प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२८
मागील भागात,
"तुम्ही चुकीचे समजत आहात. त्यामागे कारण होते." ती म्हणते.
"तू काहीही बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ का?" दुसरी बाई रागात पुढे येत तिला धक्का मारत बोलते.
"आमचा साखरपुडा झालेला आहे आणि सकाळी तुम्ही जे पाहिले ते चुकीचे नाही पण त्याबद्दल चुकीचा समज करून घेतला आहे." ती त्यांना विनंतीच्या सुरात म्हणते.
आता पुढे,
'मला घरी जाताना असे अस्वस्थ का वाटत आहे?' हर्ष मनालाच प्रश्न विचारत होता.
त्याने न राहून चिन्मयीला फोन केला.खूप वेळ फोन करूनही ती उचलत नाही म्हणून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"अगं तू काहीही सांगशील आम्ही विश्वास ठेवायचा का?"
अनुजाची सासू आगीत तेल ओतत म्हणाली.
अनुजाची सासू आगीत तेल ओतत म्हणाली.
"नाहीतर काय? काय पुरावा आहे तुमचा साखरपुडा झाला
आहे?" दुसरी एक बाई तिला मागे ढकलते आणि ती खाली पडते.
आहे?" दुसरी एक बाई तिला मागे ढकलते आणि ती खाली पडते.
तिथे एक कारचा आवाज येतो आणि बाकीचे बाजूला होतात.
"काय झालं? तुम्ही ठीक आहात ना?" तो पुढे जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतो.
"हो." ती त्याचा हाताला पकडून उभी राहते.
"इथे काय चालू आहे ह्याबद्दल मला कोणी सांगेल का?" तो रागाने सर्वांना पाहत विचारतो.
त्याला बघून काही जण तोंड फिरवतात तर काही जण अजून रागीट नजर त्याच्यावर टाकतात.
"चिन्मयी तुम्ही सांगाल का मला? "
"सकाळी तुम्ही इथे आलात आणि मला मिठी मारली त्यानंतर आपण घरात गेलो.त्यावरून ते बोलत आहेत.त्यांच्यामते आपण चुकीचे वागलो.तसेच आपला साखरपुडा झाला हे मानायला ते तयार नाहीत." ती खिन्नपणे सांगत होती.
"आज असे वागण्याचे कारण काय आणि साखरपुडा झाल्याचा पुरावा दाखवा." एक वयस्कर आजीही त्यात बोलतात.
"हा आमचा साखरपुडा झालेला ह्याचा पुरावा." असे म्हणत तो आपल्या मोबाईमध्ये फोटो दाखवतो.
"आणि सकाळी मिठी मारण्याचे कारण तुम्हाला आम्ही का सांगावे? मला आणि चिन्मयी ह्यांना माहीत आहे की आम्ही चुकीचे वागलो नाहीत.तुम्ही तुमच्या घरात आणि घराच्या बाहेर काय करता हे आम्ही विचारायला नाही येत." तो त्यांना चढ्या आवाजात म्हणाला.
"चुकीचे काही केलं नाही तर मग कारण सांगा. कर नाही त्याला डर कशाला?" अनुजाची सासू तिच्या मोबाईल मधला त्याने मिठी मारलेला फोटो त्याला आणि सर्वांना दाखवत कुत्सितपणे विचारते.
"हर्ष मी सांगते.त्याशिवाय ह्यांना चैन पडणार नाही." ती बोलते.
हर्षला बिल्कुल पटले नव्हते.ही लोक उगाच एका गोष्टीचा मोठा मुद्दा बनवत होते.
"सकाळी तुम्ही फक्त त्यांनी मला मिठी मारताना पाहिले पण पुढे त्यांचा कोट माझ्या कमरेला बांधताना पाहिला नाही का?
माझ्या कपड्याला लाल डाग जो मासिक धर्मामुळे लागला होता ह्याची कल्पना मला नव्हती.तुमच्यासारखे मला दिसत नाही ना आणि काही त्रास न झाल्याने मला समजले नव्हते. हर्षनी ते बघितल्यावर मिठी मारत जॅकेट माझ्या कमरेभोवती बांधले. घरी कुलूप उघडून त्यांनी कपडे बदलण्यासाठी सांगितले. तो
पर्यंत ते हॉलमध्ये होते आणि मी माझ्या खोलीत.समजले आता कारण तुम्हाला? की अजून काही ऐकायचे आहे?" ती कधी नव्हे ते आवाजाची पट्टी वाढवून बोलत होती.
माझ्या कपड्याला लाल डाग जो मासिक धर्मामुळे लागला होता ह्याची कल्पना मला नव्हती.तुमच्यासारखे मला दिसत नाही ना आणि काही त्रास न झाल्याने मला समजले नव्हते. हर्षनी ते बघितल्यावर मिठी मारत जॅकेट माझ्या कमरेभोवती बांधले. घरी कुलूप उघडून त्यांनी कपडे बदलण्यासाठी सांगितले. तो
पर्यंत ते हॉलमध्ये होते आणि मी माझ्या खोलीत.समजले आता कारण तुम्हाला? की अजून काही ऐकायचे आहे?" ती कधी नव्हे ते आवाजाची पट्टी वाढवून बोलत होती.
त्याला प्रत्येकवेळी तिला असे सर्वांना स्पष्टीकरण देताना पाहून वाईट आणि राग ह्या दोन्ही भावनाने मन भरून आले होते.
"इथून पुढे कोणीही माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावणार नाही.माणसे आहात तर माणसासारखे राहा.धक्काबुक्की करता तेही चुकी नसता आणि त्या एकट्या आहेत असे समजण्याची चूक कोणी करू नका.पुन्हा असे काही घडले तर सरळ मी पोलिस स्टेशनमध्ये माझ्या होणाऱ्या बायकोला त्रास देतात म्हणून तक्रार करेन.आता इथून रजा घ्या." तो खूप गंभीरपणे त्यांना बोलला त्यामुळे सर्व निघून गेले.
त्याने तिला आतमध्ये नेले.हाताला आणि पायाला थोडे खरचटले होते म्हणून त्याने तिथे जखम पुसून अलवार मलम लावला.
काही ठिकाणी तिला धडपडल्यामुळे आधीच्या जखमा झाल्या होत्या त्याचे निशाणही होते.ते पाहून त्याचे हृदय हेलावले.
तसाच त्याने चिन्मयीचा हात हातात घेऊन सुकलेल्या एका जखमेच्या डागावर आपले ओठ ठेवले.
तसाच त्याने चिन्मयीचा हात हातात घेऊन सुकलेल्या एका जखमेच्या डागावर आपले ओठ ठेवले.
"हर्ष,तुम्ही ठीक आहात?" तिला कदाचित आज जे झाले त्यामुळे तो अस्वस्थ झाला असेल हे जाणवले.
"तुमचे सामान घ्या.आता इथे तुम्ही थांबायचे नाही." आजच्या झालेल्या प्रकाराने तो हवालदिल झाला होता.
त्याच्या बोलण्यामागे तिच्याबद्दलची काळजी वाटत होती हे तिला कळत होते.बायको शब्द ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा आला होता.नेहमी एकटीने जगाला तोंड देणारी तिच्यासोबत तिला जोडीदार लाभला होता.न सांगता तो तिथे आला होता.फक्त तिच्यासाठी!
"आपण असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत हर्ष!"
"मघ इथे राहून हे रोज रोज ऐकायचे का ह्या लोकांचे? कसे बोलत होते ते सर्वजण? तुम्हाला खाली ढकलून देण्यापर्यंत त्यांची मजल गेली.तुम्ही पण का त्यांना कारण सांगितले? मला लगेच का फोन केला नाही?" तिच्या खांद्यावर हात ठेवून तो विचारत होता.
"ती गोष्ट मघाशीच संपली.आता कशाला विचार करायचा.
आपण काही चुकीचे वागलो नाही तर कशाला घाबरायचे.
चोराच्या मनात चांदणे असते.आपण थोडी चोर आहोत? तसेही माझ्या होणाऱ्या नवऱ्याने त्यांना चांगले खडसावले आहे.
त्यामुळे ते काय पुन्हा हिंमत करणार नाहीत." ती असे बोलताच आधी गंभीर असणारा त्याला तिचे शेवटचे बोलणे ऐकून आपोआप त्याच्या ओठांनी रुंदावण्याची क्रिया केली.
आपण काही चुकीचे वागलो नाही तर कशाला घाबरायचे.
चोराच्या मनात चांदणे असते.आपण थोडी चोर आहोत? तसेही माझ्या होणाऱ्या नवऱ्याने त्यांना चांगले खडसावले आहे.
त्यामुळे ते काय पुन्हा हिंमत करणार नाहीत." ती असे बोलताच आधी गंभीर असणारा त्याला तिचे शेवटचे बोलणे ऐकून आपोआप त्याच्या ओठांनी रुंदावण्याची क्रिया केली.
"जेवायला बाहेर जाऊया का? भांडून खूप भूक लागली आहे." ती म्हणते.
त्याने तिला तयारी करायला सांगून तो बाहेर कारमध्ये बसतो.
ती पटकन तयार होऊन त्याच्यासोबत कारमध्ये बसते.
त्या विषयाचा जास्त विचार करायला नको म्हणून ती बाहेर जेवण्याचा आग्रह करते.
"हर्ष, काहीच दिवस मघ मी येईनच त्या घरी?" जेवण झाल्यावर ती बोलते.
"आपल्या घरी." तो ती बोलली त्यात सुधारणा करत म्हणाला.
ती हसली आणि तिच्या खळीमध्ये त्याची नजर कैद झाली.
साखरपुडा करण्यासाठी त्याने घाई केली असे आधी वाटले होते पण आज जर त्यांनी त्यांचे नाते काय म्हणून विचारले असते आणि तो पुरावा नसता तर पुन्हा शब्दाने चिखलफेक तिच्यासोबत त्याच्यावरही झाली असती ह्याचा विचार ती कारमध्ये बसून करत होती.
त्याने डार्क चॉकलेट तिला दिले आणि घरी सोडून स्वतःच्या घरी गेला.
डॉक्टर मन ह्यांना फोन करून सर्व हर्षने सांगितले.त्यांनीही मित्र ह्या नात्याने समाजावत चिन्मयीची बाजू घेतली होती.
माझ्या अधीर मनाला
तुझीच लागे आस
कसे समजलेच नाही
झालीस तू इतकी खास
तुझीच लागे आस
कसे समजलेच नाही
झालीस तू इतकी खास
ब्लॉगिंग साईटवर त्याने मनातील भाव पोस्ट केले.
धीर धरायला थोडा
आता शिकायला हवे
सुंदर आयुष्याचे स्वप्न
दोघे पाहू मिळून नवे
आता शिकायला हवे
सुंदर आयुष्याचे स्वप्न
दोघे पाहू मिळून नवे
तिने त्याला प्रत्युत्तर दिले.
"मी ठीक आहे.काळजी करू नका." ती त्याला मेसेज करते.
तो ते पाहून तिला मेसेज करून झोपायला सांगतो.
आजची गोष्ट तर एक गोष्ट होती.अशा किती गोष्टी चिन्मयीने लहानपणापासून सहन केल्या असतील ह्याचा तो विचार करत होता.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जग कितीही पुढे गेले असेल तरी माणसाची मानसिकता बदलणे कठीण असते.आजही बहुतांश लोकांकडून भिन्न लिंगाच्या व्यक्तीकडे नर आणि मादी फक्त ह्या नजरेनेच बघितले जाते.डोळ्यांना दिसते तेच खरे मानणारे लोक त्या मागचे कारण मनापासून जाणून घ्यायला तयार असतीलच असे नसते.खूप वेळ ह्याबद्दल विचार करत हर्ष झोपून गेला होता.
सकाळी उठून पुन्हा नेहमी कामे करत पूर्ण आठवडा असाच दोघे घालवतात.तो त्या दिवसापासून न बोलता तिची जास्त काळजी घेत आहे हे तिला जाणवत होते.
"आपण लग्न कधी करायचे?" तो सुट्टी असल्याने तिला घरी घेऊन आलेला तेव्हा तिच्या बाजूला बसत विचारतो.
"चला आताच करू." ती म्हणते.
"मी खरंच विचारत आहे." तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला पाहत म्हणतो.
"पुढच्या महिन्यात करूया." ती बोलते.
"अजून एक महिना थांबायचे?" तो नाराजीच्या सुरात म्हणतो.
"शाळेचे सत्र संपेल मघ सुट्टी असेल ना.मी काही दिवस सुट्टी घेणार आहे.हॉस्पिटलमध्ये ही उद्या मी सुट्टीबद्दल सांगणार आहे." ती सांगते.
"बरं." तो म्हणतो.
"तुम्हाला लग्न कधी करायचे आहे?" त्याला आपण विचारलेच नाही असे वाटते.
"मलाही चालेल.माझे काही कामे आहेत त्यामुळे एक महिना मलाही जमणार नाही." तो कामाबद्दल सांगत म्हणतो.
"उशीर होतोय.मला घरी लवकर सोडा."त्याला बाजूला करत बोलते.
ही तीच मुलगी आहे का जिला माझ्या कारमध्ये काही महिन्यांपूर्वी बसायचे नव्हते आणि आता हक्काने सांगते हा प्रश्न त्याला पडतो.
"चला लवकर." ती त्याला हलवून बोलते.
क्रमशः
© विद्या कुंभार
पुढे काय होईल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा