेली.तो तिथेही पाठोपाठ गेला.
आज तिला खूप दिवसांनी बघून त्याचे हृदय जोरात पळत होते.
आज तिला खूप दिवसांनी बघून त्याचे हृदय जोरात पळत होते.
वाऱ्याची झुळूक आली आणि तिची केसाची एक बट तिला त्रास देत होती पण ती तिथल्या एका विद्यार्थ्याशी बोलत होती.मध्येच तिचा एक हात ती अवखळ बट सावरण्याचे काम करत होता.
त्याला मात्र तिच्याजवळ जावून बोलायचे होते पण संध्याकाळी भेटणार आहोत आणि आपण उगाच उतावीळ आहोत हे तिला नको समजायला म्हणून कसे तरी स्वतःला हर्षने सावरले.
त्याला मात्र तिच्याजवळ जावून बोलायचे होते पण संध्याकाळी भेटणार आहोत आणि आपण उगाच उतावीळ आहोत हे तिला नको समजायला म्हणून कसे तरी स्वतःला हर्षने सावरले.
ती आतमध्ये गेली आपले शिकवण्याचे काम करत होती. दुपारचे जेवण सर्व मुलांसोबत केले.त्यातही जो बाजूला बसला असेल त्याच्याशी ती अभ्यास सोडून इतर विषयांवर बोलत असायची म्हणून तिच्या बाजूला बसण्यासाठी मुले आणि काही मुलीही हट्ट करायचे.सर्वांची लाडकी चिन्मयी ताई होती.मॅडम बोलायला तिने मनाई केली होती.
बाजूलाच मुलींची वेगळी अंधशाळा होती.आज ती वयोमानानुसार मुलींमध्ये काय बदल होतात हे डॉक्टर सोबत सांगणार होती.
तसेच चांगला आणि वाईट स्पर्श ह्यातील फरक ती समजावून सांगणार होती आणि गरज पडल्यास प्रात्यक्षिक करूनही समजण्याचा प्रयत्न करणार होते.त्यामुळे त्या व्याख्यानासाठी सर्व मुलींना समजण्यासाठी ती तयारी करून गेली होती.

"कोणाला काही शंका असेल तर मला आता किंवा नंतरही विचारू शकता." व्याख्यान संपल्यावर ती म्हणाली.
एका तासाचे व्याख्यान दोन तास चालू राहिले.मनगटातील घड्याळावर हाताची बोटे फिरवल्यावर तिला समजले की उशीर झाला आहे.तिने व्याख्यानानंतर होणारे चहा-पाणी ह्यात सहभागी न होता आपली पर्स आणि बाकी साहित्य घेऊन ती केनच्या साहाय्याने बाहेर जाण्यासाठी थोडी चालण्याची गती वाढवू लागली.
मध्येच तिला काका भेटून उद्याचे सांगत होते.तिने अर्धे ऐकून बाकीचे नंतर बघू असे सांगत ती तिथून निघाली.
ती बाहेर येत कॅब बुक करणार तर तिच्या हातातून मोबाईल
खेचला गेला.
खेचला गेला.
"चोर?" तिने विचारले.
"तसे तर तुमच्या हृदयाचा चोर म्हणण्यास हरकत नाही चिन्मयी!"
खूप दिवसांनी हर्षचा आवाज कानी पडला होता आणि मनात आनंदाचे तरंग उठले होते पण लगेच रुंदावलेले ओठ तिने कमी केले.जे त्यानेही बघितले होते.
"चला जायचं का?" तो जाण्यासाठी तिला विचारत होता.
"हो,पण आधी चहा पिऊया.मी चहा न घेताच उशीर झाला म्हणून लगेच आले." ती म्हणाली आणि लगेच आपले ओठ मुडपून बंद केले.
त्याला भेटण्याची अधीरता लपवण्याचा निष्फळ प्रयत्न ती करत आहे हे त्याला गवसले होते.म्हणजेच तिला पण भेटण्याची ओढ आहेच हे त्याने त्याच्या नकारात्मक मनाला मनातच सांगितले.
एका चहाच्या ठिकाणी त्याने थांबवले.सोबतच सँडविच मागवले.
तिला भूक लागली असेल हे त्याने तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरून टिपले होते.
तिला भूक लागली असेल हे त्याने तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरून टिपले होते.
"चहा आणि सँडविचसाठी धन्यवाद.खूप भूक लागली होती." ती म्हणाली.
"इथेच बोलायचे की बाहेर कुठेतरी जाऊया?" त्याने विचारले.
"एवढा वेळ बसून देतील का?" तिने शंका विचारली.
त्याला तिच्या ह्या बोलण्यावर हसूच आले.
"तुम्हाला हरकत नसेल तर जवळच एक बाग आहे तिथे जाऊ शकतो." तो म्हणाला.
तिने जाण्यास होकार दिला.
संध्याकाळच्या वेळीही तिथे लहान मुलांचा खेळण्याचा आवाज येत होता.
"तुम्ही ते पत्र स्वतः लिहिले होते का?" एका बाकावर बसल्यावर तिने विचारले.
"हो." तो म्हणाला.
"कोणाकडून ब्रेललिपीमध्ये करून घेतले?" तिने दुसरा प्रश्न विचारला.
"मी क्लास लावला होता ब्रेल लिपीचा.आता एक पायरी पार केली आहे.त्यामुळे थोडे त्यात लिहायला जमत आहे.बाकी किती बरोबर आणि किती चुकीचे ते तुम्हीच सांगू शकता."तो अगदी शांतपणे म्हणाला.
त्याच्यादिशेने चेहरा करून ती वळून बसली.तो तर आधीच तिच्यादिशेने तोंड करून बसला होता.
"मला अजूनही वाटते की तुम्ही विचार करावा.कारण माझ्यासोबत आयुष्य काढणे सोपे नाहीये.तुम्हाला जास्त समजून घ्यावे लागेल.
मला दिसत नसल्याने खूप गोष्टी समजणार नाही.मला कोणावर ओझे म्हणून राहायचे नाहीये.हे फक्त समाजकारणासाठी किंवा काही दिवसांसाठी असेल तर मला नकोय." ती स्पष्टपणे म्हणाली.
मला दिसत नसल्याने खूप गोष्टी समजणार नाही.मला कोणावर ओझे म्हणून राहायचे नाहीये.हे फक्त समाजकारणासाठी किंवा काही दिवसांसाठी असेल तर मला नकोय." ती स्पष्टपणे म्हणाली.
"चिन्मयी मी सर्व शिकून घेण्यास तयार आहे फक्त तुम्ही हो म्हणा.
मला तुम्ही जे आता म्हणत आहात त्याचा सर्व विचार करूनच मी तुम्हाला लग्नासाठी विचारले आहे.तरी तुम्हाला त्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.आपण दोघे मिळून ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू?" तो तिचा एक हात हातात घेत म्हणाला.

"मी जसे जगते तसेच मला जगायचे आहे.मला परावलंबी बनायचे नाही.तुम्हाला माहीत आहे त्यादिवशी आमचे सर त्यांचे निधन झाले ते कशामुळे झाले ह्याचे मुख्य कारण कोणाला माहीत नाही.
त्यांची बायको त्यांना अंध मुलांसाठी वेळ देत होती म्हणत सोडून गेली.कारण त्या मुलांसाठी काम करणे त्यांच्या बायकोला पटत नव्हते.त्यांच्या लग्नाआधी त्यांनी कल्पना दिली होती पण तेव्हा हो बोलून नंतर त्यांना सोडून गेली.त्याचा त्यांना धक्का बसला.मला तुमच्यावर अवलंबून राहायचे नाहीये.मला इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे.माझी एक मैत्रीण होती.तिनेही एका सामान्य मुलासोबत लग्न केले.नंतर तो तिला सोडून गेला कारण सर्व त्याला आंधळ्या बायकोचा नवरा म्हणून चिडवायचे.
ती त्याच्यावर इतकी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहिली होती की तिला तो सोबत नसणे सहन झाले नाही आणि ती आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे.म्हणूनच मला तुमच्यावर ओझे नाही व्हायचे.तुम्ही एक चांगली मुलगी बायको म्हणून शोधा आणि माझा नाद सोडा." ती म्हणाली.

"तुमची काळजी आणि चिंता मी समजू शकतो पण मी असे काही करणार नाही हे मी लेखी लिहून देतो.तुमच्यावर प्रेम आहे हे मला जगाला दाखवण्यासाठी नाही तर तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व प्रयत्न मी करेन.तुम्हाला माझी सहचारिणी म्हणून जो मान सन्मान मिळायला हवा तो मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन." तो म्हणाला.
ती "पण मला जेवण बनवता येत नाही."
हर्ष "मला येते थोडेफार."
"मला तुमच्या चेहऱ्यावरून काहीच समजणार नाही."
"आवाज आणि स्पर्शावरून तर ओळखता ना ते माझ्यासाठी पुरेसे आहे."तो म्हणाला.
"बऱ्याच गोष्टी मला न पाहता समजणार नाहीत."अजून एक मुद्दा मांडला.
"मी आहे ना.मी समजावून सांगेन." तो थोडासा तिच्या बाजूला सरकला.
"अजून काही प्रश्न आहेत का?" तो विचारत होता.
"नाही,पण सुचले तर नंतर विचारेन." ती म्हणाली.
शाळेत एखादा धडा शिकवल्यावर काही प्रश्न आहेत का हे विद्यार्थ्यांना विचारल्यावर आधी अभ्यास करून पुन्हा नंतर विचारतात हेच त्याला तिच्याकडे पाहून वाटायला लागले.
क्रमशः
© विद्या कुंभार
आता तरी चिन्मयी होकार देईल का?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा