प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-३१(अंतिम)
मागील भागात,
"माझ्या बायकोला जास्त रडवू नका." तो मुद्दाम त्या दोघींच्या जवळ येत म्हणतो.
शशी तिच्यासोबत एकदिवस राहणार असते यामुळे ती, डॉक्टर मन आणि नवविवाहित जोडपे हर्षच्या घरी जायला निघतात.
तिथे पोहोचल्यावर गृहप्रवेश करणार तर त्यांना मध्येच थांबवले जाते.
आता पुढे,
"काय झाले शशी?" चिन्मयी विचारते.
दोघांचे पायांचे ठसे एका फ्रेममध्ये घेतात.नंतर माप ओलांडून ती हर्षच्या जीवनात पत्नी म्हणून प्रवेश करते.
थोडे जेवून मग चौघेही आराम करतात.
लग्नात धावपळ झाल्याने दोन दिवसांचे जेवण ते बाहेरून आणायचं हे आधीच ठरले होते.संध्याकाळी जेवण आल्यावर चौघे जेवतात.
डॉक्टर मन आणि शशी हर्ष तिला सर्व जेवणाचे पदार्थ याची नावे सांगत असताना पाहून ते दोघे एकमेकांसाठी आहेत ह्याची खात्री होते.तिला आवडतात म्हणून गुलाबजामून त्याने जास्त मागवले असतात.सोबतच तिला पहिल्यांदा बासुंदी पदार्थ म्हणजे काय हे खाल्ल्यानंतर समजते.
चिन्मयीला हर्षने घरात तिला ज्या कपड्यात ठीक वाटेल तेच घालायला सांगितले होते.नवी नवरी असल्याने साडीच घालावी असे जरुरी नाही हे सांगितले.
जेवण झाल्यावर दोघेही थोडा वेळ चालण्यासाठी बिल्डिंगच्या बाहेर पडतात.डॉक्टर मन आणि शशी त्या दोघांना वेळ मिळावा म्हणून मुद्दाम घरी थांबतात.
तिने केन सोबत घेतली होती टकटक असा आवाज येत होता सोबतीला त्याचा एक हात हातात होताच.
"कसे वाटत आहे मिसेस चिन्मयी आता?" तो विचारतो.
"छान वाटत आहे." ती हसून बोलते.
"एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे." ती पुढे म्हणते.
"आणखी स्वप्ने तुमची पूर्ण होतील.आपण एकमेकांच्या साथीने पूर्ण करू." हर्ष तिला जणू खात्री देत आहे असेच म्हणाला.
"तुमच्या हातात हे काय आहे?" तिला बारीक मणी असलेले ब्रेस्लेट सारखे हाताला लागले ते स्पर्श करत म्हणाली.
"हॅण्ड मंगळसूत्र."
"हॅण्ड मंगळसूत्र? कशासाठी?" तिला नवलच वाटले.
"जसे तुम्ही गळ्यात घातले आहे तसे माझे लग्न झाले आहे हे समजायला नको का?" तो स्पष्टीकरण देत म्हणाला.
असे पण असते हे तिला माहीत नव्हते पण ही संकल्पना तिला आवडली.त्याने मंगळसूत्रासारखे काळ्या आणि सोन्याच्या मण्यांची गुंफण केलेले ब्रेस्लेट बनवून घेतलेले होते.
"छान आहे." ती पुन्हा स्पर्श करत आणि त्याने त्याचे वर्णन सांगितल्यावर कौतुक करते.
"आजचा कार्यक्रम खूप छान झाला.तुम्हीही रुबाबदार दिसत होता." ती शेवटचे वाक्य लाजून म्हणाली.
त्याच्याही गालावर गुलाबी रंग चढला.
तिने शशीला हर्ष कसा दिसत आहे हे विचारले असेल त्यावरून ती म्हणते हे त्याला कळले.
"हो,माझी बायकोही आज काही कमी दिसत नव्हती." तो म्हंटला आणि तिने हसल्यावर गालावरची खळी त्याला दिसली.
मोहक रुप तिचे तो सकाळपासूनच डोळ्यांत साठवत होता. नव्या नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.एका बाकावर बसत तो तिचे हात हातात घेतो.मेहंदीचा हात त्यातून सुगंध येत होता आणि सोबतच ती खूप सुंदर रंगलेली होती.
तो त्यावर आपले ओठ टेकवतो आणि ती शहारते हे त्याला जाणवते. तो तिचा हात पकडतो आणि घरी परत जायला निघतात.
एका खोलीत डॉक्टर मन आणि हर्ष राहतात तर दुसऱ्या खोलीत शशी अन् चिन्मयी झोपतात.
दुसऱ्या दिवशी पूजा असते म्हणून सारी गडबड चालू असते.
काही बिल्डिंगमधले लोक येतात.आज काकी पण आलेल्या असतात.शशी आणि काकी दोघी मिळून सर्व पाहतात.
काही बिल्डिंगमधले लोक येतात.आज काकी पण आलेल्या असतात.शशी आणि काकी दोघी मिळून सर्व पाहतात.
चिन्मयीने रेडीमेड पिवळ्या रंगाची नव्हारी साडी शिवून घेतलेली असते ती घालते तर हर्ष हिरवा आणि पांढरा कुर्ता पायजमा घालतो.डॉक्टर मन ह्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये बोलावले असते म्हणून ते जातात.
सर्व झाल्यावर शशी रात्री निघायचे बोलते तेव्हा चिन्मयीला आपला आधार जातोय का असे वाटत असते कारण तीच तर सर्व तयार करण्यात आणि बाकी गोष्टींमध्ये मदत करत होती.
"चिनू स्वतःची काळजी घे.जिजू खूप चांगले आहेत.त्यांच्याशी उगाच भांडू नको आणि काहीही लागले तरी त्यांना विचार. विचारू का नको किंवा मदत करताना नि घेताना जास्त वेळ विचार करण्यात घालू नको.तू त्यांची पत्नी आहेस.चुका होतील तर होऊ दे. तुझा हट्टीपणा सोड. काही लागलेच तर मला एक फोन कर.नवीन नाते आहे वेळ लागेल पण तूही ते समजून घेतात म्हणून त्यांना गृहीत धरू नकोस." शशी जे एक आईवडील आपल्या मुलीला लग्न झाल्यावर समजून सांगतात तसेच चिन्मयीला समजून सांगण्याचे काम करत होती.
शशी गेल्यावर चिन्मयी खूप रडते आणि तिला सावरायला हर्ष तर सोबत असतोच.तो विषय बदलून तिला हसवण्याचा प्रयत्न करतो.
हर्ष आणि शशीचे वैवाहिक जीवन सुरू होते.त्याने शारीरिक संबंध आणि तिच्यासोबत राहताना कोणती काळजी घ्यायची ह्याचे कौन्सिलिंग तिच्या नकळत लग्नाच्या आधी घेतलेले असते.तो तिला वेळ देतो आणि तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचे ठरवतो.
दोघे फक्त दोन दिवस महाबळेश्वरला फिरायला जातात.तिला जास्त त्रास होणार नाही ह्याची तो पदोपदी काळजी घेत असतो. ती सुद्धा ज्या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात त्या शिकून घेते.कोणतीही गोष्ट समजत नसेल तर त्याचा सल्ला घेऊन निःसंकोचपणे विचारते.
"काय झाले? आज तुमचा चेहरा का उतरला आहे?" तो विचारतो.
तिने सांगितल्यावर तो गरम पाण्याची पिशवी तिच्या पोटावर ठेवून जवळ घेऊन बसतो.त्याचे जवळ असणे किती महत्त्वाचे आहे हे तिला आता कळायला लागले होते.
तिचे पुस्तक प्रकाशित होणार होते त्याबद्दलचे पत्र तिला आधी आले होते त्यामुळे ती आनंदात होती.तिच्या आनंदात तोही सहभागी होतो.
ब्रेललिपीमध्ये खूप कमी प्रमाणात पुस्तके उपलब्ध असल्याने तिने काही पुस्तके त्या लिपीत प्रकाशित करण्याचा विचार केला होता त्यातील हे पहिले पुस्तक होते.
पुस्तक प्रकाशन हे अंधविद्यालयात करण्याचा विचार असतो.
सगळे खूप उत्सुक असतात.
सगळे खूप उत्सुक असतात.
"हर्ष..." ती त्याला हाक मारते.
"हो,बोला." तो तिच्याजवळ येत म्हणतो.
ती त्याच्या हातात एक वस्तू देते.तो ती बघतो आणि उघडण्यासाठी विचारतो तर ती होकार देते.
एक मातीची मूर्ती असते.ती बघून तो अवाक होतो.कारण ती मूर्ती ही हाताने बनवलेली असती.हर्षची छोटीशी मूर्ती!
"हे... खूप सुंदर आहे." तो तिला एका हाताने जवळ घेत म्हणतो.
"तुम्हाला नक्की आवडले ना?" ती त्याला विचारते.
"हो,खूप जास्त.छान बनवले आहे.कोणी बनवले आहे?" तो खूप आनंदात असतो आणि त्यात कोणी बनवले ह्याची त्याला उत्सुकता लागलेली असते.
"मी बनवले आहे." ती म्हणते.
आता हा त्याला दुसरा आश्चर्याचा धक्का लागलेला असतो. फक्त तिने केलेल्या हाताच्या स्पर्शाने तिने हुबेहूब त्याची चेहऱ्याची मूर्ती बनवलेली असते. त्यात तिचे कलेचे सौंदर्य आणि दृष्टीहीन असूनही बारीक निरीक्षण दिसत असते.
तो लगेच त्याचा फोटो काढून स्टेटसला ठेवतो आणि त्याच्या खाली लिहितो ' माझ्या पत्नीच्या हाताने बनवलेली सुंदर मूर्ती!'
बस मघ काय धडाधड त्याला त्यावर प्रतिसाद येतात.तो ते तिला वाचून दाखवत असतो.तिला तर त्याला आवडले हेच महत्त्वाचे होते.
"हर्ष,मला कार्यक्रमासाठी साडी नेसायची आहे." ती बोलते आणि तो काहीच बोलत नाही.
दुसऱ्या दिवशी ती तयार होणार तर तोच तिच्या हातात एक पिशवी देतो.ती उघडते आणि त्यात रेडीमेड स्टिच असलेली साडी आहे हे तिला समजते.त्याच्या ह्या विचाराने ती खूप खूश होते.ती तयार होऊन बाहेर येत असते तर तो मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळतो.तिथे बाजूलाच गुलाबाचे फूल असते ते ती घेते आणि त्याचा शर्टाचा खिसा हात फिरवून शोधून त्यावर खोवते.
पुस्तक प्रकाशन सोहळा असतो आणि तिचे पुस्तक एका प्रकाशक कंपनीतून प्रकाशित होणार होते. डॉक्टर मन, शशी, विक्रम काका, इन्स्पेक्टर आणि अनुजा व तिचा नवरा त्यांच्या छकुलीसोबत त्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होतात.
शाळेतील समिती सदस्य आधी दीपप्रज्वलन करतात आणि थोडा वेळ चिन्मयीबद्दल माहिती सांगतात. तेव्हा तिच्या डोळ्यांतून पाणी वाहते आणि ते हर्षला समजणार नाही असे होणारच नव्हते.तो तिच्या हातात रुमाल देतो.कारण सार्वजनिक ठिकाणी तिच्यासाठी काही करू नका असे तिने आधीच तंबी त्याला दिली होती.नाहीतर त्यानेच तिचे अश्रू पुसले असते.
पुस्तक प्रकाशन होते सर्वांचे चेहरे खुललेले असतात.थोडा वेळ त्यातील काही भाग हात फिरवून चिन्मयी वाचून दाखवते.सर्व एकाग्र होऊन ऐकत असतात.
"ह्या कार्यक्रमासोबतच मी अजून एका गोष्टीची घोषणा इथे करू इच्छित आहे." हर्ष माईक घेऊन बोलतो.
चिन्मयीसोबत बाकीचेही कोणती घोषणा असेल ह्याचा विचार करतात आणि त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालेले असते.
"आजच्या पुस्तक प्रकाशनाचे प्रकाशन हे एका प्रकाशन कंपनीने केलेले आहे.तर ही कंपनी नवीनच आहे. 'डोळस साहित्य प्रकाशन' कंपनीच्या संस्थापिका आहेत सौ.चिन्मयी इनामदार." बस एवढे बोलून तो थांबून आपल्या बायकोकडे पाहतो.
आपण चुकीचे तर ऐकले नाही ना असा ती विचार करत असताना ती ते पुस्तकाचे माहिती असलेले पान उघडते आणि त्यावर हात फिरवताना ती तोंडावर हात ठेवते.कारण मी बघतो असे बोलून हर्षने तिला याबद्दल काहीच सांगितले नव्हते.तिचे पुस्तक प्रकाशित होणार नाही असे खरे तर पत्र तिला आलेले असते आणि ते पत्र हर्ष बदलून टाकतो.
थोडी माहिती काढल्यावर त्याला समजते की ब्रेल लिपीमध्ये पुस्तके लिहिणे हे कठीण काम तर आहेच पण त्याहीपेक्षा त्या भाषेमध्ये पुस्तक प्रकाशित करणे हे जास्त कठीण काम आहे.
ह्या किचकट कामामुळेच ब्रेललिपीमध्ये अन्य पुस्तकांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत.त्यामुळे आपणच अशी प्रकाशन कंपनी का काढायची नाही हा विचार तो करतो.त्याला लागणारे पैसे आणि सर्व झाल्यावर तो हा निर्णय घेतो.ही प्रकाशन कंपनी भेट म्हणून त्याला तिला द्यायची असते.
ह्या किचकट कामामुळेच ब्रेललिपीमध्ये अन्य पुस्तकांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत.त्यामुळे आपणच अशी प्रकाशन कंपनी का काढायची नाही हा विचार तो करतो.त्याला लागणारे पैसे आणि सर्व झाल्यावर तो हा निर्णय घेतो.ही प्रकाशन कंपनी भेट म्हणून त्याला तिला द्यायची असते.
टाळ्यांच्या गडगडाटमध्ये सर्व त्या घोषणेचे स्वागत करतात.
ती तर जागीच थिजून जाते.तो तिला भानावर आणत दोन शब्द बोलायला सांगतो.
"खरं तर हा खूप मोठा सुखद धक्का माझे पती श्रीयुत हर्ष इनामदार ह्यांनी दिला आहे.मला ह्याबाबतीत आजच तुमच्या समोर समजले आहे.साहित्य संस्था आहे म्हणजे फक्त पुस्तक नाही तर साप्ताहिक आणि मासिक सुद्धा आपण ब्रेल लिपीत प्रकाशित करू शकतो.त्यामुळे माझ्यासारख्या अंध व्यक्तींना आता पुस्तकाची जास्त वाट पहावी लागणार नाही. म्हणून त्याचा आनंद तर आहेच पण दृष्टी असलेल्या व्यक्तीने दृष्टीहीन लोकांसाठी केलेला हा उत्तम विचार मनाला खूप भावला आणि त्यासाठी मी हर्ष ह्यांचे मनापासून आभार मानते." असे बोलून ती शांतपणे खाली बसते.
सर्वांना अल्पोहार देण्यात येतो.कार्यक्रम खूप सुंदर झालेला असल्याने दोघेही खूप जास्त आनंदात असतात आणि सोबतच सर्वांच्या मनापासून शुभेच्छा स्वीकारत असतात.
"प्रकाशन कंपनी काढून तुम्ही खरचं चांगले काम केले आहे हर्ष, मला तुमचा खूप अभिमान वाटतो." रात्री झोपताना ती त्याला बोलते.
"मी म्हंटले होते ना,तुमचे स्वप्न आपण सोबतीने पूर्ण करू.यातच सर्व आले."
चिन्मयी मान हलवून त्याला बिलगते आणि हर्षही तिला जवळ घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो.
नैराश्याच्या तिमिरात हर्ष अडकलेला होता.आपले कुटुंब गमावल्याने त्याला जीवन जगण्याची इच्छाच शिल्लक राहिली नव्हती.तेव्हा त्याच्या आयुष्यात नकळत आली ती चिन्मयी.
आपल्या आयुष्यात नेहमी अंधारच राहणार असे मानणाऱ्या आणि उजेडाची अपेक्षा न करणाऱ्या तिला मात्र हर्षच्या रूपात एक समजूतदार आणि ती आहे तशी स्वीकारणारा जोडीदार भेटतो.दोन टोक एकत्र येतात तेव्हा विश्वासाने आणि समजूतीने त्यांचे प्रेमाचे नाते बहरत जाते.
आपल्या आयुष्यात नेहमी अंधारच राहणार असे मानणाऱ्या आणि उजेडाची अपेक्षा न करणाऱ्या तिला मात्र हर्षच्या रूपात एक समजूतदार आणि ती आहे तशी स्वीकारणारा जोडीदार भेटतो.दोन टोक एकत्र येतात तेव्हा विश्वासाने आणि समजूतीने त्यांचे प्रेमाचे नाते बहरत जाते.
फक्त शब्दांनी नव्हे
तर कृतीने सिद्ध केले
माझे हृदय हर्षने
कधीच चोरून नेले
तर कृतीने सिद्ध केले
माझे हृदय हर्षने
कधीच चोरून नेले
तिमिराच्या आयुष्यात
ती प्रकाश बनून आली
सखी काळजाची राणी
चिन्मयी माझी झाली
ती प्रकाश बनून आली
सखी काळजाची राणी
चिन्मयी माझी झाली
अन् काव्यहर्ष आणि शब्दस्पर्शा एक झाले.
समाप्त.
© विद्या कुंभार
शेवटच्या भागावर कमेंट करून कथा कशी वाटली ते सांगा.
आजपर्यंत कथेला ज्यांनी वाचून,लाईक करून आणि समीक्षा देवून प्रोत्साहन दिले त्या सर्व वाचकांचे खूप धन्यवाद.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा