Login

डबलक्रॉस भाग १२ ( अंतिम)

Double Cross
त्या निर्जन पॉईंट वर एका पाठोपाठ एक गोळ्या झाडल्याचा आवाज आला सोबत मोहितचं ते राक्षसी हसणं
...घुमणारा आवाज काहीसा भयानकच होता.
जिमी भानावर आला. त्याला कळून चुकलं की मोहितच्या गोळीने रोझीच्या कपाळाचा वेध घेतला आहे . पण का ? रोझीच का ? ती तर मोहितच्या प्लॅनमध्येच सहभागी होती ना ? तिच्याकडून काही चुकीच झालं असेल का की या राक्षसाने मुद्दाम मारली ?
कपाळाच्या मध्यभागी लागलेल्या एकाच गोळीने रोझीच्या त्या सुंदर चेहऱ्याचे २ तुकडे केले होते. रक्तबंबाळ अवस्थेत तिचं धड आणि मुंडकं तडफडत होतं. जीव जाता जाता देखील तिचे डोळे अविश्र्वासाने मोहितकडे पाहत होते. शेवटीं मिनिटभराने त्या मुंडक्याचे तडफडणे थांबले आणि मोहितने जिमीच्या खांद्यावर हात ठेवला.

मोहित.. झाली ती शांत कायमची.
हे sssss काssss य तू असा थंडगार का पडला आहेसsssss?
घाबरsss लास....? माझं हे रोजचंच काम आहे . होईल तुला सवय हळूहळू. DS group's मध्ये आलास ना तू आता ..कळेल माझे कारनामे sss.

जिमी भेदरलेल्या अवस्थेत..गाडीच्या दिशेने जायला निघाला तेवढ्यात त्याच्या मानेवर आणि डोक्यावर जोरदार पहाडी हाताचा फटका पडला. तडफडत तो खाली कोसळला . त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरू लागली किलकिले डोळे करून तो मोहितकडे पाहून काहीतरी बोलणार तेवढ्यात मोहित म्हणाला....
घाबरू नकोस तुला मारायला अजून भरपूर वेळ आहे. तुझं मरण माझ्या हातून नाही तर दुसऱ्याच्या हातून होणार आहे . सध्यातरी तू बेशुद्ध होणं गरजेचं आहे. असं म्हणत मोहितने लेदरच्या बुटांची एक जोरदार लाथ जिमीच्या तोंडावर मारली आणि जिमी बेशुद्ध पडला.

दूरवर डिंपल ही सर्व दृश्य पाहत होती. मोहितच्या या पराक्रमाने डिम्पलसुद्धा हादरली होती. गाडीच्या पाठून पळत ती एका झाडाच्या आडोशाला लपली.

इकडे मोहितने जिमिला तसंच उचलून गाडीत टाकलं आणि सुसाट वेगात गाडी पळवत निघून गेला.

डिंपल मोहितचा पाठलाग करू शकली नाही. मात्र जिमी कडे असलेला ब्लूटूथ तिला त्यांची दिशा दाखवत होता.
पहिल्यांदाच डिंपल ला जिमीची काळजी वाटू लागली पण मग तिला आठवलं की कसं त्याने तिच्या ज्यूस मध्ये झोपेच्या गोळ्या टाकून मारायचा प्रयत्न केला होता. तिला यावेळी तिच्या वडिलांची खूप गरज होती पण ते सहा महिन्यांपूर्वी कॅनडाला बिझिनेस संदर्भात गेले होते.
शेवटी मनाशी काहीतरी ठरवुन डिंपल तिथून निघून गेली.

इथे साधारण दोन तासांनी जिमीची हालचाल सुरू झाली. त्याचं डोकं आणि मान जबरदस्त ठणकत होतं.
अर्धवट डोळे उघडून त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याचा लक्षात आलं की त्याला कुठल्यातरी एका वेअरहाऊस मधे मोडक्या तोडक्या चेअर वर मजबूत साखळदंडाने बांधलं आहे.
आजुबाजूला कोणी दिसत नसलं तरी माणसांच्या हालचाली जाणवत आहेत.
ब्लूटूथ वर त्याने एक दोन वेळा डिंपलला आवाज दिला पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. शेवटी तो डोळे बंद करुन बेशुद्ध असल्याचं सोंग घेऊ लागला.

१५-२० मिनिटांनी २ गुंड जिमीच्या जवळ आलें .
तोंडावर फटके मारत जिमिला उठवू लागले.
जिमीने हळूहळू हालचाल करत डोळे उघडले.
त्या गुंडाना तो सोडून द्यायची विनवणी करू लागला तेवढ्यात मोहित आला.

मोहित - चल तयार रहा तुझ्या डिम्पलकडे जायला.
बॉस येतायत तुला वर पाठवायला.

अचानक डोळ्यांवर गाडीच्या हेड लाइट्स चा प्रखर उजेड आला आणि एक गाडी आत शिरली.

जसजशी ती व्यक्ती पुढे येऊ लागली तसा जिमी ला धक्का बसू लागला.

एकदम गोंधळून तो ओरडला....MR. राजीव शर्मा sssss आय मीन डॅडी ssss ? तुम्ही sss?
आय कान्ट अंडरस्टँड धिस.
तुम्ही आहात या सर्व खुनाच्या पाठी?
कसं शक्य आहे पण ?
तुमचाच पैसा तुमच्याच मुलीला मारून मिळवताय?
मूर्ख कुठचे...ss

Mr. शर्मा , मोहित आणि इतर साथीदार जिमीच्या या बोलण्यावर खो खो हसू लागले.

ऑल वर्क डन?
इस देएर एनी इश्यू? मोहितकडे वळत शर्मा म्हणाले.

येस सर, प्लॅन वर्क्स परफेक्टली. आय किल रोझी अँड डिंपल. नाव जिमीsज टर्न . प्लीज टेक धिस गन अँड शुट. - मोहित म्हणाला.

थांब मोहित. आधी माझ्या या भिकार जावयाला कळू तरी दे.
काहीसे हसत शर्मा म्हणाले.
अरे साधं नोकर म्हणून भरती करताना आम्ही डिटेक्टिव लावून बॅकग्राऊंड तपासतो तिथे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला मी काहीच चौकशी न करता जावई करून घेईलच कसा?
त्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या पोरीची प्रॉपर्टी ती मेली तरी तुझ्यासारख्या भिकाऱ्याला कधीच मिळणार नाही हे त्या मूर्ख रोझीच्या लक्षात नाही आलं.
अर्थात हे सर्व माझ्याच प्लॅन चा भाग होता. म्हणून लायकी नसताना तुला माझा जावई करून घ्यायला लागलं.

माझ्या पोरीच्या खुनात अडकवायला मला एक बकरा हवाच होता.
म्हणून मोहितच्या मदतीने रोझी आणि तिच्या फडतूस बॉयफ्रेंड ला जाळ्यात अडकवायचा प्लॅन तयार झाला.

जिमी अजूनही न समजल्याचे भाव आणून म्हणाला...अरे पण मूर्ख म्हाताऱ्या...तुझाच पैसा तुझ्याच मुलीला मारून कसा मिळेल तुला?
जे काय आहे ते तुझंच तर आहे ना.मग पोरीला मारायची काय गरज?

शर्मा - कसं आहे ना जिमी ..पैसा फार महत्वाचा. हे तुझ्या सारख्या भिकाऱ्याला वेगळं सांगायची गरज नाही....
याचं पैशाने हे सर्व घडवून आणलं बघं.
तुला वाटलं हा प्लान रोझीच्या आणि रोझिला वाटलं मोहितच्या इशाऱ्यावर चालत आहे .

पण खरा मास्टरमाईंड मीच.

मोहित माझा महत्वाचा माणूस ...१५ वर्ष माझ्यासाठी काम करतोय.. एवढा मोठा
Business नुसता असाच नाही चालत. त्यालापण पैसा पुरवावा लागतो आणि
त्यासाठी एका मजबूत बिझनेस बॅकग्राऊंड ची गरज आहे असं बोलून शर्माने आपल्या खिशातून एक पांढरी पावडर काढली.
हे कोकेन, गांजा, हेरॉईन, ब्राऊन शुगर..हा आहे मेन बिझिनेस.

खरा पैसा मिळतो ना तो यातूनच बरं का . पण माझी खूप मोठी कॉन्साएन्मेंट बँकॉक मध्ये पकडली गेली रे..आणि बरंच नुकसान झालं .
सप्लाय साठी माझ्यावर भरपूर प्रेशर आलं.
इंटरनॅशनल धंद्यामधे हे नुकसान वैगेरे कोणी ऐकत नाही. पैसा पुरवला की त्याला माल सप्लाय करावाच लागतो.
इतका मोठा पैसा रिटर्न करणे नाहीतर पुन्हा माल सप्लाय करणे या शिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

पण इकडे माझी पिग गर्ल अप्सरा होऊन बसली आणि फुकटचा पैसा चॅरिटी मधे देत बसली. शिवाय माझ्या उद्योगधंद्यांमध्ये विनाकारण हस्तक्षेप करू लागली. जे माझ्या दृष्टीने धोक्याचे होते. म्हणून मोहितला तिच्यावर नजर ठेवायला बॉडीगॉड आहे अस सांगून कामाला लावून दिलं.
शेवटी मोहितने या प्लॅनसाठी ऑफिसमध्ये असणारी रोझी आणि तिच्या भिकार बॉयफ्रेंड ला हेरल आणि सी द रिझल्ट...
तिला मारून तिची प्रॉपर्टी आणि तिच्या नावे असणारे इन्शुरन्स चे कोट्यवधी रुपये मला मिळणार आहेत मग तुझी गरजच काय आम्हाला ?
मोहितने रोझिला मी बनवलेला प्लॅन त्याचा आहे अस सांगून जाळ्यात ओढले आणि तिने तुला पण करोडो रुपयांची भुरळ घातली.
रोझीचा तसाही काही उपयोग नव्हता पण तिला जिवंत ठेवणं धोक्याचं होतं म्हणून डिंपलसोबत तिचाही बंदोबस्त करावा लागला.
आता तुलाही मारून आत्महत्या दाखवू म्हणजे डिंपलच्या मृत्यूच्या धक्केने तू ही गेलास.
आणि राहिली रोझी तर तिच्याबद्दल विचारायला तुझ्याशिवाय साधं कुत्रं ही येणार नाही.

ऑल विल बी हॅप्पी एंडिंग. गुड बाय जावई.
असे म्हणून शर्माने बंदूक जिमीवर ताणली.

आधी हळूहळू मग जिमी मोठ्याने हसू लागला.

काय झालं साल्या तुला हसायला?

जिमी - हसू नको तर काय करू .
अरे तू तर स्मार्ट आहेसच पण तुझी पोरगी डिंपल तर तुझ्यापेक्षाही स्मार्ट निघाली.
तुझ्यासारख्या मास्टरमाईंड ला तुझ्या पोरीने डबलक्रॉस केले.

कदाचित तुम्हाला माहीत नाही. डिंपलला हे प्लॅनिंग समजले ते तिच्या रूममध्ये लावलेल्या सिक्रेट कॅमेरामुळे.
जे की ती इटलीला गेली असताना मी आणि रोझीने तिच्या बेडरूममध्ये असताना केले होते.
म्हणून शेवटच्या क्षणी तिने मला फोर्स करून प्लॅन उलटवायला सांगितला आणि मी गाडीच्या डिकीत जाड गादी मध्ये उश्या आणि कार्पेट गुंडाळून ठेवले होते.
मूर्ख मोहितने डिंपल समजून ही गादी फेकून दिली.

माझी डिंपल जिवंत आहे सुखरूप आहे. आतापर्यंत तिने तुमचे कारनामे ऐकले असतील . लोकेशन पण ट्रेस केले असेल. माझ्या खिशात तिने ब्लूटूथ ठेवले आहे जे की तिला कनेक्ट आहे. आता तुम्ही माझं ब्लूटूथ जरी फेकलं किंवा मला मारलं तरी काय फरक नाही पडत.

जिमीचं स्पष्टीकरण ऐकून शर्मा चिडले..
यू लुझ्झर्स sssss म्हणत आधी इतर २ साथीदारांवर गोळी झाडलीं.
मग मोहितला शिव्या देत ते बंदूक चालवणार तितक्यात मोहितनेच शर्मावर फायरिंग केली. आणि जिमिला मारणार तितक्यात
खाली कोसळता कोसळता शर्माने बेसावध मोहितवर जवळून २ गोळ्या झाडल्या.

अशाप्रकारे सर्व काही शांत झाले.
जिमी ला साखळदंड सोडवता येईना. तो बराच वेळ आपल्या सुटकेची वाट बघत बसला.

शेवटी त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं की तो एका हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मध्ये ऍडमिट आहे.
इतक्यात दरवाजा उघडला आणि डिंपल आत आली.
जिमी - सॉरी मॅम...माझी लायकी नाही तुमचा पती म्हणून रहायची. तुम्ही मला तुरुंगात टाका किंवा काहीही शिक्षा द्या मला आता काही फरक नाही पडत.
डिंपल - शूssssss आता काहीही नको बोलूस जिमी मला सर्व कळलं आहे. त्या दिवशी मी त्या ब्लूटूथ device मुळे सर्व ऐकलं आहे. त्याची रेकॉर्डिंग घेऊन पोलिसांच्या मदतीने तुला इथे आणलं मी. डॅडी आता नाहीत आपल्यात पण अजूनही मी त्यांच्या अशा वागणुकीने शॉक मध्ये आहे.
पोलिसांनी प्रॉपर्टीचे व्यवहार ऑडिटिंग साठी दिले आहेत.

आता २ दिवस झाले त्या घटनेला. शेवटी आज डोळे उघडले तू.

जिमी - तुला माझ्यावर विश्वास बसला तू माझा जीव वाचवला हेच खूप झालं. मला आता काही नको. मी इथून खूप दूर निघून जाईल.

जिमी तुला शिक्षा तर मी देणारच आहे....-डिंपल.
जिमी - मान्य आहे मला .

डिंपल - तुला कायम माझी साथ द्यायची आहे. हसत हसत डिंपल ने जिमीच्या कपाळावर किस केले. तसा जिमीने ही तिचा हात हलकेच दाबून प्रतिसाद दिला.

समाप्त.
0

🎭 Series Post

View all