दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 37
"पिहू तु शुद्धीवर आहेस? तू ड्रिंक घेत आहेस पिहू?" त्याने काळजीच्या स्वरात पिहूला उलट प्रश्न केला.
"थोडीसी तो पि ली है......" पिहू तिला सुचेल तसे जुने गाने गाउ लागली.
"पिहू, तुला माहित आहे ना तुझ्या पोटाची अवस्था? तरीही तु ड्रिंक घेत आहेस?" तेजस.
"मग काय करू? नारळपाणी पिऊनही कोणता असा फरक पडला आहे?" पिहू हसली.
"पिहू असं पिऊन पडून काहीच होणार नाही आहे. तुला तुझ्या हक्कासाठी लढावे लागणार. त्या कपटी रिद्धीने फेकलेल्या जाळ्यातून बाहेर निघायची उद्या शेवटची संधी आहे तुझ्याकडे. तेव्हा उद्याच्या मुंबई कन्फाईनमेंट सेंटरच्या यशस्वी कॅम्पेन निमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलायचे, स्वतःचे क्रेडिट कसे परत मिळवायचे याचा विचार कर. समजलं." तेजस तिला म्हणाला.
" तू अजूनही तिथेच अटकून आहेस. मला काहीच सिद्ध नाही करायचे आहे तेजस ना काही मिळवायचे आहे. चल गूड नाईट बाय बाय." पिहूने कॉल कट करून मोबाईल स्विच ऑफ करून ठेऊन दिला. तिच्या मनात आले जेव्हा ज्यांच्यासाठी इतके वर्ष राब राब राबली तेच माझे विचारसरणी समजू नाही शकले तर जगाला काय समजवत बसायचे? पण तेजस म्हणतो तसे रिद्धीने खरंच छलकपट केला असेल का? कदाचित माझी कस्तुरीला बाय बाय म्हणायची वेळ आली आहे. तिच्या मनात आले.
सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन कॉफीचा एक एक घोट घेत पिहू लॅपटॉपवर नवीन जॉब शोधू लागली. तिला आता परत कस्तुरीत पाय ठेवायचीही इच्छा नव्हती. म्हणून तिला लवकरात लवकर नवीन नोकरी हवी होती. दुपार झाली. जेवायला काय करायचे या विचारात असताना तिच्या कानावर मोबाईलची रिंग ऐकू आली. मिसेस कस्तुरीचे ला मोबाईल स्क्रीनवर झळकले. तिने मोबाईल सायलेंटवर करून किचनमध्ये निघून गेली. त्यांनी पिहूला त्या प्रोजेक्ट मधून काढल्यावरही पिहुने शब्दानेही त्यांना तक्रार केली नाही. त्यांना तिचे असे शांत राहणे, नवीन नव्हते. मात्र यावेळी ते एका हुशार, चनाक्ष व कष्टाळू एम्प्लॉयीला मुक्ती अशी त्यांना भीती वाटली. म्हणून त्यांनी पिहूची समजूत काढण्यासाठी स्वतःहुन तिला कॉल केला. पिहूने आजवर कधीच त्यांचा कॉल नाकारला नव्हता. म्हणजे ती सध्या नक्कीच खूप दुःखी आहे. पण त्यांना तिला अति महत्व देऊन डोक्यावरही बसवायचे नव्हते म्हणून त्यांनी तिला मेसेज केला,
"पिहू असे वागून तुझे जनरल मॅनेजर पद तू धोक्यात टाकत आहेस. संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाला ये. आपण बोलू. एक प्रोजेक्ट तुझ्या हातून काढला म्हणून काय झाले? आणखी बरेच प्रोजेक्ट येणार आहेत. आपली सहिष्णुता दाखवून तु किती योग्य कॅंडिडेट आहेस कस्तुरीची डायरेक्टर बनण्यासाठी ते सिद्ध कर."
पिहूने लंच करता करता मेसेज वाचला. नक्की काय करावे तिलाही कळत नव्हते. कार्यक्रमाला गेल्यावरही सर्व तिच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहतील, जे तिला अजिबात नको होते. एक वेळ कोणी तिच्यावर हसले तर चालेल. पण एखाद्याच्या नजरेत स्वतः विषयी सहानुभूती पाहताच तिचं डोकं ठण ठण ठणकायचं. पण आज या कार्यक्रमाला गेली नाही तर मी हरली हेच सर्वांच्या मनात पक्क होईल आणि ती दिसेल तिथे या विषयावरून तिला पुन्हा पुन्हा बोलले जाईल.
तेव्हा ती तिची हारही आनंदाने पचवते हा संदेश सर्वांना देण्यासाठी तिने त्या कार्यक्रमाला अगदी तिच्या नेहमी पेक्षाही जबरदस्त रुबाबात हजेरी लावायचे ठरवले. तिने साऊथ कॉटन, रंगाला हिरवीकंच, सोनेरी बारीक काठ, पदराला गोंडे लावलेली प्लेन साडी घातली. त्यावर साजेसे छोटेसे हिरे जडीत कर्णफूल, गळ्यात चैन, एका हातात सोनेरी कडे व दुसऱ्या हातात घड्याळ, पायात पातळ अँकलेट घालून शेवटी तिने भुवयांवर पेन्सिलने टचप करून भुवयांच्या मधोमध एक छोटीशी टिकली लावली. ओठांवर तिची आवडती फिक्कट गुलाबी लिपस्टिक फिरवली. मग केस मोकळे सोडून स्ट्रेटनरने ते स्ट्रेट केले. स्वतःलाच फ्लाईंग किस देऊन ती कार्यक्रमाला गेली.
मोबाईल हातात पकडून जेव्हा तिने कार्यक्रम असलेल्या हॉलमध्ये प्रवेश केला सर्व नजरा तिच्यावरच थांबल्या. आज पिहू तिच्या अगदी हटके अंदाजात दिसली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा