Login

DINK भाग 31

पिहूचा त्रास समजून घेईल का तेजस? तिच्या या परिस्थितीला तीच जबाबदार आहे का?
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 31

पहाटेच्या गारेगार वाऱ्याने तेजसला जाग आली. तो उठून आत त्याच्या बेडवर पसार झाला. दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मोबाईल त्याचा मोबाईल वाजू लागला. आधी बराच काय वाजला होता पण त्याने उचलला नाही. मात्र मी त्याने पिहूच्या कॉल साठी सेट केलेली रिंग वाजली म्हणून वेळ न दवडता तो लगेच कॉल रिसीव करणार तोच त्याचा इगो त्याला म्हणाला,

"थोडं तरसु दे तिला ही तुझ्यासाठी." त्याने फोन उचलला नाही. काही वेळाने अनिताचा फोन आला. त्याला समजले नक्कीच ती पिऊ सोबत असेल म्हणून तिनेच फोन लावायला सांगितला असेल. त्याने अनिताचाही कॉल रिसिव्ह केला नाही. काही मिनिटांनी आणि त्याचा व्हॉइस मेसेज आला. तिला आपल्या मैत्रिणीसाठी काय बहाना द्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने व्हॉइस मेसेज उघडून बघितला,

"हॅल्लो तेजस. मला माहित आहे तू पिहू वर नाराज आहेस. तिने तुला जाणून-बुजून त्रास दिला नाही. तिची तब्येत खराब झाल्यामुळे तिला काल संध्याकाळी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे."

व्हॉइस कॉल ऐकून होताच त्याने अनिताला फोन लावून पिहू भरती असलेल्या दवाखान्याचा पत्ता मागितला व तिला भेटण्यासाठी त्यांनी धाव घेतली.

इकडे दवाखान्यात पिहू अनिताला रागवू लागली.

" कशालाच त्याला फोन करून हे सर्व सांगितले? "

" कशाला म्हणजे तुझ्याबद्दल त्याला गैरसमज झाला असेल तो दूर करायला नको? " अनिताने पिहूला विचारले.

" अगं कमीत कमी या नात्यातून निघाली तरी असती मी. मला ना कंटाळा आला आहे त्याच्यासोबत गुलगुलु बोलायचा, फिरायला जायचा. असं बंदिस्त वाटायला लागलं आहे मला. " पिहूने तिच्याजवळ आपले मन मोकळे केले.

" अति विचार करत आहेस तू. बघ त्यामुळे काय हालत करून घेतली आहेस स्वतःची." अनिता पिहूला रागवू लागली, " डॉक्टर म्हणाल्या अजूनही वेळ आहे. लवकरात लवकर बेबी प्लॅनिंग करून घे. तुझ्या सर्व शारीरिक मानसिक समस्या दूर होऊन जातील."

" मेनोपॉज सुरू होण्याच्या काळात बेबी प्लॅनिंगचे बोलत आहेस तू. "

" अग तेच म्हणत आहे आणखी दोन-तीन वर्षात पाळी पूर्णपणे अनियंत्रित होऊन जाईल. गर्भधारणेचे चान्सेस 99% कमी होऊन जातील. फक्त एक टक्का संधी असेल तुझ्याजवळ गर्भ ठेवण्याची. त्यातही किती कॉम्प्लिकेशन्स होतील. " अनिताने, पिहूचा हात पकडून तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

"इतक्या वर्षांपासून मैत्रिणी आहोत आपण. तुला माहित आहे ना मला बाळ नाही ठेवायचे आहे. मला स्वतःचेच काय मला इतर कोणाचेही मूल नको आहे." पिहू दुसरीकडे तोंड फिरवून तिला म्हणाली.

" काय हट्ट आहे हा? अगं किती नाजूक, किती गोड, सुंदर असतात मुलं. अशी कशी तू, जगात पहिली व्यक्ती बघितली मी जिला लहान मुलं आवडत नाहीत. " अनिता त्राग्याने बोलली.

" या जगात सर्वांना आपापल्या मर्जीने जगायचा हक्क आहे. तु घरी जा, तुझी लहान व मोठी मुलं तुझी वाट पाहत असतील. " पिहू म्हणाली.

" ठीक आहे. पण तुझ्या हातात स्वतःचे आयुष्य सावरण्याची एक संधी आहे, साथ देणारी व्यक्ती ही मिळाली आहे. तेव्हा विचार करून पाऊल उचल. स्वतःची काळजी घे इतकेच म्हणेल मी." अनिता, भिंतीला टेकून बेडवर बसलेल्या पिहूला म्हणाली, " संधीचं सोनं कर. त्या माणसाला दूर ढकलू नकोस नाहीतर मरेपर्यंत पस्तावशील."

पिहूने फक्त मान डोलवली. झाले असे होते की पिहू इतरांना दाखवत नसली तरीही आता तिच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे म्हणावे कि वाढत्या वयामुळे कि एकटेपणामुळे तिच्या हार्मोन्सचा बॅलन्स चांगलाच बिघडला. आधीच तिची पचनशक्ती नाजूक त्यात आणखी भर म्हणून तिला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊन तिचे मूड स्विंग वाढले. तेजस सोबत संबंध ठेवतांना ओटीपोट दुखू लागले म्हणून तिला तोही नकोसा झाला. त्याला सांगून तिच्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे म्हणून तिने तशी तसदीही घेतली नाही. त्याच्या वाढदिवसाला मात्र एका मैत्रिणीच्या नात्याने ती जाणार होती व काही दिवसांनी त्याला आपलं पुढे काही होऊ शकत नाही असे सांगून त्याच्याशी संबंध तोडणार होती.

मात्र दुपारी मीटिंग संपवून ती तिच्या लहान भावाला नचिकेतला भेटायला गेली असता तिचे आधीच दुखत असलेले पोट आणखीच दुखू लागले. तिच्या चेहऱ्यावरिल त्रासदायक हावभाव पाहून तो बळजबरीने तिला दवाखान्यात घेऊन गेला. तिथे डॉक्टर समोरच तिच्या पोटात जोरात कळ उठली.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all