दोन घासासाठी
हे दवनव् तुझ्या माझ्या मधल
दोन घासाची किंमत
किती चुकवू मी
तू काय करते
म्हणून जीवाच्या आकांतापर्यंत
काम तू करून घेशील का
म्हणून जीवाच्या आकांतापर्यंत
काम तू करून घेशील का
जगण्याचे संपले नाते
जीव नुसता उरला
दाखवण्यापुरता
जीव नुसता उरला
दाखवण्यापुरता
मुल होत नाही हा गुन्हा
माझा एकटीचा का
तु मात्र नावाला का
माझा एकटीचा का
तु मात्र नावाला का
मुलाला समोर ठेऊन
त्रास हा रोजचा
सहन मीच का करावा
त्रास हा रोजचा
सहन मीच का करावा
मदत घेण्यासाठी
मलाच का पुढे करून
स्वतःचा स्व तु जपशील का
मलाच का पुढे करून
स्वतःचा स्व तु जपशील का
दोन घासासाठी
किती करु
जगण्या मरणाचा संघर्ष हा
किती करु
जगण्या मरणाचा संघर्ष हा