Login

डबलक्रॉस भाग ८

Doublecross
ठरल्याप्रमाणे जिमीने रोझिला येत्या शनिवारी प्लॅन करणार असल्याची खबर दिली.
शुक्रवारी दुपारी जिमी डोकं दुखत असल्याचा बहाणा करून लवकर घरी आला. पॅलेस ला आज त्याने स्टाफच्या मदतीने सजवले होते. Specially डिंपलच्या बेडरुमला.
गोलाकार बेडवर गुलाब पाकळ्या, खोलीत मंद दिव्यांची रोषणाई, संपूर्ण रूममध्ये त्यांचे दोघांचे कितीतरी फोटोज, डायनिंग टेबल वर डिंपलला आवडणारे पदार्थ, ज्यूस, चॉकलेट्स,
एकवार भरल्या डोळ्यांनी तो हे सर्व पाहत होता. डिंपल इटलीवरून आल्यानंतर तो मनापासून तिच्या प्रेमात पडला होता आणि आता तिचाच जीव घेणं , तिला धोका देणं हे त्याच्या जीवावर येतं होतं. आधी त्याचं प्रेम रोझी होती पण १० वर्ष तिच्यासोबत फिरल्यानंतर त्याला जाणीव झाली की रोझीच फक्त पैशांवर प्रेम आहे शिवाय तिला लोकांचा फक्त स्वतःच्या गरजेपुरता वापर करता येतो.
गरज संपली माणूस संपला.
तितक्यात डिंपल ची कार पॅलेसमध्ये शिरली.
आतमध्ये जाता जाता पॅलेसला केलेली रोषणाई पाहून ती हरखली.
जिमी sss जिमी ssssss

काय हे जिमी ? आज माझा वाढदिवस नाही ना आपलीं अनिवरसरी.
मला वाटलं तू खोलीत झोपला असशील पण तुझा तर भलताच उद्योग दिसतोय.

जिमी - असं काही नाही स्वीट हार्ट... ❤️ आज लवकर घरी आलो पण खूप एकटं एकटं वाटत होत. बरेच दिवस आपण फक्त बाहेरच फिरत आहोतं . एकांत असा हा मिळालाच नाही म्हणून ही सर्व बाकी नाही.
डिंपल आधी तू फ्रेश हो. मग आपण खाऊन घेऊया. आजची रात्र मला तुझ्या सोबत घालवायची आहे . भरपूर गप्पा मारायच्या आहेत , तुला कवटाळून राहायचं आहे.

डिंपल - तू ना जिमी खूपच इमोशनल झाला आहेस . अरे मी तुझीच आहे शेवटपर्यंत तुझ्यासोबतच आहे . जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणीच माझी साथ देत नव्हतं. पण तू माझा हात धरलास , माझ्या शरीरासकट माझा स्वीकार केलास मग मी तरी कशी तुला सोडून जाणार . निदान जीवात जीव असेपर्यंत तरी कधीच नाही.

पुढे ती शुक्रवारची रात्र जिमी आणि डिंपलने सेलिब्रेट केली.

"असे म्हणतात न कर्त्याचा वार शनिवार. शनिवारी प्लॅन केलेले कुठलेच काम पूर्णत्वास जात नाही .
निदान जिमीचा प्लॅन तरी सक्सेस होतो का ?

शनिवारी सकाळी ११ वाजता -

गुडमॉर्निंग डार्लिंग...... गालांवर एक किस करत जिमीने डिंपल ला विश केले.
तेव्हा डिंपलने डोळे चोळत पाहिले तर जिमी नुकताच आवरून बाहेर आला होता आणि हातात एक कॉफी मग घेऊन उभा होता.

डिंपल - Good morning... पण हे काय तू कधी उठलास? आणि कुठे निघालास ?

जिमी - विसरलात का मॅडम? तुम्हीच force केला होता पुण्याचा पार्टीला जायचं आहे त्यानंतर लाँग ड्राईव्ह करत रविवारी रोमँटिक डेट.
आता तुझी झोपायची इच्छा असेल तर राहूदे , असे म्हणतं जिमीने बेडवर बसलेल्या डिंपलला आपल्या मिठीत ओढले. त्यावर डिंपलने त्याला एक कीस देत दूर ढकलले आणि आवरायला बाथरूम मध्ये पळाली.

जिमी - हिच ती वेळ प्लॅनची सुरुवात करण्याची.
डिंपल शॉवर घेत असल्याचा अंदाज घेऊन जिमीने स्टाफकरवी ब्रेकफास्ट लावायला सांगितला आणि आम्ही आज उद्या नाही आहोत त्यामुळे सर्व स्टाफ ना १ तासांनी घरी निघून जाण्याचा निरोप दिला.

१० मिनिटात स्टाफने डायनिंग टेबल वर ब्रेकफास्ट लावला आणि निघून गेला.
टेबलवर डिंपलच्या आवडीचे चीझ टोस्ट सँडविच, ब्राउनि, फ्रूट सॅलड विथ कर्ड,
फ्रेश लाइम ज्यूस, एग टोस्ट इत्यादी पदार्थ होतें .
जिमीने लाइम ज्यूस मध्ये झोपेच्या ५ गोळ्या मिसळल्या आणि तो डिंपलच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all