दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 2
काही वेळाने नाश्ता आला. पिहूला बोलून बोलून कंटाळलेल्या स्वाती व तिची बहीण हर्षाने नाश्ता केला. स्वातीची मुलगी, मिंटीही रडून रडून थकली अन झोपी गेली. सर्व आपापल्या जागी गप गुमान बाहेरील नैसर्गिक दृश्य पाहण्यात रमले. पिहूनेही ती रमनीय दृश्य टिपण्यासाठी तिचा आयफोन काढला. आयफोन पाहून हर्षा व स्वातीच्या आत एक वेगळीच आग लागली.
"वॉव, आयफोन सेव्हन्टीन." हर्षाच्या किशोर वयीन मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"फक्त पैशांनी श्रीमंत असून काय होतं. माणसाने मनानेही श्रीमंत असायला हवं." स्वाती बोलली.
"हो हो, अगदी बरोबर बोललीस तु. खरी श्रीमंती माणुसकी दाखवण्यात असते. जी या बाईकडे मुळीच नाही आहे." हर्षा पिहूला ऐकू जाईल अशा आवाजात बोलली, "कोणास ठाऊक आयफोन खरा आहे कि खोटा कि एखाद्या यार ने दिलेला."
पिहू तरीही शांतच. तिच्या शांतपणाने त्यांना आणखीच तापवलं. त्यांनी पिहूचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकला. इतक्यातच त्या गप्प बसल्या नाही त्यांनी ओळखीतील एका पत्रकारालाही तो व्हिडिओ पाठवला. पुढे त्याने काय केलं असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. पिहू थिविमला उतरली. टॅक्सी करून ती अश्वेम बिच वरील तिची बुकिंग असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. फ्रेश होऊन आली नाही तसे वीस ते पंचवीस मिस कॉल तिच्या मोबाईलवर. मोबाईल परत वाजला.
"हॅल्लो."
"हॅल्लो."
"कुठे आहेस तु? तुला माहित आहे तुझ्याबद्दल सोशल मीडियावर काय काय येत आहे? तुझा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे." पलीकडून तिचा बॉस बोलला.
"मी हॅन्डल करेल सगळं पण सुट्ट्या संपल्यावर." पिहू
" तेव्हा पर्यंत बरीच उठाठेव होऊन जाईल तुझ्याबद्दल सोशल मीडियावर. " बॉस चिडला.
" तितकाच तुम्हाला फायदा होणार आहे. आता मी मोबाईल स्विच ऑफ करून निवांत वेळ घालवणार आहे. गूड नाईट. " इतके बोलून पिहुने मोबाईल स्विच ऑफ करून टेबलवर ठेवून दिला.
वयाच्या पस्तीशीत असलेली पिहू एका नावाजलेल्या जाहिरात कंपनी, कस्तुरीची मार्केटिंग हेड. कमालीची चतुर, चणाक्ष, धैर्यशील, शांत, सुस्वभावी, मदतीला धावणारी मात्र स्वतःचा हक्क जपणारी, आपलं ध्येय्य डोळ्यांसमोर ठेवून पाऊल उचलणारी, कितीतरी तरुणांना नकार देऊन त्यांचा हृदयभंग केलेली, करियर प्राधान्य स्त्री. नेहमी विमानाने प्रवास करणारी , काहीतरी वेगळं ही करून पहावे या इराद्याने तिने तिचा कम्फर्ट लेव्हल सोडून यावेळी चक्क रेल्वेने गोव्याला जायची योजना आखली जी अतिच वेगळा अनुभव देऊन गेली. तीन दिवस तीन रात्र अश्वेम बीचवर योगा, ध्यान, स्विमिंग व सर्फीन्ग करून तरो ताजा झाली.
बरोबर पुणे जायच्या दिवशी एअरपोर्टवर पोहोचल्यावरच तिने तिचा सर्वांसाठी असलेला मोबाईल सुरू केला. तसा परत मोबाईल वाजू लागला. आईचे नाव मोबाईल स्क्रीनवर ब्लिंक होऊ लागले. उचलू की नाही उचलू उचलू की नाही उचलु असे करता करता फोन कटला आणि तिने सुटकेचा श्वास भरला. बॉसचा फोन आला,
"हॅल्लो."
"काळजी करू नका, फ्लाईटने येत आहे तेही बिझनेस क्लासचं तिकीट आहे." पिहूने त्यांना सांगितले.
" गुड आल्यावर रिम्बर्स करून घेशील. " बॉस.
"थँक्यू." पिहू बोलली तसा फोन कट झाला.
पिहू विमानाच्या बिझनेस क्लास मध्ये गेली तशी तिच्या नजरेस परत एक तरुणी एक दीड वर्षाच्या मुलाला सांभाळताना दिसली. तिने तोंडातल्या तोंडात शीट असा उच्चार काढला. तिला वाटले परत तोच घोर होणार आहे की काय?
"मॅम ही तुमची सीट." एअर होस्टेस ने पिहूला तिची सीट दाखवली. शेजारच्या सीटवर एक मध्यम वयीन, लॅपटॉपवर कामात गुंतलेला पुरुष पाहून तिला जरा बरे वाटले. म्हणजे कमीत कमी परतीच्या प्रवासात रेल्वेत झाला तसा गोंधळ होणार नाही याची तिला खात्री झाली. तो पुरुष शेयर मार्केट बद्दल गहन अध्ययन करत असतांना एअर हॉस्टेसने त्याला टि कॉफी विचारले. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही. फक्त बोटाने नाही असा इशारा केला. मग ती एअर होस्टेस पिहू कडे वळली.
"कॉफी, लेस शुगर." पिहू बोलली.
तिचा आवाज ऐकून तो क्षणभर थबकला.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा