कथा : दोष कुणाचा?
भाग ८ : दोष कुणाचा ?
भाग ८ : दोष कुणाचा ?
मृणाल माहेरी गेल्यानंतर घर अचानक मोठं झालं होतं. स्वयंपाकघरात आवाज कमी होते, संध्याकाळी दिवा लावतानाची घाई नव्हती. सासूबाईंना ही शांतता बोचत होती.
“हिच्याशिवाय घर कसं चालणार?” असा प्रश्न नाही,
तर “हिच्यामुळे लोक काय म्हणतील?” हा प्रश्न जास्त होता.
“हिच्याशिवाय घर कसं चालणार?” असा प्रश्न नाही,
तर “हिच्यामुळे लोक काय म्हणतील?” हा प्रश्न जास्त होता.
प्रशांत कामावरून आला तेव्हा आई चिडचिडीतच होती.
“लोक विचारतायत. बायको माहेरी का आहे ते.”
“लोक विचारतायत. बायको माहेरी का आहे ते.”
प्रशांत थकलेल्या आवाजात म्हणाला,
“काही दिवस राहू दे. तिला वेळ हवा आहे.”....
“काही दिवस राहू दे. तिला वेळ हवा आहे.”....
“वेळ?” सासूबाई तावातावाने म्हणाल्या.
“तिला सवयच लावलीस ना तशी! जरा कडक राहिला असतास तर…”
“तिला सवयच लावलीस ना तशी! जरा कडक राहिला असतास तर…”
त्या वाक्यावर प्रशांत थांबला.
“आई, सगळा दोष तिचाच होता का?”
“आई, सगळा दोष तिचाच होता का?”
सासूबाई क्षणभर गप्प झाल्या. मग ठामपणे म्हणाल्या,
“आई होऊ शकत नाही ती. एवढं पुरेसं नाही का?”
“आई होऊ शकत नाही ती. एवढं पुरेसं नाही का?”
प्रशांत खुर्चीत बसला. पहिल्यांदाच त्या शब्दांना वेगळ्या अर्थाने ऐकत होता.फक्त तीच?डॉक्टरांचा आवाज त्याच्या डोक्यात घुमला....
‘दोघांची तपासणी गरजेची आहे.’
“जर… जर दोष माझ्याकडे असला तर?” तो हळूच बोलला.
‘दोघांची तपासणी गरजेची आहे.’
“जर… जर दोष माझ्याकडे असला तर?” तो हळूच बोलला.
सासूबाईंनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
“असं काही नसतं. पुरुषांना असे दोष नसतात.”
“असं काही नसतं. पुरुषांना असे दोष नसतात.”
ते वाक्य प्रशांतच्या मनात खोलवर रुतलं.
असे दोष नसतात....की असतात पण मान्य केले जात नाहीत?
त्या रात्री तो झोपला नाही. मृणालचे शब्द आठवत होते....
‘परिणाम मी भोगले.’
असे दोष नसतात....की असतात पण मान्य केले जात नाहीत?
त्या रात्री तो झोपला नाही. मृणालचे शब्द आठवत होते....
‘परिणाम मी भोगले.’
दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी पुन्हा विषय काढला.
“तिला परत घेऊन ये. लोकांना उत्तर द्यायचं आहे.”
“तिला परत घेऊन ये. लोकांना उत्तर द्यायचं आहे.”
प्रशांत पहिल्यांदाच शांत पण ठामपणे म्हणाला,
“लोकांना उत्तर द्यायचं की माणसाला समजून घ्यायचं....हे ज्याचं त्याने ठरवायला हवं.”
“लोकांना उत्तर द्यायचं की माणसाला समजून घ्यायचं....हे ज्याचं त्याने ठरवायला हवं.”
सासूबाई चकित झाल्या.
“तू तिच्या बाजूने बोलतोयस?”
“तू तिच्या बाजूने बोलतोयस?”
“मी कुणाच्याच बाजूने नाही,” प्रशांत म्हणाला.
“मी फक्त चुकीचं काय होतं ते पाहतोय.”
“मी फक्त चुकीचं काय होतं ते पाहतोय.”
त्या क्षणी घरात एक अदृश्य आरसा उभा राहिला.
ज्यात सासूबाईंना आपली कठोरता दिसत होती,आणि प्रशांतला स्वतःचं मौन.पण आरसा पाहणं वेगळं…आणि बदल करणं वेगळं.
ज्यात सासूबाईंना आपली कठोरता दिसत होती,आणि प्रशांतला स्वतःचं मौन.पण आरसा पाहणं वेगळं…आणि बदल करणं वेगळं.
हा आरसा स्वीकारायची तयारी दोघांचीच होती का?
समोर काही दिवस असेच गेले आणि प्रसंग उभा राहिला...
समोर काही दिवस असेच गेले आणि प्रसंग उभा राहिला...
मृणाल कोर्टाच्या पायऱ्या चढताना थांबली. हात थरथरत होते, पण पाय मागे वळत नव्हते. हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता; तो वर्षानुवर्षे साचलेल्या वेदनेचा निष्कर्ष होता.
प्रशांत समोर उभा होता. ओळखीचा… पण दूर. सासूबाई काही अंतरावर उभ्या, चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह.
प्रशांत समोर उभा होता. ओळखीचा… पण दूर. सासूबाई काही अंतरावर उभ्या, चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह.
घर मोडतेय ही त्यांची वेदना होती,पण माणूस मोडला होता हे त्यांना उशिरा कळत होतं.सुनावणीदरम्यान शब्द कमी होते, आठवणी जास्त.मानसिक छळ, एकतर्फी दोषारोप, मौनाने केलेली साथ...सगळं मृणालने शांतपणे सांगितलं.
रडत नाही… कारण ती आता स्वतःसाठी उभी होती.
रडत नाही… कारण ती आता स्वतःसाठी उभी होती.
प्रशांतने मान खाली घातली आणि पहिल्यांदाच त्याने स्वीकारलं
“मी तिला समजून घेऊ शकलो नाही.”
“मी तिला समजून घेऊ शकलो नाही.”
ते वाक्य उशिरा आलं होतं.माफी होती, पण उपाय नव्हता.
निर्णय लागला. नातं कायद्याने संपलं.कोर्टाबाहेर पडताना मृणालच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती…एक शांत थकवा होता.
निर्णय लागला. नातं कायद्याने संपलं.कोर्टाबाहेर पडताना मृणालच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती…एक शांत थकवा होता.
सासूबाई पुढे आल्या.
“तू आमचं घर तोडलंस,” त्या म्हणाल्या.
“तू आमचं घर तोडलंस,” त्या म्हणाल्या.
मृणाल थोडा वेळ शांत राहिली.
“नाही. जे घर मला माणूस म्हणून जगू देत नव्हतं,
त्यातून मी स्वतःला बाहेर काढलं.”
“नाही. जे घर मला माणूस म्हणून जगू देत नव्हतं,
त्यातून मी स्वतःला बाहेर काढलं.”
प्रशांत काही बोलू पाहत होता,पण शब्द अपुरे पडले.
मृणालने मागे वळून पाहिलं नाही...कारण मागे राहिलं होतं
दोष, अपेक्षा आणि अपराधीपण......पुढे होतं ते स्वतःचं आयुष्य.
आज ती एकटी होती,पण नाव नसलेली नव्हती.
ती मृणाल होती....स्वतःची ओळख मिळवलेली स्त्री.
आणि दोष कुणाचा?हा प्रश्न आता तिच्यासाठी प्रश्न राहिला नव्हता.....कारण दोष शरीराचा नव्हता,दोष विचारांचा होता.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा