दोघे निघून गेल्यावर जिमी तिथेच बसुन होता. मोहित आणि रोझी चा प्लॅन आहे पण फक्त प्लॅन पुरतेच संबंध आहेत की आपल्यासारखेच बिछान्यातले?
पुढचे काही महिने सर्व काही ठीक झालं तर आपण करोडपती होऊ. मग रोझी आपल्याशी लग्न नाही का करेना.
पण सर्वच फसलं आणि पकडलो गेलो तर स्वप्न तर दूर आताचे स्वच्छंदी जगणे पण नशिबात राहिले नसते. रोझी नाही तर दुसरी कोणी सहज मिळेल पण मोहितचा विचार डोक्यात आला. त्यांनी सर्व प्लॅन ओपन केला होता आणि आता माघार घेणे म्हणजे.....जाऊदे जे होईल ते होईल. त्याने दोघांचा विचार सोडून दिला.

इकडे डिंपलच्या आयुष्यात जिमीच्या रूपाने एक आशेचा किरण उगवला होता. तिच्या वागण्या -बोलण्यात फरक पडला होता आणि हा अनुभव तिच्या जवळच्या सहकाऱ्यांना विशेषतः तिच्या वडीलांना जाणवला होता .
एके दिवशी सरळ सरळ तिने आपल्या वडिलांसमोर जीमिशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. डॅडी, आय वॉन्ट माय husband लाईक जिमी ओन्ली. अ मॅन विथ सेल्फ प्राइड अँड सेल्फ रिस्पेक्ट. नॉट फॉर मनी बट फॉर पीपल.
त्यावर तिच्या वडिलांनी होकार दिला. येस बेटा माय ब्लेसिंग इस विथ यू. मनी नॉट इंपॉर्टन्ट नाव. जस्ट सिलेक्ट as पर हिस बेहविओर्स.
त्यावर तिच्या वडिलांनी होकार दिला. येस बेटा माय ब्लेसिंग इस विथ यू. मनी नॉट इंपॉर्टन्ट नाव. जस्ट सिलेक्ट as पर हिस बेहविओर्स.
अश्याच एका संध्याकाळी डिंपल ने जिमिला पहिल्यांदा आपल्या घरी बोलवले आणि वडिलांशी भेट घालून दिली. तेव्हाच तिने वडिलांसमोर जिमिला लग्नाची मागणी घातली.
सहा महिन्यातच आपला प्रभाव पडेल असं जिमिला वाटलं नव्हतं पण तरी शक्य तेवढा निरागस भाव ठेवत तो म्हणाला.
" डिंपल आता याक्षणी आपल्या पायाखाली जे कार्पेट आहे ना त्याची किंमत माझ्या पगारापेक्षा जास्त आहे . त्यामुळे तुम्ही भावनिक न होता आपल्यातल्या आर्थिक आणि सामाजिक दरीचा विचार करा.
तुला माहीत नसेल पण माझ्या मुलीशी लग्न करायला बरेच जण टपून बसले आहेत पण त्यांना डिंपलशी नाही तर तिच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीशी लग्न करायचं आहे. ....राजीव मेहता म्हणाले,
तसं जिमीने उलट प्रश्न केला .. पण माझ्याकडे साधं घरही नाही ना मला कोणी नातेवाईक, माझ्या सारख्या भिकाऱ्याशी लग्न करून तुमच्या मुलीचा इतर लोकांसमोर अपमान नाही करायचा मला .

डिंपल...- शट अप! आज पासून येत्या आठवड्याभरात आपण लग्न करत आहोत आणि मी तुझा होकार गृहीत धरला आहे ओके. आता अजून काही बोलू नकोस.
राजीव मेहता डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले, माझी खरी प्रॉपर्टी डिंपल आजपासून तुला सोपवत आहे.
त्यानंतर डिंपलने जिमिला आपला पॅलेस दाखवला . आतली प्रत्येक खोली ही किमती वस्तू आणि आधुनिकतेने भरलेली होती. प्रत्येक ठिकाणी cctv camera होता. महागडे पेंटिंग्ज , छोटासा लाउंज, मिनी बार, उत्तम कलाकुसर केलेले नक्षीदार उंची पडदे, सागवानी furniture, आणि डिंपल ची खोली एका महालापेक्षा कमी नव्हती. पॅलेसच्या आवारात तर काही महागड्या कार्स धूळ खात उभ्या होत्या.
हे सर्व पाहून जिमीचे डोळेच दिपून गेले . काहीच मेहनत न घेता आपण काय कमावलं आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
हे सर्व पाहून जिमीचे डोळेच दिपून गेले . काहीच मेहनत न घेता आपण काय कमावलं आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
या प्रसंगानंतर काल रात्री झालेली मोहित आणि रोझीची भेट.
एका स्वस्तातल्या पीजी मध्ये आपल्या मळकट - कळकट गादी वर पडून जिमी पॅलेस चे स्वप्न पाहत झोपी गेला.
अखेर २ दिवसांनी काही महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात जिमी - डिंपल विवाहबद्ध झाले. पहिल्यांदाच डिंपलचे रूप मिडियासमोर, जगासमोर आले.
जग- रहाटी प्रमाणे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्या वाद झाले पण त्याचा काहीच परिणाम डिंपल वर पडला नाही.

लग्नाच्या पहिल्या रात्री डिंपलच्या शरीराची स्थिती पाहून जिमिला जाम टेन्शन आले , कुठल्याही परिस्थितीत हे संकट टळो असा तो मनापासून धावा करत होता .पण मग डिंपलनेच त्याची या विचारातून सुटका केली , तिने कारण दिले मला माझा हा रोमँटिक क्षण स्वित्झर्लंड ला सेलिब्रेट करायचा आहे . सो आपण येत्या रविवारी फ्लाईट ने निघत आहोत . तोपर्यंत इथली महत्वाची काम मार्गी लावायची आहेत.
दुसऱ्या दिवशी डिंपल ने जिमिला आपल्या ऑफिस मध्ये नेले . आतापर्यंत त्याला माहित नसलेले DS group's रिलेटेड वर्क्स प्रेझेंटेशन च्या माध्यमातून त्याला एक्सप्लेन केले.
रोझिला आतमध्ये बोलवून तिने जिमिला आपले वर्क्स डिपार्टमेंट रिलेटेड प्रेझेंटेशन द्यायला लावले.
रोझिला आतमध्ये बोलवून तिने जिमिला आपले वर्क्स डिपार्टमेंट रिलेटेड प्रेझेंटेशन द्यायला लावले.
रविवारचा दिवस जरा उशीराच उगवला. फूल ऑन कुलिंग सेट रूम मध्ये जिमी मऊ मऊ उबदार गादी आणि महागड्या रग मधे एखाद्या मेलेल्या प्रेतासारखा गाढ झोपला होता.
साधारण चार पाच तासाने त्याला जाग आली तेव्हा डिंपल रूम मधे नव्हती. नेहमीप्रमाणे ती ऑफीस ला गेली असेल असा विचार करून जिमीने शॉवर घेतला. फ्रेश होऊन तो ऑफिस ला जायला निघाला तेव्हा त्याने पाहिले डिंपलची कार आज पार्किंग मधेच होती शिवाय मोहितही सर्व्हंट रूम मधे बसून होता.
जिमीने मोहितला डिंपल बद्दल विचारणा केली त्यावर मोहितने उत्तर दिले की तो स्वतः चार तासांपासून मॅडम खाली येण्याची वाट पाहत आहे आणि त्यांचा फोनही ऑफ येत आहे. पॅलेसमधील एकही सर्व्हंट ने त्यांना रूमच्या बाहेर पडताना पाहिले नाही म्हणून त्या बेडरूममध्येच असतील असा अंदाज आहे.

जिमी - नो मोहित आय एम जस्ट कमिंग फ्रॉम और बेडरूम अँड शी इस नॉट इनसाइड.
मोहित... चला आधी आपण ऑफिस मधे जाऊन त्या तिथे आहेत की नाही याची खात्री करून घेऊ.
गाडी स्पीडने पळवत दोघेही ऑफिस मधे पोहोचले पण डिंपल तिथेही नसल्याचे रोझीने सांगितले.
हे सर्व काय आणि कसं घडलं याच त्या तिघांना टेन्शन आलं होत.
Cctv असल्यामुळे त्यांना तिथे एकत्र चर्चा करता येत नव्हती . रोझीने आपल्या कॉन्टॅक्ट मधील लोकांना डिंपलची चौकशी केली पण आजवर डिंपल कधीच कोणत्या clinet visit ला गेली नाही त्यामुळे आताही ती कुठे जाण्याची शक्यता नव्हतीच.

अचानक जिमीचा फोन वाजला display वर डिंपलचाच कॉल दाखवत होता.
जिमी..... अगं कुठे आहेस तू सकाळपासून अख्खा पॅलेस, ऑफिस , सगळीकडे तुला शोधून झालं. वेड लागायची वेळ येणार होती माझ्यावर.
डिंपल - डिअर सॉरी हे मी तुला आधीच सांगणार होते पण बऱ्याच काळापासून इटली मध्ये महत्वाचं काम पेंडिंग होतं आणि अचानक त्यासाठी मला पहाटे निघावं लागलं. माझं काम मी तुझ्या भरवश्यावर सोडलं आहे. मी ऑनलाईन जॉइन असेलच पण तसंच काही महत्वाच असेल तर तुला निर्णय घेण्यात सूट आहे. सध्यातरी ८ महिने मी भारतात येऊ शकत नाही. होप तू मला समजून घेशील.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा