कुछ ना कहो ( भाग ५)
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
पद्मनाभ साठी चांगल्या चांगल्या मुली सांगून येत होत्या. पण आव्वांना शक्यतो कानडी भाषा येणारी मुलगी हवी होती. एखादी फारच काळी असे तर एखादी थोडी वागायला थोडी माॅडर्न वाटे आप्पांना. असे करण्यात दिवस चालले होते. दोन तीन वर्ष निघून गेली पण पद्मनाभचे लग्न काही जमले नाही. तेवढ्यात रामचे लग्न झाले. रामने मामाच्या मुलीशी लग्न केले. त्यामुळे त्याची आई खूश होतीच, पण माहितीची असल्याने चांगल्या घरची, चांगल्या वागणुकीची, दिसायला चांगली व हुशार बायको रामला मिळाली. रामचे लग्न थाटामाटात झाले. पद्मानाभला रामच्या लग्नात भावाच्या बरोबरीने मान मिळाला. रामच्या आईवडीलांनीही पद्मनाभच्या आईवडिलांचा चांगला मान राखला. लग्न झाले तरी रामच्या आणि पद्ममनाभच्या मैत्रीत काही फरक पडला नाही किंवा दोघांचे एकमेकांकडे येणे जाणे ही कमी झाले नाही. राम आणि रेवती जोडीने पद्मनाभच्या घरी येत. रेवती अगदी नावाप्रमाणेच होती. शांत, विनम्र, सुस्वभावी. तिने आपल्या गुणांनी रामच्या आईवडीलांबरोबर पद्मनाभच्या अव्वा अप्पांची ही मने जिंकली होती. आता सगळेच पद्मनाभच्या लग्नाची वाट पहात होते.
रामच्या लग्नाला वर्ष होत आले आणि रेवतीने गोड बातमी दिली. रेवतीला मुलगा झाला. ज्या दिवशी राम रेवतीला मुलगा झाला त्याच दिवशी पद्मनाभचे लग्न ठरले. पक्के झाले. तिलोत्तमा म्हणजे दक्षिणी सौंदर्याचा नमुना होती. सावळी पण तरतरीत नाक, मोठे काजळ भरले डोळे. नावाप्रमाणेच केशसंभार, हो केशसंभार म्हणावे इतके लांब पाठीवर रुळलेली वेणी पुढे घेतली तरी गुडघ्या पर्यंत जात होती. अव्वा ला तिलोत्तमा फारच आवडली. आप्पांना ही आवडली. मग पद्मनाभ ही " हो" म्हणाला. फक्त एकच प्रश्न पद्मनाभला पडला होता. तिलोत्तमाचे माहेर अतिश्रीमंत होते. त्यात तिलोत्तमा एकुलती एक, तरी त्यांनी पद्मनाभला होकार कसा दिला? असो. तर पद्मनाभचे लग्न अगदी राजेशाही पद्धतीने झाले. खूप थोरामोठ्यांची उपस्थिती लग्नात होती. लग्नाच्या पंगती उठत होत्या. वाढपी पंगती वाढून दमले होते. पद्मनाभ आणि तिलोत्तमा सगळ्यांकडे हसून बघून आणि सतत उभे राहून थकले होते. त्यात तिलोत्तमाचे डोके अचानक खूप दुखायला लागले. ती डोक धरून खाली बसली. तिच्या डाॅक्टर मामाने तिला औषध देण्याआधी जेवायला लावले. सगळ्यांची जेवणे झाली, पण पद्मनाभ तिलोत्तमा जवळ बसून होता. त्याचे जेवण व्हायचे आहे हे कुणाच्याही लक्षात आले नाही. राम खोलीत बघायला आला, पद्मनाभ तिलोत्तमा जवळ बसून होता. राम तसाच गेला जेवणाचे ताट आणायला तर सगळा स्वयंपाक संपला होता. कसतरी रामने एक ग्लास दूध मिळवले व रामसाठी घेऊन आला. ऐन लग्नाच्या दिवशी पद्मनाभ उपाशी राहिला.

तिलोत्तमा जरा ठीक झाल्यावर व-हाड निघाले. सोन्याने मढलेल्या तिल़त्तमाने पद्मनाभच्या घरात सोन पावलांनी प्रवेश केला. तिलोत्तमा बरोबर पद्मनाभच्या घरी सुबत्ता आली. पद्मनाभ हुशार गुणी होताच. चांगली नोकरी होती. ब-यापैकी पैसाही मिळवत होता. पोस्ट चांगली होती, मान होता सगळे होते. तिलोत्तमा जितकी सुंदर तितकीच मस्तवाल, गर्विष्ठ, उद्धट होती. तिने हळूहळू तिचे रंग दाखवायला सुरवात केली. अव्वाने केलेला साधा स्वयंपाक तिला आवडत नसे. ती स्वतः ही काही करत नसे. तिच्या माहेरी तिला कधीच काम करावे लागले नाही त्यामुळे तिला कामाची सवयच नव्हती. तिला रोज जेवायला काहीतरी स्पेशल हवे असायचे.
तिच्या मनासारखे झाले नाही तर ती अव्वा आप्पा आणि पद्मनाभचा देखील अपमान करत असे. तिच्या आईवडिलांना अवयवांना गोड शब्दात सांगितले की " तिलोत्तमा काही काम का करत नाही? मी शिकवले तर तिची शिकायची तयारी नाही. " तिचे आईवडील काहीच बोलले नाहीत. ते गेल्यावर दुसर्याच दिवशी एक कामवाली बाई तिलोत्तमाच्या सेवेत हजर झाली. पद्मनाभ तिला म्हणाला " उत्तमा परत पाठव त्या बाईला. नको इथे ती. थोडे काम तू कर. एखाद्या कामाला बाई लावू. पण ही बाई दिवसरात्र आपल्या घरात रहाणार ते मला आवडत नाही. " पद्मनाभ.
" तिला तुम्हांला पैसे द्यावे लागणार नाहीत. माझे वडील देतील. तसही तुमची कुठे इतकी ऐपत आहे म्हणा. " तिलोत्तमाचे हे शब्द ऐकून पद्मनाभ ओरडून म्हणाला, " तिलोत्तमा तू हे काय बोलते आहेस? मी तिला पैसे देऊ शकतो पण मी देणार नाही. आपण स्वावलंबी असावे. आपली कामे आपण करावीत. घरची बाई स्वयंपाक करते तेव्हा तिचे आप्ताविषयीचे प्रेम त्यात उतरत असते. मोली काम करणारी बाई ते कधीच करू शकत नाही. "
पद्मनाभचा वाढलेला आवाज ऐकून अव्वा आत येऊन समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली, " तिलोत्तमा असू दे. मी करत जाईन स्वयंपाक. तिला नको हो सांगायला. पद्मा राहू दे आता. भांडण राहू दे. " इकडे तिलोत्तमा चक्कर येऊन पडली. लगेच ती बाई आव्वांना म्हणाली, " ते त्याची औषधाची वेळ चुकली काय? म्हणून चक्कर आली म्हणतो मी" भागव्वा ती कामाची बाई.

" कसली गोळी? कोणाची? " पद्मनाभ.
" ते मिरची ( फीट) येत असते केवळ आक्काला, त्याची गोळी असते. " भागव्वा
" काय? " पद्मनाभ आणि अव्वा दोघेही एकदमच म्हणाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तिलोत्तमा ला फीट येतात हे आपल्याला सांगितले नाही, आपल्याला फसवले गेले आहे हे पद्मनाभच्या लक्षात आले. तो काही बोलला नाही. डाॅक्टरांना बोलावून आणले. तिलोत्तमाचे औषध पाणी केले. दुसऱ्या दिवशी तिलोत्तमाचे आईवडील त्यांच्या दारात हजर होते. तिचे वडील म्हणाले, " तिला कायम फीट येत नाही. कधीतरी क्वचित येते. बाकी तिची तब्येत उत्तम आहे. आणि तुम्हांला तिचा औषध पाण्याचा खर्च करावा लागणार नाही. तो मी देईन. तिच्यासाठी पाठवलेल्या भागव्वा च्या कामाचे पैसे ही आम्ही देऊ. " तिलोत्तमाच्या वडीलांचे अढ्यतेचे बोलणे पद्मनाभ ने खोडून काढले. तो म्हणाला, " मोठे म्हणून मी तुमचा मान राखतो पण असे बोलू नका. माझ्या बायकोच्या आजाराचे आणि कामवालीचे कामाचे पैसे मी देऊ शकतो. तेवढे पैसे मी मिळवतो. तेव्हा तुमची श्रीमंती मला नको. पण तुम्ही आम्हांला तिलोत्तमाच्या आजाराची कल्पना आधी द्यायला हवी होती. इतके असूनही तुमची मुलगी मात्र संयमी नाही. ती माझा अव्वा आप्पा कोणाचाच अपमान करताना विचार करत नाही. तिला समजला. नाहीतर.. … "
पद्मनाभला रागवलेला बघून तिलोत्तमाचे वडील शांत राहिले. तिलोत्तमाचे आईवडील तिथे असतानाच डॉक्टर परत तपासायला आले. डाॅक्टरांना तिला तपासले आणि ते पद्मनाभ आणि तिलोत्तमाकडे पहात म्हणाले, " आव्वा पदर बांधा आता. आता जास्त काळजी घ्यायला हवी सूनबाईंची. आजी होणार आहात तुम्ही. " डाॅक्टरांना शब्द ऐकून काय बोलावे पद्मनाभला कळेना. अव्वा आनंदाने म्हणाल्या, " हो बांधतेच पदर, नातवंड येणार मग तयार नको रहायला. थांबा आता तोंड गोड करते. गोडाचा शिरा खाऊनच जा. " तिलोत्तमाचे वडीलांच्या चेहर्यावर विजयी हास्य होते. तर तिलोत्तमा आपल्याच नादात होती.

क्रमशः
सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा