प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२६
मागील भागात,
तिला आपली किती काळजी आहे हे त्याला तिच्या बोलण्यातून आणि इथे येऊन वाट पाहण्यावरून समजले होते.त्यात दोघांच्या नात्याबद्दल असुरक्षितता तिला अजूनही वाटते हेही त्याला जाणवले.
त्याने नवीन मोबाईल घेतला होता त्यात सर्व नीट सेटिंग करून एक काम करून घेतले.
आता पुढे,
कुजबुज करणारा आवाज कानावर पडल्यामुळे चिन्मयी
सकाळी उठली.सूर्योदय झाला होता आणि सुट्टीचा दिवस वाटत पुन्हा डोळे बंद केले आणि चेहऱ्यावर हलकेसे हसू आले.छान वाटत होते.नंतर तिला पटकन लक्षात आले की ती हर्षच्या घरी आहे म्हणून ती उठून बसली.
सकाळी उठली.सूर्योदय झाला होता आणि सुट्टीचा दिवस वाटत पुन्हा डोळे बंद केले आणि चेहऱ्यावर हलकेसे हसू आले.छान वाटत होते.नंतर तिला पटकन लक्षात आले की ती हर्षच्या घरी आहे म्हणून ती उठून बसली.
"चिन्मयी झोप झाली का?" तो खोलीत येऊन तिला बसलेले पाहून विचारत होता.
"हो." झोपेच्या तंद्रीत ती बोलली.
तिने अजूनही डोळे नीट उघडले नव्हते.
"आवरून घ्या.मघ नाश्ता करू." तो पुढे आलेले केस खांद्यावर टाकत म्हणाला.
एव्हाना त्या खोलीत कुठे काय आहे हे माहीत असल्याने ती फ्रेश व्हायला निघून गेली होती.
कालचेच कपडे घालून ती बाहेर आली.
"हे हर्ष भाऊंनी दिले आहे." तिथे काम करणाऱ्या काकी
म्हणाल्या.
म्हणाल्या.
"साडी?" ती हात लावून विचारते.
"हो." त्या म्हणाल्या.
"काकी पण मला साडी नेसता येत नाही." बारीक चेहरा करून ती म्हणाली.
"मी मदत करते." त्या तिचा हात हातात घेत म्हणाल्या.
त्यांनी तिला नीट साडी नेसून दिली. सोबतच चाफ्याची फुले केसात अंबाडा घालून बाजूला खोवली होती.
"खूप सुंदर दिसत आहात." त्या म्हणाल्या.
"तुम्ही मदत केलीत त्यासाठी खूप धन्यवाद." असे म्हणून तिने त्यांना मिठी मारली.
मायेचा स्पर्श तिला त्यांच्याकडून मिळत होता.आधी कधीतरी एकदाच शशीच्या आग्रहाखातर तिने तिच्या मदतीने साडी नेसली होती त्यानंतर आज दुसऱ्यांदा नेसली.
"बाहेर चला, हर्ष भाऊ वाट पाहत असतील." असे म्हणत तिला घेऊन गेल्या.
चाफ्याचा सुगंध आणि तिची येण्याची चाहूल लागताच तो मागे फिरला आणि बघतच राहिला.जागेवर थिजणे म्हणजे काय असते ह्याची अनुभूती त्याला तेव्हा झाली होती.
त्याने तिचा हात पकडला आणि काकूंना नजर नको लागायला म्हणून काळा टीका लावायला सांगितले.काकूंनी दोघांची हातानेच नजर काढली.
त्याने तिचा हात त्याच्या हातात मनगटावर पकडायला सांगितला आणि दोघांनी सकाळी देवाची आरती केली.
त्याच्या सोबत उभे राहून हे सर्व करताना तिला खूप आनंद झाला होता.तोही आरती म्हणत तिच्याकडे मध्येच बघत होता.
आरती झाल्यावर दोघांनी काकूंच्या पाया पडल्या.ती मध्येच धडपडली तेव्हा त्याने तिला सावरले होते.
त्याच्या सोबत उभे राहून हे सर्व करताना तिला खूप आनंद झाला होता.तोही आरती म्हणत तिच्याकडे मध्येच बघत होता.
आरती झाल्यावर दोघांनी काकूंच्या पाया पडल्या.ती मध्येच धडपडली तेव्हा त्याने तिला सावरले होते.
"चिन्मयी,मी तुम्हाला न विचारता एक निर्णय घेतला आहे." तो तिला चहा आणि नाश्ता झाल्यावर म्हणाला.
"काय?" ती विचारत होती.
"आज आपला साखरपुडा आहे." असे तो म्हणताच ती ते ऐकून थक्क झाली.
"काय म्हणालात?" तिला विश्वास बसत नव्हता.
"हो.तुम्ही त्यासाठी तयार आहात?" त्याने विचारले.
तिला ह्या नात्याबद्दल सुरक्षितता वाटण्यासाठी त्याने असे केले होते.त्यासाठी रात्री मोबाईल आणल्यावर ऑनलाईन त्याने बरीच खरेदी केली.तातडीने दोन अंगठ्याही त्याने मागवल्या होत्या.त्याही सकाळी त्याच्या घरपोच केल्या होत्या.
"असे अचानक म्हणजे ..." तिला काही समजत नव्हते.
"लग्न आपण मुहूर्तावर करू पण आज मात्र साखरपुडा करू." तो म्हणाला.
"ठीक आहे." तिने संमती दर्शवली होती.
त्याने लगेच देवाजवळ ठेवलेली अंगठी घेऊन तिच्या डाव्या हाताच्या बोटात घातली.त्याने अलगद सरकवलेली अंगठी आणि त्याचा स्पर्श खूप काही सांगून देत होता.
"ही घ्या अंगठी." त्याने दुसरी अंगठी तिच्या हातात दिली.
तिने त्याचा उजवा हात पकडून एका बोटावर स्वतःचे बोट स्थिर केल्यावर त्याला विचारले.त्याने होकार देताच तिने त्याच्या बोटात अलवार आपल्या नाजूक हाताने अंगठी घातली.
काकी एकमेकांना पेढा चारण्यास सांगतात.तसे ते करतात. तिच्यासाठी तो थोडा खाली झुकतो आणि ती चेहऱ्यावर हात फिरवत ओठांजवळ येते आणि त्याला पेढा चारते.
ना कोणता मुहूर्त होता ना आधी काही नियोजन होते पण दोघेही आता एका नात्यात अडकले होते.
काकी जेवणाचे सांगून त्यांना वेळ देण्यासाठी लगेच तिथून गेल्या.
"सर्व तयारी तुम्ही कधी केली?" त्याने घातलेल्या हातातल्या अंगठीवर बोट फिरवत ती विचारत होती.
"तुम्ही काल रात्री झोपल्यावर." तो तिला बाजूला घेऊन बसत म्हणाला.
"मी कशी दिसते हे तुम्ही सांगितलेच नाही." कधी पासून ती वाट पाहत होती.
गर्द हिरव्या साडीत
तू दिसतेस खूप छान
माझ्या आयुष्यात तुला
नेहमीच मिळेल पहिला मान
तू दिसतेस खूप छान
माझ्या आयुष्यात तुला
नेहमीच मिळेल पहिला मान
असे म्हणून तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो.
अचानक निर्णय घेण्याने
झाले मी सख्या थक्क
आता मी गाजवणार
प्रेम करण्याचा हक्क
झाले मी सख्या थक्क
आता मी गाजवणार
प्रेम करण्याचा हक्क
तीही त्याला चारोळीतून उत्तर देत लाजून त्याला बिलगते.
"हर्ष,मला रात्री खूप छान झोप लागली.आजचा दिवस पण तुम्ही खास बनवला." त्याचे तिच्या मांडीवर असलेल्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.
"पण मला तरी झोप लागली नाही." तो म्हणाला.
"का?" कपाळावर आठ्या आणत ती विचारते.
"तुम्ही नव्हता ना सोबत म्हणून.त्यामुळेच मी लगेच आजच साखरपुडा करायचा निर्णय घेतला." मुद्दाम तिला चिडवत म्हणाला.
त्याच्या अशा उत्तराने ती लाजून गोरीमोरी झाली.
दोघांनी जेवण केले आणि झोपायला आपल्या खोलीत गेले.
"आ..." करत ती किंचाळली.
"काय झाले?" तो पळत येऊन तिच्या खोलीत विचारत होता.
"तुम्ही बाहेर थांबा." ती पाठमोरी होऊन म्हणाली.
तो आपल्या खोलीत गेला आणि एक रुमाल घेऊन डोळ्यांना पट्टीसारखा बांधला.
तिच्याजवळ अंदाजाने गेला आणि तिचा हात हातात घेत डोळ्यांच्या पट्टीला लावत तो बघत नाही हे पटवून दिले.
"काय झाले सांगाल?" त्याने पुन्हा विचारले.
"ते काकूंनी साडीला खूप पिनस लावल्या आहेत.मागची काढता येत नाही.हात तिथपर्यंत पोहोचत नाही आणि एक काढली ती हाताला लागली." ती म्हणाली.
"बरं मी मदत करतो." तो म्हणाला.
न बघता तिला मदत करणे कठीण होते पण त्यांच्यात अजून स्पर्शाची सहजता नव्हती म्हणून ती कुठे आहे हे हात पकडून सांगत होती आणि तो अंदाजाने तिला न लागता एक एक पिन काढून देत होता.
"झाले.आता तुम्ही जा." ती म्हणाली.
"धन्यवाद वगैरे बोलायची काय पद्धत नाही वाटते?"
"तुम्ही तर आपल्या माणसासाठी केलेत ना मग त्यात काय धन्यवाद बोलायचे?" ती ठसक्यातच बोलली.
"अस्स?" त्याने तिला जवळ घेत विचारले.
"झाले काम, आता इथून जा." ती बिचकत म्हणाली.
त्याने हातावर ओठ ठेवत तसेच चाचपडत खोलीच्या बाहेर जात म्हणाला, "देवा बघ रे, आतासा साखरपुडा झाला आहे तर हे असे लग्न झाल्यावर काय होईल?"
तिलाही हसायला आले आणि तिने साडी बाजूला ठेवत त्याने सकाळी दोन ड्रेस दिलेले त्यातील एक घातला.
दोघांनी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितले आणि त्यांनाही हर्ष आणि चिन्मयी पुढे जात आहेत हे बघून आनंद झाला.
संध्याकाळी दोघे निवांतपणे चहा पित होते.तेवढ्यात त्याच्या दाराची घंटी वाजली.
पार्सल आलेले होते.त्याला प्रश्न पडला की मी तर मागवले नाही मघ कसे काय आले.
"मी मागवले आहे." ती म्हणाली.
त्याने तिच्या हातात दिले तर तिने त्यालाच उघडायला सांगितले.दोन फॉर्मल शर्ट होते.
"माझ्यासाठी?" त्याने उत्सुकतेने विचारले.
"हो, मी तर ते घालू शकत नाही." ती म्हणते.
"छान आहेत.परवा ऑफिसला जाताना घालीन." तो म्हणाला.
तिलाही ते ऐकून त्याला आवडेल की नाही ह्याची धाकधूक लागली जे त्याने छान आहे म्हणत दूर केली.
तिच्या पर्समध्ये नेहमीच एक पुस्तक असायचे ते ती काढते आणि वाचत बसते.तो ती कशी वाचत आहे ह्याचे निरीक्षण करतो.थोडा थकवा त्याला जाणवत असतो पण त्याचा ब्रेलचा अभ्यास करायचा ह्याचा विचार करत तिच्याबाजूला बसत तो करतो.मध्ये मध्ये जी शंका येत असते तो तिला विचारत असतो.तीही त्याला समजेल असे सांगत असते.
रात्रीचे जेवण तो बनवतो.ती त्याला सोलून आणि भाजी निवडण्याचे काम करत मदत करत होती.
दोघेही खिडकीजवळ बसतात.तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. तो तिला आकाशात असणारे तारे आणि चंद्राच वर्णन करत असतो.ती शांतपणे ऐकत असते.
"मला तर तुम्ही कसे दिसता हे माहीतच नाही." तिच्या ह्या प्रश्नावर तो निरुत्तर होतो.
क्रमशः
© विद्या कुंभार
हर्ष काय उत्तर देईल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा