दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 40
पिहू पुन्हा मन लावून काम करण्यावर भर देऊ लागली. पण तिचे चित्त आधीसारखे एका गोष्टीवर टिकून राहने बंद झाले. रिद्धी ऑफिसमध्ये असतांना रोज काही ना काही असे करत असे ज्याने पिहूला त्रास होईल. पिहू घरी आली की शेजारीही रिद्धीच. त्यामुळे तिला एक प्रकारे उदास वाटू लागले. मिसेस कस्तुरीला जणू तिची अडचण समजून आली. त्यांनी रिद्धीला मुंबई ऑफिसचे जनरल मॅनेजर पद बहाल करून पिहूला परत पुण्याला पाठवले. ऑफिसमध्ये चांगलीच गॉसिपिंग सुरू झाली. पिहूने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तिला माहित होते की तिने कितीही सांगितले, स्पष्टीकरण दिले तरीही तिच्याबद्दल काही ना काही बोलले जाणार आहेच. यावर एकच उपाय कंपनी स्विच करायची. तिने तिचे लिंकडीन (LinkedIn) प्रोफाइल अपडेट केले. ती नव्या जोमाने नोकरीसाठी मुलाखती देऊ लागली व होईल तसे कस्तुरीचे काम सुद्धा पाहू लागली. मात्र कस्तुरीसारखे हाय प्रोफाइल तिला होकार दिलेल्या कंपनीत दिसून आले नाही आणि इतरांना तिच्या विचारसरणीमुळे ती नको होती.
तिला काही कळत नव्हते. स्त्रीने मुलांना बघण्यासाठी सुट्ट्या घेतल्या तर ती काम न करण्याची बहाणेबाजी ठरते. एखादी स्त्री स्वतः हुन चोवीस तास काम करू इच्छिते तर तीही यांना नको असते. मग हवं तरी काय या कंपन्यांना? अनिताने तिला पिहूने स्वतःची इमेज लोकांमध्ये सुधारण्यावर भर द्यायला हवे असा सल्ला दिला. त्यासाठी ती जरी डिंक असली तरीही तिला लहान मुलांमध्ये राहायला आवडतं, ती सर्वांना समजून घेते, तिच्यात एका स्त्रीमध्ये जन्मता असणारा मातृत्वाचा अंश आहे हे दाखवायला हवं. पिहूने तिचा सल्ला ऐकून दोन दिवस तिच्या घरी राहून तिच्या मुलासोबत चित्रीकरण करण्याचा बेत आखला. मात्र पहिल्याच दिवशी त्या पाच सहा वर्षाच्या मुलाने पिहूला आपल्या प्रश्नांनी बेजार करून टाकले.
" यापेक्षा मी बाहेर देशात नोकरी करायला जाईल. " पिहू अनिताला म्हणाली, " किती पटरपटर करतो तुझा मुलगा."
" काहीही, किती गोड बोलतो तो. मी तर त्याला त्याच्यासारखीच बहीण आणायची तयारी करत आहे. " अनिता तिला म्हणाली.
" म्हणजे परत गरोदर आहेस की काय?" पिहूने तिला विचारले.
" तिसरा महिना सुरू आहे. " अनिता आनंदाने उत्तरली.
" दाद द्यायला हवी तुझ्या हिमतीची व तुला झेलणाऱ्या अजितची. " पिहू गंमतच आश्चर्योद्गार काढत बोलली.
" त्याला काय करायचे आहे?" अनिताने प्रश्नार्थक नजरेने पिहू कडे बघितले.
" घर चालवण्यासाठी पैसे त्यालाच कमवायचे आहे ना." पिहू उत्तरली.
" हो, पण त्यात काय. वडिलोपार्जित घर आहे. त्याचे ऑफिसही छान सुरू आहे." अनिताने स्वेटर वीणायला घेतले, "तुही तेजस सोबत लग्न करून घ्यायला हवे होते. किती छान आहे तो. ही आधीच एका लेकराची आई नसती ना त्याला नक्कीच पटवले असते."
"त्याचा विषय नको. मला माझं नाव उंचीवर न्यायला कोणाच्याही खांद्याची गरज नाही." पिहू तिला म्हणाली.
थोड्या वेळात अजित कामावरून परतला. पिहूने त्याची विचारपूस केली. तिला तो नेहमी सारखा भासला नाही. कसल्याशा विचारात असल्यासारखा वाटला. तिची इच्छा झाली त्याला कसली चिंता आहे का हे विचारण्याची. मात्र कदाचित अनिता म्हणते तसे आपण जास्तच विचार करायला लागलो आहे असे तिला वाटले म्हणून तिने जास्त खोलात न शिरनेच योग्य समजले. तिने पुन्हा अपडेट करून वेगवेगळ्या बाहेर देशातील कंपन्यांमध्ये पाठवला. आता तिला या बुरसटलेल्या विचारांच्या देशातही राहायचे नाही असे ती मनोमन विचार करू लागली. कसातरी एक दिवस अनिता व तिच्या मुलासोबत काढून लिहू आपल्या फ्लॅटवर परतली. पाहते तर तेजस आतमध्ये सोफ्यावर पाय पसरवून ड्रिंक करतोय.
" तेजस मी सांगितले ना मी आयुष्यभर तुझी साथ नाही देऊ शकत. मी फार मुडी, एकटेपणाची सवय पडलेली मुलगी आहे." पिहू त्याला पाहताच बोलली.
" मुलगी! बाई आहेस तू. " तेजस एकवार तिला वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाला.
" तू कशाला आलास इथे? " पिहूने चिडून त्याला विचारले.
" टाइमपास करायला. " तेजस उत्तरला.
" तेजस परत जा. " पिहूने त्याचा हात पकडून त्याला उठवले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा