प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-२७
मागील भागात,
दोघेही खिडकीजवळ बसतात.तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. तो तिला आकाशात असणारे तारे आणि चंद्राच वर्णन करत असतो.ती शांतपणे ऐकत असते.
"मला तर तुम्ही कसे दिसता हे माहीतच नाही." तिच्या ह्या प्रश्नावर तो निरुत्तर होतो.
आता पुढे,
चिन्मयीने असे म्हंटल्यावर हर्ष बाजूला उठून बसला.त्याने तिचा हात हातात घेतला.
"स्पर्शाने तर समजू शकते ना?" असे म्हणत त्याच्या चेहऱ्यावर तिचा हात ठेवला.
तिने कपाळापासून सुरुवात करत त्याच्या भुवयांवरून दोन्ही हात फिरवले.नाकावर बोट फिरवताना ते सरळ आहे हे समजले.गालावर हात फिरवताना त्याची त्वचा आपल्यापेक्षा थोडी खडबडीत आहे हे समजले.
"हसून दाखवा." ती म्हणाली.
त्याने दाखवले.तिने गालावर रेष किंवा किंचित खड्डा पडतो का ते तपासले पण तसे काही नव्हते.
नंतर त्याच्या ओठांच्या आणि नाकाच्या जागेमध्ये मिशीचे अस्तित्व आहे हे समजले.काही मुलांना आवडत नाही म्हणून ते दाढी -मिशी ठेवत नाहीत हे एका कादंबरीत तिने वाचले होते.
हनुवटीवर हात आल्यावर टोचण्याच्या जाणिवेने थोडी दाढी आहे तिला समजले.
हनुवटीवर हात आल्यावर टोचण्याच्या जाणिवेने थोडी दाढी आहे तिला समजले.
तसाच मानेवरून स्पर्श केल्यावर खांद्यावर हात ठेवल्यावर ते रुंद आहेत ह्याची प्रचिती आली.
"कसा दिसतो मी?" त्याने विचारले.
"तुमची उंची जास्त आहे हे समजले पण एक कमी आहे."ती म्हणाली.
"कशाची?" तो विचारतो.
"तुमच्या गालावर खळी नाहीये." ती म्हणाली.
"हो, कारण ती तुमच्या गालावर आहे." त्याने तिच्या गालावर हाताचा स्पर्श केला.
"मी कशी दिसते?" आता तिला स्वतःबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
"मी सांगू?" त्याने विचारले.
"मला वाटते तुम्हीच आता इथे माझ्यासोबत आहात मिस्टर हर्ष." ती ओठ तिरपे करत म्हणाली.
"फक्तं हर्ष म्हणणार असाल तरच मी सांगेन." तो म्हणाला.
"हर्ष सांगा. मी कशी दिसते?" तिने विचारले.
"छोटेसे कपाळ आणि कोरीव भुवया
शिंपल्याच्या आकाराचे डोळे दोन
ना नकटे ना बसके असे नाक
भासे धनुष्याच्यासम ओठ
हसता गालावर दिसे खळी छान
सांगा बरं अशी ती कोण?"
शिंपल्याच्या आकाराचे डोळे दोन
ना नकटे ना बसके असे नाक
भासे धनुष्याच्यासम ओठ
हसता गालावर दिसे खळी छान
सांगा बरं अशी ती कोण?"
त्याने मोडक्या तोडक्या पद्धतीने कोड्यात सांगतो असे वर्णन केले होते.
ती त्यावर खळखळून हसायलाच लागते.
"पण त्याहून तिचे सुंदर काय आहे माहीत आहे?"
"काय?" ती विचारते.
"अंतर्मन." असे बोलल्यावर डोळ्यांतून तिच्या पाणी येते.
आपण कसे दिसतो ह्याबद्दल तिला कुतूहल असायचे. बाकींसारखे तिला तयार व्हायला वेळ लागायचा.आधी तर गालाला पावडर लावायची असते हेही माहीत नव्हते.पुन्हा एकदा प्रयत्न केला तर कमी जास्त लागल्यामुळे बाहेर तिला हसायचे.तिने मग ते लावणे सोडून दिले.
शशी तिला एकदा कार्यक्रमात भेटली होती.चिन्मयीला तिने स्वतःची मैत्रीण बनवली आणि काही गोष्टी शिकवल्या.त्यात
पावडर लावल्यावर जसे ती चालताना एक ,दोन, तीन असे पावले मोजते तसे कपाळ, गाल, हनुवटी आणि नाक ह्यावर थोडी पावडर लावून चेहऱ्यावर पुन्हा त्यावर हात किती वेळा फिरवायचा हे सांगितले.
पावडर लावल्यावर जसे ती चालताना एक ,दोन, तीन असे पावले मोजते तसे कपाळ, गाल, हनुवटी आणि नाक ह्यावर थोडी पावडर लावून चेहऱ्यावर पुन्हा त्यावर हात किती वेळा फिरवायचा हे सांगितले.
टेलरकडून ती डिझाइन आहे असे म्हणून एका बाजूला तिची ब्रेल लिपिने सांकेतिक भाषेत ६ बिंदूंची रचनाद्वारे त्या कपड्याचा रंग लिहायला सांगायची.त्यामुळे विसंगत कपडे घालण्याचे तिने टाळले होते.
पोडोकास्टमधून महत्वाच्या गोष्टींची आणि तज्ञ लोकांचे मार्गदर्शन ऐकायची.आपल्याला देवाने जन्म कोणत्या तरी कारणासाठी दिला आहे त्यामुळे प्रयत्न करत राहायचा हेच ती समजून काम करायची.
"आज आपल्या नात्याचा पहिला दिवस म्हणायला हरकत नाही?" तो तिची शांततेची मुद्रा भंग करत म्हणतो.
तिने त्याला बिलगून दुजोरा दिला होता.
ती तशीच झोपून गेली होती त्याने तिला उचलून खोलीत नेले आणि जाताना गालावर अधरस्पर्श करून दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.
"शुभ सकाळ." तिने त्याच्या बाजूला जाऊन आवाज दिला.
तो गाढ झोपेत होता.
त्याला तसेच झोपून देत ती बाहेर जात असताना बाजूच्या टेबलवरचा काचेचा पेला खाली पडला.त्या आवाजाने त्याला जाग आली.
तो पाहतो तर ती तिथेच उभी होती.बाजूला काचा विखुरलेल्या होत्या.
"तिथेच थांबा चिन्मयी.असे म्हणत तो झाडूने सर्व काचा भरून केराच्या डब्ब्यात टाकतो."
"तुम्हाला कुठे लागले नाही ना?" त्याने हात आणि पाय तपासून पाहिले.
तिने मानेनेच नकार दिला.
तो फ्रेश होऊन येतो म्हणत असताना ती बाहेर जाऊन सोफ्यावर बसते.
काकी आलेल्या असतात त्यांच्याशी ती बोलते.चहा आणि नाश्ता करून तो तिला बाहेर घेऊन जातो.
"कुठे जात आहोत?" ती कारमध्ये बसल्यावर विचारते.
"गेल्यावर समजेल ना." तो सांगत नाही.
चित्रपटगृहात गेलेले असतात.तिथली थंडी तिला सहन होत नसते म्हणून तो तिला त्याचे जॅकेट देतो.जर काही प्रसंग त्यात संवाद नसतील तर तो ते सांगत असतो आणि ती सुद्धा ऐकत असते.
त्याने मुद्दाम बाजूची सीट बसण्यासाठी घेतलेली असते ज्यामुळे कोणाला त्यांच्या बोलण्याचा त्रास होत नव्हता.
"हर्ष... मला भूक लागली आहे." ती चित्रपट संपल्यावर त्याला म्हणते.
"ठीक आहे.जवळच एक हॉटेल आहे तिथे जावूया." तो म्हणतो.
सर्व जेवून झाल्यावर थोडा वेळ ते तिथे बसतात.
"उद्यापासून ऑफिस सुरू होईल आणि तुमची शाळा सुद्धा." तो म्हणतो.
"हो.मी आज घरी जाते." ती म्हणते.
त्याला तर तिला स्वतःच्या घरीच ठेवायचे असते पण ती अजून थांबणार नाही म्हणून तो पुढे काही बोलत नाही.
जाताना एका दुकानात ते थांबतात आणि तिच्यासाठी एक स्लीपर चप्पल घेतात. सकाळी पायाला काच लागली असती तर तिला दुखापत झाली असती पुन्हा काही होऊ नये म्हणून तो काळजी घेत होता.
तिला घरी सोडताना त्याच्या जीवावर आलेले आणि लवकरच आपण लग्न करायला हवे हाही विचार त्याच्या मनात आला.
घरी आला आणि ब्लॉगिंग साईट उघडून लिहू लागला.
तुला दूर करताना सखे
मनास दुःख होई फार
विरहाचा हा काळ
काळजावर करे वार
मनास दुःख होई फार
विरहाचा हा काळ
काळजावर करे वार
काव्यहर्ष पोस्ट अशी तिला नोटिफिकेशन जाते.
तुझ्यासारखेच मलाही
आता नाही राहवत दूर
सख्या थांब ना रे थोडा
लवकरच गाऊ प्रीतीचे सूर
आता नाही राहवत दूर
सख्या थांब ना रे थोडा
लवकरच गाऊ प्रीतीचे सूर
शब्दस्पर्शा पोस्ट शेअर केली आहे असे त्याला नोटिफिकेशन जाते.
तिला तो आणण्यासाठी घरी जातो. ती वाट बघतच बाहेर उभी असते.
"चला जाऊया." त्याची कार आल्यावर ती कुलूप लावण्यासाठी
त्याच्या पाठमोरी वळते.
तो तिला तसाच पाहतो आणि जवळ जाऊन मिठी मारतो.
"आपण बाहेर आहोत. तुमचे काय चालू आहे?" ती अचानक त्याने मारलेल्या मिठीमुळे बावरते.
तो तसाच तिच्या हातातील चावी घेऊन कुलूप काढतो आणि आतमध्ये घेऊन जातो.
तिला ह्या अनपेक्षित वागण्या मागचे कारण समजत नाही.
तेवढ्यात तिच्या खोलीच्या कपाटाचा आवाज येतो.
तेवढ्यात तिच्या खोलीच्या कपाटाचा आवाज येतो.
तो तिला जवळ जात कानात काही सांगतो आणि ती त्याचे ऐकून त्याने हातात दिलेले कपडे बदली करून बाहेर येते.
नंतर थोड्यावेळात ते दोघे बाहेर पडतात आणि आधी हॉस्पिटलमध्ये तिला तो सोडतो आणि ऑफिसला जातो.
"तुम्ही ठीक आहात ना?" तो व्हॉईस मेसेज करतो.
"हो, मी ठीक आहे.सेशन चालू आहे नंतर बोलू." असे म्हणून त्याला प्रतिसाद देते आणि आपले काम करते.
तो तिला तिचे शाळेचे काम झाल्यावर घरी सोडतो.ती घरी जाते थोडी फ्रेश होते. तेवढ्यात तिला माणसांची कुजबुज ऐकू येते.
ती दुर्लक्ष करते. तेवढ्यात जोरजोरात बाहेरून दाराची घंटी वाजवते. ती आधी तर दचकतेच आणि मग बाहेरून लोकांचे आवाज तिला ऐकायला येतात.
ती दरवाजा उघडते.
"कोण?" घाबरत विचारते.
"तुला मागे पण आम्ही सांगितले होते. इथे राहायचे असेल तर नीट राहावे लागेल पण तू काही सुधारणार नाही." एक बाई तावातावाने बोलते.
"हो ना,आज सकाळी तर तो मुलगा हिला मिठी मारत होता.हा बघा मी फोटो काढला आहे.नंतर तिला आतमध्ये घेऊन गेला होता." अनुजाच्या सासूला आयते कुलीत हातात मिळाल्यासारखे बोलत होती.
"तुम्ही चुकीचे समजत आहात. त्यामागे कारण होते." ती म्हणते.
"तू काहीही बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ का?" दुसरी बाई रागात पुढे येत तिला धक्का मारत बोलते.
"आमचा साखरपुडा झालेला आहे आणि सकाळी तुम्ही जे पाहिले ते चुकीचे नाही पण त्याबद्दल चुकीचा समज करून घेतला आहे." ती त्यांना विनंतीच्या सुरात म्हणते.
क्रमश:
© विद्या कुंभार
काय असेल कारण?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा