Login

दुरून डोंगर साजरे - भाग -2

Dongar Sajre
दुरून डोंगर साजरे -  भाग - 2 


विवाहानंतरच्या पहिल्या दिवशी...तेजू रोजप्रमाणे लवकर उठली. सासरचं घर जबरदस्त आलिशान होतं. ती स्वयंपाकघरात गेली.

सासूबाई— रंजना, सोफ्यावर बसून नाश्त्याचे आदेश देत होत्या.

“तेजश्री, आमच्या घरी सगळं एकदम परफेक्ट असतं. नाश्त्यात चीज सँडविच, फ्रूट प्लॅटर, आणि लेमन टी. बघ, हे सर्व सुंदरपणे प्लेट पण करायचं असतं…... मध्यमवर्गीय घरातली तू हे असले पदार्थ तुमच्याकडे होतं नसतील ना कधी, नोकराणी नंतर शिकवेलं तुला सगळं.” असं बोलून सासूबाई खोलीत गेल्या....


तेजू अवाक…

तिला वाटलं होतं सासूबाई काही शिकवतील, काही बोलतील. पण इथे तर पहिल्याच दिवशी हुकूमशाही,कामवाली होती, पण तिच्यावर पण त्या ओरडत होत्या.



असेच,दिवस जातं होते.

लग्नाच्या आधी अगदी नम्र दिसणारा सिद्धार्थ… लग्नानंतर मात्र थोडा बदललेला दिसला,ऑफिसमधलं प्रेशर, मीटिंग्ज, पार्ट्या ह्याच्याच तो गुंतलेला असे.त्याच्या जीवनशैलीत तेजूला जागा खूपच कमी होती.

एकदा तेजू म्हणाली,

"सिद्धार्थ, आज तुम्ही थोडा माझ्यासाठी वेळ काढाल का? मला आईंबद्दल काही बोलायचं होतं."त्या मलाच इथलं काहींचं शिकवत नाही आहेत.

तो मोबाईलवरून डोळे न उचलता म्हणाला,
"तेजू, प्लीज. माझं लाईफ खूप व्यस्त आहे. मी परदेशातून शिकून आलोय. मला मायक्रो-मैनेज करणं आवडत नाही. तुम्ही दोघींनी तुमचं बघा."

तेजू गप्प बसली.
तिला कळत होतं की हे घर बाहेरून जितकं सुंदर दिसत होतं, आतून तितकंच थंड आणि आत्मकेंद्रित आहे.

एक दिवस सासूबाई म्हणाल्या,“तेजश्री, आज आमच्या क्लबच्या मैत्रिणी येणार आहेत. त्या खूप उच्चभ्रू आहेत. कृपया तुझी नेहमीची साधी कपड्यांची चॉइस नको. आमच्या इमेजला शोभेल असं काही घाल.”

तेजूने हसून म्हंटल.. “आई, मी प्रयत्न करते…”



मैत्रिणी आल्या, गप्पा-टप्पा झाल्या,तेजूने चहा दिला.त्याच्यातल्या एकीने विचारलं,“तेजश्री, तू कुठे जॉब करतेस?”तेजू म्हणाली, “मी सध्या नोकरी शोधते आहे.”


सासूबाई लगेच बोलल्या,“अहो, तिचं बॅकग्राऊंडचं तसं मध्यमवर्गीय. करिअर वगैरेची त्यांच्या फॅमिलीमध्ये फार माहिती नाही. आम्ही शिकवतोय तिला हळू-हळू.”

त्या एक वाक्याने त्या सगळ्यांनी तेजूकडे एक वेगळयाच दृष्टीने पाहिलं.

तेजुला खूप वाईट वाटलं.


लग्नाला सहा महिने झाले.

सासरच्यांची खरी ओळख तेजुला स्पष्ट झाली,दृष्ट, दिखाऊ, फक्त बडेजाव करणारे,त्यांच्यासाठी मान-सन्मान म्हणजे पैशाचं प्रदर्शन.


एकदा सासूबाईंनी तेजूला म्हणलं,“तुझ्या आई-वडिलांनी लग्नात जे दिलं… ते बरंच कमी पडलं, त्यामुळे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळसणाला तुझ्या बाबांना सिद्धार्थला दोन तोळ्याची चैन करायला सांग.


तेजूला ते ऐकून खूप कसतरीचं वाटलं, तिच्या मनाला लागलं, ती मनातल्या मनात बोलू लागली - आई - बाबांनी त्यांची सगळी सेविंग्स लग्नात वापरली होती तरी ह्यांना ते कमीच वाटतंय, आणि दोन तोळ्याची सोन्याची चैन करायची म्हणजे आता बाबांना कुठूनतरी उधारी घ्यावी लागेल.


त्या रात्री तिने शांतपणे आपल्या आई-वडिलांचा नंबर डायल केला… पण फोन लागला नाही, मग तिने विचार केला— त्यांना सांगितलं तर ते काळजी करत राहतील त्यांचं मन दुखेल. त्यापेक्षा नकोचं…


ती सगळं अंतरंगात साचवून बसली, दिवस जातं राहिले,ती आतल्या आत कुढत राहिली.


एके दिवशी घरात मोठं फंक्शन होतं. सासू - सासर्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता,नाव ठेवणं, कीर्ती वाढवणं… त्यांच्यासाठी फक्त उपस्थिती दाखवणं महत्त्वाचं होतं.


    सासरचे लोक चमकदार कपडे, सोन्याचे दागिने, मोठा हॉल, मोठा मेन्यू…तेजुला मात्र एकटेपणा वाटत होता.....फंक्शनदरम्यान तिच्या आई-वडिलांनी साधी, सुंदर पण स्टायलिश भेट आणली.

सासूबाईनीं गिफ्ट पाहताच नाक मुरडलं.

"अरे देवा! असं गिफ्ट कोण आणतं? इट्स सो चीप! सगळ्यांसमोर आपली इमेज किती डाउन झाली!"तेजूचे आई-वडील शांत होते. पण त्यांना लाज वाटली.


त्या दिवशी तेजुने पहिले मनोमन ठरवलं,हे घर माझ्यासारख्या मुलीसाठी नाही. इथे माणुसकी नाही. इथे फक्त दिखावा आहे.

रात्री घरी आल्यावर तेजूने सिद्धार्थला म्हंटल,
“सिद्धार्थ, आपल्या आई-बाबांनी माझ्या घरच्यांशी असं वागायला नको होतं. त्यांना दुखावलं आईंनीं.”

तो तिलाच ओरडून म्हणाला,
“तेजू, हे उच्चभ्रू लोकांचं कल्चर तुला समजत नाही. आमची लेव्हल काही वेगळी आहे. तुमच्या घरी असं काही चालत असेल, पण…इथे चालत नाही ”

तेजूने लगेच विचारलं,
“आणि माणुसकी? त्याचं काय?”

सिद्धार्थ हसला आणि म्हणाला,“हा शब्द मध्यमवर्गीय लोकांसाठी असेल. आमच्याकडे इमेज आणि स्टेटस महत्त्वाचं.”


तेजुचं मन सिद्धार्थच्या वाक्याने हेलावलं, ती मनातल्या मनात म्हणू लागली, इथे अशी मी सारखी ऐकून घेत राहिली तर हे सासरचे लोक अजून माझ्या माहेरच्यांकडून मागण्या करत राहतील.माझा आत्मसन्मान इथे संपत आलायं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या अशा नात्यांचं भविष्यात काय होते ते)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all