Login

दोन ध्रुव भाग १

दोन ध्रुव भाग १
" आई तू मला सांगितल होत ना या सुट्टीत माझ्या रूम मध्ये एसी बसवून देणार म्हणून ? मग तु वहिनीच्या रूम मध्ये का बसवला ?"

कानन घरी आल्यावर चिडचिड करत होती. ती मगाशीच कॉलेज मधुन आली होती.तिच्या बाबांनी नविन एसी खरेदी केला होता. आज तोच एसी तिच्या वहिनीच्या रूम मध्ये बसवला होता.

तिचा चढलेला आवाज ऐकुन, रेवा जी किचन मध्ये काम करत होती ती बाहेर आली. ती शांत स्वरात म्हणाली,

" कानन एसी खरेदी करायला माझ्या बाबांनी जास्त पैसै दिले आहेत. मग आईनी एसी आमच्या रूम मध्ये बसवला तर काय चुकलं ?"

" वहिनी सारख काय पैशाचं कौतुक सांगतेस. माझ्या बाबांनी पण पैसै दिले आहेत ना ? मग एसी माझ्या रूम मध्ये बसवला तर काय बिघडलं ? उलट तु म्हणायला हवे होते, एसी काननच्या रूम मध्ये बसवायला हवा. तुम्ही तर कुलर मध्ये पण राहु शकता." कानन ने तिला टोमणा मारला.

रेवाचा बिचारीचा तर चेहराच उतरून गेला. त्यावेळीं रेवा काहीच बोलली नाही. पण मनातल्या मनात तुटली होती. तिच्या लग्नाला आताशी कुठं पाच महिने होत होते. कानन तिला नेहमी काही ना कारण काढून सूनावयची. ती या घरात आली आहे. कानन या घरची लाडकी मुलगी आहे. रेवा या घरची सून आहे. तिने या घरच्या मुलीचा लाड करणं हे पहिले केलं पाहिजे. किंबहुना हे सगळं करण कर्तव्य आहे. काननच्या या वागण्याला प्रभा ताई कंटाळल्या होत्या. त्या तिला समजावून सांगत होत्या,

" कानन ही चांगली गोष्ट नाही वहिनी सोबत वागण्याची "

" आई मला कशाला खोटं सांगितलं, उन्हाळा खुप आहे. तुला माहीत आहे ना, माझी रूम खुप गरम होते. उन्हाचा तडाखा या बाजुला जास्त बसतो. तर रूम मध्ये एसी बसवून देणार. जसं दादाचं लग्न झालं, रेवा वहिनी बनून घरी आली तर सगळं घर तिच्या पाठीशी उभ आहे. तुम्ही सगळेपण तिच्या मागेपुढे करतात. मला तर वाटतं मी माझ्या घरात परकी झाली आहे." डोळ्यात पाणी आणून ती बोलतं होती. प्रभा ताईंना यावर काय बोलावं ते समजेना.

रेवा उदास होती. रात्री जेवण झाल्यावर ती अनिकेतला म्हणली,

" कानन माझ्याशी अशी का वागते ? तिला मी आवडत नाही का ? ती माझा इतका राग का करते ? मी तर तिला काहीच बोलत नाही. पण ती मला सारखी सारखी सांगत असते ती या घरातील आहे आणि मी घरात परकी आहे."

" रेवा कानन सगळ्यांच्या लाडाने थोडी हट्टी झाली आहे. तिला समजतं नाही. तू तुझं मन मोठ कर." अनिकेत तिला समजावत म्हणाला.

" पण मीच का ? मी का मन मोठं करू ? मान्य आहे मी या घरात नविन आहे. मी या घरची सून आहे. मग सुन म्हणून मला काहीच मान नाही का या घरात ?" तिने विचारलं.

अनिकेतला एक् फोन आला आणि विषय तिथच बंद झाला. त्या दिवसानंतर त्या दोघींच्यात एक पोकळी निर्माण झाली.

दररोज कोणत्या कोणत्या कारणावरून दोघींच्यात वाद होत.

" तू पाण्याची बाटली भरून फ्रिज मधे का नाही ठेवली ?"

" तू हेचं कापडे का घातले ? "

" आज भाजीला खोबरं का घातलं ? दाण्याचा कुट घालून केली तर ती भाजी मला आवडते. वहिनीने मुद्दामहून भाजी मध्ये खोबरं घातल."

प्रभा बाई आणि अनिकेत या दोघींच्या भांडणाला वैतागले होते. उंदीर मांजरा सारख्या दोघी भांडणं करत होत्या. एक दिवस वाद इतका वाढला की कानन सगळ्यांच्या समोर बोलली,

" वहिनी इतकीचं एसी रूम मध्ये बसवायचा असेल तर तूझ्या बापाला सांग. सगळे पैसे देऊन नविन एसी खरेदी करुन द्यायला. हा एसी माझ्या बाबांनी खरेदी केलेला आहे. हा माझ्या खोलीतच बसवायला हवा."

रेवा रात्र भर रडत होती. एकीकडे नवरा काही तिच्या बाजूने उभा राहत नव्हता. सासूबाई दोघींच्या भांडणात पडत नव्हत्या. नणंद भावजयीच नातं आहे. तर ते कसं निभावयच हे त्या दोघींच्या वागण्यावर त्यांनी ठरवावं. अस स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं होतं.घरातलं वातावरण दिवसेंदिवस अधिकच बिघडत चाललं होतं. तिच्या डोक्यात अनिकेतचं वाक्य घुमत होते.

'  रेवा कानन सगळ्यांच्या लाडाने थोडी हट्टी झाली आहे. तिला समजतं नाही. तू मन मोठ कर.'

एक दिवस अचानक सकाळी रेवा म्हणाली,

" आई तुम्ही एसी काननच्या रूम मध्ये बसवून घ्या. पाहिजे तर तुम्ही अनिकेतना सांगा. ते एलेक्ट्रिशियनला बोलवून आजच्या आज ते काम करुन घेतील."

" का ग रेवा ? एकदम अस का म्हणत आहेस ?"

प्रभा बाईंनी विचारलं. त्यांना तिच्या वागण्याचं आश्र्चर्य वाटलं.