दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 33
पिहू डॉक्टरला काही बोलणार तोच तेजस मधे पडला.
"बरं बरं चालेल. आपण सध्या हा विषय बाजूला ठेऊ." मग डॉक्टर कडे वळून त्यांना तो म्हणाला, "मॅम प्लीज तुम्ही हिला चेक करून घ्या."
"बरं बरं चालेल. आपण सध्या हा विषय बाजूला ठेऊ." मग डॉक्टर कडे वळून त्यांना तो म्हणाला, "मॅम प्लीज तुम्ही हिला चेक करून घ्या."
डॉक्टरने त्याचा इशारा समजून तिला चेक केले. तिच्या सर्व रीडिंग नोट पेपरवर लिहून त्या निघून गेल्या.
"सांग तुझ्यासाठी काय ऑर्डर करू खायला?" तेजसने पिहुचा हात हातात घेऊन तिला विचारले.
पिहूला तेजसची हीच गोष्ट फार आवडलेली. तो तिचा राग क्षणात शांत करू शकण्याची ताकद ठेवत होता. तिने तिचा हात त्याच्यासमोर केला. त्याला काही समजले नाही. ती लटक्या रागाने त्याला म्हणाली,
" ती अंगठी काय फक्त दाखवायलाच आणली का? घाल बोटात. "
"इथे?" तेजसने आश्चर्याने विचारले.
" मुहूर्त काढत बसशील तेव्हापर्यंत माझा विचार बदलणार नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही. " पिहू त्याला म्हणाली.
" नको बाबा इथेच बरं मग. " त्याने अंगठी काढून तिच्या बोटात घालून दिली. दोघे बराच वेळ एकमेकांकडे पाहत हसत होते.
पिहूचा पोटाचा त्रास कमी झाला. ती नक्कीच तिची काळजी घेईल असे आश्वासन डॉक्टरला देऊन तिने सुट्टी घेतली. डॉक्टरने पिहूला लिहून दिलेले डाएट फॉलो करावे म्हणून तेजस स्वतः ती काय खात आहे काय नाही याकडे लक्ष देऊ लागला. पिहूला परत मुंबईच्या ऑफिसला जॉईन झाली. तिला जनरल मॅनेजर पदाचे प्रमोशन मिळाले. तिच्यासाठी ही खूप महत्वाची पायरी होती. आता तिला कंपनीच्या डायरेक्टर फायनान्स पदाची आस लागली. दरम्यान सहा महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह संपल्यावर रीद्धीही ऑफिसला येऊ लागली. तिला पिहूला जनरल मॅनेजरच्या खुर्चीत बसलेले पाहून खूप त्रास झाला. एक प्रकारे तिचा जळफळाट झाला असे म्हटले तरी चालेल. पिहू समोर तिने तसे काहीच चेहऱ्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. ती पिहू समोर एका ट्रेनी मुलीला खूप अदवा तद्वा बोलली. इतकेच नाही तिने तिला मारण्यासाठी हातही वर केला. पिहूच्या लक्षात येताच ती खोकलली तशी ती थांबली व खुर्चीत बसून तोंडावर हात ठेवून रडू लागली. पिहूने ट्रेनि मुलीला समजावून आत काय घडले ते कुणालाच सांगायचे नाही अशी विनंती करून बाहेर पाठवले.
"रिद्धी ही काय हालत करून घेतली आहे स्वतःची?" पिहूने रिद्धीच्या खांद्यावर हात ठेवून तिला विचारले. रिद्धी आणखीच रडू लागली.
पिहू तिला टिशू पेपर देऊन तिच्या शांत होण्याची वाट पाहत तिच्या समोरील खुर्चीत बसून आपले काम करू लागली.
"थँक्यू." रिद्धीचे रडून आसू पुसून झाल्यावर ती पिहुला म्हणाली, " आजकाल खूप थकल्यासारखं होत आहे. घरी जाताच बाळाची रडा रडी सुरू होते."
"त्याला वाटत असेल की आई आपल्या सोबत दिवसभर का राहत नाही?" पिहू बोलली.
"हो ना, तू फक्त जन्मदे बाळाला, आम्ही बाळाला पाहू असं म्हणणाऱ्या आई व सासू दोघीही मला एकटं टाकून निघून गेल्या. फक्त काही दिवस माझी चिडचिड त्या समजू शकल्या नाही आणि मीही त्यांना सहन करण्याच्या पलीकडे गेलेली. खूप तुटल्यासारखं वाटतं बाळाला बाईजवळ एकटे सोडून येतांना, त्याचा रडणारा आवाज दिवसभर कानात घुमत असतो. असं वाटतं किती वाईट आई आहे मी. पण इतक्या दिवसांच्या वर्षांच्या कष्टाने घडवलेले करियरही सोडावे वाटत नाही. कधी कधी वाटतं खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. मी त्या निष्पाप जीवाला वेळ नाही देऊ शकत तर या जगातही आणायला नको होते."
" आता तो या जगात आला आहे तेव्हा असला काही विचार करू नकोस. काही जबाबदाऱ्या शशीलाही देत जा. तो बाप आहे. त्याची फार इच्छा होती ना बाळ व्हावी अशी मग आता पाहा म्हणावं बाळाला. " पिहू रिद्धीला म्हणाली.
" त्याचे नाव नको काढूस पिहु. त्याच्यामुळेच आपली मैत्री संपुष्टात आली आणि त्याच्यामुळेच माझे करिअरही धोक्यात आले आहे. मला त्याच्या आई व माझ्या आई सोबत एकटं सोडून निघून जायचा. दोघींमधले वाद ऐकून ऐकून मला दम कोंडी व्हायची. पण घरी आल्यावर त्याला काही सांगितले, त्याच्याजवळ काही बोलले तर म्हणायचा आताच ऑफिस मधून आलो आणि झाली तू सुरू. थोड्यावेळाने रात्री झोपायच्या वेळी बोलली तर म्हणणार आता मी झोपूही नाही. " रिद्धीचे डोळे बोलता-बोलता भरून आले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा