संसार थाटला आहे तर तो निगुतीने करावा लागतो, हे तिला समजत नाही ?
नुसते पैसै देऊन काम करायला मदतनीस ठेवणं आणि एक स्त्री म्हणून घराला सांभाळणं यात फरक आहे.
ती तिच्या जबाबदाऱ्या टाळते. असं बोलून दाखवत होत्या. त्यामुळे तिचं कामात मन रमत नव्हतं. कधी कधी तर मॅनेजरची बोलणी पण खावी लागली होती. जमेची बाजु म्हणजे सक्षम तिच्या बाजूनं भक्कम उभा होता.
आज तर त्यांनी विचारलचं ,
" बाळाचा विचार कधी करताय ? वर्ष उलटून गेलं आता ? करिअर काय बाळाच्या जन्मानंतरपण करता येईल ? "
" आई सध्या आमचा बाळाचा विचार नाही. आम्हाला थोड सेटल व्हायचं आहे." तिने सौम्य शब्दात समजावण्याचा प्रयत्न केला.
" अजुन काय सेटल व्हायचं आहे ? सगळं तर आहे. घर आहे. थोडी फार जमापुंजी आहे. दोघं मिळून कमावता. सहज जमेल. तुम्ही काही जगावेगळे नाहीत जे पहिल्यांदाच आई वडील होणारं !"
ती काही बोलणार इतक्यात तिच्या मॅनेजरचा फोन आला. त्यामुळे ती अजुन काही बोलू शकली नाही. कामात वेळ निघून गेला. पण तिच्या मनातल्या प्रश्नाचं काय ? त्यांची उत्तर कोण देणार ?
" स्त्री ही परिपूर्ण तेव्हाच होते का, जेव्हा ती एका बाळाची आई होते ? आई होण्याआधी ती एक मुलगी होती. जिने करिअर घडवण्या साठी अनेक वर्ष कष्ट घेतले आहेत. स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी रात्र दिवस स्वतःला झोकून दिलं आहे.
आता जेंव्हा ती करिअर मध्ये तिच्या मनातील ध्येय गाठण्याच्या इतक्या जवळ आली आहे तेव्हां तिने इतक्या वर्षांच्या कष्टाला विसरून जावं ?
मुलाचा विचार करावा ? हे कितपत योग्य आहे ? अस केलं तर इतके दिवस केलेले कष्ट वाया घालवणे होईल."
मुलाचा विचार करावा ? हे कितपत योग्य आहे ? अस केलं तर इतके दिवस केलेले कष्ट वाया घालवणे होईल."
रात्री या विषयावर सक्षमसोबत बोलायचं. असं मनाशी पक्क करत तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. रात्री तिने सक्षमला सांगितलं तर तो म्हणाला,
" तु काळजी नको करू. सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू दे. मला यावेळी प्रमोशन मिळवायचं आहे."
असं बोलून कुस बदलून तो झोपी गेला. त्या नंतर काही दिवस तर त्या दोघांना एकमेकांची तोंड बघायला देखील सवड मिळाली नाही. नाईट शिफ्ट आणि वेळी अवेळी असणारे क्लाएंट कॉल यामुळे ते दोघं बिझी होते.
मागच्या आठवड्यात भक्तीताई नणंदबाईंच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जावून आल्या होत्या. तेव्हां पासून तर त्या अधिकच मागे पडल्या. सकाळी अर्णवी नाश्ता करत होती. बाबा घरात नव्हते. सक्षम तर नाईट शिफ्ट करुन आला होता. त्यामुळे झोपला होता. अर्णवी नाश्ता करत होती तेव्हा भक्तीताईनी पुन्हा एकदा तो विषय काढलाच,
" अर्णवी आम्हाला आजी आजोबा बनण्याच सुख कधी देणार ? कृत्तिकाचं लग्नपण तुमच्या लग्नानंतर दोन महिन्यात झालं होतं. तिने बघ कसा लगेचच चान्स घेतला. ती पण तुझ्यासारखी नोकरी करते. जरा शिक तिच्याकडून. कधी पर्यंत आम्ही लोकांची बोलणी ऐकायची ?
आधी शिक्षण करायचं आहे. मग थोड सेटल व्हायचं आहे. म्हणून लग्न लांबणीवर टाकलं. आता काय करिअर करायचं आहे. म्हणून बाळाचं पण लांबणीवर टाकलं ? तुमची तिशी उलटून गेली आहे. तरी समजतं कस नाही ? " त्या तिला समजावून सांगुन थकल्या होत्या.
" अजुन किती दिवस वेळ हवा आहे ? वयाचा तीन दशकांचा टप्पा पार केला तरी अक्कल कशी येत नाही ? तुम्ही आता विचार करणारं , मग बाळाला जन्माला घालणार, अग आमचा ही विचार करा. आम्हीपण साठी पार केली. आम्ही त्या बाळाच्या मागे कसे धावणार ? त्यांच्याशी कसं खेळणार ? निर्णय घ्यायला अजून उशीर केला तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोण उचलणार ?
शिकलेले असून देखील समजत कसं नाही ? तुमचं बाळ जेव्हा ऐन तारुण्यात असेल तेव्हां तुम्हाला म्हातारपण आलं असेल . तुमच्या जबाबदाऱ्या कशा काय पुर्ण करणारं ? इतकी साधी गोष्ट समजतं कशी नाही. अक्कल गहाण ठेवून काम करता का ? "
" आईं काय बोलतं आहात ? अक्कल गहाण ठेवून काम करायला आम्ही वेडे आहोत का ? आई बाळ जन्माला घालणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का ? ते काही खेळणं आहे का ?
आई बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी आम्ही दोघं मानसिक शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला नको का ?"
अर्णवी काहीशी चिडून म्हणाली. तिचा चेहरा काहीसा लाल झाला होता. राग अनावर होत होता.
" ही सगळी कारणं आहेत. जबाबदारी पासुन पळून जाण्याची. मला वाटतं तुला तुझ करिअर महत्त्वाचं आहे. संसार वगेरे काय होत राहील. संसार झाला तर झाला. बहरला तरी ठीक आहे. कुटुंबं वाढलं काय किंवा नाही काय, तुला सगळ सारखचं ? मला वाटतं तुलाच बाळाची जबाबदारी घ्यायची नाही आहे. तुला तूझ्या कुटुंबापेक्षा तुझं करिअर महत्वाचं आहे ! " भक्ती ताई तडकून म्हणाल्या.
तिच्या कडे रागाने बघत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. स्वतःचा राग सावरत ती हतबल पणे उभी होती.
" खरचं मला संसार करायचा नाही आहे का ? मला बाळ आवडत नाही का ? मला संसार करायचा नसता तर मी लग्न कशाला केलं असतं ?
मी जबाबदाऱ्या टाळत आहे का ? "
मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण त्यांची उत्तरं तिच्या कडे नव्हती.
मी जबाबदाऱ्या टाळत आहे का ? "
मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण त्यांची उत्तरं तिच्या कडे नव्हती.
घरातील वातावरणाची संकेतरावांना बऱ्यापैकी कल्पना होती. सुरुवातीला सासू सुनेच्या भांडणात आपण पडायचं नाही हे तत्त्व त्यांनी पाळल होत. पण भक्तीचा नातवंडं हवं. हा अट्टाहास त्यांच्या समजण्यापलीकडचा होता. एक दिवस त्यांनी भक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला होता.
क्रमशः
टीम सुप्रिया
इरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा