दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 28
पिहू पुन्हा मन लावून तिचे काम करू लागली. मुंबई हेड ऑफिसच्या जनरल मॅनेजर पदी तिची नेमणूक करण्याची घोषणा झाली. तिला तिची लक्ष प्राप्ती लवकरच होणार म्हणून आता कोणतीही चूक होता कामा नये. तिच्यावर जबाबदारी पूर्वक काम करण्याचे आणखीच दडपण आले. ऑफिस कामापुढे तिने फक्त तेजसलाच नाही तर तिच्या तब्येतीला सुद्धा दुय्यम स्थान दिले. तेजसने कॉल केला असता त्याला तिने ती काही दिवस त्याला वेळ देऊ शकणार नाही असे स्पष्ट सांगून दिले. एक दिवस दोन दिवस तीन दिवस करता करता पूर्ण आठवडा निघून गेला पण पिहुने त्याला पलटून फोन किंवा मेसेज केला नाही. एकटं वाटू लागल्यामुळे बऱ्याच दिवसांनी तो आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेला.
" एका महत्त्वाकांक्षी महिलेवर प्रेम करणाचा परिणाम हाच होईल. " तेजसला नाराज बघून त्याचा एक मित्र त्याला म्हणाला, " सो चील, तुला यादरम्यान आणखी कोणी हवं असेल तर सांग. आपल्या बऱ्याच मैत्रिणी वन नाईट स्टॅन्ड साठी तयार होतील तुझ्या सोबत. "
तेजस ने एक तीक्ष्ण कटाक्ष त्याच्यावर टाकला.
" ठीक आहे भाऊ सरळ बोल ना की तू तुझ्या गर्लफ्रेंडचा भक्त आहेस." तो मित्र त्याला म्हणाला, " पण तुला काय माहित तुझ्या पाठीमागे ती तिकडे काय करत असेल. म्हणजे कामाच्या आड आणखी काही करत असेल तर? "
" तुझी घाणेरडी थिंकिंग तुझ्याजवळ ठेव. " तेजस त्याची कॉलर पकडून त्याला बोलला.
" अरे वकील आहेस तू. तुमच्या जवळ तर रोजच्या अशा केसेस येतात." पण त्याला चांगली चढलेली तो काही गप बसेना. शेवटी तेजसच्या वाढदिवस असलेल्या मित्रांनी मध्ये पडून तेजसला समजावले,
" हे पहा तेजस इतकं भडकून काही होणार नाही. आपण लोकांची तोंड बंद करू शकत नाही. तुला ती इतकी आवडते तर लग्न का करत नाही तुम्ही? म्हणजे पहा कितीही व्यस्त असले तरीही शेवटी रात्री एकमेकांना भेटणार, एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे याची माहिती राहणार. "
तेजसला त्याचे म्हणणे पटले. तेजसने पिहूला लग्नासाठी प्रपोज करायची योजना आखली. लवकरच तेजसचा वाढदिवस येणार होता. पिहू आणि तो जवळजवळ एक वर्षापासून एकमेकांसोबत अगदी नवरा बायको सारखी राहत आलेले. ती त्याचा वाढदिवस विसरणार नाहीच. याची त्याला हमी होती. म्हणून त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिलाच सरप्राईज द्यायचे ठरवले. ललितला ही त्याचीही योजना पसंतीस आली. त्याने व पिहूच्या मित्रमंडळाने काहीही करून पिहूला त्यादिवशी तेजस समोर उपस्थित करायचेच आहे हे पक्के केले. कारण त्यांना माहित होते पिहू तिच्या कामाला अतिच प्राधान्य देते.
तिकडे शशीला ज्याची भीती होती तेच झाले. रिद्धी व त्याच्या आई मधील वाद विकोपाला जाऊन त्याची आई सगळं घर, त्यांचं बाळ रिद्धीवर टाकून आपल्या गावाला निघून गेली. त्याने रिद्धीच्या आईला समजावून उमजवून परत घरी आणले मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांना जेव्हाही काही काम असेल त्या बाहेर जात जातील तसेच ज्या दिवशी रिद्धीने परत त्यांचा अपमान केला, त्यांना असं तसं काही बोललं त्या तिला व बाळाला एकटे सोडून निघून जातील. म्हणून तो बाळाला सांभाळण्यासाठी बाईची शोधा शोध करू लागला.
दरम्यान कशी आहे, काय करतेस? वगैरे वगैरे मेसेज अनिताने पिहूच्या मनातील गोष्ट जाणून घेण्यासाठी तिला केले. तिने ती एका मीटिंगसाठी पुण्यात आली आहे असा रिप्लाय दिला. कामाला बाजूला ठेवून पिहुने तेजस कडे लक्ष द्यावे, सात दिवसांनी रविवारी असलेल्या त्याच्या वाढदिवसाला यावे या उद्देश्य प्राप्तीसाठी अनिता तिला भेटायला तिच्या फ्लॅटवर गेली. पिहू तिला चांगलीच थकल्यासारखी दिसली. तिने पिहूची विचारपूस केली असता समजून आले की पिहूला पोटाचा त्रास होत आहे.
" पिहू तू स्वतःला सिरीयसली कधी घेणार आहेस?" अनिता पिहू वर रागावली.
" इतकं काही गंभीर नाही आहे गं? " पिहूने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
" चेहरा पहा तुझा कसा काळा पडला आहे. जेवण केलेस की नाही सकाळपासून? " अनिताने तिला विचारले. तिने होकारार्थी मान हलवली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा