प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-३०
मागील भागात,
पुन्हा घंटी वाजते तर मागच्या सारखा उतावीळ राहण्याचा वेडेपणा ती करत नाही.
"कोण आहात? बोलाल का?" दरवाजा उघडल्यावर ह्यावेळी मात्र कंटाळून पाच मिनिटे झालीत तरी समोरची व्यक्ती बोलत नाही म्हणून विचारते.
आता पुढे,
"काय हे चिन्मयी तुम्ही तुमच्या हर्षला ओळखू शकत नाहीत?"
"हर्ष तुम्ही?" चिन्मयी विचारते.
त्याने ह्यावेळी वेगळा परफ्यूम वापरला असल्याने आणि मघाशी चुकीचा अंदाज लागल्याने ती ओळखू शकली नाही.एक आठवड्यानंतर प्रत्यक्ष पाहत असल्याने तो तिला डोळेभरून पाहत होता म्हणून पाच मिनिटे होऊन गेले तरी तो काही बोलत नव्हता.
"हो." असे म्हणत तो आतमध्ये येऊन तिची फक्त केन घेतो आणि तिचा हात पकडून तो तिला बाहेर नेतो.
कारमध्ये बसवतो आणि तिच्या घराला कुलूप लावून बाहेर येतो.
"हे काय कुठे जात आहोत आपण?" ती त्याच्या अचानक अशा वागण्याने घाबरून बोलते.
"तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना?" तो गाडी चालवत विचारतो.
ती फक्त मान हलवते.
एका धाब्यावर जावून ते थोडे फार खातात.
"तुमचे काम होते ते झाले का?" ती विचारते.
"हो,झाले." तो तिचा हात हातात घेऊन बोलतो.
"तुमची खूप आठवण येत होती." ती एवढ्या दिवस बोलली नव्हती पण आता बोलते.
"अस्स, मघ बोललात का नाही?"
"आता बोलले ना." ती ओठ तिरपे करत बोलते.
तिच्या ह्या कृतीने तो गालातच हसतो.
थोडावेळ बोलत राहतात आणि ती कारमध्ये बसण्याआधी तो तिला थांबवतो.
"काय झाले हर्ष?"
तो तिचा पकडलेला एक हात जवळ खेचत झुकून तिला मिठीत कैद करतो.ती अवाक होते तर तो दोघांची दुराव्यानंतर झालेली भेट तो तिला जवळ घेत अनुभवत असतो.
ती त्याच्या पाठीवर हात फिरवत असते.
"मी तुमच्याशिवाय आता राहू शकत नाही.त्यामुळे लवकरच आपण लग्न करूया." तो अधीरता दाखवत म्हणतो.
"हो,मला पण मिसेस हर्ष लवकरात लवकर व्हायचे आहे." ती म्हणते.
दोन दिवसांनी ते खरेदीसाठी जातात.तिला सर्व सांगून तो प्रत्येक वस्तू घेत असतो.
"सर्व झाले पण लग्नासाठी हॉल? तो पाहिलाच नाही." डॉक्टर मन म्हणतात.
"त्याची गरज नाही." हर्ष म्हणतो.
"का जीजू?" शशी सुद्धा आलेली असते ती विचारते.
"कारण आम्ही कोर्टात लग्न करणार आहोत." चिन्मयी म्हणते.
"आणि अंधशाळेत विधिवत लग्न करून तिथेच सर्वांना लग्नाचे जेवण करण्याचे आयोजन करत आहोत." हर्ष म्हणतो.
दोघांचा विचार त्यांना पटला.
शशी थोडी वेगळ्या पद्धतीने केस रचना आणि मेकअपसाठी चिन्मयीला पार्लरमध्ये जबरदस्ती घेऊन जाते.
"हर्ष, मी तुम्हाला अशी आवडत नाही का?" ती गाल फुगवून व्हिडिओ कॉल वर विचारते.
"आवडता ना,पण वेगळा अनुभव म्हणून हे सर्व करून घ्यायला काय हरकत आहे?" तो हसत म्हणतो.
ती कधीच पार्लरमध्ये जात नव्हती तिला ते सर्व कृत्रिम
वाटायचे.तसेही आपल्याला कोण पाहणार म्हणून हेही कारण तिचे तयार असायचे. लग्न हे प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचे असते.
यामुळे इतर सामान्य मुलींप्रमाणे तिने सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा हेच तिला वाटत असते.
वाटायचे.तसेही आपल्याला कोण पाहणार म्हणून हेही कारण तिचे तयार असायचे. लग्न हे प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचे असते.
यामुळे इतर सामान्य मुलींप्रमाणे तिने सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा हेच तिला वाटत असते.
लग्नाच्या आदल्या दिवशी तिला मेहंदी काढली होती आणि तो तिला भेटायला आला होता.तर तिचा चेहरा पाहून त्याला शंका आली.त्याने तिच्या कपाळाला हात लावला तर ते गरम होते.
"चला डॉक्टरकडे जावून येऊ." तो म्हणतो.
"मी ठीक आहे." ती त्याला डॉक्टरकडे जाण्यास नकार देते.
"तुम्हाला तसे पण कोणाचे ऐकायचे नाही." असे म्हणून तो निघून जातो.
शशी सर्व पाहते.तिला डॉक्टरांना विचारून गोळी खायला देते.
अनुजा आणि तिचा नवरा चिन्मयीच्या आनंदात सहभागी झालेले असतात.हक्काने माहेरची साडी म्हणून तिला देतात.
तेव्हा तिचे डोळे भरून येतात.तेच दोघे असे होते ज्यांनी तिला आपलेसे केले होते.
तेव्हा तिचे डोळे भरून येतात.तेच दोघे असे होते ज्यांनी तिला आपलेसे केले होते.
अनुजाच्या सासूने जे केले ते ह्या दोघांच्या अनुपस्थित केले होते म्हणून त्यांना नंतर समजल्यावर त्यांनी चिन्मयीची तिला झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागितली होती.त्यांची त्यात काही चुकी नव्हती म्हणून ती त्यांना माफी मागण्यास मनाई करते.
"माफ करा ना," ती त्याला मेसेज पाठवते.
तो पाहून दुर्लक्ष करतो.
"मी डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या आहेत.वाटल्यास शशीला विचारा." दुसरा मेसेज पाठवते.
तो काहीच प्रतिसाद देत नाही म्हणून तिचे मन खट्टू होते.
थकलेली असल्याने ती विचार करत झोपेच्या अधीन जाते.
थकलेली असल्याने ती विचार करत झोपेच्या अधीन जाते.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून शशी चिन्मयीला छान तयार करते. तिच्या गव्हाळ कांतीवर लाल रंग उठून दिसत असतो.त्या रंगांची साडी नेसवून देते.मोगऱ्याचा गजरा केसात माळून बाकी मेकअप पार्लरवाली करते.
अनुजा आणि तिचा नवरा चिन्मयीला शशीसोबत घेऊन कोर्टात जातात.
तिथे थोडा वेळ वाट पाहावी लागते.तिला पाहून तर हर्षचे डोळे थोडे मोठे होतात आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात.त्यानेही लाल रंगाचा इंडोवेस्टर्न कुर्ता आणि पायजमा घातलेला असतो.
"छान दिसत आहात." तो तिचा हात पकडून थोडासा झुकून तिच्या कानाशी बोलतो.
त्यामुळे तो तिच्याजवळ आल्याने गोड शिरशिरी विजेसारखी तिच्या अंगामधून जाते असे वाटते.
राग गेला म्हणून ती मनातच निःश्वास सोडते.
दोघे सही करतात आणि एकमेकांना हार घालतात.चिन्मयी जिच्यासाठी लग्न म्हणजे एक न पूर्ण होणारे स्वप्न असते ते हर्षमुळेच पूर्ण होते.
हर्ष जो आपले कुटुंब गमावून नैराश्येच्या अंधारात गेलेला असतो तो चिन्मयीच्या साथीने जीवनात पुढे जाण्याचा मार्ग निवडतो.
त्यांच्या ह्या आनंदात सामील होण्यासाठी डॉक्टर मन, शशी, अनुजा, तिचा नवरा आणि इन्स्पेक्टर ज्यांनी त्यांना मदत केलेली असते तेही येतात.
"आजपासून तुम्ही सौ.चिन्मयी हर्ष इनामदार झाला आहात." तिथे जे त्यांचे कायदेशीर लग्न लावतात ते बोलतात.
ते ऐकून चिन्मयीला वेगळीच भावना मनात येते आणि सोबतच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडतात.
"आता रडायचे नाही आहे." तो अलगद तिचे अश्रू त्याच्या बोटाने टिपतो.
"आता माझ्या मित्राला तुम्ही रडवायचे, वहिनी." डॉक्टर मन म्हणतात.
तसा तिथे सर्वांचा हसण्याचा आवाज येतो.
सोपस्कर झाल्यावर आपापल्या गाडीने अंधविद्यालयात जातात.त्या दोघांचे स्वागत गुलाबांच्या पाकळ्यांनी होते.
"इथे आपल्या नावांची रांगोळी काढली आहे.फुगे लावून काही कागदी पताका ह्याने सजवले आहे." तो तिला सांगत असतो.
ती तिथे जाऊन साडी बदलते आणि गुलाबी रंगाची नव्हारी साडी मदतनीस असतात त्यांच्या मदतीने नेसते.चाफ्याच्या आणि थोड्या मोती मिश्रीत मुंडावळ्या ती घालते. केसांचा खोपा बनवून त्यात फुले आणि गजरा माळून छानसा
केशसांभार करते.
केशसांभार करते.
त्यानेही तिला साजेसे रंगाचा पिवळा कुर्ता आणि त्यावर गुलाबी जॅकेट घातले असते. तिच्या सारख्याच मुंडावळ्या बांधून तो अंतरपाटावर उभा राहतो.सर्व विधी पार पाडल्यावर हर्ष आणि चिन्मयी गृहस्थाधर्माकडे वाटचाल करण्याचे वचन एकमेकांना देतात.
बाजूलाच मुले शांत रांगेत बसलेले असतात.त्यांच्या आवडत्या शिक्षिकेचे लग्न असते आणि त्यानंतर चविष्ट जेवणाचा बेत असल्याने त्यांचे मन प्रफुल्लित झालेले असते.
तिथले संस्थापक,मुख्य समितीचे लोक आणि विक्रम काका जे तिच्या सोबतीला असत ते लग्नासाठी हजर होते.
मनमिळावू स्वभावाची आणि मेहनती चिन्मयी हीचे होणारे लग्न आणि तिला साजेसा वर ह्यामुळे तेही तिच्यासाठी खूश होते.
कमी खर्चात सर्व करून त्यांनी बाकीची रक्कम अंध विद्यालयाच्या विकासासाठी दान केलेली असते.
जेवताना तो तिला फक्त पहिला घास खावू न घालता पूर्ण जेवण स्वतःच्या हाताने खायला घालतो.ह्यामुळे ती खूप अवघडून जाते.
उखण्याच्या बदली ते चारोळीतून व्यक्त होतात.
तुझ्या सोबत चालेन मी
चिन्मयी जीवनाची वाट
आपल्या संसारात येईल
फक्त अखंड प्रेमाचीच लाट
चिन्मयी जीवनाची वाट
आपल्या संसारात येईल
फक्त अखंड प्रेमाचीच लाट
असे बोलण्याने ती लाजून गोरीमोरी होते.
तुझा हात हाती सदा
हर्ष असाच राहू दे
तुझ्या जोडीने नेहमी
रहाटगाडे मला पाहू दे
हर्ष असाच राहू दे
तुझ्या जोडीने नेहमी
रहाटगाडे मला पाहू दे
सर्व दोघांसाठी टाळ्या वाजवतात.
"माझ्या बहिणीला नीट सांभाळा."अनुजाचा नवरा भरलेल्या डोळ्यांनी हात जोडत म्हणतो.
"तुझी काळजी करू नका." तो त्या दोघांकडे पाहून त्यांचे हात खाली करत आश्वस्त करतो.
चिन्मयीने जोडलेली आणि रक्ताची माणसेच तिच्यासाठी तिथे आले होते.
शशीसुद्धा तिला पाठवणीच्या वेळी बिलगून रडत असते.
आपल्या मैत्रिणीचे लग्न झाले ह्याचा सर्वात जास्त आनंद तिला झालेला असतो हे तिच्या लग्नातील तयारी करण्याच्या उत्साहामुळे कळत होते.
"माझ्या बायकोला जास्त रडवू नका." तो मुद्दाम त्या दोघींच्या जवळ येत म्हणतो.
शशी तिच्यासोबत एकदिवस राहणार असते यामुळे ती, डॉक्टर मन आणि नवविवाहित जोडपे हर्षच्या घरी जायला निघतात.
तिथे पोहोचल्यावर गृहप्रवेश करणार तर त्यांना मध्येच थांबवले जाते.
क्रमशः
© विद्या कुंभार
का थांबवले असेल?
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा