दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 39
त्यावर रिद्धीही हसून बोलली, " पुरे माझं कौतुक. मला माहित आहे मी खूप कॅपेबल आहे. आपले कायदा सल्लागार, मिस्टर तेजस, त्यांनी तुला लग्नासाठी प्रपोज केल्याचे व तू ते ऍक्सेप्ट करून त्यांनी दिलेली रिंग घातल्याचे माझ्या कानावर आलं होतं. मी तुझ्या लग्नासाठी शॉपिंगही सुरु करणार होती. "
"असं होय. मला कोणी प्रपोज केलं, अंगठी घातली आणि मलाच माहित नाही. अरे देवा." पिहू तोंडावर हात ठेऊन हसली. मग आपला हात रिद्धीला दाखवत तिने विचारले, "हे बघ, दिसते माझ्या बोटात काही नवीन?"
तिच्या हातात फक्त ती नेहमी घालत असलेली एक मोती जडीत चांदीची व एक सोन्याची अंगठी होती.
रिद्धी तेजसचे नाव घेऊन पिहूला आणखी काही बोलणार तोच मिसेस कस्तुरीने तिला नजरेनेच तोंड बंद करण्याचा इशारा केला. कार्यक्रमात लीगल ऍडव्हाइजरच्या नात्याने आलेला तेजसही पिहूला सपोर्ट करण्यासाठी तिच्या दिशेने आलेला. त्यानेही पिहू तिचा हात रिद्धीला दाखवत असलेला प्रसंग बघितला. तेव्हा तिच्या बोटात त्याने घालून दिलेली अंगठी त्याच्या दृष्टीस पडली नाही. नक्कीच पिहुने ती अंगठी रिद्धीमुळे काढून ठेवली असेल. पण तशी गरजच काय आहे. सध्या पिहूला आमचे नाते जग जाहीर करणे जास्त मदतीचे ठरले असते. मग पिहुने असे का केले?
"अरे वकील साहेब एकटे काय करत आहात?" कोणीतरी तेजसच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारले.
" काही नाही काका, असंच पाहतोय कोण कोण ओळखीचे आहे त्यांना भेटतोय. " तेजस उत्तरला, " बाकी तुम्ही कसे आहात? "
" चांगला आहे पण तुझे आजोबा तुझी खुप आठवण काढतात. एखादेवेळी ये घराकडे भेटून घे त्यांना. " तेजसचे काका त्याला म्हणाले. तेजस यावर काहीच बोलला नाही.
" मला माहित आहे त्यांची विचारसरणी तुला पटत नाही. त्यांनी जरा जास्तच सक्ती दाखवली तुझ्यावर. पण तसे दिवस त्यांनी पाहिले आहेत. त्यांचे अनुभव वेगळे आहेत." काका त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, " प्लीज आपली जिद्द सोड, एखादी चांगली मुलगी पाहा आणि लग्न करून घे. तसं मला तर वाटत आहे तुला ती मुलगी आवडली आहे. चांगले नाव आहे तिचे , कस्तुरीमध्ये. तू म्हणशील तर तुझ्या आई व काकूला घेऊन जातो तिच्या घरी. " काका पिहुकडे इशारा कडून त्याला म्हणाले.
" त्याची काहीच गरज नाही आहे काका. मला जेव्हा इच्छा होईल मी बोलेल तिच्याशी. " बाकी इशू व निशु ठीक आहेत? अभ्यास कसा सुरु आहे त्यांचा बारावीचा?"
"छान आहे सगळं. चल काही लागलं तर मी आहे." तेजसचे काका मिस्टर कस्तुरीच्या आजोबांशी बोलायला गेले.
तेजस ला लवकरात लवकर पिहूला भेटून अंगठी बद्दल विचारायचे होते मात्र सतत कोण ना कोणी त्याला मध्येच लागले परिणामी तो पिहु पर्यंत पोहोचू शकला नाही. तिकडे पिहू सर्वांच्या भेटीगाठी घेऊन घरी परत जाण्यासाठी पार्किंग मध्ये पोहोचली. कारचे दार उघडणार तोच कोणीतरी तिच्या कमरेत हात टाकला. ती जागीच गारठली. तो स्पर्श तिच्यासाठी अनोळखी नव्हता. पण तो पार्किंग मध्ये अशा तऱ्हेने तिच्याजवळ येईल याची तिला अपेक्षा नव्हती.
"तेजस, काय करत आहेस तू?" पिहुने त्याला विचारले.
"काय म्हणजे, जे नेहमी करतो तेच." तो तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवत उत्तरला.
" तेजस मला तुझ्याशी बोलायचे आहे." पिहू स्वतःला ताब्यात ठेवत त्याला म्हणाली.
" बोल ना मग मी कुठे थांबवले आहे तुला. " तो तिच्या कानशीला सोबत चाळे करत बोलला.
"इथे नको, आपण कुठेतरी जाऊन बसून बोलू." ती त्याला बाजूला करायचा प्रयत्न केला.
" का इथे काय प्रॉब्लेम आहे? " तेजसने त्याच्या हातांची पकड तिच्या भोवती आणखीच घट्ट केली.
" तेजस प्लीज समजून घे. तुला माहित आहे ना मला बळजबरीचे नाते आवडत नाही. " पिहू नाराजीच्या स्वरात त्याला बोलली.
"बळजबरीचं नातं? असं कसं म्हणू शकतेस तू पिहू? आजपर्यंत मी कोणत्यातरी गोष्टीसाठी तुझ्यावर कधीतरी बळजबरी केली आहे का? " तेजसने तिला सोडून दिले.
"नाही केली. पण मला, मला हे नातं बळजबरीचेच वाटतेय. मी तुझ्या सोबत आणखी पुढे नाही जाऊ शकत." पिहूने पर्स मधून त्याने तिच्या बोटात घातलेली अंगठी काढून त्याला देऊ केली.
"पिहू तु सिरीयस आहेस?" तेजसने तिला विचारले.
" मी खूप सिरीयस आहे तेजस. हे लग्न वगैरे माझ्यासाठी नाही आहे. मी डिंक आहे आणि राहणारही. तुझ्या नावाची लेबल माझ्या नावाला लावून मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची नाही आहे. मला माझ्या जोरावर उभे राहायची सवय झाली आहे. मला नकोय तुझा सहारा." पिहू त्याच्या हातावर अंगठी ठेऊन तिच्या गाडीत बसली.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा