प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-१६
मागील भागात,
"हे घर टू बी एच के आहे की थ्री?" चिन्मयीच्या प्रश्नाने त्याची तिला पाहण्याची तंद्री भंग झाली.
"टू बी एच के." तो म्हणाला.
त्याचे घर खूप मोठे आहे हे तिला त्यावरून समजायला वेळ लागला नाही.
"मला झोप आली आहे." ती म्हणाली.
आता पुढे,
"तुम्ही एका खोलीत झोपा मी हॉलमध्ये झोपतो." हर्ष म्हणाला.
"ठीक आहे." चिन्मयीने होकार दर्शवला.
पाऊस मुसळधार तर होताच पण अधून मधून विजाही कोसळत होत्या.
ती दिशा सांगितल्याप्रमाणे खोलीत गेली. खोलीचा दरवाजा बंद केला नव्हता.तो काही तिच्या मागे गेला नाही कारण उगाच ती चिडायची.तिला सारखं सोबत केलेली आवडायची नाही,कमजोर आहे हे तिला कोणी समजलेले पटत नव्हते.
पलंगावर उशी आणि पांघरुण होतेच.ते बेडशीटवर हात फिरवल्यावर तिच्या हाताला लागले.स्वच्छता आणि वस्तूच्या जागच्या जागी ठेवण्याच्या हर्षच्या सवयीला मनातच तिने दाद दिली.
आता तर फक्त काही वेळासाठी लाईट गेली तर एवढा अंधार आहे.मेणबत्ती, टॉर्च नाहीतर जनरेटर ह्याने कृत्रिम प्रकाशात काम करता येऊ शकते आणि लाईट येईल हा विश्वास असतो पण ज्यांचे पूर्ण आयुष्य निव्वळ अंधारातच आहे ते कशाची आस लावलात असतील? काही गोष्टीत अंधारात शोधण्यासाठी प्रकाशाची साथ जरी घेतली तरी ह्या लोकांना प्रकाश ही
संकल्पनाच अनुभवता येत नाही.तरीही हाताने चाचपून म्हणा आणि सूक्ष्म आवाजाच्या निरीक्षणाने गोष्टींचे आकलन करत दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट करतात.हर्ष मनाशी विचार करत होता.
संकल्पनाच अनुभवता येत नाही.तरीही हाताने चाचपून म्हणा आणि सूक्ष्म आवाजाच्या निरीक्षणाने गोष्टींचे आकलन करत दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट करतात.हर्ष मनाशी विचार करत होता.
जोरात वीज गर्जना झाली आणि बॉम्ब जसा फुटतो तसा मोठा आवाज काहीतरी फुटल्याचा झाला होता.
"हर्ष ..." तिची आतून तीव्र किंकाळी ऐकू आली.
तो उठून पळत आत गेला.तर ती पलंगावरून खाली पडली होती आणि थरथर कापत होती.
"लागलं का तुम्हाला?" त्याने विचारले.
तिने त्याला अनावधानाने चाचपून घट्ट मिठी मारली.
त्याला तिच्या शरीराची थरथर जाणवत होती.त्याने तिच्या
पाठीवरून हात फिरवला.पुन्हा वीज कोसळण्याचा आवाज झाला आणि तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली.
पाठीवरून हात फिरवला.पुन्हा वीज कोसळण्याचा आवाज झाला आणि तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली.
खूप वेळ तो तिला तसाच घेऊन बसला होता. नंतर तिला त्याची उब जाणवली आणि झटकन बाजूला झाली. त्याने तरी मागे तोल जाऊन पडू नये म्हणून एक हात पकडला होता.
"माफ करा. चु... चुकून झाले." ती म्हणाली.
तो उठला आणि बाहेर गेला.त्याला आपल्या अशा मिठी
वागण्याचा राग आला असेल असे तिला वाटले.
वागण्याचा राग आला असेल असे तिला वाटले.
"हे घ्या,आधी पाणी प्या." त्याने तिचा एक हात पकडून त्यात पाण्याचा पेला दिला.
तिने पूर्ण पाण्याने भरलेला पेला पिऊन खाली केला.
"माफ करा.मला वीजेची भीती वाटते म्हणून मला ते आठवले आणि मग मी..." पुढे ती बोलू शकली नाही.
त्याला आधी तर वाटत होते की विजेच्या आवाजामुळे तिला भीती वाटत असेल पण काहीतरी नक्कीच कारण असेल म्हणूनच ती एवढी घाबरली होती.
"तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला घाबरण्याचे कारण सांगू शकता." हर्षला जाणून घ्यायचे होते.
आता ती जरा सहजता तिला वाटत होती आणि पाणी पिल्याने तिला बरे वाटत होते तिने मान हलवली.
"मी अंधविद्यालयात होते तेव्हाची ही गोष्ट आहे." तिने सांगायला सुरुवात केली.
"मी नववीत शिकत होते. शेवटची परीक्षा देऊन आल्यावर त्या रात्री आम्हाला टीव्हीवर एक चित्रपट ऐकण्यासाठी जमा केले होते. टीव्हीवर चित्रपट चालू होता फक्त आम्ही ऐकत होतो.मध्येच एक माणूस आम्हाला त्यात काय होते हे सांगत होता.त्यामुळे आम्हाला ते समजत होते.थोडासा चित्रपट राहिला होता परंतु पावसामुळे लाइट्स गेल्या आणि आम्ही एकाच ठिकाणी बसलो.एक एक रांग करत प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवत आम्हाला झोपण्यासाठी मोठ्या खोलीमध्ये जायला सांगितले.
तसेचं सर्व जात असताना मला त्या माणसाने निरोप दिला की मला ऑफिसमध्ये बोलावले आहे.मी वर्गप्रतिनिधी असल्याने मला बोलावले आहे असे सांगितले."
तसेचं सर्व जात असताना मला त्या माणसाने निरोप दिला की मला ऑफिसमध्ये बोलावले आहे.मी वर्गप्रतिनिधी असल्याने मला बोलावले आहे असे सांगितले."
"पण तुमच्या मुलींच्या शाळेत एवढ्या रात्री तो काय करत होता?" त्याने मध्येच आपली शंका विचारली.
"तो आमच्या शाळेच्या संस्थापकाचा पुतण्या होता.त्यामुळे कोणी त्याला काही बोलायचे नाही." तिने सांगितले.
"मघ पुढे?"
"मी सर्वांची झोपण्याआधी हजेरी घेतली आणि ऑफिस हे वसतिगृहापासून दूर होते तिथे गेले.एकटीला यायला सांगितले म्हणून मी कोणाला सोबत घेऊन गेले नाही.तिथे मी जात असताना अचानक मला जाणवले की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे.मला भीती वाटली म्हणून मी जलद चालत
ऑफीसजवळ गेले तर ऑफिसच्या दाराला कुलूप होते.मला खोटे सांगितले हे समजले म्हणून मी पुन्हा मागे फिरणार तर विजेचा जोरात आवाज झाला आणि कोणीतरी माझा हात पकडला.नंतर त्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला आणि चेहऱ्याला होऊ लागला.
तो किळसवाणा आणि नकोसा असणारा स्पर्श मला असहनीय झाला आणि ती व्यक्ती हसताना आणि मध्येच माझे नाव घेताना समजले की ती व्यक्ती म्हणजे तो माणूसच होता जो संस्थापकाचा
विवाहित पुतण्या होता."
ऑफीसजवळ गेले तर ऑफिसच्या दाराला कुलूप होते.मला खोटे सांगितले हे समजले म्हणून मी पुन्हा मागे फिरणार तर विजेचा जोरात आवाज झाला आणि कोणीतरी माझा हात पकडला.नंतर त्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला आणि चेहऱ्याला होऊ लागला.
तो किळसवाणा आणि नकोसा असणारा स्पर्श मला असहनीय झाला आणि ती व्यक्ती हसताना आणि मध्येच माझे नाव घेताना समजले की ती व्यक्ती म्हणजे तो माणूसच होता जो संस्थापकाचा
विवाहित पुतण्या होता."
हे ऐकताना हर्षचा चेहरा रागाने लाल झाला आणि हाताच्या मुठी स्वतःचा राग नियंत्रित करण्यासाठी आवळून बंद केल्या.
"मी केनने त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याने ती हातातून खेचून घेऊन दूर फेकली.माझ्यासोबत चुकीचे घडत आहे हे समजताच मी त्याच्या एका हाताला धरून जोरात चावले आणि पायाने अंदाजाने त्याला ढकलले.तसे तो खाली पडला आणि मी तिथून पळत वाचवा म्हणून ओरडले. तिथे एक काम करणाऱ्या मावशींना माझा आवाज ऐकला आणि त्या माझ्याजवळ आल्या.काहीतरी विचित्र झाले हे त्यांना समजले. त्यांनी मला माझ्या वसतिगृहात सोडले." असे ती बोलत असताना त्याने समाधानाने निःश्वास सोडला.
"पुढे ह्याबाबत चौकशी काही झाली नाही का?" हर्षने विचारले.
"हो झाली ना पण त्याने मी त्याला एकांतात बोलावले असे सर्वांसमोर सांगितले." ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली.
"तुम्ही काय सांगितले?" त्याला ती निर्दोष असावी हे सर्वांना माहीत असण्यासाठी काय प्रयत्न केले हे जाणून घ्यायचे होते.
"माझ्यावर असा आरोप झाल्यावर काही मुलींनी त्यांच्या सोबतही असे झाल्याचे सांगितले.एका मुलीचा विनयभंग त्याने केला हेही तिने सांगितले तसेच रात्री मावशींनी मला वाचवले हे त्यांनी स्वतःची नोकरी जाईल ह्याची पर्वा न करता सांगितले.त्याला शिक्षा झाली पण वीज आणि तो प्रसंग माझ्या मनातून कधी गेलाच नाही.बाहेर पडताना असे किती तरी पुरुष रेल्वे असू दे की बस नाहीतर रिक्षा माझे अंध असण्याचा फायदा घेऊन मला घाणेरडा स्पर्श करतात.आधी मी खूप रडायची पण असे रडून चालत नाही हे मला शशीने समजावले.त्यामुळे आता प्रतिकार करते." ती म्हणाली.
चिन्मयीचा कोणावर का विश्वास नाही ह्याचे कारण आता कुठे हर्षला समजले होते.असल्या पापी मने असलेल्या लोकांचा त्याला खूप राग आला.सामान्य मुलींना तर हा त्रास होतोच पण ज्यांच्यात व्यंग आहे किंवा काही कमकरता आहे त्यांचा फायदा घेताना लोकांना काहीच कसे वाटत नाही हा अनुत्तरित प्रश्न त्याला पडला.
"माझा स्पर्श तुम्हाला तसा वाटत नाही ना?" त्याने न राहून थोडे घाबरतच विचारले.
"मला दिसत नसले ना हर्ष तरी कोणता स्पर्श चांगला आहे
आणि कोणता वाईट हे समजते.तुमचा तसा नाहीये." हुश्यातच नाक उडवत ती म्हंटली.
आणि कोणता वाईट हे समजते.तुमचा तसा नाहीये." हुश्यातच नाक उडवत ती म्हंटली.
तिच्या ह्या उत्तराने त्याला समाधान झाले आणि नाक उडवण्याच्या कृतीने हसायला.
"तुम्ही झोपा आता.मी इथेच बाजूला खुर्चीवर आहे." तो म्हणाला.
ती पलंगावर बसली आधी एक पाय समोर केला नंतर दुसरा पाय आणि एका हाताने पांघरूण ओढून ती त्याच्या बाजूला कुस करून डोळे मिटून पडून राहिली आणि झोपली.
तो तिच्याकडेच पाहत होता जणू त्याची झोप तिला देऊन तो जागाचं राहणार होता!
सहन किती केलेस तू
तरी तिरस्कार नाही मनात
एकटीच चालत राहिलीस
आशेने गर्द अंधाराच्या वनात
तरी तिरस्कार नाही मनात
एकटीच चालत राहिलीस
आशेने गर्द अंधाराच्या वनात
चारोळी टाईप करून त्याने मध्यरात्रीनंतर पोस्ट केली.
माणसाचे आयुष्य किती दुःखाने व्यापलेले आहे पण त्यातही चिन्मयीसारखे त्या संकटाच्या काट्यांवर चालत राहतात. कारण थांबणे म्हणजे संपणे हे सामान्य आणि निरोगी व्यक्ती असो की शारीरिकदृष्ट्या कमकुवत त्यांनाही हे लागू पडतेच. म्हणून जे आहे ते स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण आहे हे त्यांनाही परिस्थितीने आणि अनुभवाने उमगले असते.
क्रमशः
© विद्या कुंभार
हर्ष आणि चिन्मयीचे मैत्रीचे नाते पुढे काय वळण घेईल?
भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा