कथा : दोष कुणाचा?
भाग ३ : नवऱ्याचं मौन
भाग ३ : नवऱ्याचं मौन
एवढ्या वर्षांत मृणाल ने सगळ्यांचे स्वभाव चांगले ओळखले होते...तिचे आई वडील तिला सगळ ठीक होईल हेच नेहमी म्हणायचे...प्रशांत बोलत नाही किंवा तिच्याकडून भाग घेत नाही हे मृणालला आता नवीन उरलेलं नव्हतं. सुरुवातीला तिला वाटायचं, तो शांत स्वभावाचा आहे. भांडण टाळणारा, सगळं नीट ठेवणारा. पण हळूहळू तिला कळलं, ही शांतता स्वभाव नाही… पळवाट आहे.....
सकाळी ऑफिसला निघताना तो नेहमीसारखाच विचारतो,
“डबा आहे ना?”
“डबा आहे ना?”
मृणाल मान हलवते. तिच्या मनात मात्र प्रश्नांचा कल्लोळ असतो. माझं काय? हा प्रश्न तिच्या ओठांपर्यंत येऊन थांबतो.
त्या दिवशी डॉक्टरांकडून फोन येतो. तपासणीचे रिपोर्ट्स आलेले असतात. मृणालला आठवतं...डॉक्टरांनी दोघांनाही तपासणी करायला सांगितलेलं. पण प्रशांतने “नंतर बघू” म्हणत विषयच मिटवला होता.
त्या दिवशी डॉक्टरांकडून फोन येतो. तपासणीचे रिपोर्ट्स आलेले असतात. मृणालला आठवतं...डॉक्टरांनी दोघांनाही तपासणी करायला सांगितलेलं. पण प्रशांतने “नंतर बघू” म्हणत विषयच मिटवला होता.
संध्याकाळी ती धीर करून म्हणते,
“प्रशांत, डॉक्टरांनी पुन्हा दोघांनाही बोलावलं आहे. तू येणार का?”
“प्रशांत, डॉक्टरांनी पुन्हा दोघांनाही बोलावलं आहे. तू येणार का?”
तो थोडा चिडून म्हणतो,
“मृणाल, उगाच सगळं उकरून काढू नकोस. घरात आधीच ताण आहे.”
“मृणाल, उगाच सगळं उकरून काढू नकोस. घरात आधीच ताण आहे.”
“पण दोष सगळा माझ्यावरच येतोय,” ती हळू आवाजात म्हणते.
प्रशांत काही क्षण गप्प राहतो. मग तोच परिचित वाक्य नेहमीचच...
“आईचं मन वाईट आहे. तू समजून घे.” तिला आवडणार नाही मी तपासणी केली तर आणि माझ्यात प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही...डॉक्टर उगाच माझ्या तपासणीच्या नावाखाली पैसे उकळणार आहे...
“आईचं मन वाईट आहे. तू समजून घे.” तिला आवडणार नाही मी तपासणी केली तर आणि माझ्यात प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही...डॉक्टर उगाच माझ्या तपासणीच्या नावाखाली पैसे उकळणार आहे...
त्या वाक्यात तिची सगळी अपेक्षा संपते. तिला वाटतं, नवरा म्हणून तो तिच्या बाजूने उभा राहील. पण तो आई आणि बायकोच्या मध्ये उभा न राहता, बाजूला उभा राहतो.
एक दिवस सासूबाई सरळ म्हणतात,
“आम्हाला पुढे विचार करावा लागेल. वंश चालवणं महत्त्वाचं असतं.”
“आम्हाला पुढे विचार करावा लागेल. वंश चालवणं महत्त्वाचं असतं.”
हे ऐकून मृणालचा श्वास थांबतो. ती प्रशांतकडे पाहते. त्याच्या डोळ्यांत काहीच नसतं ...ना विरोध, ना आधार...रात्री ती रडते. उशीत तोंड खुपसून, आवाज न करता. प्रशांत बाजूला वळून झोपतो. तिच्या अश्रूंशी त्याचा काहीही संबंध नसतो.त्या अंधारात मृणालला पहिल्यांदा जाणवतं की तिला दुखवणारे शब्द नाहीत…तिला संपवणारं मौन आहे.....
जर तो एकदा म्हणाला असता,“दोष तिचा नाही आम्ही दोघेही बघू काय करायचे ते,”
तर कदाचित सगळं वेगळं झालं असतं.पण तो बोलला नाही.
आणि त्याच मौनाने मृणालला एकटी पाडलं आणि ती जखम सासूच्या शब्दांपेक्षा अधिक मोठी होती. . ...
तर कदाचित सगळं वेगळं झालं असतं.पण तो बोलला नाही.
आणि त्याच मौनाने मृणालला एकटी पाडलं आणि ती जखम सासूच्या शब्दांपेक्षा अधिक मोठी होती. . ...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा