प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-१९
मागील भागात,
त्याची नजर जिला शोधत होती ती मात्र तिथे नव्हती.एका सुरक्षारक्षकाला त्याने गाठले आणि कोणाचे निधन झाले ह्याबाबत विचारले.त्यानेही दर्शन घेतले आणि मागे फिरला तर धपकन
कोणी पडल्याचा आवाज आला.
कोणी पडल्याचा आवाज आला.
कोण पडले हे बघितल्यावर त्याचे डोळे मोठे झाले आणि धावतच तो त्या व्यक्तीपाशी गेला.
आता पुढे,
चिन्मयीला फोन आलेला होता तो त्यांच्या जुन्या शिक्षकांचे निधन झाले आहे हे तिला सांगण्यात आले.
त्यांचे पार्थिव जेव्हा अंधविद्यालयाच्या पटांगणात ठेवले तेव्हा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत होता.चिन्मयीचे ते आवडते शिक्षक होते तसेच त्यांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले होते.ते फक्त शिक्षक नव्हते तर त्या सर्वांचे कुटुंबातील एक
सदस्यच होते.त्यामुळे चिन्मयीला ते दुःख सहन न झाल्याने तिला धक्का बसला.
सदस्यच होते.त्यामुळे चिन्मयीला ते दुःख सहन न झाल्याने तिला धक्का बसला.
समोर त्यांचा निष्प्राण देह ठेवला असेल आणि आता ते आपल्यात नसणार ह्याची जाणीव तिला झाल्याने जबर धक्का बसला आणि त्यांचे आपल्यातून जाणे सहन न झाल्याने तिला चक्कर आली आणि धपकन खाली पडली.
हर्षने मागे आवाजाच्या दिशेने पाहिलं तेव्हा चिन्मयीला काहीजण पाणी शिंपडून उठवण्याचा प्रयत्न करत होते.त्याने तिच्याजवळ जाऊन कोणाचाही विचार न करता सरळ तिला दोन्ही हातात उचलले आणि तिला घेऊन तो हॉस्पिटलकडे घेऊन जातो असे सांगितले.तिथल्या एका व्यक्तीला सोबत घेऊन जाण्याला त्याने संमती दिल्यावर अंधाविद्यालयातील प्रशासन समितीने सुद्धा त्याची थोडी फार चौकशी करून त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यास परवानगी दिली.
त्याने तिथे पोहोचण्या आधी डॉक्टर मनला हॉस्पिटलला यायला सांगितले.डॉक्टर मन ह्यांची आज सुट्टी असूनही ते आपल्या मित्रासाठी तिथे आले.
डॉक्टरांनी तिला नीट तपासले आणि तिला मानसिक धक्का बसल्या कारणाने ती बेशुद्ध झाली असल्याचे सांगितले आणि लवकर ती शुद्धीवर येईल त्यामुळे काही काळजी करू नका असे सांगितले.तिच्यात थोडा अशक्तपणा असल्याने त्यांनी सलाईन लावली.ती संपल्यावर आणि शुद्धीवर आल्या नंतर घरी जाऊ शकते असे सांगितले.
त्यांच्या सोबत आलेला माणूस बाहेर उभे राहून पाहत होता.
तिची अशी अवस्था बघून हर्षला तर काही सुचतच नव्हते.काही वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबासोबत जे झाले ते आठवून त्याला
चिन्मयीची आणखी काळजी वाटत होती.तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता.
चिन्मयीची आणखी काळजी वाटत होती.तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता.
थोड्या वेळाने चिन्मयी शुद्धीवर आली आणि तिने पाहिले तर
तिचा हात हातात घेऊन हर्ष शेजारी बसला होता.
तिचा हात हातात घेऊन हर्ष शेजारी बसला होता.
"मला काय झाले? आणि मी इथे का आहे?" त्याला पाहून प्रश्न केला.
त्यावर हर्ष म्हणाला, "कदाचित तुमच्या शिक्षकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला सहन न झाल्याने तुम्ही बेशुद्ध झाल्या होत्या म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो."
तिला ते आठवल्यावर तिने त्याचा आपल्या हातातील हात
सोडवला.त्यालाही तिची परिस्थिती माहीत होती म्हणून त्याने हात मागे घेतला.
सोडवला.त्यालाही तिची परिस्थिती माहीत होती म्हणून त्याने हात मागे घेतला.
तिला पुन्हा एकदा तपासले आणि डिस्चार्ज देण्यात आला.तेव्हा पैसेही त्यानेच दिले.तिचे सामान विद्यालयातच राहिले असेल हे तिला लक्षात आले म्हणून काही बोलली नाही.
"मी तुम्हाला सोडतो."
"त्याची काही गरज नाही.ते भाऊ सोबत आलेत तर मी
त्यांच्यासोबत जाते."
त्यांच्यासोबत जाते."
ती दुःखात आहे असेच समजून तिच्याबरोबर आता तरी न
रागवण्याचे ठरवले आणि तरीही तिला आणि त्या माणसाला त्याने त्या अंधविद्यालयात सोडण्याचा निर्णय घेऊन त्याने कारमध्ये तिला धरून बसवले.
रागवण्याचे ठरवले आणि तरीही तिला आणि त्या माणसाला त्याने त्या अंधविद्यालयात सोडण्याचा निर्णय घेऊन त्याने कारमध्ये तिला धरून बसवले.
कार चालवत असताना तो तिच्याकडे अधून मधून कटाक्ष टाकत होता.मध्येच त्या माणसाबरोबर बोलत होता.त्या शिक्षकांबद्दल बोलणे होत असताना ती पुन्हा रडत होती.तिच्या डोळ्यांतून पाणी येतं आणि बाजूलाच असलेल्या टिश्यू पेपर तो तिच्याकडे हातावर थाप मारून सरकवतो.ती तो घेते आणि अजून जास्त रडायला येते.तो टिश्यू पेपर पूर्ण भिजतो तर तो टिश्यू पेपरचा पूर्ण बॉक्स तिच्या मांडीवर ठेवतो.
कार अंधविद्यालयात येते आणि तिने अर्ध्या पेक्षा जास्त तोपर्यंत रडल्याने टिश्यू पेपरचा बॉक्स खाली केलेला असतो.त्यातही तिच्या रडून लाल झालेल्या तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जाते आणि तो पुन्हा नजर फिरवतो.सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करते पण निघत नसतो.तो आधी स्वतःचा काढतो आणि मघ तिचा काढून देतो.त्या आधी त्या माणसाला पुढे जायला सांगतो.
ती बाहेर उतरायला जाणार तर तो तिच्या खांद्यावर हात ठेवून पाण्याची बाटली पुढे करतो.ती त्यातले पाणी पिते.थोडा मोठा श्वास घ्यायला सांगितल्यावर ती त्याचे ऐकून तसे करते.
ती बाहेर येण्याआधी तोच बाहेर येतो.तिच्याकडे केन नसते तर तो तिचा हात आपल्या हातावर ठेवून हळू चालायला लागतो.तिथे पोहोचण्याआधी तिचा चेहरा ओल्या रूमाने पुसतो आणि दुसरा स्वच्छ रुमाल तिच्या हातावर ठेवतो.ती काहीच न बोलता तिथे सगळ्यांच्या सोबत उभी राहते.
तिच्या सोबत नेहमी असणारे काका तिच्याजवळ येऊन तिला केन देतात.अंत्यसंस्कार झालेले आहेत हे तिला सांगितले जाते.पुन्हा डोळ्यांतून अश्रू येतात आणि आता ती हर्षने दिलेल्या रुमालाने टिपते.
हर्ष तिथेच उभा राहून तिला बघत असतो.त्यालाही वाईट वाटते.ते शिक्षक खूप जवळचे आहेत हेच त्याला तिच्या आजच्या वागणुकीवरून आणि त्या माणसाने सांगितल्यावर समजते.
दुखवटा असल्याने पुढचे शिकवण्याचे तास होत नाहीत.हर्ष तिला काही दिवस सोडण्याची जबाबदारी प्रशासकांकडून घेतो.ते तसे लेखी लिहून देतात पण ह्या बदल्यात शाळेकडून त्याला कोणताच मोबदला मिळणार नसतो.तेही तो मान्य करतो.
"तुमचे मिस चिन्मयीशी काय नातं आहे?" तिथल्या मुख्य समितीचे एक सदस्य विचारत असतात.
हर्षने उत्तर दिल्यावर ते फक्त हसतात आणि त्याला लेखी स्वरूपात परवानगी देतात.
तो तिला घरी जाण्यासाठी बोलतो तेव्हा ती नकार देते.सोबत असणारे काका तिला त्या परवानगीच्या कागदाबद्दल सांगतात तेव्हा ती तयार होते.
तो तिला सोडतो आणि घरी जातो.ती त्याच्याशी काहीच बोलत नसते.
जाताना तिथे एक काकी त्याला मध्येच अडवून इथे पुन्हा का आलास म्हणून विचारणा केल्यावर तो त्यांना परवानगीचा कागद दाखवतो.त्यामुळे त्या पुढे काही बोलत नाहीत.
तो घरी जाऊन थोडा वेळ बसतो मग बनवलेले जेवण गरम करत असताना पूर्ण दिवसाचा विचार करतो.ती रडत होती हे त्याला सहन होत नव्हते.त्यात स्वतःला इतका त्रास करून घेतला की तिची शुद्ध हरपली होती.तिला रडताना तो पहिल्यांदाच बघत होता.
ती जेवली असेल की नाही ह्याची त्याला चिंता होती.
चिन्मयी भूतकाळात पोहोचली होती.सर्वात आधी कौतुक कोणी केले असेल तर हेच सर होते.नेहमी तिला ती कोणापेक्षा कमी नाही हेच तिच्या मनावर बिंबवत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकून आज ते आपल्याला सोडून गेले ह्याचे तिला खूप वाईट वाटत होते.ती काही न खाता तशीच झोपून राहिली.
सोडून जाण्याचे दुःख
असहनीय नि मोठे फार
जीवनातील श्वासांची
होते मृत्यूपुढे लगेच हार
असहनीय नि मोठे फार
जीवनातील श्वासांची
होते मृत्यूपुढे लगेच हार
मागे राहणारा जीव
आठवणीत झुरत राहतो
नयनांतील अश्रूंचा पूर
अविरत भावनेने वाहतो
आठवणीत झुरत राहतो
नयनांतील अश्रूंचा पूर
अविरत भावनेने वाहतो
डोळ्यांतील अश्रू पुसून तो ही रचना ब्लॉगवर पोस्ट करतो.
त्याला आपले आईवडील आणि बायको सोबत न जन्मलेले मूल गमावण्याचे दुःख पुन्हा जखम उघडी झाल्यावर जसे होते तसेच होत असते. चिन्मयी ही फक्त आपली सखी आहे का आणखी कोणी ह्याचे उत्तर त्याला आज हॉस्पिटलमध्ये तिच्या शुद्धीत नसलेल्या शरीराकडे पाहून मिळालेले असते.
थोड्यावेळापूर्वी,
"तुमचे मिस चिन्मयीशी काय नातं आहे?"
"मित्र आता आहे पण कदाचित ते नातेही लवकरच बदलेल." हेच उत्तर त्याने दिले होते.
त्यामुळे अनुभवी नजरेने त्या प्रशासकांनी ते उत्तर ऐकून
स्मितहास्य केले होते.त्या आधी त्या दोघांसोबत पाठवलेल्या माणसाने हॉस्पिटल मधली इत्यंभूत माहिती त्यांना आधीच दिल्याने त्यांना त्यांचे नाते काय आहे हे समजण्यास वेळ लागला नाही.
स्मितहास्य केले होते.त्या आधी त्या दोघांसोबत पाठवलेल्या माणसाने हॉस्पिटल मधली इत्यंभूत माहिती त्यांना आधीच दिल्याने त्यांना त्यांचे नाते काय आहे हे समजण्यास वेळ लागला नाही.
"मघ लेखी स्वरूपात सोडण्याची परवानगी का हवी?" त्यांनी विचारले.
"अजून त्यांना ह्याबद्दल माहिती नाही.तसेच मागे त्यांना सोडायला गेलो होतो तेव्हा तिथल्या लोकांनी गोंधळ घातला होता म्हणून ह्याची गरज आहे."तो कागदाकडे बोट करून म्हणाला.
"ठीक आहे." ते म्हणाले.
"तुम्ही त्यांची काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवू शकता."असे हर्षने म्हणताच त्यांनी समाधानाने मान हलवली.
....
....
रात्री तो आपल्या बायकोच्या फोटोकडे पाहून खूप वेळ विचार करत होता.
"मी बरोबर करतोय ना?" त्याने तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोकडे पाहून विचारले.
क्रमशः
© विद्या कुंभार
हर्षने कोणता निर्णय घेतला असेल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा