Login

डबलक्रॉस भाग ११

Double Cross
डिंपलने जिमिला पुढचा प्लान ऐकवला.
सर्व काही ठरल्याप्रमाणेच होत आहे अस तू रोझी आणि मोहित ला दाखवायचं. डिकीमध्ये मी बेशुद्ध आहे असं त्यांना वाटलं पाहिजे आणि तीच रिकामी गाडी तू दरीत ढकलून द्यायची. जेणेकरून त्यांना वाटेल की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. त्यानंतर तू पुण्याला एकटा जायला निघशील प्रायव्हेट कॅब ने. निदान त्यांच्यासमोर तरी तू निघशील. रोझी आणि मोहित जेव्हा आपल्या गाडीजवळ येतील तेव्हा मी त्यांच्या गाडीजवळ आडोशाला लपलेली असेल. समोर येताच या माझ्या पिस्तुल मधून दोघांवर पण मी जवळून ३- ४ फायरिंग करेल. त्यांना गोळी लागल्यामुळे काही करता येणार नाही पहिल्या १ गोळीतच त्यांचा जीव जाईल. मग ते दोन्ही प्रेतं खोल दरीत ढकलायचं कामं तुझं. त्यानंतर माझा तुझा काही संबंध नाही. डिव्होर्स पेपर तुला लगेच मिळतील. आणि त्यानंतर मला कधीच तुझं तोंड दाखवू नकोस.

डिंपलने एका दमात आपला प्लॅन सांगितला.

जिमी - कसं शक्य आहे ? त्यांनी जर डिकी उघडून बघायचा प्रयत्न केला तर ? रिकामी डिकी पाहून माझाच गेम करेल तो मोहित.
त्यापेक्षा एक काम करतो हे कार्पेट - बेडशीट मधे गुंडाळून डिकीत ठेवतो ऐनवेळी जर त्यांनी डिकी उघडून पाहिली तर त्यांना सांगता येईल काहीतरी.

डिंपल - ठीक आहे. मी ठराविक अंतर ठेवून तुमच्या गाडीचा पाठलाग करेल.
हा ब्लू टूथ तुझ्या खिशात असेल याने मला तुझं लोकेशन ट्रॅक करता येईल शिवाय तुमच्या मधे जे काही बोलणं होईल ते मी ऐकू शकते वेळ आल्यास यावर तुझ्याशी बोलू शकते. त्यामुळे हा ब्ल्यू टूथ फेकून द्यायचा किंवा मला मूर्ख बनवायचा अजून प्रयत्न करू नकोस.

डिंपलची कार घेऊन जिमी पॅलेस बाहेर पडला.
अर्ध्या तासाने त्याने रोझिला कॉल करून डिंपलला डिकीत एका कार्पेट मध्ये बेशुद्ध करून ठेवल्याची माहिती दिली आणि अंतर ठेवत लोटस हिलच्या जरा आधीच गाडी पार्क करून पुढे येण्यास सांगितले.

आपला प्लॅन आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचा पाहून इथे रोझी आनंदली.
ड्रायव्हिंग करत असलेल्या मोहितला तिने गालावर हलकेच किस केले.

रोझी - बघ मोहित मी म्हटलं नव्हतं तुला ..जिमी शिवाय दुसरा चांगला बळीचा बकरा मिळणार नाही म्हणून.

बिचारा sssss ही ss ही ss ही sss त्याला काय माहित डिंपलला मारल्यानंतर रोझी पण त्याची राहणार नाही . ती आधीच मोहितची झाली आहे.

सुरुवातीला आमचं प्रेम होत. मी पण याच्या देखण्या रूपाला शरीराला भुलून याला सर्वस्व देऊन बसले . पण नंतर समजलं हा फक्त मला बेडवरच खुश ठेवू शकतो . कायम याचा खिसा फाटलेलाचा आहे . १० वर्षात जो स्वतःच्या गरजेपुरता पैसा नाही कमवत तो काय मला आयुष्यभर सांभाळेल?

मला माहित आहे रोझी. आताच्या काळात फक्त प्रेमाने पोट नाही भरता येतं . जोडीला पैसा लागतोच. जो या राजीव शर्मा कडे चिक्कार आहे. मी गेले १५ वर्ष त्याच्या पर्सनल असिस्टंटच काम करतोय . त्याच्या उद्योगधंद्यातले बरेच बारकावे मी जवळून पाहिले आहेत. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे . म्हणून मी बऱ्याचदा त्याला एखादा प्रोजेक्ट मला लीड करू दे अशी विनंती केली पण त्या म्हाताऱ्याने माझं ऐकलं नाही . उलट मला म्हणाला , तुझ्यासारख्या विश्वासू माणसाला मी माझी महत्वाची जबाबदारी देणार आहे . मी खूप खुश होतो कदाचित एखादा ऑटोमोबाईल किंवा ई कॉमर्स प्रोजेक्ट असेल . पण ५ वर्ष वाट पाहिल्यानंतर या म्हाताऱ्याने काय केलं माहीत आहे ?
त्या कुत्रीचा ( डिंपल ) बॉडीगार्ड म्हणून मला चिकटवलं.
तिच्या सडक्या शरीराला प्रोटेक्ट करायचं. तेव्हाच मी ठरवलं या म्हाताऱ्याला आता माझ्या इतक्या वर्षाच्या ईमानदारीच फळ दिलं पाहिजे.

मोहित ड्राईव्ह करता करता काहीश्या रागानेच हात आपटत म्हणाला.

म्हणूनच मी हा प्लॅन तुझ्या मदतीने बनवला.
शेवटी माझी आणि तुझी गरज एकच आहे ना ?

सुरुवातीचे हे प्रसंग आठवून
दोघे जोरजोरात हसू लागले.
पण त्यांना माहित नव्हते पुढे काय वाढून ठेवले आहे.

५ मिनिटात जिमीने ब्लूटूथ वरून आपण लोटस हिल ला पोचत असल्याची बातमी डिंपलला दिली.

आणि इकडे रोझिला पण त्याने कॉल वर सेम निरोप दिला.

पुण्याला जाताना घाटाच्या विरूद्ध बाजूने एका जंगलाच्या रस्त्यातून बाहेर पडल्यावर लागणारा लोटस हिल तसा निर्जन पॉईंट.
सहसा या बाजूला कोणी फिरकत नसे.
कारण रात्री ७ वाजून गेले अंधार पडला तर या परिसरात जंगली प्राण्यांच्या वावर असायचा. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून हा भाग बंद केला होता.

संध्याकाळी ६:३० वाजता जिमी ची कार लोटस हिल च्या त्या टोकाला पोचली.
त्याच्यापासून ५ min च्या अंतरावर रोझी व मोहित आपली कार पार्क करून उतरले.

जिमीने त्या दोघांना आतापर्यंत सर्व व्यवस्थित असल्याची माहिती दिली शिवाय हे ही सांगितले की ३ तासाच्यांवर झालं आहे. झोपेच्या गोळ्यांनी डिंपल बेशुद्ध आहे. तिला जाग यायच्या आधी लवकर टाकून निघूया.
बोलता बोलता त्याने किल्ली फिरवून डिकी उघडली .
मोहित डिंपलला उचलायला आला पण गादी कार्पेट मध्ये लपेटलेलं पाहून डिंपलच आहे की नाही हे पाहू देण्याचा हट्ट करू लागला.
इकडे
डिंपलने ही जंगलाच्या थोड आडोशाला गाडी उभी केली आणि ती रोझी मोहितच्या गाडीजवळ जाऊन त्यांना पाहू लागली.
ब्लूटूथ च्या माध्यमातून डिंपल ला तिथे काय संवाद सुरू आहे ते व्यवस्थित ऐकू येत होते.

जिमी - ती डिंपलच आहे मोहित. तिला मी व्यवस्थित गुंडाळून ठेवले आहे आत. प्लीज आता वेळ वाया घालवू नको.

रोझी - ते आम्हाला कसं समजणार की तू डिंपल ला आणलं आहे की अंथरूण घेऊन आला आहेस. ते काय नाही बघू दे मला चेहरा. मोहित धर त्याला.

मोहितने आपल्या हाताच्या मजबूत पकडीने जिमिला धरून ठेवले.
ब्लूटूथ मधून जिमिला डिंपल चा आवाज आला......मला त्यांच्या पासून प्रोटेक्ट करायची जबाबदारी मी तुला दिली आहे जिमी...
जर का त्यांना समजलं मी जिवंत आणि सुखरूप आहे तर ते मला नाही सोडणार. मी मेले तर तुम्हा तिघांनाही अडकवायचा बंदोबस्त केलाच आहे . सो तुझं तू बघून घे. त्यांनी तुला जरी आता ढकललं तरी मला काय फरक नाही पडत ओके.

दोघेही ऐकत नसल्याचं पाहून जिमी इमोशनल होऊन रडायचं नाटक करू लागला.
ते पाहून रोझी शांतपणे म्हणाली...
काय चालू आहे तुझं मुर्खा? अजून ती मेली नाही आधीच काय रडायला लागलास . आता तुझं हे रड -गाणं उद्या मीडिया समोर दाखव .

जिमी - रोझी मी खरंच डिंपलच्या प्रेमात पडलो आहे गं... प्लीज तिला नको मारुस. मी तुम्हां दोघांना आयुष्यभर पैसे पुरवेल . पण प्लीज अस करू नका. मी तिला मरताना नाही पाहू शकत.
त्याचा ड्रामा पाहून मोहित ने जिमीच्या एक कानाखाली ठेवून दिली.
जिमी हट्ट करू लागला , त्या गादीला आपल्याकडे ओढू लागला . घट्ट पकडून ठेवू लागला. २-४ मिनिटं त्याची नाटकं पाहिल्यावर मोहितने त्याला ढकलले आणि गादी उचलून खोल दरीत फेकून दिली.
जिमी डिंपलच्या नावाने जोरजोरात किंचाळून ओरडू लागला हे पाहून रोझी मोहितची खात्री पटली की डिंपलच असावी.
इथे जिमीच्या जीवात जीव आला.
ठरल्याप्रमाणे मी आता पुण्याला पार्टी साठी जायला निघतो. उद्या हिचं जे काही आहे ते पोलिस बघून घेतील असं बोलून जिमी गाडीत बसायला निघाला . तोच मोहितने त्याला थांबवलं.

मोहित - रोझी या जिमिला शेवटचं बघून घे. कारण आता प्लॅन मध्ये नसलेली एक स्टेप आपण करणार आहोत.
रोझी - मोहित काय करतोयस? याला तर मारायचं आहेच पण आता इतक्यात?
डिंपलची संपत्ती जेव्हा याच्या ताब्यात येईल तेव्हा याला पण असच कुठेतरी फेकून देऊ ना.

रोझी बोलत असतानाच मोहितने आपली पिस्तूल काढली आणि जिमीच्या कपाळावर लावली.

' माझं ऐक जरा मोहित , याला आता मारून आपल्याला काय उपयोग आहे ? रोझी पिस्तूल त्याच्या हातून सोडवायला गेली , पण मोहित ने तिच्या हाताला हिसका देऊन ढकलले.
मोहितच्या मजबूत हाताच्या धक्क्याने
रोझी जरा खालीच पडली.
इकडे जिमी घामामूम झाला होता. प्रत्यक्ष मरण दिसत होत त्याला. कुठूनतरी येऊन डिंपलने हल्ला करावा असं वाटत होतं त्याला.
पण ती आली तर मोहित specially तिला सोडणार नाही. शेवटी त्या दोघांना तिचा मृत्यू हवा होता.

विचार करत असतानाच एकापाठोपाठ १...२....३ पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा आवाज आला.

क्रमशः
0