साधारण अर्ध्या तासाने डिंपल तयार होऊन बाहेर आली.
जिमी - किती हा उशिर? चल काहीतरी खाऊन घे. मग आपल्याला निघता येईल.
डिंपल - तू तरी सुरुवात करायची ना . आणि तसंही तुला माहीत आहे मी काय एवढं खाणार नाही. तो ज्यूस चा ग्लास दे फक्तं .
जिमीने डिम्पलकडे लाइम ज्यूस चा ग्लास पास केला आणि मोबाईलमध्ये लक्ष द्यायचं नाटक करू लागला.
एक दोन मिनिटांनी डिंपलने ग्लास ओठाला लावला आणि एक घोट घेणार इतक्यात बेडरूममध्ये ठेवलेला तिचा फोन वाजू लागला . ग्लास तसाच ठेवून डिंपल उठणार होती तोच
जिमी म्हणाला ' तू बस मी आणतो तुझा फोन. '
जिमी म्हणाला ' तू बस मी आणतो तुझा फोन. '
बरं म्हणून डिंपलने ग्लास पुन्हा ओठाला लावला. जिमी अर्ध्या मिनिटात आत बेडरूम मधे जाऊन फोन घेऊन आला तेवढ्यातच डिंपलने ज्यूस पिऊन संपवला होता . रिकामा ग्लास तिच्या हातात होता आणि ती जिमीच्या दिशेने पाहत होती.
ज्यूस संपलेला बघून जिमी रिलॅक्स झाला.
त्यानं डिंपलला सांगितले की मी आधीच आपल्या बॅग स्टाफकरवी गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यांना आज उद्या साठी सुट्टी दिली आहे.
त्यानं डिंपलला सांगितले की मी आधीच आपल्या बॅग स्टाफकरवी गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यांना आज उद्या साठी सुट्टी दिली आहे.
डिंपल - बरं केलंस. माझी पण तयारी झाली आहे फक्त जरा लॅपटॉप वर मेल्स मधे एकदा नजर मारते . चुकून महत्त्वाचा मेल निसटला तर इश्यू होईल.
डिंपल आत बेडरूम मधे गेली तेवढ्यात इथे जिमी फोन वर बोलायचं नाटक करू लागला.
जिमी - काय ssss अरे बापरे sss हे काय होऊन बसलं?
तुला अक्कल नाही का ? ड्रिंक केली माहित आहे तरी कशाला चालवायला गेलास . सरळ सरळ कॅब करून निघायचं ना.
बरं ..बरं... काळजी नको करू मी बघतो काहीतरी.
..हो ...हो ...होईल . नक्की...सांगतो त्यांना पण. ठेवतो मी करतो तुला कॉलबॅक.

त्याच्या बोलण्याच्या आवाजाने डिंपल बाहेर आली.
जिमी काय झालं ? कोण होतं कॉल वर? ठीक आहे ना सर्व ? ...- डिंपल
डिंपल सर्व ठीक आहे actually आश्रम मधे असताना माझा एक मित्र होता सुयोग म्हणून. त्याचाच फोन होता.
कुठल्यातरी पार्टीला गेला होता. परत येत असताना त्याचा एक छोटासा अपघात झाला आहे . जास्त सीरियस नाही आहे पण ऍडमिट आहे. त्याची बायको डिलिव्हरीसाठी नाशिकला गेली आहे म्हणून त्याने मला कॉल केला.
डिंपल तुझी परमिशन असेल तर मी १ तासासाठी जाऊन येऊ का? तोपर्यंत तू तुझ्या मेल्स चेक कर.
जिमीने थाप मारली.

डिंपल - it's ok. असं करूया मी पण येते सोबत. मग तिथूनच आपण पुण्यासाठी निघूया.
तू एकटा जाणारं मग मला घ्यायला परत येणार मग परत निघणार त्यापेक्षा एकत्रच जाऊ.
तू एकटा जाणारं मग मला घ्यायला परत येणार मग परत निघणार त्यापेक्षा एकत्रच जाऊ.
जिमी - नको तसंही तू कुठे हॉस्पिटलमध्ये येतेस. ते काही special हॉस्पिटल नाही आहे . माझा गरीब मित्र एका छोट्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तुझ्या सारखी लखपती तिथे आली तर लोकांच्या रांगा लागतील तुझ्याकडे डोनेशन मागण्यासाठी.
डिंपल आनंदात म्हणाली ' असे जर असेल तर मला खरंच येऊ दे. तू भेट तुझ्या मित्राला . मला गरजू गरीब लोकांना दान करू दे.
डिंपलच्या या वाक्यावर जिमी मनातून खूप हळहळला. या इतक्या चांगल्या दुसऱ्याच्या विचार करणाऱ्या मुलीला मी मारायला निघालो? ते ही त्या रोझी आणि मोहित ला पैसे मिळवून देण्यासाठी? पण आता काय उपयोग झोपेच्या गोळ्या टाकलेला तो ज्यूस तिने कधीचाच संपवला होता. एव्हाना हिला झोप यायला हवी.

जिमी - मॅडम हा चॅरिटी चा प्रोग्राम आपण पुढच्या वीकेंड ला करू. आता मी आलोच जाऊन.
बाय.
इतके बोलून डिंपलला बोलण्याची संधी न देता जिमी निघून गेला.
बाय.
इतके बोलून डिंपलला बोलण्याची संधी न देता जिमी निघून गेला.
तासभर बाहेर भटकल्या नंतर त्याने रोझिला कॉल केला. सर्व काही ठीक आहे . आता ती गाढ झोपेत असेल. शिवाय स्टाफ नाही कोणी घरी. मी तिला उचलून गाडीच्या डिकीत टाकेल. पनवेल फाट्याजवळून तुम्ही दोघे माझ्या BMW ला फॉलो करा.
जिमी रोझिला निरोप देऊन पुन्हा पॅलेस कडे जायला निघाला.
नेहमी स्टाफ ची वर्दळ असणारा पॅलेस आज शांत वाटत होता.
बेडरूम मधे कुठेतरी पडलेली डिंपल त्याच्या डोळ्यासमोर आलीं . तिचा शेवटचा दिवस आज या पॅलेसमधला.
नेहमी स्टाफ ची वर्दळ असणारा पॅलेस आज शांत वाटत होता.
बेडरूम मधे कुठेतरी पडलेली डिंपल त्याच्या डोळ्यासमोर आलीं . तिचा शेवटचा दिवस आज या पॅलेसमधला.
बिचारीच्या आयुष्यात एकटे वडील सोडले तर आई आणि आता नवऱ्याचं प्रेम नाही. आज असं काहीतरी व्हावं की डिंपल सोबत मी ही मरावं नाहीतर ते दोघं रोझी आणि मोहित तरी.
त्या दोघांना भरपूर शिव्या घालत जिमी आत पोहोचला.
पण बेडरूम पूर्ण रिकामी होती. बाथरूम मधे पण कोणी नाही.
एक एक करत जिमी प्रत्येक खोली बघू लागला.
आता त्याला खरंच काळजी वाटू लागली.
कुठे आहेस तू डिंपल ? प्लीज डिअर सुखरूप आहेस ना ? जिमी आवाज देऊ लागला. ते किचनमध्ये जायला वळणार इतक्या त्याने पाठी वळून पाहिले.

समोरच डिंपल एका हातात बंदूक रोखून जिमी कडे तुच्छतेने पाहत होती.
जिमी - "डिंपल तू? अगं मी कधीचा तुला शोधत आहे. बंदूक घेऊन काय करतेस . ठेव ती. निघू आपण आता.
डिंपल - कशाला? आणि मी कुठे हवी असायला होते? अरे देवा sss आता पर्यंत मी तर गाढ झोपेत असायला हा ना ? त्या शिवाय कशी येणार मी पुण्याला ?
अरे ss पण मी म येतेय का पुण्याला ? की मधेच घाटात कोसळणार आहे गाडी सकट?
अरे ss पण मी म येतेय का पुण्याला ? की मधेच घाटात कोसळणार आहे गाडी सकट?
जिमी - डिंपल काय बडबडतेस. चल ठेव ते .निघू आपण लगेच.
डिंपल - अरे पण तू मला डिकीत कसा टाकणार ? मी तो लाइम ज्यूस घेतलाच नाही ना?
काय बोलतेस तू? लाइम ज्यूस तू रोज घेतेस ..त्याचा काय संबंध.
डिंपल - रोज फक्त साधा लाइम ज्यूस घेतें. पण आजचा स्पेशल झोपेच्या गोळ्या टाकलेला नाही घेतला रे . तू फोन आणायला गेलास बघ तेव्हाच ओतला मी डायनिंग टेबलवरच्या फ्लॉवर पॉट मधे.
आता काय करशील तू ? पुढचा प्लान कसा सुरू राहील.
जिमी डिंपलच्या दिशेने जायला निघाला, तेवढ्यात डिंपलने बंदूक जिमी वर ताणून धरली.
तर Mr. रॉकस्टार जिमी . या बसा आपण बोलूया पुढच्या प्लॅन बद्दल.
जिमी - डिंपल अगं काहीही बोलू नकोस . कोणीतरी तुला मुद्दाम माझ्याविरुद्ध भडकावलं आहे .
कोण आहे तो सांग मला . त्याला सुतासारख सरळ करतो बघं.
कोणाला आपलं प्रेम पाहवलं नाही बघतोच आता.
कोण आहे तो सांग मला . त्याला सुतासारख सरळ करतो बघं.
कोणाला आपलं प्रेम पाहवलं नाही बघतोच आता.
डिंपल - चल ये बघ. असं बोलत डिंपलने आपल्या बेडरुममधला ७० इंच चा LED चालू केला.
त्यावर दिसणारे दृश्य पाहून जिमी घाबरला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा