आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये बरोबर आमच्या फ्लॅट समोर परांजपे कुटुंब राहायचे.आमच्या गॅलरी मधून त्यांचा पूर्ण फ्लॅट दिसायचा. सहज कधी गॅलरीत राहिले की नजर जायची.
मध्ये एक पूर्ण आठवडा कोणी नजरेस पडले नाही.बहुतेक बाहेरगावी गेले होते. परत आले तेंव्हा नवी नवरी पण दिसू लागली.आलोकचे लग्न झाले बहुतेक ...
घरात नवीन वस्तूही भरपूर दिसू लागल्या. नाजूक नवी नवरी तिचे नाव अंजली होते मला खूप आवडली.बालसुलभ कुतूहलाने मी तिला पाहत राहायची. बाहेर हॉल मध्ये सासूसासरे लहान दिर झोपायचे .ते दोघे किचन मध्ये झोपायचे. मी अभ्यासाला सकाळी लवकर उठायचे तेंव्हा ती उठलेली असायची .सुगरण होती स्वयंपाकाचा दरवळ दूरपर्यंत यायचा.
बिचारी दिवसभर कामात असायची.सासू सारखी रागावत असायची.तिच्या प्रत्येक कामात चुका काढायची.
काही दिवसांनी कळाले तिच्या आईवडिलांनी हुंडा मनासारखा दिला नव्हता. नवरा आल्यावर मात्र ती खूप खुश दिसायची.आलोक घरात असला की वातावरण खेळीमेळीचे वाटायचे.
काही दिवसांनी मी एकदा तिला चोरून चिंचा खात लाजताना पहिले .आई म्हणाली तिला बाल होणार आहे.
आलोक अंजली खूप खुश झाले होते.
काही दिवसांनी आलोक दिसेना तेंव्हा तो ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला आहे असे कळले.
आणि त्या रात्री मी गॅलरीत अभ्यास करत बसले होते .समोरच्या घरातून जोरजोराने
भांडणाचे आवाज येवू लागले.अंजली खूप रडत होती. मला आईने आत बोलावले. सकाळी उठले तेंव्हा कॉलनीत पोलिस आले होते.ambulance उभी होती. अंजलीला त्यात घातले जात होते.ती बेशुद्ध होती.
पोलिस सर्वांना घेवून गेले चौकशी साठी.
नंतर आई व शेजारच्या काकू बोलत होत्या.त्यावरून कळाले. रात्री भांडण झाल्यावर अंजलीने बाथरूम मधून ४ थ्या मजल्यावरून खाली पडली होती. पोटातले बाळ दगावले.कमरेखाली अपंगत्व आले. नवरा खूप रडत होता.पण आईच्या भीतीने तिला कोनिभेतायला पण गेले नाही दवाखान्यात. पुराव्याअभावी सर्वांची सुटका झाली.
आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून उलट अंजलिवर गुन्हा दाखल झाला बाळाच्या हत्येचा .
तिच्याशी सर्वांनी संबंध तोडले.नवऱ्याने आईचे ऐकून दुसरे लग्न केले.कॉलनीतल्या सर्वांना सत्य माहीत होते पण तिची साथ कोणी दिली नाही.
आज जाणत्या वयात मला अंजली आठवली की प्रश्न पडतो की खरंच दोष कुणाचा ? अंजलीचा की तिच्या लोभी सासरच्या माणसांचा?....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा