दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 38
मोबाईल हातात पकडून जेव्हा तिने कार्यक्रम असलेल्या हॉलमध्ये प्रवेश केला सर्व नजरा तिच्यावरच थांबल्या. आज पिहू तिच्या अगदी हटके अंदाजात दिसली. उपस्थितांपैकी कोणीही तिला आजवर कधीच अशा अवतारात बघितले नव्हते. कधीतरी तिने सांस्कृतिक दिवसाला साडी घातली असेल पण आज काही वेगळाच शृंगार तिचा. हृदय घायाळ करणारे तिचे रूप. तिने वयाची पस्तीशी पार केली आहे असे कोणीच म्हणणार नाही.
"अरे वा आज स्वर्गाची अप्सरा धरतीवर आली की काय?" गार्गीने हसत डोळा मारला.
"थँक्यू गार्गी." पिहू बोलली.
"मॅम, खूप छान केले तुम्ही आलात. तुम्ही या प्रोजेक्टच्या करता धरता आहात. रात्र रात्र जागून आपण डाटा जमवून याच्या टेम्पलेट बनवले आहेत आणि श्रेय मात्र कोणी दुसरंच घेत आहे." गार्गीने तिचे मन मोकळे केले.
" गार्गी इथे नको. बोलू आपण कधीतरी यावर बाहेर. " पिहू चेहऱ्यावरिल आपले सुहास्य कायम ठेवत तिला म्हणाली.
"हो मॅम पण आपले वर्चस्व असेच दाखवत रहा. कोणी कितीही डावलले तरीही मागे हटू नका." गार्गी बोलली.
" ठीक आहे मी आता इतर पाहुण्यांना भेटते. त्यांच्यावर आपली सकारात्मक छाप सोडायला हवी ना. " पिहू तिला म्हणाली.
" हो नक्कीच मॅम. " गार्गीने होकारार्थी मान हलवली.
" चल मग आता हे तुझ्या मनातील फर्स्ट स्टेशन बाजूला ठेव आणि आनंदी चेहऱ्याने सर्वांना सामोरे जा. हेच आपल्या टीम मधील इतर मेंबर्सलाही सांग. " पिहू ने तिला समजावले. मान हलवत ती बाजूला झाली.
पिहू मिस्टर आणि मिसेस कस्तुरी जवळ गेली.
"पिहू, किती गोड दिसत आहेस तू." मिसेस कस्तुरी तिला म्हणाल्या.
"पिहू, किती गोड दिसत आहेस तू." मिसेस कस्तुरी तिला म्हणाल्या.
" हो आत्ताच कोणीतरी बोललं मला की तुमची आवडती एम्प्लॉयी आज अगदी लावण्यवतीच्या रूपात आली आहे." मिस्टर कस्तुरीने पिहूचे कौतुक केले. ते पुढे म्हणणार होते की लवकरच एखाद्या राजकुमार शोधून घे वगैरे वगैरे पण पिहूची विचार सरणी व तिच्या मनात लग्नाबद्दल असलेला राग त्यांना चांगला माहीत होता म्हणून त्यांनी आपला मोह आवरला.
" मला माहित होतं तू नक्की येशील. मी सर्वांना सांगितलं ही होतं तू येणार आहेस. थँक्यू पिहु तू माझ्या शब्दाचा मान ठेवलास." मिसेस कस्तुरी तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला म्हणाल्या, "चल तुझी कस्तुरीसोबत नव्याने जुळलेल्या महत्त्वाच्या लोकांची ओळख करून देते."
तिकडे पिहूला इतक्या छान अवतारात कार्यक्रमाला आलेलं पाहून रिद्धीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिला वाटलं होतं की पिहू तिच्या हातातून काढून घेतलेल्या प्रोजेक्टच्या यशस्वी कॅम्पेन निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुळीच इथे येणार नाही आणि आली तरीही तिला पदोपदी रिद्धीच्या सांत्वनाची गरज लागेल. मात्र हे उलट चित्र तिच्या नजरेस पडले. मेहुणे एकदाही रिद्धीकडे बघितले नाही किंबहुना तिला तशी फुरसतच मिळाली नाही.
" सगळं काही खूप छान आहे बेटा. पण तुझं हे डिंक संस्कृतीला स्वीकारणं आम्हा म्हाताऱ्यांना काही पटत नाही. " मिस्टर कस्तुरीचे वडील पिहूला म्हणाले.
" बाबा प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरून निश्चित होतो. तिचे अनुभव वेगळे आहेत. तेव्हा हा विषय नको. " मिसेस कस्तुरी पिहूच्या बाजूने बोलल्या.
" हो, पण मी ऐकलं आहे पिहूचे यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे ती आता जास्त दिवस डिंक (DINK - double income no kids ) राहणार नाही आहे." आली रिद्धी पिहूच्या जखमेवर मीठ चोळायला. ती बोला तिच्यापासून अशी अपेक्षा नव्हती. तरीही आपल्या आत दडलेल्या अग्नीला बाहेर न येऊ देता चेहऱ्यावर स्मित हास्य आणून पिहू तिला म्हणाली,
" रिद्धी मॅम, मी तुमच्या इतकी कॅपेबल मुळीच नाही. एका दूध पित्या बाळाला सांभाळत, स्वतः चा पोस्ट पार्टम डिप्रेशनचा काळ सुरु असतांनाही किती छान कॅम्पेन पार पाडलं तुम्ही. म्हणजे दिवसभर ऑफिसात राबणे, घरी बाळाला झोपवून रात्रभर जागून डाटा जमा करने, मग पीपीटी बनवणे आणि इतका ताण असतांनाही चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवून सर्वांना सामोरे जाणे. हे खरंच तुम्हालाच जमायचं. माझ्यात इतकी हिंमत नाही आहे." मिसेस कस्तुरीला पिहुच्या बोलण्यातील टोमणे स्पष्ट जाणवले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा