Login

दुरून डोंगर साजरे - भाग -3 ( अंतिम भाग )

Dongar Sajre
दुरून डोंगर साजरे -  भाग - 3 ( अंतिम भाग )


    दिवाळी यायला आठ दिवस बाकी होते, तेजुला सतत सासूबाई म्हणाल्या ते वाक्य आठवतं होतं, दोन तोळ्याची चैन सिद्धार्थला द्यायला सांग......तीला बाबांना सांगणं योग्य वाटतं नव्हतं, ती विचार करू लागली, काय करावं ह्यांच्या मागण्या भविष्यात वाढल्या तर - अजून माझी लहान बहीण आणि भाऊ शिक्षणाचे आहेत, त्याचं पण बाबांना बघावं लागतं, ह्यांच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर मला भविष्यात शारीरिक त्रास दयायला पण हे लोक कमी करणार नाहीत.


एके सकाळी लवकर तेजूने आईला फोन केला,आई म्हणाली, तेजू कशी आहेसं गं...“तेजू, तू आनंदात असलीस की आम्ही सुखी. बाकी काही नाही.”आईच्या आवाजातील प्रेमाने तिचं अस्तित्व हलून गेलं.


त्या दिवशी ती सासूबाईंकडे गेली आणि शांतपणे म्हणाली,
“आई, मी इथल्या पद्धती, श्रीमंती आणि मोठेपणा यांचा आदर करते. पण माझ्या आई-वडिलांचा अपमान मी सहन करणार नाही. माझं मन इथे रमत नाही आहे, माझ्या आत्मसन्मानासाठी… मला काही दिवस माहेरी जावंसं वाटतंय.”


सासूबाई ओरडून बोलल्या.“ ये, नाटकं करू नकोस. आमच्या घरातून असं सुनेला कधीपण माहेरी जायची परवानगी नसते!”


तेजू म्हणाली,
“मी तुमची नोकर नाही. मी मनाने जड असलेली सून आहे. आणि माझा सन्मान जर इथे नसेल… तर माझी जागा इथे नाही.”

सिद्धार्थही चिडला.
“तेजू, तू ड्रामा करतेस!”

तेजू थंडपणे बोलली,
“ड्रामा तुम्ही करता— स्टेटस, इमेज, शोऑफ. मी फक्त स्वतःची किंमत ओळखते.”

तीने शांतपणे बॅग घेतली आणि घराबाहेर पडली आणि माहेरी पोचली,

आईने तीला पाहताच तिला कवेत घेतलं.
तेजू रडत म्हणाली,
“आई, ते घरं दुरून मोठ्ठं सुंदर वाटतं असलं तरी ते आतून खूप कोरडं, पोकळ… माणुसकीहीन आहे.”


आई म्हणाली,“दुरून डोंगर साजरे दिसतात. पण जवळ गेल्यावर काटेच दिसतात. तु तुझ्या मनाचं ऐक. तुझा सन्मान सर्वात आधी.”

बाबांनी तिला मिठी मारली.
“बाळा,.... धैर्य दाखवलंस, तू स्वतःला सांभाळण्याचं धाडस केलंस.”



सिद्धार्थने दोन-तीनदा फोन केला,
"घरी परत ये. समाज काय म्हणेल?"त्याची आई पण तीच्या माहेरी येऊन तीला चलं म्हणून समजावून गेली..तेजूने त्यांना ठामपणे सांगितलं,“माझ्या आयुष्याचा आधार ‘समाज’ नाही. माझा आत्मसन्मान आहे.”


तेजू शांत झाली, महिनाभरात तेजूने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या आणि उत्कृष्ट नोकरी मिळवली.


तिने घटस्फोट घेतला.

तेजु आता स्वतःचं आयुष्य, स्वतःचं नाव, स्वतःची ओळख बनवू लागली,ती अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतंत्र झाली.

सिद्धार्थच्या घरचे लोक अजूनही त्यांच्या श्रीमंतीत जगत राहिले आहेत, सिद्धार्थने दुसरं लग्न केलं पण तेही तीन वर्षांनी मोडलं..


पण तेजू बदलली, तिचा आत्मविश्वास वाढला, कालांतराने तिने तीच्या ऑफिसमधल्या एका मध्यमवर्गीय कलीगबरोबर लग्न केलं..तिला आता एक मुलगी असून तिचा सुखाचा संसार आहे.


दुरून डोंगर साजरे असते … पण कधीकधी  माणसांच्या जवळ गेल्यावर काटे आणि अंधाऱ्या गुहा दिसतात. पण ते पाहण्याइतकं डोळे उघडण्याचं धैर्य मुलींनो नक्कीच ठेवा गं त्यासाठी आत्महत्या हा पर्याय निवडू नका गं..”


( ही माझ्या एका मैत्रीणीची सत्य कहाणी होती मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयन्त केला..)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
0

🎭 Series Post

View all