प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२५
मागील भागात,
"जरा वेग वाढव." तरीही सूचना केलीच.
"एक काम कर.तू बस पुढे आणि चालव.किती रहदारी आहे माहीत आहे ना? आता जर तू शांत नाही बसलीस ना तर तुला मी इथेच सोडेन." रागावून शशी म्हणाली.
एकतर खूप रहदारी होती.त्यात मध्येच ब्रेक दाबावा लागत होता आणि दोघी पडू नये ह्याचीही ती खबरदारी घेत होती.
दोघीही त्याच्या घराजवळ पोहोचल्या.
आता पुढे,
शशीला कामानिमित्त फोन आल्याने ती चिन्मयीला बोलते, "मला जावे लागेल."
आपल्यामुळे तिला उशीर नको व्हायला म्हणून ती तिला जाण्यास सांगते.
"काळजी घे आणि काही वाटले तर लगेच मला फोन कर." असे म्हणून ती निघून गेली.
चिन्मयी आधी आली असल्याने तिला कोणत्या मजल्यावर हर्ष राहतो हे माहीत होते आणि म्हणून ती तसेच त्याच्या मजल्यावर केनच्या मदतीने गेली.
खूप वेळ तिने दाराची घंटी वाजवली पण कोणी दरवाजा उघडला नाही.थोडावेळ तिथे वाट पाहण्याचा विचार केला.सकाळची संध्याकाळ झाली हर्षबद्दल काहीच समजत नव्हते.
ती रागानेच तिथून निघून घरी गेली.
प्रेम वगैरे हे काही खरे नसते असे समजून ती इथून पुढे त्याचा विचार करायचा नाही असा मनाशी पक्का निर्धार करते.
दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये जाते.दोन-तीन दिवस अपॉइंटमेंट नसल्याने ती गेली नव्हती.
"आज जरा जास्त अपॉइंटमेंट आहेत.माझा शिकवण्याचा तास मी नंतर घेईन." तिने फोन करून शाळेतील काकांना त्याबाबत सांगितले.
तिचे शेवटचे सेशन झाले.
"डॉक्टर मन ह्यांनी तुम्हाला बोलावले आहे." तिला एक परिचारिकेने निरोप दिला.
"हो." असे म्हणून आपले सामान आवरत होती.
तिने डॉक्टर मन यांची केबिन कुठे आहे हे विचारले आणि तिथे गेली.मनात तर त्यांनी का बोलावले असेल ह्याचा विचार करत होती.
"मी आतमध्ये येऊ शकते का?" तिने आतमध्ये जाण्या आधी विचारले.
"हो." आतून आवाज आला.
"मिस चिन्मयी बसा." डॉक्टर मन म्हणाले.
तिने आधी केनने खुर्चीजवळ असेल का म्हणून फिरवून पाहिले.
एका ठिकाणी केन थांबली मग तशीच ती आधी हात लावून त्याला स्पर्श करून मागे करते आणि मघ त्यावर बसते.
एका ठिकाणी केन थांबली मग तशीच ती आधी हात लावून त्याला स्पर्श करून मागे करते आणि मघ त्यावर बसते.
डॉक्टर मन तिला मदत करण्यासाठी उठणारच होते पण ती तोपर्यंत बसली होती.
"बोला.तुम्ही मला इथे का बोलावले?" तिने मुद्दालाच हात घातला.
त्यांनी फोन करून दोघांसाठी चहा मागवला.मघ तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते बोलायला लागले.
"मला हर्षबद्दल बोलायचे आहे."
"मला तुमच्या मित्राबद्दल काही ऐकून घ्यायचे नाही आहे." निर्विकारपणे ती म्हणाली.
"पण तुम्ही तर प्रेम करत ना?" त्यांनी विचारले.
"करत होते पण आता करत नाही." ती शांतपणे म्हणाली पण हे बोलताना तिच्या हृदयावर मात्र दुःखाने कळ उठत होती.
तेवढ्यात चहा आला आणि त्याने आग्रह करून तो प्यायला सांगितला.तिने शांतपणे पिऊन टेबलवर ठेवला आणि उठणार तर त्यांनी तिला थांबायची विनंती केली.
"बोला,तुम्हाला काय बोलायचे आहे?" आता मात्र तिचा
वैतागलेला सूर तिच्या बोलण्यात डोकावत होता.
वैतागलेला सूर तिच्या बोलण्यात डोकावत होता.
डॉक्टर मन ह्यांनी एक एक गोष्ट सांगितल्यावर मघाशी मनात राग होता तर त्याची जागा आता काळजीने घेतली होती.
"कुठे आहेत हर्ष?" तिने जलद झालेल्या श्वासानेच विचारले.
"मी तुम्हाला घेऊन जातो." डॉक्टर मन यांनी तिची स्थिती समजून ते सोबत गेले.
"आताच झोप लागली आहे.थोड्यावेळाने उठतील.आज डिस्चार्ज मिळेल." असे म्हणून तिथे जे दुसरे डॉक्टर होते ते गेले.
तिने बाजूला असणाऱ्या छोट्या खुर्चीवर बसून चाचपडत
स्वतःच्या हातात त्याचा हात घेतला.त्या दोघांना त्यांचा वेळ देण्यासाठी डॉक्टर मन निघून गेले.
स्वतःच्या हातात त्याचा हात घेतला.त्या दोघांना त्यांचा वेळ देण्यासाठी डॉक्टर मन निघून गेले.
हातावर पडलेल्या काही पाण्याच्या थेंबाने त्याला जाग आली.
"चिन्मयी तुम्ही इथे?" त्याने हळूहळू डोळे उघडले तेव्हा नजरेसमोर पाहून तो चकित झाला.
"का... तुम्ही का सांगितले नाही?" ती रडायला लागली.
"तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता.तसेही आज डिस्चार्ज मिळणार होताच." तो तिने बाजूला केलेला तिचा हात हातात घेऊन
म्हणाला.
म्हणाला.
"असे कसे तुम्ही कार चालवत होता?" आता मात्र जाब विचारायचे काम तिने सुरू केले.
"माहीत नाही.कशी काय गाडी ठोकली.मी कारच्या बाहेर आलेलो.
तेव्हा भरधाव वेगात त्या गाडीने ठोकले." तो आता बसून तिच्याशी बोलत होता.
तेव्हा भरधाव वेगात त्या गाडीने ठोकले." तो आता बसून तिच्याशी बोलत होता.
ती त्याचा हात आणि हळू हळू चेहरा हाताने चाचपडत तपासत होती की कुठे कुठे त्याला लागले आहे.
त्याने हाताला आणि पायाला थोडे लागले आहे असे सांगितले.
आता तो बरा आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे बोलत होता.
आता तो बरा आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे बोलत होता.
"एवढे झाले साधा फोन करता येत नाही?" चिडून ती प्रश्न करत होती.
"माझा फोन हरवला आहे.मला रस्त्यावरच्या एका व्यक्तीने इकडे आणले होते." तो माहिती पुरवत होता.
"तुम्हाला वाटले की मी पाहू शकत नाही.त्यामुळे मला काही समजणार नाही.मी तुमची काळजी घेऊ शकत नाही.म्हणूनच तुम्ही मला सांगणे योग्य समजले नाही ना?" अपघाताची गोष्ट न सांगितल्याने तिच्या मनाला खूप लागले होते म्हणून ती दुखऱ्या स्वरात म्हणाली.
"तुम्ही गैरसमज करू नका.मी डिस्चार्ज झाल्यावर तुम्हांला सर्व सांगणार होतोच पण डॉक्टर मनने आताचा सांगून टाकले." मनात आपल्या मित्राला हर्ष खूप ओरडत होता.
"वहिनी,मी तुम्हाला सांगून काही चुकीचे केले का?" मागून डॉक्टर मन येत म्हणाले.
"बिल्कुल नाही." ती म्हणाली.
मनोमन वहिनी शब्द ऐकल्याने तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
संध्याकाळी त्याला डिस्चार्ज मिळाला पण त्याला काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
"मी तुमच्यासोबत थांबले तर काही हरकत नाहीये ना?" चिन्मयीने घरी पोहोचल्यावर विचारले.
"नाही.तुमचचं घर आहे." तो हसून म्हणाला.
त्याच्या घरी काम करणाऱ्या काकू त्यांनी दोघांना जेवण दिले.
जेवण झाल्यावर तिने सर्व भांडी घासून आणि धुवून ठेवली.
"औषधाच्या गोळ्या खायच्या असतील ना?" तिने विचारले.
"तुम्ही भांडी घासत असताना खाल्ल्या." त्याने उत्तर दिले.
त्याने रेडिओ लावला आणि तिला जवळ बसण्यासाठी बोलावले.
तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो डोळे मिटून गाणी ऐकत होता.ती मात्र वेगळ्याच विचारात होती.
तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो डोळे मिटून गाणी ऐकत होता.ती मात्र वेगळ्याच विचारात होती.
"छान आहे ना हे गाणं?" त्याने विचारले.
तिचा काहीच प्रतिसाद नव्हता.
त्याने वळून तिच्याकडे बघितले तर तिचा गाल ओला झाला होता.
"चिन्मयी काय झालं?" त्याने तिचे अश्रू पुसत विचारले.
"मी पाहू शकत असते तर किती बरे झाले असते ना?" तिने त्याला मिठी मारत हुंदके देत विचारले.
"तुम्ही असा का विचार करता?" त्याने विचारले.
"तुम्हाला कुठे आणि किती लागले आहे हे मला तुम्हाला विचारल्याशिवाय समजत नाही.स्पर्श केल्याने सर्वच समजते हा माझा आजपर्यंतचा भ्रम मात्र तुटला." आपल्यात कमी आहे हे ती बोलून दाखवत होती.
"मी कधी बोलण्यातून किंवा वागण्यातून तसे तुम्हाला जाणवून दिले का?" त्याला पण आता आपण तिच्यापासून लपवले ह्याचे वाईट वाटत होते.
"तुम्ही कधी जाणवून दिले नाही पण तुमच्याशी संपर्क होत नव्हता तेव्हा मला वाटले की तुम्ही मला फसवले.तुम्हाला माझी साथ नको आहे.म्हणूनच तुम्ही अचानक गायब झालात." ती प्रामाणिकपणे त्याच्याजवळ व्यक्त होत होती.
"अशा परिस्थितीत तसा विचार करणे स्वाभाविक आहे.तुम्हाला तरी कुठे माहीत होते का माझ्यासोबत काय झाले आहे? त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा." तो तिला शांत करत मिठी घट्ट करत म्हणाला.
ती घरी आलेली आणि वाट पाहत थांबली होती हे सर्व त्याला सांगितले.त्यालाही ती एवढ्या वेळ एकटी बाहेर बसली ह्याचे वाईट वाटले.
त्याने तिला तसेच बाहेर नेले आणि घराची लॉक सिस्टीम होती त्यात पासवर्ड तर होताच पण आणखी एक बोटांचे ठसे घेण्याचा पर्याय होता तर त्यावर क्लिक करून त्याच्या सोबत तिच्याही बोटांचे ठसे घेतले.म्हणजे पुढे तिला असे वाट बघत बाहेर बसावे लागणार नव्हते म्हणून लगेच त्याने हे करून घेतले.
"मी ह्यासाठी नव्हते सर्व सांगितले." तिला वाटत होते उगाच आपण लग्नाआधी हक्क गाजवत आहे असे वाटत होते.
"हे घर आपले दोघांचेही आहे." पुन्हा जणू तो तिला आठवण करून देत आहे अशाच अर्थाने म्हणाला.
"बरं झोपा आता.खूप उशीर झाला आहे." ती घड्याळाकडे हात फिरवून म्हणाली.
"तुम्ही एक मस्त गाणं म्हणा.मग झोपू." तो विनंती करत म्हंटला.
तिने गाणे म्हणायला सुरुवात केली आणि तिच्या उडणाऱ्या बटा त्याने सावरून कानामागे नेल्या.
मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून त्याने डोळे बंद करत त्याचा आस्वाद घेत होता.संपल्यावर त्याने आधी तिचे आवाजाचे कौतुक केले आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली.बोलत बोलत ती झोपली पण तो जागाच होता.तिच्या अंगावर नीट पांघरूण घालून तो दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.
तिला आपली किती काळजी आहे हे त्याला तिच्या बोलण्यातून आणि इथे येऊन वाट पाहण्यावरून समजले होते.त्यात दोघांच्या नात्याबद्दल असुरक्षितता तिला अजूनही वाटते हेही त्याला जाणवले.
त्याने नवीन मोबाईल घेतला होता त्यात सर्व नीट सेटिंग करून एक काम करून घेतले.
क्रमशः
© विद्या कुंभार
पुढे काय होईल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा