प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२३
मागील भागात,
"अजून काही प्रश्न आहेत का?" तो विचारत होता.
"नाही,पण सुचले तर नंतर विचारेन." ती म्हणाली.
शाळेत एखादा धडा शिकवल्यावर काही प्रश्न आहेत का हे विद्यार्थ्यांना विचारल्यावर आधी अभ्यास करून पुन्हा नंतर विचारतात हेच त्याला तिच्याकडे पाहून वाटायला लागले.
आता पुढे,
चिन्मयी आणि हर्ष दोघेही एका हॉटेलमध्ये जेवायला गेले.त्याने त्याच्या आवडीचे जेवण सांगितले आणि तिने आधी तिथे काय खास आहे हे विचारून स्वतःचे जेवण मागवले.
गाण्याची मैफिल तिथे चालू होती आणि मध्येच त्यांनी काही ठराविक ब्लॉगचे वाचन करण्याचे ठरवले.
"मी आलोच म्हणत." हर्ष तिथून उठून गेला.
ती आपली केन बंद करून बसली.आधीच हात वगैरे धुवून आली होती.तिथेच नवीन गाणी ऐकत होती मध्येच पुढील कार्यक्रमासाठी ती बंद केलीत.
तेवढ्यात तिथे एक घोषणा झाली.कोणीतरी आपली स्वरचित रचना वाचून दाखवणार होते असे नाव न घेता सांगितले.चिन्मयी सुद्धा उत्सुक होती की काय असेल ती रचना चारोळी की कविता?
"नमस्कार मी आज काही माझ्या स्वरचित चारोळ्या वाचून दाखवणार आहे तर आशा आहे की तुम्ही माझे काही चुकले तर ते समजून घ्याल."
हा आवाज ऐकून तिच्या हृदयाची स्पंदने वाढू लागली.
त्याने बोलायला सुरुवात केली.
"प्रेमाच्या वसंताला येतो
तुझ्या असण्याने बहर
सखीचे निर्मळ,दिलखेचक
वाटे स्मितहास्यच कहर "
तुझ्या असण्याने बहर
सखीचे निर्मळ,दिलखेचक
वाटे स्मितहास्यच कहर "
"वाह.." म्हणून सर्व जण टाळ्या वाजवत राहतात.
दुसरी चारोळी तो वाचतो.
"तू नसताना समोर
चलबिचल होई मन
कधी बाजूला होतील
दुराव्याचे काळे घन "
चलबिचल होई मन
कधी बाजूला होतील
दुराव्याचे काळे घन "
पुन्हा टाळ्यांचा कडकडाट त्याला प्रोत्साहन देतात.
"किती वाट पाहू सखे?
आता तरी हो बोल
सख्याच्या वेड्या प्रितीचे
जाणून घे तू जरा मोल"
आता तरी हो बोल
सख्याच्या वेड्या प्रितीचे
जाणून घे तू जरा मोल"
पुन्हा एकदा त्याला टाळ्यांच्या रुपात कौतुक होते.
तो सर्वांना धन्यवाद देत आपल्या जागेवर बसतो.
"तुम्ही काव्यहर्ष आहात?" चिन्मयी त्याला आश्चर्यचकित झालेल्या स्वरात विचारते.
"हो." तो हसून बोलतो.
"एक मिनिट म्हणजे तुम्ही माझ्या चारोळ्या वाचत होत्या?" त्याने आता कुठे तिच्या बोलण्यावर नीट लक्ष दिले.
"हो, मी शब्दस्पर्शा म्हणून लिहिते." तिने आपली ब्लॉगची ओळख करून दिली.
जरी तिला दिसत नसले तरी ती म्हणाली, "डोळे मोठे करू नका.तुम्हाला धक्का बसला ते समजले." स्मितहास्य करत ती म्हणाली.
"मी तुमचा हात पकडू शकतो?" त्याने तिची परवानगी मागितली.
तिने होकार दिला आणि त्याने काहीवेळासाठी तिचे हात हातात घेऊन बसला.
जेवण आल्यावर दोघे जेवून त्यातले प्रत्येकाने अर्धे पैसे देऊन निघाले.
त्याने घराच्या थोड्या अंतरावर तिला सोडले आणि जाताना तुमचा निर्णय लवकर सांगा असे सांगितले.
"हो. मी सांगेन." ती शांतपणे बोलली.
घरी गेल्यावर ती पूर्ण दिवस कसा गेला त्याचा विचार करत होती.
ती जे विचारत होती त्याची हर्षने सर्व उत्तरे समाधानकारक दिल्याने तिने त्याचा विचार करण्याचा ठरवले.
ती जे विचारत होती त्याची हर्षने सर्व उत्तरे समाधानकारक दिल्याने तिने त्याचा विचार करण्याचा ठरवले.
तो तिकडे आजचा दिवस आठवत होता.ती किती चांगली चारोळी आणि कविता करते हे त्याला माहीत होते.
ऑनलाईन व्यासपीठावर तिला खूप वेळा विजेते मानांकन प्राप्त झाले होते हे त्याने तिने पोस्टद्वारे ती बातमी सामायिक केल्याने त्याला कल्पना आली होती.
देते आता शब्दरूपी
तुझ्या होकाराला उत्तर
पाहून तुझे वेडे प्रेम सख्या
सखी झाली तुझी निरुत्तर
तुझ्या होकाराला उत्तर
पाहून तुझे वेडे प्रेम सख्या
सखी झाली तुझी निरुत्तर
असे म्हणून तिने शब्दस्पर्शा ह्या तिच्या ब्लॉगवर पोस्ट केले.
त्याला नोटिफिकेशन आले आणि ते उघडून पाहिल्यावर त्याचे डोळे पाणावले होते.ह्या क्षणाची त्याने खूप वाट पाहिली होती.
उत्तरासाठी फार फार तर विनंती पण कोणतीही जबरदस्ती न करण्याचे त्याने आधीच ठरवले होते.
उत्तरासाठी फार फार तर विनंती पण कोणतीही जबरदस्ती न करण्याचे त्याने आधीच ठरवले होते.
दुसऱ्यादिवशी तो सकाळीच हजर होता.दोघांना आज सुट्टी होती.
तिने दरवाजाची घंटी वाजली म्हणून दरवाजा उघडला तर मोगऱ्याचा सुवास तिला आला.
"हर्ष? तुम्ही?" तिला हे अनपेक्षित होते.
"तयार होऊन लगेच बाहेर या.मी वाट पाहतोय." असे म्हणून पानांच्या मध्ये लपलेला मोगऱ्याचा मोठा गजरा तिच्या हातात देऊन तो कारमध्ये बसला.
तिने आधी त्या फुलांचा सुगंध श्वासात भरून घेतला आणि तयारी करण्यास सुरुवात केली.
तो अधीर मनाने तिची वाट पाहत होता.
आज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ तिने तयार होण्यास घेतला.
तिने ड्रेस नीट केला आणि घराला कुलूप लावून ती बाहेर आलेली.
तिने ड्रेस नीट केला आणि घराला कुलूप लावून ती बाहेर आलेली.
केनचा आवाज आला आणि त्याने तिच्याकडे पाहिले.तो ड्रायव्हिंग सीटवर बसला.त्याच्या बाजूचा दरवाजा उघडून ती हळूच आतमध्ये बसली.
"दोघांनी न ठरवता एकसारख्या रंगाचे कपडे घातले आहेत." तो म्हणाला.
"खरचं?" तिने विचारले.
"हो.मी पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे. तुम्हीही पांढऱ्या आणि राखाडी थोडीशी लाल फुले असलेली कुर्ती आणि राखाडी रंगाचा पायजमा घातला आहे." तो म्हणाला.
आता त्याला काय माहीत हिने अनुजा वहिनींना फोन करून त्याने काय घातले होते हे विचारले होते पण ते सांगणे तिने कटाक्षाने टाळले.
तिने चेहऱ्यावर साधी पावडर आणि क्लचरमध्ये आपले केस अडकवून मोगऱ्याचा गजरा केसात माळला होता.
"गोड आणि सुंदर !" तो तिला बघत म्हणाला.
तिला समजले तरी तिने विचारले, "कोण?"
"माझी सखी चिन्मयी उर्फ शब्दस्पर्शा." तो सीटबेल्ट बांधून देत म्हणाला.
त्याच्या अचानक जवळ येण्याने तिचा श्वास मध्येच थांबला असे वाटले.
"आपण कुठे जातोय ?" श्वास नियंत्रित करत तिने विचारले.
"तुम्हाला कुठे जायचे आहे?" आज त्याने तिला कुठे जायचे हे विचारले.
"त्या हॉस्पिटल जवळच्या टेकडीवर जाऊया?" तिने विचारले.
"तुम्ही गेलात कधी?" त्याने कार चालवत विचारले.
"नाही.फक्त त्याबद्दल ऐकून आहे."
"पण खूप जास्त चालावे लागेल?" त्याला काळजी वाटत होती.
"हो,माहीत आहे मला त्याबद्दल." ती तो नेतो की नाही म्हणून जरा हुश्यातच बोलली.
त्याला तिच्या अशा चिडण्याचे हसायला येत होते.
दोघेही तिथे जाण्याआधी थोडा हलका आहार घ्यायचा विचार करत होते कारण प्रेमाने पोट भरत नाही.सकाळी भेटण्याच्या ओढीने ना त्याने काही खाल्ले होते ना तो लवकर आल्याने तिने.
त्याने काही सामान घेतले आणि टेकडीजवळ गेले.थोडे ऊन असल्याने त्याने तिला एक कॅप घातली.तिला रस्ता सांगत दोघे जात होते.मध्येच काही लोक त्या दोघांना भेटत होते.तिला सांभाळून जा म्हंटल्यावर तिचा चेहरा फुगत होता आणि तो मुद्दाम गालावर हात ठेवून लक्ष नका देऊ बोलत पुढे चालत होता.आधी मध्ये तो थोडे पाणी आणि सोबत आणलेला लिंबू सरबताचे छोटे घोट प्यायला सांगत होता.
ती सरबताची बाटली हलवून त्याच्यासाठी पण आहे ना हे पिताना तपासत होती.
"अजून किती वेळ हर्ष?" ती विचारते.
"अजून थोडा वेळ.थकला असाल तर बसूया.नंतर पुन्हा चालू या." तो म्हंटला.
तिने मानाने होकार दिला.
एक लहान झाड होते त्याच्या सावलीला दोघेही बसले.
थकल्यामुळे तिने त्याच्या बाजूला बसत अलगद मान त्याच्या खांद्यावर ठेवली.तो तिच्याकडे बघत होता.चेहरा थकला होता आणि सतत चालण्याने तिच्या श्वासांची गती तीव्र होती.काही बटा वाऱ्याने चेहऱ्यावर आल्या होत्या त्या त्याने तिच्या कानाच्या मागे सरकवल्या.त्या स्पर्शाने तिच्या अंगावर विजेसारखा सरकन काटा आला होता.
थकल्यामुळे तिने त्याच्या बाजूला बसत अलगद मान त्याच्या खांद्यावर ठेवली.तो तिच्याकडे बघत होता.चेहरा थकला होता आणि सतत चालण्याने तिच्या श्वासांची गती तीव्र होती.काही बटा वाऱ्याने चेहऱ्यावर आल्या होत्या त्या त्याने तिच्या कानाच्या मागे सरकवल्या.त्या स्पर्शाने तिच्या अंगावर विजेसारखा सरकन काटा आला होता.
"इथूनच घरी जायचे का?" त्याने ती पुढे चालेल की नाही ह्याचा विचार करून विचारले.
"नाही,पुढे जाऊया.थोडा वेळ फक्त." ती म्हणाली.
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आणखी जवळ बसवले. तिच्या केसातून मोगऱ्याच्या माळलेल्या गजऱ्याचा मोहक सुगंध येत होता.
दोघांनी चढाईला सुरुवात केली.मध्येच येणारे दगड आणि अडथळे तो पायाने ती तिथे पोचण्याआधी बाजूला करत होता.
एका ठिकाणी तिचे पाय दुखायला लागले हे त्याला तिने थांबून पायावर हात टेकवले तसे समजले.त्याने लगेच केन बंद करून तिच्या हातात दिली आणि दोन्ही हातावर उचलून चालू लागला.
"काय हे हर्ष? मला खाली सोडा." ती म्हणाली.
"बिल्कुल नाही.आता आपण पोहोचू.हालचाल करु नका दोघेही खाली पडू.मघ तुम्हालाच मला असे उचलून खाली न्यावे लागेल."
असे म्हंटल्यावर तिने हालचाल करणे थांबवले आणि त्याच्या गळ्यात हात गुंफले.
असे म्हंटल्यावर तिने हालचाल करणे थांबवले आणि त्याच्या गळ्यात हात गुंफले.
तिथे पोहोचल्यावर एका ठिकाणी छोटेखानी हॉटेल होते तिथे ते जेवायला जाण्याचे ठरवतात.वॉशरूमची सोय आहे का पाहून त्याने तिला सोबत नेले.बाहेर उभे राहून तो तिची वाट बघत थांबला होता.
दोघे थोडे जेवले कारण पुन्हा खाली चालत जायचे होते.तिने किती वाजले हे पाहिले आणि संध्याकाळ होणार होती त्यामुळे तो घाई करत असताना तिने त्याला हात धरून थांबवले.
"तुझ्यासारखीच मलाही होती
प्रेम मिळण्याची एक आस
कधी तू बनलास जिवलग सखा
ह्या सखीसाठी एवढा खास?"
प्रेम मिळण्याची एक आस
कधी तू बनलास जिवलग सखा
ह्या सखीसाठी एवढा खास?"
तो स्तब्ध झाला आणि भानावर आल्यावर त्याने पुढे काही बोलणार तेवढ्यात ती पुढे बोलायला सुरुवात करते.
"सूर्यास्ताला साक्षी मानून
तुला मी होकार आज देते
सात जन्म माहीत नाही मला
मात्र ह्या जन्मासाठी साथ देते "
तुला मी होकार आज देते
सात जन्म माहीत नाही मला
मात्र ह्या जन्मासाठी साथ देते "
आता कुठे सूर्यास्त होई पर्यंत तिचा थांबण्याचा हट्ट का होता हे त्याला समजते.तिने खाली गुडघ्यावर बसून त्याला उत्तर दिलेले असते तो तसाच पुढे जाऊन तिला मिठी मारतो आणि चिन्मयीच्या कपाळावर साश्रू नयनांनी ओठ टेकवतो.
तिच्यासाठी हा निर्णय अवघड होता हे तो जाणून होता.
थोड्यावेळानी ती त्याला बाजूला करते आणि बोलते,
"पण माझी एक अट आहे."
"पण माझी एक अट आहे."
आता कुठे आनंदाच्या जहाजात बसलेला तो त्या एका अटीने लगेच वास्तवात आला.
क्रमशः
© विद्या कुंभार
चिन्मयीची अट काय असेल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा