Login

डबलक्रॉस भाग ५

Doublecross
डिंपल चा निरोप मिळून एक आठवडा पूर्ण झाला.
जिमीने ही आनंद कम दुखःद बातमी रोझीला दिली.

त्यावर रोझी म्हणाली बरं झालं ना तसंही आपल्याला काही विशेष करायचं नव्हतं. ८ महिने भरपूर वेळ आहे आपल्याजवळ.
फक्त एक समजत नाही असं काय आणि कुठलं काम आहे जे ती अशी अचानक निघून गेली . तिच्या पुढील ६-७ महिन्यांचं schedule माझ्याकडे आहे त्यात इटलीच काय कुठल्याही परदेश दौऱ्याचा उल्लेख नव्हता. ती भारतात आपल्या हेड ऑफिस शिवाय कुठेच जात नाही.
जिमी तरीही तू तिच्याकडून ही गोष्ट काढून घे. कदाचित ती ज्यासाठी गेली असेल ते आपल्या फायद्याचं ही असू शकतं.
बरं म्हणून जिमीने संभाषण संपवलं.

४ महिने जिमीने स्वातंत्र्य, सत्ता आणि पैशाचा पुरेपूर उपभोग घेतला. स्वर्गसुख म्हणजे काय हे प्रत्येक मिनिटाला अनुभवत होता. डिंपल फोन वर त्याची चौकशी करत होती तर तिचे वडील मुलीच्या अनुपस्थित कधी ऑफिस तर कधी कॉन्फरन्स, बिझनेस कॉल अटेंड करत व्यस्त होते.

मधल्या काळात कधी मोहित तर कधी एकटी रोझीच अनेकदा त्याला भेटून गेली.

एके दिवशी संध्याकाळी पॅलेस मधल्या lounge कम बार मधे जिमी ड्रिंक्सचे घोट वर घोट रिचवत होता सोबत रोझिला परत बिछान्यात कसं ओढता येईल याचा विचार करत होता तेवढ्यात त्याला डिंपल चा कॉल आला .

डिंपल - हाय डिअर कसा आहेस?
जिमी - लग्नाच्या आठवड्याभरात एकट्याला टाकून गेलेल्या नवऱ्याला विचारतेस कसा आहेस?
प्लीज ये ना परत.. या डिंपल महालात मी एकटा पडलो आहे.

डिंपल - अरे हो हो ! इथे तुझ्याशिवाय मी एक एक दिवस कसा काढतेय माझं मलाच माहित. पण आता तुला अजून वाट नाही पाहावी लागणार . माझं इथलं काम या ५ महिन्यातच झालं आहे.
परवाच्या डेल्टा airways ने मी परत येत आहे . मग फक्त तू मी आणि आपला राहिलेला मधुचंद्र. जेवढे दिवस दूर होते त्यापेक्षा जास्त दिवस फक्त तुझ्या सहवासात असणार आहे मी.

डिंपलच बोलणं ऐकून जिमिला शॉक बसला. तिच्यासोबत मधुचंद्राच्या कल्पनेनेच त्याला शिसारी आल्यासारखं झालं तरी शक्य तितका आनंद आवाजात दाखवत तो म्हणाला येस माय बेबी अँड आय एम वेरी एक्साईट टू सी यू अगेन . आय विल कम ॲट एअरपोर्ट फॉर पिकअप. लव यू डिअर.

डिंपल - येस लव यू टू. विल मीट सून बाय.

इकडे जिमीने कपाळावर हात मारून घेतला . डिंपल पॅलेस मधला स्पेशली बेडरूम मधला राजेशाही थाट त्याला परत अनुभवता येणार नव्हता . त्या बेढब आणि भयानक आकाराच्या आकृतीसोबत त्याला आता इथे रहाव लागणार होतं.
इटलीवरून निघालेले डेल्टा airways मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वर सुखरूप लँड झाल्याची उद्घोषणा झाली आणि जिमी उदास मनाने डिंपलच्या येण्याची वाट पाहत राहिला.
डिंपलने मी थकले आहे कॉफीची गरज आहे प्लीज समोरच्या कॅफे मध्ये भेटू असा msg टाकला.

जिमी कॅफे मध्ये पोहोचला तसं त्याने पाहिलं बहुतेक टेबल्स रिकामी आहेत अजून डिंपल पोहोचली नाही . कोपऱ्यातल एक टेबल पकडून तो तिच्या येण्याची वाट पाहत दाराच्या दिशेने पाहू लागला.
साधारण अर्धा तास झाला असेल त्याच्या लक्षात आले की त्याच्या विरुद्ध दिशेला बसलेली एक सुंदर तरुणी चोरून चोरून त्याला पाहत आहे. २४- २५ वर्षांची ,नाजूक कमनीय बांधा, शरीरावर आवश्यक ठिकाणी असणारे उठावदार वळण , थोडासा सावळा पण देखणा नाजूक चेहरा , खांद्यापर्यंत रुळणारे केस, रेड colour चा शॉर्ट वन पिस, पायात टक टक वाजणारे उंची हिल्स, या अशा पेहरावाला सूट होणाऱ्या महागड्या एक्सेसरी, एकंदर अशा मॉडेल अवतारातील ती तरुणी जवळ जवळ जिमीच्या टेबल जवळ आली.

हॅलो जिमी , हाऊ आर यू डिअर?

तू? आय मीन तुम्ही....? नाही म्हणजे डिंपल....डिंपलचा आवाज...? ..?

त्याच्या कपाळाला किस करत ती तरुणी म्हणजेच डिंपल उत्तरली.... येस जिमी इट्स मी! कसं वाटलं तुला surprise?

जिमिला आता वेड लागायचंच बाकी होतं.
त्याचं वेडाच्या भरात तो डिंपलच्या हाताला चेहऱ्याला खांद्याला स्पर्श करू लागला.
डिंपल माय डिअर आय लव यू बेबी.
लव यू फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. आय कान्ट explain माय हॅपिनेस.
आयुष्यात पहिल्यांदाच जिमी मनापासून डिंपल बद्दल प्रेम व्यक्त करत होता.
" जिमी please कंट्रोल युअर फिलिंग्स.
खरंतर माझं असं काहीच काम नव्हतं इटलीला.
तुला मला हेच surprise द्यायचं होत.
लिपोसेक्शन सर्जरी आहे त्याद्वारे आपल्या शरीरावर ,चेहऱ्यावर असलेली अतिरिक्त चरबी काढून टाकता येते. यासाठी साधारण दोन महिने लागतात. मी हिच ट्रीटमेंट घेतली . इटलीला उतरले आणि सरळ २ महिने सर्जरी साठी त्यानंतर पायाच्या उपचारासाठी ऍडमिटच झाले बघ. त्यांनंतर हा सर्व मेकओव्हर केला..
माझे जुने कपडे ,वस्तू ,शरीर आणि स्वभाव सर्व काही तिथेच सोडून आले बघ तुझ्यासाठी.

तुला माझ्या शरीराचा तिरस्कार नव्हता , माझ्याशी त्याच शरीरासोबत विवाह केलास पण मग मलाच माझ्या शरीराचा तिरस्कार वाटू लागला. अस वाटलं हिच वेळ आता तुझं तुला स्वाधीन करायची.
आजपासून तु आणि फक्त मी.
....
जिमी - पण मग हे तू आधीच का नाही केलंस?
डिंपल - मग मला कसं समजणार कोण माझ्यावर प्रेम करतंय आणि कोण पैशांवर? ..
मी तेव्हाच ठरवलं होत जो माझ्या शरीरासकट माझा स्वीकार करेल त्यालाच मी जीवनसाथी म्हणून निवडणार. आणि तू माझं हृदय जिंकलस.
0

🎭 Series Post

View all