कथा : दोष कुणाचा?
भाग ७ : समाज काय म्हणेल?
भाग ७ : समाज काय म्हणेल?
माहेरचं दार उघडताच मृणाल काही क्षण तिथेच थांबली. तेच अंगण, तीच तुळस, तोच शांतपणा… पण ती स्वतः बदललेली होती. आईने काहीही विचारलं नाही. फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तो स्पर्शच मृणालसाठी उत्तर होता.
पहिल्या दोन दिवसांत घरात शांतता होती पण तिसऱ्या दिवशी शेजारणी आली.
“ काय ग मृणाल अचानक आली??सासरी सगळं ठिक आहे ना?”
तो प्रश्न साधा होता, पण त्यामागचा अर्थ मृणालला स्पष्ट जाणवत होता.
“ काय ग मृणाल अचानक आली??सासरी सगळं ठिक आहे ना?”
तो प्रश्न साधा होता, पण त्यामागचा अर्थ मृणालला स्पष्ट जाणवत होता.
आई उत्तर देणार तेवढ्यात मृणाल म्हणाली,
“हो सगळ ठीक आहे पण मी थोडे दिवस इथे राहणार आहे.”
“हो सगळ ठीक आहे पण मी थोडे दिवस इथे राहणार आहे.”
शेजारणीच्या चेहऱ्यावर क्षणात आश्चर्य.
“का? काही झालं का?
“का? काही झालं का?
तिने वाक्य पूर्ण केलं नाही, पण अर्थ हवेत लटकला.
मृणाल पहिल्यांदाच खाली मान घालून उभी राहिली नाही.
“हो, झालं आहे... खूप काही झालं आहे कळेलच तुम्हाला"
मृणाल पहिल्यांदाच खाली मान घालून उभी राहिली नाही.
“हो, झालं आहे... खूप काही झालं आहे कळेलच तुम्हाला"
हळूहळू गावात बातमी पसरली.
“मुलगी सासर सोडून आली.”
“आई होऊ शकत नाही म्हणून असेल.”
“नवऱ्याला समजून घ्यायला हवं होतं.”
“मुलगी सासर सोडून आली.”
“आई होऊ शकत नाही म्हणून असेल.”
“नवऱ्याला समजून घ्यायला हवं होतं.”
प्रत्येक वाक्य मृणालच्या कानावर आदळत होतं, फरक इतकाच की आता ती स्वतःला दोष देत नव्हती तर प्रश्न तिला वेगळे पडत होते की
दोष कुणाचा? शरीराचा, की विचारांचा?
दोष कुणाचा? शरीराचा, की विचारांचा?
एक दिवस प्रशांतचा फोन आला.
“लोक काय म्हणतील याचा विचार केलायस का?”
“लोक काय म्हणतील याचा विचार केलायस का?”
त्याच्या आवाजात काळजी नव्हती, फक्त समाजाची भीती होती....मृणाल थोडा वेळ शांत राहिली.
“मी इतकी वर्षे लोक काय म्हणतील याचाच विचार करत जगले. आता स्वतः काय म्हणतेय ते ऐकतेय.”
“मी इतकी वर्षे लोक काय म्हणतील याचाच विचार करत जगले. आता स्वतः काय म्हणतेय ते ऐकतेय.”
तो फोन ठेवून देतो. संभाषण अपूर्ण राहतं… अगदी त्यांच्या नात्यासारखं.त्या रात्री मृणाल अंगणात बसते. आकाशाकडे पाहत. आई जवळ येते.
“काय ठरवलंयस? जाणार आहेस का परत” आई विचारते.
“काय ठरवलंयस? जाणार आहेस का परत” आई विचारते.
मृणाल हळूच म्हणते,
“मी परत जाणार नाही… किमान तशी नाही.”
“मी परत जाणार नाही… किमान तशी नाही.”
आई तिचा हात घट्ट पकडते.
“मग लोक? ते तुलाच बोलतील .. तुझेच दोष दाखवतील...तू ते ऐकून नक्की दुःखी होशील”
“मग लोक? ते तुलाच बोलतील .. तुझेच दोष दाखवतील...तू ते ऐकून नक्की दुःखी होशील”
मृणाल थोडंसं हसते.
“लोक बोलणारच....आज नाही तर उद्या. पण मी शांत राहिले, तर तेच माझं उत्तर असेल.”
“लोक बोलणारच....आज नाही तर उद्या. पण मी शांत राहिले, तर तेच माझं उत्तर असेल.”
त्या क्षणी मृणालला कळतं की मुक्ती म्हणजे एकटेपण नव्हे तर स्वतःच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत.
आणि ही हिंमत…तिला शेवटच्या निर्णयापर्यंत घेऊन जाणार होती.
माहेरी येऊन आठवडा झाला होता. मृणालचं आयुष्य बाहेरून शांत दिसत होतं, पण आत सतत वादळ होतं. सुटकेचा श्वास होता… पण त्यासोबत अपराधीपणाची सावलीही होती.
मी चुकीचं करतेय का?
हा प्रश्न वारंवार मनात डोकावत होता.

त्या दिवशी प्रशांत अचानक आला.दार उघडताच मृणाल क्षणभर गोंधळली. त्याचा चेहरा थकलेला होता, डोळ्यांत चिडचिड. आईने दोघांना आत बसायला सांगून स्वतः स्वयंपाकघरात जाणं पसंत केलं.
“इतकं टोकाचं पाऊल घ्यायची गरज नव्हती,” प्रशांत म्हणाला.“सगळ्या बायका सहन करतात.”
“इतकं टोकाचं पाऊल घ्यायची गरज नव्हती,” प्रशांत म्हणाला.“सगळ्या बायका सहन करतात.”
मृणालने त्याच्याकडे नीट पाहिलं.
“सहन करणं म्हणजे जगणं नसतं, प्रशांत.”
“सहन करणं म्हणजे जगणं नसतं, प्रशांत.”
“पण तू प्रयत्न तरी केलेस का?”
“मी?” मृणाल थोडी हसली. “मीच फक्त प्रयत्न केले. स्वतःला दोष देण्याचे, उपवासांचे, देवधर्माचे… पण तू कधी केलास का?”
“मी?” मृणाल थोडी हसली. “मीच फक्त प्रयत्न केले. स्वतःला दोष देण्याचे, उपवासांचे, देवधर्माचे… पण तू कधी केलास का?”
तो गप्प झाला.
मृणाल पुढे म्हणाली,
“डॉक्टरांनी दोघांची तपासणी सांगितली होती. तू नकार दिलास. तरीही घरात रोज माझाच न्याय झाला आणि तरी सुद्धा तू कधीच माझ्याकडून बोलला नाहीस .”
“डॉक्टरांनी दोघांची तपासणी सांगितली होती. तू नकार दिलास. तरीही घरात रोज माझाच न्याय झाला आणि तरी सुद्धा तू कधीच माझ्याकडून बोलला नाहीस .”
प्रशांत चिडून म्हणाला,
“माझ्या घरच्यांचा हेतू वाईट नव्हता.”
“माझ्या घरच्यांचा हेतू वाईट नव्हता.”
“हेतू नव्हे,” मृणाल ठामपणे म्हणाली,
“परिणाम वाईट होते आणि ते मी भोगले.”
“परिणाम वाईट होते आणि ते मी भोगले.”
पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी स्पष्ट शब्दांत बोललं होतं. आवाज थरथरत होता, पण मत ठाम होतं.
“मग आता काय हवंय तुला?” प्रशांतने विचारलं.
“मग आता काय हवंय तुला?” प्रशांतने विचारलं.
मृणालने खोल श्वास घेतला.
“मला अशी मृणाल नको जी रोज स्वतःला दोषी मानते. मला अशी नाती नकोत जिथे प्रेम अटींवर दिलं जातं.”
“मला अशी मृणाल नको जी रोज स्वतःला दोषी मानते. मला अशी नाती नकोत जिथे प्रेम अटींवर दिलं जातं.”
तो उठला.
“तुला मोकळं व्हायचंय, तेच ना?”
“तुला मोकळं व्हायचंय, तेच ना?”
मृणाल हळूच मान हलवते.
“हो..... मला मोकळं व्हायचं आहे आणि ते बोलायला मला खूप वेळ लागला… पण ठरवायला नाही.”
“हो..... मला मोकळं व्हायचं आहे आणि ते बोलायला मला खूप वेळ लागला… पण ठरवायला नाही.”
प्रशांत निघून गेला... कोणताही निर्णय न घेता… पण मृणालसाठी मात्र मनातला निर्णय स्पष्ट झाला होता.
त्या रात्री तिने पुन्हा डायरी उघडली...यावेळी भीती नाही, गोंधळ नाही. फक्त एक ओळ....
स्वतःचा सन्मान जपणं, हाच माझा धर्म आहे.
त्या रात्री तिने पुन्हा डायरी उघडली...यावेळी भीती नाही, गोंधळ नाही. फक्त एक ओळ....
स्वतःचा सन्मान जपणं, हाच माझा धर्म आहे.
ती उंबरठ्यावर उभी होती.पलीकडे अनोळखी भविष्य होतं…पण मागे जे होतं,
ते तिला परत तोडणार होतं .
ते तिला परत तोडणार होतं .
क्रमशः