कथा : दोष कुणाचा?
भाग ६ : स्वतःसाठी मृणाल च पहिलं पाऊल
भाग ६ : स्वतःसाठी मृणाल च पहिलं पाऊल
त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं. सासूबाईंचे शब्द थांबले नव्हते, पण मृणालचं ऐकणं बदललं होतं. आधी प्रत्येक टोमणा मनात खोल रुतायचा पण आता तो ऐकूनही तिथेच थांबत नव्हता... ती पहिल्यांदा स्वतःला सावरत होती.
सकाळी सासूबाईंनी नेहमीप्रमाणे उपवासाची आठवण करून दिली.
“आज अमुक व्रत आहे. विसरू नकोस.”
सकाळी सासूबाईंनी नेहमीप्रमाणे उपवासाची आठवण करून दिली.
“आज अमुक व्रत आहे. विसरू नकोस.”
मृणाल शांतपणे म्हणाली,
“आज मी उपवास करणार नाही.”
“आज मी उपवास करणार नाही.”
हे वाक्य साधं होतं, पण त्याचा परिणाम मोठा. सासूबाई क्षणभर थांबल्या. असा विरोध त्यांनी कधीच पाहिला नव्हता.
“मग देवाकडून काय अपेक्षा ठेवतेस?”
“मग देवाकडून काय अपेक्षा ठेवतेस?”
मृणालने नजर उचलली.
“मी स्वतःकडून काहीतरी अपेक्षा ठेवतेय.”
“मी स्वतःकडून काहीतरी अपेक्षा ठेवतेय.”
हे बोलताना तिचा आवाज स्थिर होता. आतून भीती होती, पण ती भीती तिने शब्दांवर येऊ दिली नाही.
त्या दिवशी ती पहिल्यांदा एकटी बाहेर गेली. कुठेही नाही...ती फक्त जुन्या ओळखीच्या स्त्रीरोगतज्ज्ञाकडे. तिथे तिने पुन्हा सगळं ऐकलं...तपासणी, पर्याय, उपचार. डॉक्टरांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं,
“दोघांनीही तपासणी केली तरच चित्र स्पष्ट होईल.”

बाहेर येताना मृणालच्या हातात फाइल होती, पण मनात पहिल्यांदा स्वतःचा विचार होता. तिला जाणवलं की आई होणं हा तिचा एकमेव उद्देश नाही. तिचं अस्तित्व त्यापेक्षा मोठं आहे.संध्याकाळी घरी आल्यावर प्रशांत तिला थांबवतो.
“आज आई खूप चिडली आहे” तो म्हणतो.
“आज आई खूप चिडली आहे” तो म्हणतो.
मृणाल शांतपणे उत्तर देते,
“त्या नेहमीच चिडलेल्या असतात, फरक इतकाच की त्यांच्या चिडण्याने आज मी घाबरलेली नाही.”
“त्या नेहमीच चिडलेल्या असतात, फरक इतकाच की त्यांच्या चिडण्याने आज मी घाबरलेली नाही.”
प्रशांत तिच्याकडे पाहतो आणि पहिल्यांदाच त्याला तिच्यात बदल जाणवतो.
“तुला काय झालंय? तू बदलतेयस का?” तो विचारतो.
“तुला काय झालंय? तू बदलतेयस का?” तो विचारतो.
मृणाल थोडंसं हसते.
“नाही. मी स्वतःकडे परत येतेय.”
“नाही. मी स्वतःकडे परत येतेय.”
त्या रात्री ती डायरी उघडते. वर्षांनंतर. काही ओळी लिहिते की माझं आयुष्य. माझा निर्णय. माझी जबाबदारी.
हे पाऊल लहान होतं, पण खूप महत्त्वाचं होतं...
स्वतःसाठी उभं राहायला...
हे पाऊल लहान होतं, पण खूप महत्त्वाचं होतं...
स्वतःसाठी उभं राहायला...
मृणाल बदलतेय हे आता घरात सगळ्यांनाच जाणवत होतं. ती मोठ्याने भांडत नव्हती, पण शांतपणे नकार देत होती आणि हाच नकार सासूबाईंना जास्त बोचत होता.
“आजकाल फारच मोकळी झाल्यासारखी वागतेस,” सासूबाई एक दिवस थेट म्हणाल्या.
“घरात राहायचं असेल तर नियम पाळावे लागतात.”
“आजकाल फारच मोकळी झाल्यासारखी वागतेस,” सासूबाई एक दिवस थेट म्हणाल्या.
“घरात राहायचं असेल तर नियम पाळावे लागतात.”
मृणालने हातातली कामं थांबवली.
“मी नियम मोडत नाहीये, आई!!! फक्त स्वतःला महत्त्व देत आहे ”
“मी नियम मोडत नाहीये, आई!!! फक्त स्वतःला महत्त्व देत आहे ”
सासूबाईंनी उपहासाने हसत उत्तर दिलं,
“असं बोलायला बाळ असतं तर शोभलं असतं.”
“असं बोलायला बाळ असतं तर शोभलं असतं.”
ते शब्द पुन्हा एकदा हवेत लटकले. पण यावेळी मृणाल कोसळली नाही. तिने आतमध्ये काहीतरी घट्ट केलं होतं.
रात्री प्रशांतशी पहिल्यांदाच तिने सरळ बोलायचं ठरवलं.
“मला डॉक्टरांकडे जायचंय… दोघांनी,” ती म्हणाली.
प्रशांत चिडला.
रात्री प्रशांतशी पहिल्यांदाच तिने सरळ बोलायचं ठरवलं.
“मला डॉक्टरांकडे जायचंय… दोघांनी,” ती म्हणाली.
प्रशांत चिडला.
“माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना माहीत आहे दोष कुणाचा आहे.”
मृणालने खोल श्वास घेतला......“मग माझं आयुष्य शिक्षा म्हणून का चालू ठेवायचं?”
तो गप्प झाला ,उत्तर नव्हतं होता तो फक्त अहंकार... एक पुरुषी अहंकार....त्या रात्री मृणाल झोपली नाही. डोळ्यांसमोर दोन चित्रं होती की, एक म्हणजे जिथे ती आयुष्यभर दोष स्वीकारत जगत राहते.
दुसरं, जिथे ती एकटी असते… पण मोकळी असते...
दुसरं, जिथे ती एकटी असते… पण मोकळी असते...
सकाळी तिने आईला फोन केला.आईचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाज मात्र ठाम होता.
“आई, मला काही दिवस घरी यायचंय.”
“आई, मला काही दिवस घरी यायचंय.”
आई काही विचारत नाही. फक्त म्हणते,
“ये. घर तुझंच आहे.”
“ये. घर तुझंच आहे.”
तो एक साधा वाक्य… आणि मृणालच्या छातीत साठलेला दगड हलका झाला.संध्याकाळी तिने सासूबाई आणि प्रशांतला सांगितलं,
“मी काही दिवस माहेरी जाणार आहे.”
“मी काही दिवस माहेरी जाणार आहे.”
“पळ काढतेयस का?” सासूबाई ओरडल्या.
मृणाल शांतपणे म्हणाली,
“नाही. स्वतःला वाचवतेय तुमच्यासारख्या pasun
“नाही. स्वतःला वाचवतेय तुमच्यासारख्या pasun
तीचे बॅग भरताना हात थरथरत होते. भीती होती समाजाची, लोकांच्या बोलण्याची, भविष्याची पण त्या भीतीपेक्षा मोठी होती स्वतःला हरवण्याची भीती. दाराबाहेर पाऊल टाकताना तिने मागे वळून पाहिलं नाही,कारण तिला माहित होतं की नातं तोडणं सोपं नसतं,
पण स्वतःला तोडत... दुखवत जगणं… त्याहून कठीण असतं.
पण स्वतःला तोडत... दुखवत जगणं… त्याहून कठीण असतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा