Login

DINK भाग 30

एका वेगळ्याच विचारसरणीची पिहू, प्रेमासाठी करेल का तिच्या तत्वाशी तडजोड
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 30

"तेजस तुमच्यात काही वादावादी तर झाली नाही ना?" ललितने तेजसला विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली.

" मागील काही दिवसांपासून हाय-हॅलो शिवाय काही बोललोच नाही आम्ही. ती तिच्या नवीन प्रोजेक्टमध्ये फार व्यस्त आहे. " तेजस उत्तरला.

" मग काय झालं असेल? का नाही आली ती? अजून किती वाट पाहायची ?" तेजसचे मित्र कुजबूज करू लागले.

तिकडे अनिता, अजित, जीजा, कुणाल यांचे चेहरे चिंतातुर झाले कारण जिच्यासाठी ते इथे आले होते तिचा अजूनही कुठे आता पता नव्हता. पिहूला पन्नास-साठ वेळा फोन करून झाला मात्र एकदाही तिने फोनला काही उत्तर दिले नाही. मग त्यांनी तिच्या ऑफिस सहकाऱ्यांना कॉल लावणे सुरू केले. पण काही उपयोग झाला नाही. पिहू ऑफिस मधून दुपारीच एका मीटिंगसाठी बाहेर गेली ते पुन्हा ऑफिसला परतली नाही. त्यामुळे ती कुठे असेल त्यांना सांगता येणार नाही असे उत्तर त्यांना मिळाले.

रात्रीचे नऊ वाजून गेले. कुजबुज वाढली. तेजसच्या काही मित्रांनी त्यांच्या फॅमिलीलाही सोबत आणले होते. त्यात समाविष्ट लहान मुलांना आता बोर व्हायला लागले. अर्थातच मोठ्यांची ही तीच गत होती फक्त ते स्पष्टपणे असं बोलू शकत नव्हते.

" पिहूच्या फ्लॅटवर जायचे का? " ललितने तेजसला विचारले.

" नको राहू दे. मी बघेल नंतर. " तेजस उत्तरला.

"मग आपण केक कापून घ्यावा का. पिहूसाठी सर्वांना असे तात्कळत ठेवणे योग्य नाही." ललित त्याला म्हणाला.

तेजसने होकारार्थी मान हलवली. तो चेहऱ्यावर हसू आणून सर्वांसमोर आला. मात्र त्याच्या हृदयातील निराशा त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. शेवटी त्याने केक कापून सर्वांना फ्री केले. जीजाला जेवणाचा एक घास घेणे कठीण झाले. ती रडायची तेवढी बाकी होती.

"पिहू अशी का वागली? तिला नकारच द्यायचा असेल तर इथे येऊ तसे तेजसला सांगायला हवे होते." कुणाल म्हणाला.

"अरे तिला नक्कीच काहीतरी महत्वाचे काम आले असेल नाहीतर मुद्दाम ती असं तेजसच्या भावनांशी नाही खेळणार." अनिता त्याला बोलली.

"अगं पण कमीत कमी आपल्यासाठी तिने इथे यायला हवे होते. तिला माहित होते ना आपण सर्व इथे राहणार." जिजा तिला म्हणाली.

"हो गं, पण आपल्या इतक्या वर्षांच्या ओळखी ती वागली का कधी अशी? त्यामुळे समजून घ्या." अनिता गळ्याशी आलेला आवंढा गिळत तिला म्हणाली. अजितने अनिताच्या खांद्याभोवती हात ठेवून तिचे सांत्वन केले.

त्यांना त्रस्त पाहून तेजस त्यांच्याजवळ जाऊन समजावणीच्या स्वरात त्यांना म्हणाला,

" हे सर्व तिच्या व माझ्यातील बाब आहे तुम्ही कोणीच स्वतःला दोष देऊ नका. प्लीज माझ्यासाठी तरी जेवण करून जा. मागील एक वर्षात तुम्ही फक्त तिचेच मित्र मैत्रिणी राहिले नाही. माझेही जीवाभावाचे सोबती झाले आहात. तेव्हा आपल्या या मित्राचे म्हणणे नक्की ऐका. बाकी उद्या तिला भेटून तुमच्या सर्वांच्या वाट्याचा चांगला चोप देतो मी तिला पाहा. "

जिजाने अश्रू पुसत होकारार्थी मान हलवली. जेवण करून रात्री साडेदहा अकराच्या सुमारास सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. ललित ही काही काळ त्याच्यासोबत बसून मग मिशाला घेऊन आपल्या फ्लॅटवर परतला. तेजसला आज पहिल्यांदा पिहूचा खूप राग आला. या आधीही पिहूने त्याच्यावर तिच्या कामाला प्राधान्य दिले होते मात्र आज त्याने खास तिच्यासाठी सर्वांना बोलावले. कधी स्वतःचा वाढदिवस गाजावाजात साजरा न करणाऱ्या माणसाने आज सर्वांना त्याच्यावर हसण्याची संधी दिली असे झाले. खरंच त्याची निवड चुकली का? त्याला प्रश्न पडला.

उद्या हे पिहूच्या आवडीचे पेंत हाऊस, तिची ओढ लावणारे हे शहर, हा देश सगळं सोडून कुठेतरी दूर तिची आठवण त्रास देणार नाही अशा ठिकाणी निघून जायचे. या विचारातच व्हिस्कीचा एक एक घोट तिथेच स्विमिंगपूलच्या बाजूला तो झोपी गेला.

पण पिहू? ती का आली नसेल? कि आणखी कोणत्या संकटात सापडली असेल ती. जाणून घेण्यासाठी वाचत राहा डबल इनकम नो किड्स.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all